Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
कोल्हापूर
पत्रांक ५२२
श्री.
१७२२
राजश्री येसाजीपंतआपा स्वामी गोसावी यांसी:-
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नेहांकित शिदोजी जगथाप मुकाम कर. वीर सां दंडवत विनंति उपरी येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लेखनास आज्ञा करावी. विशेष. आह्माकडील वर्तमान तरः मातुश्री बाईसाहेबांचा व कागलकरांचा बिघाड जाहला. पौष शुद्ध अष्टमीस आह्मांकडील फौज तयार होऊन कागलावर गेली होती. तों कागलकरहि जमावसुद्धां बाहेर पडले. मग त्यांची आमची दृष्टादृष्ट जाहले, परंतु कांहीं जुंझ जाहले नाहीं. च्यार घटका उभें राहून फिरून कागलास गेले. त्यांचा जमाव दोनसें स्वार व च्यारसें प्यादे असें आहे. वडिलांस कळावें, ह्मणोन लिहिलें आहे. दुसरें वर्तमान, तरी शुा ८ अष्टमीस कागलकरांनी बाईसाहेबांचा मामा ? गुरू मारून नेले. दोनसें गुरें व मेंढरें पांचसें असे नेलें. गांवातील माणसें जखमी पांचसात व ठार एक पडला. कागलकराकडीलही थोडे बहुत जाहले. आमचे प्यादे रुईस तीसपसतीस पाठऊन दिले आहेत. रुईची फार आवाई आहे. आपलें पत्र आल्यावर राजश्री भगवंतपंतासहि हटकिलें. त्यास, त्याणीं उत्तर दिलें की रा विसाजीपंतआपा आले म्हणजे काय तें सांगू. वडिलीं लिहिलें होतें कीं, फौजेंत खाऊन राहायाचें प्रयोजन नाहीं. त्यास, त्याणींहि थोडें बहुत पोटास दिलें. आपण सुप्याकडील शाहे लि। त्यास, तिकडील शाह मातबर असला तर, तसेंच लिहून पाठवणें, म्हणजे आह्मी निकाल काहाडून येऊं. नाहींतर, चार दिवस तह ह्मणोन जरूर राहूं. बहुतकरून आण्णा आले ह्मणजे तेहि निरोप देतील. बहुत काय लिहिणे ? हे विनंति.
सेवेसीं बाळाजी गंगाधर सां नमस्कार, लि। प्रसिजे, वडिली आशीर्वाद पत्र पाठऊन परामर्ष केला पाहिजे हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
[ ५९ ] श्री. ७ ऑक्टोबर १७०७.
˜ ° श्री˜शिवनरपति हर्षनिदान । मोरे- श्वरसुत नीळकंठ प्रधान |
˜ ° श्रीआईआदिपुरुष श्रीराजाशिवछत्रपति स्वामी कृपानिधि । तस्य परशुराम त्र्यंबक प्रतिनिधि |
स्वस्तिश्री राज्याभिषेक शके ३४ सर्वजित् संवत्सरे कार्तिक बहुल नवमी भृगुवासरे क्षत्रियकुलावतंस श्रीराजा शिवछत्रपति याणीं राजश्री सूर्याजी इंगळे मुद्राधारी जंजिरे विजयदुर्ग यासी आज्ञा केली ऐसी जे - जंजिरे मजकुरी जिभीमध्यें राजश्री नारो पंडिच यांचा वाडा आहे. तेथें त्याणीं आपले कारभारी वेदमुर्ति रघुनाथभट्ट ठेविले आहेत. ऐशियास तुह्मीं त्यास ह्मणता जे, तुह्मीं आणखे ठाई राहणें, तें घर नामजाद लोकांस रहावयास देणें तरी ऐसी गोष्ट ह्मणायास तुह्मांस प्रयोजन काय आहे ? पंडित मशारनिल्हे हुजूर दर्शनास आले होते. यांस स्वामीनीं मागती जंजिरे मजकुरास जावयाची आज्ञा केली आहे. हे येऊन आपल्या वाडियांत राहतील यांच्या परामर्षास अंतर पडो न देणें. याकडे पहिलेपासून जंजिरे मजकुरपैकीं नोबती दोघेजण होते, तैसे पुढें यांकडे असों देणें. पंडित मा। निल्हे आपल्या वाडियाच्या जाग्यावरी श्रीचें देवालय लहानसें बांधणार आहेत. त्यास अलिगौडा देवालय बांधायाच्या कामास नेहमीं यांकडे देविला असे. तरी देवालय मुस्तेद होय तोंवरी अलिगौडा यांकडे देणें त्याचा रोजमुरा जंजिरे मजकुरपैकीं पावतो तैसा पाववीत जाणें. जंजिरे मजकुरीं आगत्यागत्य कार्य प्रयोजनास गौडा पाहिजे. तरी पंडित मा।निल्हेस सांगोन पाठवीत जाणें. हे पाठवून देत जातील व यांच्या दोन बागा आहेत. त्या कांहीं कोणाचा उपसर्ग लागो न देणे. बागाखालील जमीन जे आहे त्यांत कोणी शेत पोत करील तरी यांचे आज्ञेखेरीज करूं न देणें. लेखनालकार.
