Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

पत्रांक ५०१

श्री.
१७२२ वैशाख शुद्ध ९

अजम सिद्दी बिलालखां दामोबतहूं.

अज दिल्हे येकलास सिदोजीराव नाईक निंबाळकर सरलष्कर सलाम. येथील खैरखुसी जाणून कलम ताजा करीत जावें. तुम्हीं जदीद सिदी व अरब व हिवसी याचे उमेदवारीचा मजकूर लिहिला. त्यास विलायत आरब याचा सिरस्ता दरमहा रुपये १६ व सिदी याच दरमहा रुपये १३ तेरा व मालपे याचा दरमहा रुपये ११ येंणें  प्रों आहे. त्यास तेथें किती लोक असतील तें पत्र पावतांच घेऊन येणें. सिवाय हिवसी व सिलेदार घेऊन येणें. घोडेमाणूस पाहून बंदोबस्त करून दिल्हा जाईंल व तुमचे जातीचा बंदोबस्त येथें आल्यावर हुजूर करून देऊ. जाणिजे. छ ८ माहे जिल्हेज. ज्यादा काय लिहिणे? हे किताबत.

पत्रांक ५००

श्रीगणपती.
१७२१ श्रावण वद्य १


वेदशास्त्रसंपन्न राजश्री लक्ष्मीनारायण दीक्षित स्वामीचे सेवेसी:-

विद्यार्थी बाजीराव रघुनाथ प्रधान नमस्कार विनंती उपरी येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहीत जावें. विशेष. श्रीचा उत्साह भाद्रपद चतुथींचा सरकारांत आहे. याजकरितां आपणास पालखी पाठविली आहे. तरी आपण सत्वर निघोन यावें. जाणिजे. छ. १८ रबीलावल, सुा मयातैन व अलफ. बहुत काय लिहिणें हे विनंती.

पत्रांक ४९९

श्रीगजानन
१७२२ श्रावण शुद्ध १३

पुा। वडिलांचे सेवेसी शिरसाष्टांग नमस्कार विज्ञापना. राजश्री यशवंतराव होळकर यांचे लष्करांत रा। बाळाजी भाईजी व सदाशिव भाईजी व रामचंद्रजी लोहारेकर बोरनारे जवळ आहे. तेथील ग्रहस्थ हे होळकराचे बहुत स्नेही आहेत. पेशजीं मल्हारराव यांचा कारभार रामचंद्रभाईजी करीत असत. पुढें मल्हारराव यांची गर्दी जाहल्यावर उभयतां सदाशीवपंत व रामचंद्र यांस कासीराव यांणीं कैद केलें. ते दोन वर्षें कैदेंत वाफगांवचे किल्यावर होते. पुढें बाळाजी भाईजी लोहो-याहून येऊन, कांहीं जिवामाफक दरबार खर्च काशीराव यांचे लष्करांत व हुजूर याप्रों करून, उभयतां बंधु मोकळे केले आणि घरीं लोहो-यास गेले. त्याजकडे आमचा ऐवज साडेबारासें येणें आहे. त्यांचा आमचा स्नेह बहुत. जातेसमईं दोन तीन वेळां आह्मांकडे भेटावयासीं आले होते. घरीं जाऊन, दोन तीन महिने राहून, पुढें येशवंतराव होळकर यांचे लष्करांत जावयाचा मंछबा मारनिलेचा होता. त्यास, ते घरीं जाऊन एक वर्ष जाहलें. कोठें आहेत याचा ठिकाण नाहीं. त्याचा व होळकर यांचा स्नेह येथील केवळ+++होता. त्यास या तिघांचा शोध तेथें बारकाईनें लावावा. तिघांतून एक तेथें असल्यास, आम्हांस लिहोन पाठवावें. आमचें पत्र व तुह्मी आमचें भाऊ असें कळलें असतां प्राण देऊन, तुमचे माहालांचा समस्त बंदोबस्त करितील, आणि आमचा पैसाही त्याजकडे आहे. तरी याचा शोध अगत्य लावावा. येथें असतां येशवंतराव व ते बंधू याप्रों घरोबा होता. याजकरितां लिहिलें आहे. शोध लागल्यास जलद लिहून पाठवावें. म्हणजे तुम्हांविशीं वगैरे एक पत्र पाठऊं. म्हणजे ते सर्व बंदोबस्त करितील. हा भरंवसा जाणोन, वडिलांस लिहिलें आहे. वरकड सविस्तर यजमान यांणीं तुम्हांस लिहिलें आहे. त्याजवरून कळेल. आपला जीव जे गोष्टीनें सुटून देशीं येणें होई, असा विचार असेल तो करावा. सविस्तर ल्याहावें. हे विज्ञापना. छ १२ रोवल, श्रावण शुद्ध १३ शके १७२२ सन इहिदे मयातैन व अल्लफ.

