Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

पत्रांक ४६१

श्री १७१८


यादी राजश्री नारायण बाबूराव वैद्य यांस राजश्री सेनासाहेबसुभा यांणीं दरबार खर्च वगैरेचे ऐवजीं कृपा करून दिल्ही. त्याचा ठराव सु।। सबा तिसैन मया व अलफ.
१ तूर्त करून देण्याची.
१ प्रांत वराड येथें दोन हजार रु।। तनख्याचा गांव वंशपरंपरापुत्रपौत्रादि इनाम करून द्यावयाचा करार ठरला आहे. त्याच्या सनदा करून द्याव्या.
१ चिरंजीव अन्याबा यांस पालखीसुद्धां तीन हजार रु।। तैनात करून देण्याचा ठराव जाहला आहे. त्याप्रों सिलेखान्याकडून दरमहाची परवान रु।। अडीचशेंची सदर देवावी. कलम.
१ पदरचे कारकून यांस आ। तीन, दर दोनशांप्रों, करून देण्याचा ठराव जाहला आहे. त्यांची नेमणूक करून देवावी.
-----

१ बशर्त मंडल्याचा आमल बसल्यावर खातरजमा पटे ऐसी हमीचिठी रु।। पन्नास हजारांची सावकारी अनभवावी.
----

पत्रांक ४६०

श्री १७१८


यादी कलमें.
१ दौलतीसमंधें हिसेब तीर्थरूप कैलासवासी यांचे वेळेपासून आजपर्यंतचे आहेत, त्याजवर मखलाशा करून घ्याव्या व हिसेवाअन्वयें आमचा ऐवज सरकारांत घेणें निघेल त्याचा फडशा करून द्यावा.
(* हे दौलतराव शिंद्यांचे तोडचे शब्द कारकुनानें यथोच्चार लिहून काढले आहेत.)
१ नगरचा किल्ला व दौलताबादचा किल्ला, महाल सरंजामी, सुदामतपासोन आहेत. त्यासुद्धा दोन्ही किल्ले द्यावे.
१ मामले बीड दरोबस्त व प्रो पाथरी व प्रो नेवासें, हे तिन्ही माहाल दरोबस्त लाऊन द्यावे.
१ दौलतीसमधें वगैरे किरकोळ कलमें आहेत ती उगऊन द्यावीं.
१ हालीच्या बोलण्याबाबत ऐवज येणें आहे तो झाडबाकी फरशा करून द्यावा.
-----

येकूण पांचही जाबसाल कलमाप्रमाणें उगऊन द्यावें.

पत्रांक ४५९

श्री. १७१८


याद मसुदा.
१ मल्हारजी कनसे व हनवतराव कनसे, मौजे पिपळवडी, प्रा। पयेठण, तुजकडे बहेरजी ताकपीर याचे स्वाधान, आजबास कारभार समधी जवाहर व कापड दरबाबी फितूर करून घेऊन आलास. ते सरकारी रुजू न करतां, आपले घरीं श्वस्त बसलास. ह्मनान सरकारांतून मसाला रु।। १००० हजार काये तुजवळ चीजबस्त असल ती सरकारांत घेऊन येणें

पत्रांक ४५८

श्री. १७१८


यादी श्री रामचंद्र तुलसीबाग का। पुणें येथील वर्षासन का। पाटस पौ दरसाल दोनशे रुपये राजश्री दौलतराव बावा सिंदे यांजकडील नेहमी नेमणुक आहे. त्याजपौ कमावीसदाराकडून ऐवज येणें
-----------------------------------------रु।।
७३७।।-          बाकी ता। फाल्गुन अखेर शके १७११
१४००             ई।। सन इहिदेतिसैन ता। सन सबातिसैन सालें ७, दरसाल रु।। २०० प्रो।.
--------
२१३७।।-

पौ वसूल------------------------------------------रु।।.
          ९७।।- शके १७१४ चैत्र.
            २०० शके १७१६ खमस तिसैन बा।.
            ------------
            २९७।।-

बाकी येणें------------------------------------रु।।.
                                                                    ----------
                                                         १८४०

पत्रांक ४५७

श्री. १७१८


यादी संस्थान मंडले व किल्ले चौ-यागड राजेश्री रघोजी भोंसले सेनासाहेब सुभा यांजकडे द्यावयाचा अलाहिदा करार आहे. त्याविसीं सनदी व पत्रें, सु। सबा तिसैन मया व अल्लफ.

१ बाळाजी गोविंद यांस सनद कीं:-

१ राजश्री रघोजी भोंसले सेनासाहेबसुभा याजकडे संस्थान मंडले पो अठ्ठेचाळीस हजार तीनसें रु।। याचा सरंजाम सरकारांत ठेऊन बाकी द्यावयाचा करार. त्याप्रों। हालीं सरकारांतून कारकून पाठविले आहेत. यांचे स्वाधीन अठ्ठेचाळीस हजार तीनशाचा माहाल करून, बाकी संस्थान ठाणें जातसुद्धां सेनासाहेबसुभा यांजकडील अंमलदार येतील त्याचे हवाला करून कबज घेणें, ह्मणोन.