मर्यादेयं विराजते.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ५२१
मसुदा.
श्री.
१७२२ फाल्गुन शुद्ध.
श्रीमंत राजश्री पंतप्रधान यांसी:-
प्रती लक्ष्मीनारायण दीक्षित कृतानेक आशीर्वाद येथील क्षेम ता। फालगुन शुद्ध + पावेतों मुकाम औरंगाबाद येथें आपले कृपेंकरून कुशलरूप असों. विशेष. राजश्री जिवाजी यशवंत बावनपागे फौज सुद्धां कायगांवीं शुद्ध ३ रविवारीं येऊन राहिले. त्यांचे मागे पेंढार एक हजार दुसरे दिवशीं आलें. त्यांची व यांची लढाई जाली. पेंढार चारपांचशें जखमी व दोनशें ठार बाक्नपागे यांणीं केले. पेंढारास तीन कोश हटविलें, मागाहून कंपू पलटणें व तोफा घेऊन आला. त्यानें तोफा सुरू केल्यावर, जिवाजी यशवंत फौजसुद्धा गंगापार उतरून गेले. नंतर कंपू व पेंढार कायगांवावर मुकाम करून, पेंढा-यानें गांवात लूट केली. ब्राह्मण आदिकरून सर्वत्रांस वस्त्रहरण जालें ! श्री. कृपेंकरून बायकांची आबरू व ती। रामचंद्र दीक्षित यांचा व आमचा वाडा ऐसे दोन वाडे मात्र निरोपद्रव राहिले. वरकड कायगावासच पेंढा-यांनी उपद्रव केला. हा ईश्वरीक्षोभ! असो ! सर्व गेल्याची क्षीत नाहीं. आपले प्रतापेंकरून मागती सर्वत्रांस प्राप्त होईल. वर्तमान श्रुत असावें ह्मणोन लिहिलें आहे. विशेष काय ल्याहार्वे ? लोभ असों द्यावे.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ५२०
श्री.