लेखांक ३१                                                                                                                                        १६२० आषाढ वद्य ७

                                                                        13
                                                                       
     (फारसी मजकूर )

इजत असार देसमुखानि व देसपांडियानि व मोकदमानि व रायानि व मुजारियानि पा। सुपे सा। जुनर सुबे खुजस्तेबुनियाद सु॥ सन ११०६ कारणे बिदानद पा। मजकुरास इजत असार यादोजी मुरारी सेखदार करुनु पाठविले आहेत तरी पेसजीची कुल हकीकती जाहीर करणे पेस्तर साल मजकुराकारणे याच्ये मारुफातीने साहेबकाम करीत जाणे पा। मजकुरी बाकी दामदीर मजरा राहे ते करणे दरी बाब ताकीद दानद अज तगीर यादो तायदेऊ सेखदार माजुल याचे अमलची बाकी पा। मजकुरी राहिली आहे ते रुजू करुनु बेबाक करणे एक रुका बाकी न राही जाब करणे लागेल मा।

अमल बा। पारसी लिहिले असे तेणे प्रमाणे अमल करणे

तेरीख २१ मोहरम सन ४०

रुजू दफ्तर हिंदवी ता। २१ मोहरम सन ४०

पत्रांक ४९८

श्रीशंकर
१७२२ आषाढ शुद्ध ११

श्रीमंत वेदशास्त्रसंपन्न राजमान्य राजश्री नानाजी स्वामीचे सेवेसीः-

विद्यार्थी विश्वनाथ महादेव थथे सां। नमस्कार बिज्ञापना येथील कुशल ता। आषाढ शुा ११ गुरुवार पो स्वामीचे आसिर्वादेंकरून सुखरूप असों. विशेष. स्वामीनीं कृपा करून पत्र पाठविलें. तें पाहून बहुत समाधान जालें. इकडील वर्तमान तरः श्रीमंत राजश्री दादा जुनराहून निघून वद्य ३० रविवारीं राजश्री बळवंतराव वाकडे यांचे बागांत संध्याकाळीं आले. शुा १ सोमवारीं तेथून निघून गारपिरावर आले. मी भोजन करून गेलों होतें. श्रीमंत चौघे व सिंदे आले होते. भेटी मोठ्या समारंभेंकरून जाल्यानंतर, सिंदे लष्करांत गेले. श्रीमंत राजश्री बाबासाहेब यांचे खवासखान्यांत राजश्री दादा बसले होते. त्यांच्या मागें राजश्री रामरावनाना बसले. समारंभेंकरून वाड्यांत गेले. चार घटका श्रीमंतांसीं एकांत होऊन, नंतर मुरलीमनोहराचे वाड्यांत राहिले. आठ दिवस मुहूर्त वाड्यांत यावयास नवता. याजकरितां आले नाहींत, सर्व मानकरी व ग्रहस्थ मंडळींच्या भेटी, आज अक्रा दिवस जाले, होतात. याजमुळें घटकाभर फावत नाहीं. शुा १० मंगळवारीं राजश्री सिंदे यांच्या येथें मेजवानी श्रीमंतांस जाली. अमृतराव गेले नाहींत. उभयतां व राजश्री दादा गेले होते. जवाहीर त्रिवर्गांस दिल्हें. वरकड मानक-यांस वस्त्रें दिल्हीं. श्रीमंतांनी दादास आजपो सा पोषाक दिल्हे. कंठी