१ किल्ले चौरागड सरंजाम सुद्धां सेनासाहेब सुभा यांजकडे द्यावा. हवाली करून हे सनद सादर केली असे. सेनासाहेबसुभा यांजकडील अंमलदार येतील त्याचे हवाले करोन कबज घेणें ह्मणोन.
------


२ सदरहू अन्वयें शिरस्ते प्रों जमीनदारांस पत्रें.
             १ संस्थान मंडले.
            १ किले चौरागड.
              -----
             २
----

सदरहू प्रों दोन सनदा व दोन पत्रे शिरस्ते प्रों.

पत्रांक ४५५

श्री १७१८

यादी सेनासाहेबसुभा यांजकडील जाबसाल ठरले त्याची माहितगारी.
१ मागील बाकीचे ऐवजीं ठरलें ते.
८०००००                    पुर्जा माघारा द्यावा.
६०००००                    सरकारांत मसलतीस आले तेव्हां येतांना वाटेनें घेतले ते.
१५०००००                   नग्द द्यावे. सरकारचे हप्ते तीन येतील त्याजबराबर यावे
                                ह्मणोन करार.
---------------
२९०००००

शिवाय उभयतां कारभारी यांस दोन लक्ष द्यावे ह्मणोन कुपिया करार आहे.
१ कायरबोरी, येदलाबाद, कवाल, उदेपूर वगैरे महालांत पेशजीं चालत आल्याप्रमाणें अमल द्यावा ह्मणोन दसकतीनिशीं करार आहे.
१ घांसदाणा याबद्दल ठरेल तें.
        ३१८००० नबाबाकडील माहालांत लाऊन देणें ह्मणोन करार ठरला. माहाल लाऊन देणें आहे.
        ३२००० उमरखेड वगैरे माहालांत पेशजींपासून घेत आले. त्याप्रो घ्यावें.
           -----------
        ३५००००

सदरर्हू ऐवजाचे नबाबाकडील माहाल लाऊन द्यावे.

१ सरकारांत रेवादक्षणतीर पौ चार लक्ष कमालाचे बा। सनदा माहाल दिल्हे. त्याविसीं बुंदेले यांस ताकीद पत्रें.

पत्रांक ४५४

श्री. १७१८


राजश्रिया विराजित राजमान्य राजेश्री भगवंत रावजी स्वामीचे सेवेसीः-

पो अमृतराव रघुनाथ कृतानेक साष्टांग नमस्कार विनंति येथील कुशल जाणोन स्वकीय कुशल लिहीत जावे. विशेष. राजश्री काकानीं आपल्याकडून ऐवज देविला. त्याजकरिता स्वार मुजरद पाठविला. च्यार दिवस जाले. अद्याप ऐवज आला नाही. तूर्त दोन हजार रुपये देविले आहेत. तरी, हाली विळूरीहून ऐवजास स्वार आले तेच रवाना केले आहेत. तरी, लिया प्रे।। ऐवज आपली सिबंदीची माणसें देऊन ऐवज चापळ येथें पावता करावा. ह्मणजे पुढें विळूरीं आह्मी रवाना करूं. वरकड नवल विशेष ल्यावयाजागें नाहीं. भिल्लांचा उपद्रव, यास्तव सरंजाम येथें आला आहे. शेपन्नास भिल्ल ठार जाले. नित्य स्वारी होत आहे. आपल्याकडील सविस्तर ल्याहावें. सत्वर ऐवज व स्वार पाठवावे. बहुत काय लिहिणें ? लोभ करावा. हे विनंति.

पत्रांक ४५३

श्री १७१८


यादी. सनगे नानांचीं सु।। सबा तिसैन मया व अलफ.

१ पडदाळे मखमाली                   २ शेले जाहनाबादी कोरे.
१ बटवा किनखापी लहान.            १ पागोटें ज्याहानाबादी कोरें.
१ पायेजमा किनखापी                  १ दुपट्टा जाहनाबादी धुवट.
१ वही कोरी वर बनात हिरवी.       १ दोरव्याचे महमुदी दुमडा
१ सोवळें मर्दानी जुनें.                       हात ११
१ अंबव्याची रेंजा हात २ दोन       १ अतीस दुमडा हात २
हात असे                                 २
१-----                                    ------
७                                          ८
                                                      -----
                                            १५
एकूण पंधरा सनगें आहेत.