१७२२ माघ वद्य १०
श्रीमंत राजश्री नानाजी स्वामींचे सेवेसी:-
विद्यार्थी परशरामभट धर्माधिकारी सां। नमस्कार विनंती विज्ञापना ता। माघ कृष्ण १० पो। आपले कृपेंकरून यथास्थित असे. विशेष. इकडील वर्तमान बाळाजी कुंजर याचा बंधू पागे मौजे निवरी पाचेगांवचे मुक्कामीं आहे. पुढें गंगातीरास अ.ठ पंधरादिवस कालक्षेप करणार, सिवारची कही करितो. राजश्री शिवराम जोशीबाबा पुण्याहून काल शनवारीं प्रातःकाळींच टोंके यास दाखल जाले. त्यांनी पुण्याचें वर्तमान सांगितलें व चिरंजीव आणानीं मौजे शेवल्यास कारकून पाठविला. त्यांनी सांगितलें कीं, श्रीमंत शिवरात्रीस भिमाशंकरी जाणार, तेथें श्रीमंत अमृतराव साहेबही येणार, उभयतांचे भेटी होणार. आणानीं लिहिलें कीं, अमृतराव थत्ते यांचा हिशेब व पत्रें पो। ते पावले. त्यावरून त्यांस तगादा केला. त्याचें ह्मणणें कीं तूर्त ऐवज नाहीं. त्यास, आह्मी पुढेंही उद्योग करीतच आहोंत. या प्रमाणें लिहिलें. लग्नासही येत होतों, परंतु कुंजराचे पागेचे गडवडीकरितां राहिलों. वरकड वर्तमान सर्व यथास्थित असे. सरकारचाकरीस सावध आहोंत. कामामुळें कितकिांस संतोषअसंतोष आहे. आमचे लक्ष स्वामींचे पायांशी, अंतर तिळभर नाही, येविशीं खातरजमा आहे. आह्मीही एखादी गोष्ट करूं ती खातरजमेचीच करू. आह्मांस पुण्यास चिरंजीव आपांनी बोलावलें. परवां चिरंजीव यज्ञोबाची रवानगी केली. तेव्हांच बेत होता. परंतु आपली आज्ञा घेतली नाहीं ह्मणोन राहिलों. आतां शिवरात्र जाल्यावर जावें लागतें. आपली भेट जालियावर जाऊं. राणूजी हवालदार समक्ष आला आहे. यास रानचे रखवालीविषई ताकीद करावी. महारपोर परवानगीशिवाय आणूं न पावे. आमचा दाब ठेविल्यास सरकारचाही दाब रहातो. बहुत काय लिहिणें हे विनंती.
शेवेसी मल्हार रामचंद्र कुलकर्णी सां। नमस्कार, लिखितार्थ परिसोन लोभाची वृद्धी असावी. आह्मांस सर्व आधार आपले पायाचा आहे. लिहावे असा अर्थ नाहीं. सर्व प्रकार माझे चालवणें साहेबास आहे. हे विज्ञाप्ती.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ५१९
श्री.
१७२२ माघ वद्य ४
श्रीमंत राजश्री नानाजी दीक्षित यां प्रतिः-
परश्रामभट धर्माधिकारी सां। नमस्कार विनंति उपरी येथील क्षेम ता। माघ वा। ४ इंदुवासर जाणून सुखरूप असो. विशेष. श्रीमंत राजश्री बापू यांची लग्नाकरितां मूळचिठी आली कीं, अगत्य अगत्य यावें, असें लिा आहे. वे रा। परश्राम नाना शिंद्याच्या लष्करांत गेले होते, ते गांवास आले. भेटहि निवळहि जाली नाहीं ! आशीखहि दाहावीस ब्राह्मण गेले होते. त्यांस दक्षणा विठ्ठलपंत बापूंनीं देऊन वाटे लाविलें. असामीस दोन रुपये देऊन वाटे लाविलें. परश्रामभटासहि शेंपन्नास रु। मिळाले. रा मल्हारराव होळकर सुभेदार यांचा पुत्र समागमेंच आहे. गोट, निशाण, वेगळाच चालत असतो. लष्कर दर कुच गेलें. ब-हाण पुरापावेतों मुक्काम होत नाहीं. ++++ श्रीमंत पुणियास आले. फडक्यांचे वाड्यांत आहेत. सरकार वाड्यांत अद्यापि गल नाहींत. लष्कर गारपिरावर आहे. पुन्हां लष्करांत येणार ऐसी वदंता आहे. बाहेर स्वारी निघणार ऐसें ऐकिलियांत आलें. + ++ हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ५१८
श्री.