मोत्याची व शिरपेंच दिल्हा, शिंद्याकडील कंठी व शिरपेंच आला. शुद्ध ११ बुधवारीं दाहा घटका दिवसास मुहुर्तानसीं वाड्यांत आले. ग्रहस्थ मंडळी वाड्यांत आली होती. सर्वांस विडे दिले. आपला आसीर्वाद सांगितला. मी माझें पत्रांत लिहिलें होतें. यजमानाची स्वारी आलीच असेल. माझा आसीर्वाद सांगावा, याप्रों बोलले, आपलें पत्र यजमानास आल्यास त्यांत ल्याहावें की विश्वनाथ नाईक यांचे पत्रीं आसीर्वाद लिहिला होता; तो प्रविष्ट त्यांणीं केलाच असेल. याप्रों लिहिलें असतां मजकडे लबाडी येणार नाहीं. सूचनार्थ लिहिलें आहे. श्रीमंत राजश्री बाबासाहेब, पांच दिवस जाले, फडावर येऊन बसतात. कारभारही कांहीं मनास आणूं लागले आहेत. आपले आसीर्वादेंकरून बंदोबस्तही लवकर होईल, ऐसें दिसतें. मागाहून होईल तें लिहून पाठऊं. जेष्टाविशीं कल्पना आली आहे. बाह्य वदंता विपरीत बोलतात. अद्याप स्वस्थ आहेत. आपणास कळावें. बहुत काय लिहिणें ? लोभ करावा हे विज्ञापना.

ती। गंगाभागीरथी मातोश्रीबाई यांस बालकाचा सां। नमस्कार, विनंती लिा। परिसोन लोभ करावा. हे विज्ञापना.
पो आषाढ वा। १ शके १७२२.

पत्रांक ४९७

१७२२ ज्येष्ठ शुद्ध १५
पै।। ज्येष्ट कृष्ण २ शके १७२२. श्रीसांब.

श्रीमद्वेदशास्त्रसंपन्न राजमान्य राजश्री दीक्षित स्वामीचे सेवेसी:-

विद्यार्थी बापू गोखले याचे अनेक सां नमस्कार विज्ञापना ऐसीजेः आपली आज्ञा घेऊन निघालों तों गुरुवारीं षष्टीस कान्हेरास पोहोंचलों. यानंतर राजश्री यशवंतरावजी याजबरोबर जुन्नरास आलो. ते जेष्ठ शुद्ध पौर्णिमा पावेतों आपले कृपावलोकनेंकरून आनंदायमान सुखरूप आहें. विशेष. श्रीमंत अमृतराव, बाळोबातात्या, आबा चिटणीस आणखी चक्रदेवप्रभृति * नकारमंडल सर्व एकत्र होऊन, नकारास दत्तक द्यावा, असा ठराव जाला. तो श्रीमंत बाजीरायास कळला. त्यांनी दवलतरावास सांगून बाळोबास कैद करविला. त्यामुळें अलिकडेस उभयतां श्रीमंतांचीं चित्तें शुद्ध नाहींत. शिंदे यांचा विचार तर लखबा व अल्लीबहादूर, येशवंतराव होळकर, बाया सर्व एक विचारें होऊन, हिंदुस्तानांत दवलतराव यांस ठिकाण ठेविलें नाहीं. इकडेस अमृतराव व दवलतराव यांशीं चुरूस लाऊन दिल्ही आहे. कोणीही हलका झाल्यास बरेंच आहे. श्रीमंत दादाविषई आपाजीपंत यांणीं दवलतराव यांसी बोलणें करून, पंनास लक्ष रुपये द्यावे. त्यापैकीं निमे सरकार व निमे तुह्मी, असे घेऊन हिंदुस्तानांत तुह्मीं जावें. त्यानें कबूल केलें. त्यावरून मशारनिल्हे यांनी कारकून पाठविला. जुन्नराचें प्रत्युत्तर, आमचा अदृष्टियोग असल्यास सर्व घडेल,