पत्रांक ४५२

श्री १७१८


विज्ञापना. इकडील वृत्त. बाहादरजीची स्वारी घाटीवर पर्णेयाहून साताकोसांवर येऊन दाखल जाली, तों घाटीखालीं झाडून रांगडे जमा होऊन पाचसात हजार पायेदळ व स्वार च्यारसे-पाचसे याप्रों जमाव करून, जमलपूरचें ठाणें उठऊन दिल्हें. ऐसी सर्व जागां सुदीखाली रांगड्यांनीं कोटी केली. याजकरितां त्याचे तोंडावर व पारपत्याकरितां राजश्री मिर्जा-गनी-बेग याजला पाठविले आहेत. परंतु त्याचा भरणा बंदुकेचा बहुत आहे. दुसरें या जिल्ह्यांत जागा आहेत. परंतु त्याचा भरणा बंदुकेचा बहुत आहे. दुसरें या जिल्ह्यांत जागा आहेत त्या सर्व भयभीत नाईक मृत्यपावल्यापासून जाले आहेत. बिथरियेवाले व भगले व बुंदले या त्रिवर्गाचें पारपत्य चांगले जाल्या खेरीज जरब बसावयाची नाहीं. फौजेंतहि गवगवा बहूत आहे. कोणी कोणाचे येकविचारांत नाहींत. ऐसा प्रकार येऊन बाजसाला काल्पीकराकडील उभयताकडूनहि येकाचीहि पागापथक येऊन पावलें नाहीं. याणीं त्यास हि लेहून पाठविलें आहे कीं, आपले सरजामानिसी येऊन दाखल होणें, अपणाकडील ऐवज काल्पीकराकडे येणें. त्याविसीं याणीं निक्षूण ताकीद काल्पीकरास लेहून पाठविली कीं, आजवर वरातीचा ऐवज पटला नाहीं, याचें कारण काये, त्यास हालीं पत्र पावतांच ऐवजाची तोडजोड लाऊन द्यावी. त्याजवरून कांहीं तोडजोड लाऊन देणार आहेत. याप्रमाणें येथे लिहिलें आलें. भोसले याजकडील येणें वकील राजश्री केशवराव आले होते, याजकडील हि तिकडे कारकून गेला होता. दोन तीन दिवस त्या वकीलास ठेऊन घेतले होतें. सिष्टाचारीकरीतां आले होते. दोन दिवस राहून घेऊन, दोन वस्त्रें जातेसमई त्यांस दिलींत. तो आपले ठिकाणीं उदास होऊन गेलेत मेहरची जागा मातबर. तेथें रांगडयांनी येऊन मोर्चे लाविले. त्यांचे बंदोबस्ताकरितां कांहीं पागे पथकें नेमलींत. परंतु लवकर जाऊन पावत नाहींत. येथून त्याचीं ठाणीं दाहाबारा कोसांवर आहेत, तीं अद्याप उठून जात नाहींत. रांगड्याची चांगली येकवेळ पारपत्यें जाल्याखेरीज जरब बसणार नाही. निंबाळकराकडील कारभार येथे आह्मापासीं नित्य येतात कीं, आमचा बंदोबस्त तेथे नाईक साहेबाचे पुत्र आहेत. आपले विद्यमानें येखादा जाबसाल होऊन हिकडे त्याची येणी जाले ह्मणजे भरवसा चांगला त्यास येईल. शेवेसी श्रुत होये. हे विज्ञाप्ति.

पत्रांक ४५१

श्री. १७१८

हाजी अबदुल नि।। वलीआहदबहादूर हुजूर आहे, याविसीची आंदेशा लिहिला. तर, शानिजामदीन याची रीत तुह्मास वाकफ जालीच आहे. येशवंतराव सिंदेयाचा प्रकार समजलाच आहे. त्यापक्षीं येथून हाजी-आबदुल-मजीद व सरकारचे तर्फेचा मातबर कारकून नेमून दिल्हा आहे. ते उभयतां हुजूर पातशाहाचे खर्चाचे माहाल वगैरेचा बंदोबस्त राखून रजावंदी राखितील. तुह्मी त्याचा उपर राखणें. इसमाल–बेग या (स) ग्वालेरीस आणावयाचें केलें. उत्तम केलें. परंतु पलटणचौकीबरोबर बंदोबस्त पका राखून पोहचावणें ठीक असें. नबाब, वजीर व पामरसाहेब वगैरे पत्रें आणिविलीं. तूर्त पामरसाहेबास लि।। आहे. तुह्मीं मनन करून, पत्र त्यास पोहचाऊन देणें, त्याचें उतर ते लिहितील व तुह्मासी बोलतील ते सविस्तर लि।।. नबाबवजीर यास आलाहिदा लिहून विशेष आहे ऐसें नाहीं. हें तुह्मीहि जाणत नसाल ऐसें नाहीं. जो सालजाब होणें तो पामरसाहेबाच्याच विद्यमानें होईल. तुह्मी लि।। होतें कीं, च्यार पाच किल्ले कृष्णगडसुद्धां आहेत. नेमणूक हे लक्ष्मण अनंत यांणी कमी केली होती, त्याप्रमाणें असावी ह्मणोन लि।। होतें. तर, तें ठीक नाहीं. पेशजीची नेमणूक आहे तेच बाहाल करून बंदोबस्त राखवणें. बेदील ठाणेयाच्या लोकास न करणें. कृष्णगडास कृष्णाजी आंबादास याजकडील कारकून पोहचलेच असतील. तुह्मापासीहि पावलेच असतील. तर, जलद त्याची दिलभरी करून, रवाना करून देणें. ह्मणजे खातरजमेनें बंदोबस्त राखतील. दिल्लीचे नजीक, आणि जागा मेवातची. यास्तव बरगुजर न करणें, लौकर काम उ ( ल ) गडून देणें.