१७२२ माघ वद्य १
श्रीमंत राजश्री नानाजी स्वामींचे सेवेसी:-
विद्यार्थी परशरामभट धर्माधिकारी सां। नमस्कार विनंती विज्ञापना येथील क्षेम ता।माघ वद्य १ पावेतों आपले कृपेंकरून वर्तमान यथास्थित असे. विशेष. काल पत्र आपलें आलें. लिहिल्याप्रों बेवीस रुा। ब्रहाभटजीपासून घेऊन, देवीचंद मारवाडी यास देऊन, त्याची पावती घेतली. रा। दौलतराव शिंदे देवठाणींहून कूच करून, आज कासारवारीचे मुकामास गेले. याप्रों वर्तमान आहे. वो रा परशरामनाना टोंकें प्रवरासंगमकर यांस शिंदे यांचें पत्र आलें होतें. त्यावरून ते लष्करांत गेले. चिरंजीव गणोबाही आज शिंद्याचे लष्करात रा। मनोहरपंतआपाच कामानिमित्य गेला आहे. एका दो रोजां तो आला ह्मणजे सविस्तर वर्तमान कळेल, त्याप्रों लिहून पाठऊं. आज वर्तमान ऐकिलें कीं, किल्ले नगर शिंद्यांनीं सरकारांत श्रीमंतास दिल्हे. कामकाज किल्याचें सरकारांतून रा। यशवंतराव सुभेदार यांकडे सांगितलें, म्हणोन आज तिसरे प्रहरापासून वदंता आहे. मोहन तेली गांवांतून गेला ह्मणोन आपणास कळलें. त्यावरून आपण लिहिलें. त्यास, त्याचा बाप वामोरीहून आला. त्याकरतां तो बापास घेऊन देवदर्शनास सेडिवधे यास गेला होता तो काल गांवास आला. कळावें. हुर्डीपेट्या ३ वे टांहाळ कडपे २ पाठविले आहेत. पावतील. बहुत काय लिहिणें ? हे विज्ञाप्ती.
सेवेसी मल्हार रामचंद्र कुळकर्णी सां। नमस्कार लिखितार्थ परिसोन लोभाची वृद्धि असावी. हे विज्ञाप्ती.
रा. रा. विनायक बापूस उभयतांचा नमस्कार, पांघुरणें व नवार पाठविली ते पावली. हे विनंती.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ५१७
श्री.
१७२२ माघ शुद्ध ११
श्रीमंत राजश्री नानाजी स्वामींचे सेवेसी:-
विद्यार्थी परशरामभट धर्माधिकारी सां। नमस्कार विनंती विज्ञापना येथील कुशल जाणून ता। माघ शुद्ध ११ पर्यंत यथास्थित असे विशेप, परवां जिवता दळयाबरोबर पत्र पाठविलें तें पावलें. पुण्याचें पत्र पाठविलें तें तिळाच्या पिशव्या नव, मल्हारपंत कुळकर्णी याचे माणूस पुण्यास गेले, त्याबराबर पाटविली. कळावें. रा॥ दवलतराव शिंदे निंबदेहरें येथें आला, ह्मणोन वर्तमान आहे. खचित आला. पुढें पुण्यस्तंभाची आवई आहे. बाहेर अफवा ऐकतों कीं, खटला राहोरीचे मुक्कामीहून पुणतांब्याकडे रवाना करून, सडा तिरस्तळीकडे येणार. ऐसें लोक बोलतात. वरकड सर्व मजकूर यथास्थित आहे. देवीचंद वाणी आपणाकडे आला आहे. राजश्री व्यंकटरावजी गांडापुरकर आपले गांवीं बावनपागेचे गर्दीपासून आहेत. ते मुलीचें लग्न येथें करितात. त्यांस राजश्री शिवरामपंत तात्याचा वाडा च्यार दिवस लग्न करावयास जागा प्रशस्त आहे. याकरता त्याची परवाननी पाठऊन द्यावी. अ ++ नारोपंतास सांगून त्याची चिठ्ठी पाठऊन द्यावी. वरकड नवल विशेष जालियास लिहून पाठऊं, बहुत काय लिहिणें ? हे विज्ञाप्ती.
महाराजांचे सेवेसी मल्हार रामचंद्र कुळकर्णी सां। नमस्कार, लिखतार्थ परिसोन लाभाची वृद्धी असावी. हे विज्ञाप्ती.
राजश्री विनायकबापूस सां। नमस्कार.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
[ ५८ ] श्री. ५ ऑक्टोबर १७०७.