आह्मांस कपर्दिक द्यावयास मिळत नाही. तेव्हां तो विचार राहिला. बाजीराव यांचे चित्तांतून यांस द्रव्य न पडतां घेऊन जावें. परंतु अमृतराव यांचें भाषण विचार पाहातां, तूर्त न आणावें. यामुळें सांप्रत राहिलें. यांस चांचवड किल्ला जुन्नरापासून पांचा कोसांवर दिल्हा. ३० सहस्त्र रुपये दिल्हे. आमचे यजमान तर बंधूचा विभाग करावा ह्मणोन येथें आले. येऊन त्यांनी यांणीं उभयतां दादाचे पायावर हात ठेविले. आपण जसा विभाग कर्तील त्यांस आह्मीं राजी. यानंतर विभाग होतील, त्या अन्वयें सेवेसीं लिहून पाठवीन. येथील आमचा विचार तर कोण्या रीतीचा आहे तो तीर्थस्वरूप आपा आठापंधरा दिवसां घरी आल्यावर कळेल. हें पत्र ब्रह्मभटजी जवळ देऊन वडिलांस दाखवावें. आपला पुण्यास जावयाचा बेत कसा झाला, हें लिहावयाविषयीं आज्ञा जाली पाहिजे. बहुत काय लिहिणें ? हे विज्ञापना.
हेच पत्रीं वेदमूर्ती ब्रह्मभट व बाळकृष्णभट यांस सां नमस्कार, कृपावृद्धी लोभाची करीत जावी. हे विनंती.

पत्रांक ४९६

श्री. १७२२ वैशाख,

श्रीमंत राजश्री नानाजीसाहेब साहेबांचे सेवेसीः--

आज्ञाधारक राणूजी...पाटील व भिकाराऊत...वगैरे समस्त लहान थोर मौजे काठीपिंपळगांव अर्ज रामराम विज्ञापना. काल लष्कराचा मा।र कालचें पत्रावरून कळला. व आज कही आली. आपले शिवेवरून फिरली. आपले गांवाजवळ श्रीमंताच्या पागा दाहा आहेत. गावड्यानें तमाम चिठ्या(करून) लोक जागांजागां धरून नेले. आपले गांव पागामुळें जगले. त्यास, कहीचा दंगा ह्मणोन, वायांचे खासगतहुजूरच्या बल्लम व बाणदार ऐसें रविवारीं दों प्रहरां आणले. दररोज रु।। ३ शिवाय खुराक, याप्रमाणें आहे. त्यांस, याप्रमाणें आवस्ता आहे. नरसिंगचा राघोडा जाला. रुपाया दंग्यांत उठला. त्याचा तगादा. रा। बळवंतराव भाऊचा स्वार आला होता. +++ हे विज्ञापना,

पत्रांक ४९५

 


शेवेसी विनंति सेवक क चो जनार्दन, निसबत केशो भिकाजी, कृतानेक सां नमस्कार विज्ञापना ता। छ २२ माहे जिल्हेज मु।। लष्कर नजीक बर्डावदा येथे शेवकांचे वर्तमान यथास्थित असो. विशेष इकडील वर्तमान छ १७ मीनहूस विनंतिपत्र लिहून मुकाम पंचगवा येथून सेवेसीं रवाना केलें आहे. त्यानंतर येणेंप्रमाणे :-
१ छ १८ मीनहूस तेथून कूच होऊन मौजे नामलीपचोर, परगणें रतलाम, येथें मु।। केला. चिमाजी बुळे याचे कनिष्ट चिरंजीव गोविंदराव बुळे पाऊणसें स्वारांनिशीं येऊन भेटले. राजश्री यशवंतराव होळकर सामोरे गेले होते. समागमें डे-यास घेऊन आल्यावर, ते आपले मिसलीवर गेल्यावर त्यांचे येथें सरदार गेले. त्यांणीं वस्त्रें तिवट शेला दिल्हा. कलम
(* संक्षेपार्थ मामुली शब्द आह्मीं सोडले आहेत.)
१ उज्यनींत मीरखापठाण व दुदरनेक फिरंगी, चिमाजी कृष्ण ऐसे फौजेसुद्धां गेले होते. ते, बाळोजी इंगळे व लक्ष्मण अनंत यांचा सलुख, बाळाजी अनंत पागनीस यांचीं पत्रें आल्यावर, होऊन भेटी जाल्यामुळें, ठाणे बसवायाची मसलत राहून, येथून सरदारांनीं पत्रें त्रिवर्गास पाठविलीं कीं, तुह्मीं फौजेसुद्धां महत्पुरास जावें. त्याजवरून ते महत्पुरास गेले. तेथून तुलसाजी वाघ याजवळून येवज घेऊन, सरंजाम जप्त करावा या बेतावर गेले. कलम.
१ इंगळे व लखबा एकत्र जाहाले, उखबा उदेपुराकडे गेले. इंगळे मल्हारगडाकडे आले. सरदारांस लखबाकडे न्यावें, सबब लक्ष्मण रघुनाथ फौजेसमागमें आहेत. सलूख उभयतांचा जाला नवता, तोंपरियंत यांची कूच जल्दी करून सरदारास न्यावें हे जरूर होती. आतां मतलब जाल्यामुळें जरूर नाहीं. लखबा चितोडाहून उदेपुराकडे गेले. कलम.

१ सरदार यांणीं रतलामची खंडणी चाळीस हजार रुपये घेतले. पुढें देवळेप्रतापगडास जाणार तों तेथील वकील रुजू होऊन भेटले. जाबसाल होत आहे, तों इंगळे यांणीं फौजेसुद्धां देवळेप्रतापगडावर शह दिल्हा. घांसदाणा मागतात. त्याजवरून सरदारांची मर्जी क्रूर जाली. इंगळे यांणीं होळकर यांचे गांवास उपद्रव दिल्हा, याजकरितां लढाई घ्यावी हा विचार आहे. फिरंगीमरिखा याजलाही पत्रें जलद यावयाविशीं गेलीं आहेत. सांप्रत, देवळे प्रतापगडाचा शह सरदारांनी सोडून, छ मजकुरीं येथें मुकाम केला. आबाजी लक्ष्मण शंभर स्वारानिशीं सरदारास मु।। मजकुरीं येऊन भेटले. येतेसमई महेश्वरावरून आले. पंत मशारनिले आले आहेत. यावर काय घडेल तें पाहावे. गोवर्धन ( भील ?) समागमें आहे. कलम.

१ मीरवजीर हुसेन दोनशें स्वार व पायदळ पांचशें ऐसे आपले सरंजामानसी. त्याजला महत्पुरास मागील मुकामहून रवाना केलें आणि वराता महत्पुरावर लाख रुपयांच्या केल्या. ऐवज वाघाकडून घेऊन, वरातदारास देऊन, त्याजला येथें घेऊन यावें, या बेताबर रवाना केला. कलम.

१ चिमाजी बुळे यांचे चिरंजीव विठुजी याचे चिखलदे वगैरे महालच्या जप्ती राजश्री आनंदराव पवार यांजकडे सांगून, सनदा करून दिल्ह्यासिवाय पवार मजकूर याजला चाळीस हजार नक्त दिले. त्यांणीं थोरलें काम नागोपंताचें करून दिल्हें, म्हणोन बक्षीसी दिली. बुळेमजकूर कनिष्ठ येथें आले. त्यांणीं जाबसाल लावला. लाख रुपये घेऊन, महालाची सोडचिठी देऊन, मुक्त करावें, शंभर स्वारानसी चाकरी करूं, याप्रमाणें बोलणें संताजी लांबहातेचे विद्यमानें लागलें. हाली बुळ्यावर वराता करून दिल्ह्या, हशमी शिलेदाराच्या. कलम.
--------


येणेंप्रमाणें ध्यानास येईल. उत्तराची आज्ञा होऊन खर्चाचा बंदोबस्त जाला पो. हे विज्ञापना.