स्वस्तिश्री राज्याभिषेक शके ३४ सर्वजित् संवत्सरे कार्तिक बहुल सप्तमी सौम्यवासरे क्षत्रियकुलावतस श्रीराजा शिव छत्रपति याणीं राजमान्य राजश्री सदाशिव परशराम यांसी आज्ञा केली ऐसी जे- राजश्री नारो पंडित स्वामीच्या दर्शनास आले होते. हालीं आज्ञा घेऊन विजयदुर्गी रहावयास आले आहेत. ऐशास, यांचा घरठाव जिभींमध्ये आहे बहुत दिवस तेथें राहात आहेत. प्रस्तुत ते जागां राहातील तरी तुह्मीं हरएकदिवशी परामर्ष करून सुखरूप राहात असे करणें. नोबती दोघेजण पहिलेपासून याकडे होते तसे देणें. प्रयोजन प्रसंगी सुतार गौडा मागतील तो जंजि-याकडून देववित जाणें. याकडील माणसांशी परवानगी रसानगीविषयी व वरकड कोण्हेविशीं कटकट होऊं न देणेय यांचे कर्जवाम कोणीं देणें असेल तें रास्ती घेतली. तेविषयीं इस्कीलकी कथळा न करणें बहुत काय लिहिणें
मर्यादेय
विराजते.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ५१६
१७२२ पौष वद्य १३
राजश्रियाविरजित राजमान्य राजश्री बाजीपंत स्वामीचे सेवेसी:-
पोष्य गंगाधर गणेश साष्टांग नमस्कार विनंति उपरी येथील कुशल ता। पौष वा १३ पावेतों यथास्थित जाणून स्वकीयें लिहीत जावें. विशेप. तुह्मी ती। दादाची रवानगी केली. ते येथें सुखरूप पावले. आह्मी यावे. सबब माणसें गाडली ठेविली. कालपासून इकडे पेंढारी, निा शिंदे, याची आवई दाट उठली. भागानगराकडे जाणार, दहापांच कोशीं स्वार पेंढारी आढळले, अशी आवई दाट बोलतात. सबब राहिलों. दुसरेंहि काम जरूरीचें, याजमुळें गुंता जाहला. गाडली माणसें उगीच ठेवावीं, तर तुह्मीं रागें भरुं नये, जाणून माघारी पाठविली आहे. अमावास्या जाल्यावर येथूनच माणसें घेऊन येतों. तुह्मी मार्ग लक्षूं नये. आजच निघणार हातो. परंतु दोषा चौघांनी मोडे घातले व दुसरें काम जरूरीचें प्राप्त जालें. सबब राहिलों. तुह्मीं रागे भरूं नये. वोढीमुळें कांहीं सुचत नाहीं. तुह्मापाशीं येऊन येथें लठीकवाद कोठवर घ्यावा. तुह्मांस सर्व ठावकेंचे आहे. तुह्मी तेथे घाबरू नये. पेंढारी आपले तिकडे येत नाहीं. वरकड मार, यजमान तेथें आले आहेत. फार मर्जी सरंक्षावी. राजश्री बाळाजीराव व काशीनाथराव मराठे यांचाही समाचार घ्यावा. त्यांची मर्जी खुप ठेवावी. तुह्मांस येथून सरंजाम दाळ तुरीची वजन ।३।, हरभ-याची १ दीपाव, सालंमिश्री ८९, १ व दादानी दिला ३, रोख, बापूबरोबर पाठविले आहेत रु. वीस हे घ्यावे. उत्तर पाठवावे. पौषआकार जाला. तुह्मांस कळावें. महारास मंगळवारचे पाहोस दिल्हे आहे. बहुत काय लिहिणें ? हे विनंति. पुण्याहून राजश्री पंतांची स्वारी येणार, असे वर्तमान तुमचे तेथें आहे, ह्मणून दादा सांगत होते. यजमानस्वामीचे पत्र नाहीं. तिकडे आणखी काय वर्तमान असेल तें लिहून पाठवावें. हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ३५ १६२९ माघ वद्य २