पत्रांक ४९४

श्री. १७२२ चैत्र.
पौ मिती वैशाख वद्य १२ शके १७२२


वेदशास्त्रसंपन्न राजमान्य राजश्री लक्ष्मीनारायण दीक्षित स्वामीचे सेवेसीं:-

विद्यार्थी यशवंतराव महादेव सां नमस्कार. * विशेष. आपण पत्र पाठविलें तें पावलें. वेदशास्त्रसंपन्न राजश्री मोरेश्वर दीक्षित यांस औषधा करितां मंडूर दोन तोळे पाठवावा, म्हणोन लिहिलें. त्याजवरून दोन तोळे मंडूर माणसाबराबर पाठविला आहे. पावेल. आपल्यास औषध पाठवावयाचें तें, आठाचौ दिवशीं राजुरास जाणार आहे, तेथें गेल्यावर पाठवीन. औषध राजुरास राहिलें आहे. येथें नाहीं. वरकड राजकीय नवल विशेष लिहिणेसारिखें नाहीं. राजश्री सिद्धेश्वर महिपत म्हणोन कारकून सरकारचे हे फौज जमा करून गावड्यावर जाणार, म्हणोन म्हणतात. आणि खंडण्या घेतात. त्यासह त्याप्रांतीं येणार आहेत. बहुत प्रळय या प्रांतीं केला आहे ! तो लिहितां पुरवत नाहीं ! आपण सावध असावें. यास विचार काडीमात्र नाहीं. याजकरितां लिहिणें आहे. बहुत काय लिहिणें? लोभ असों दिजे. हे विनंति.

पत्रांक ४९३

श्री. १७२२ चैत्र शुद्ध १२


श्रीमंत राजश्री पंतप्रधान साहेबाचे सेवेसीः-

आज्ञाधारक आपाजी पायगुडे दंडवत विज्ञापना. तागायत छ ११ जिलकाद पावेतों मुक्काम नजिक किल्ले कावनई साहेबांचे कृपाकटाक्षें पागापथकाचें व सेवकाचें वर्तमान यथास्थित असे. विशेष ......... डोंगर कावनई .......... जमा जाहलें होते यास्तव आस्वलीचे मुकामींहून कुच्य करून किल्यानजीक आलों. फौजेचे दहशतीनें कोळी डोंगर सोडून पट्याकडे गेला. छ. ७ जिलकादीं कोळी यांनी किल्लेपट्यास येलगार केला. किल्लेकरी सावध होते. व राजश्री बापूजीपंत गार्दीसुद्धां येऊन पोंहचले. कोळीयांचे पारिपत्य थोडेंबहुत जाहलें. आम्हांस केळ्याची बातमी लागतांच, छ मजकुरीं स्वार होऊन गेलों. मौजे खेडानजीक दक्षणेस डोंगरालगती गांठी पडली. आम्हांकडील निकड पाहून, दहशतीनें कोळी पळून पहाडांत गेले. गोळागोळी बरीच जाहली. त्याजकडील तट्टें, पथकांतील लोकांनीं दहापंधरा पाडाव करून आणिलीं. तें समयीं पाईचे बरकंदाज असते तरी कोळ्यांचें पारिपत्य जाहलें असतें. स्वारांचा इलाज अवघड डोंगरावर कळतच आहे ! याप्रांतीं कामगिरी नेमल्यासारिखें सरकारकामाचा बंदोबस्त होय तें जाहलें पाहिजे. तालुकदार यांजकडील पाईचे लोक व लढवई सामान.........एक जागा जाहालों, ह्मणजे कोळी मैदानांत येत नाहीं. मागाहून सविस्तर लेहून कळऊं. रोजमरियांविशीं लिहिलें, त्याचे उत्तराची आज्ञा जाली पाहिजे. सेवेसीं श्रुत होय. हे विज्ञापना.