Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

[२२३]                                                                       श्री.                                                                        ८ जून १७६०.

Xराजश्री यशवंतराव कोनेर स्वामी गोसावी यांसी :-
विनंति उपरि. यमुने पारवारच्या नावा सा-या जमा करून आपले हुकमांत ठेवाव्या, त्यास प्राप्त न व्हाव्या, याप्रमाणें करावयास लिहिलेंच आहे. त्या बमोजीब कोठें केलें, कोठें न केलें, तें लिहिणें. जेथें बंदोबस्त जाहाला असेल तेथील जाहाला. पुढें ठीक राखाव्या. नसेल जाहाला तेथील करणें. जाणिजे. छ २३ सवाल, सु॥ इहिदे सितैन मया व अलफ. हे विनंति.  
             



[२२४]                                                                       श्री.                                                                    ३० डिसेंबर १७६०.

राजश्रियाविराजितराजमान्यराजश्री नागो वा ++++ यांसी :-
सेवक ++++++ येथील कुशल त॥ छ १४ जमादिलावल जाणून स्वकीय लिहिणें. विशेष. तुह्मीं पत्र पाठविलें तें पावलें. लिहिलें वर्तमान कळो आलें. यानंतर आह्माकडील वर्तमान तर: अबदाली गंगापार उतरोन पळोन गेला. श्रीमंत राजश्री भाऊसाहेबाची फौज उतरोन पार जाणार. तुह्मास कळावें. त्याजकडील फौज वगैरे तोफखाना होता तो लुटून घेतला. तुमचे काशीद श्रीमंताकडे गेले त्यांस खर्चास रु॥ ++++++ चा सरंजा+++++ स्वार रवाना करणें पूर्वी धोत्रजोडे करून पाठवून दिले होते त्याप्रमाणें राधाकृष्णी धोत्रेजोडे करून पाठवणें. तुह्मी निश्चय केला होता तो सिध्दीस गेला. तुह्मी लौकर येणें. बहुत काय लिहिणें. हे विनंति.

कोणी एक असामी मागें न राहे तो गोष्ट करणें आह्मी स्वार होऊन गेलों असें समजोन तिळतुल्य दिरंगावर न घालितां फौजेची रवानगी करणें. राजश्री सुलतानजी आटोळे यांजकडे पत्रें व मनुष्यें पाठवून, त्यास आणवून, त्याचें समाधान करून, बोलीचाली करणे ह्मणोन लिहिले. ऐशियासी, त्यांजकडे चार पांच वेळा पत्रें पाठविली. परंतु मशारनिले कडील कोण्हीच आलें नाहीं. आह्मीं यत्नास चुकलों नाहीं. ऐशियासी, त्याजकडील राजश्री गोपाळपंत सातारेयासी आहेत. त्यास, मशारनिलेजवळ जे बोलीचाली करावयाची असेल ती करून ज्याप्रमाणें आह्मांस लेहून पाठवाल त्याप्रमाणें आह्मांस मान्य आहे. तरी सत्वर बोलीचाली करून त्यांस आह्मांकडे रवाना करणें. सर्वप्रकारें त्यांचे चालवावयास अंतर होणार नाही. व गंगाजळ मातुश्री राधाबाई ढमढरी यांचेविशी लिहिलें की, संगोजी ढमढेरे याबाबद घोडीं, वस्तभाव देवणें व त्याची बोलीचाली केली आहे, त्यास समाधानाचें पत्र पाठवणें. ह्मणोन लिहिलें; तरी, त्यास समाधानाचें पत्र पाठविले असें. तुह्मीं त्याजकडील जमाव सत्वर रवाना करणें. याउपरी तमाम लोकांस जलदीने पत्रें पाठवून अविलंबे राजश्री बाबूराव यासी फौजेसहवर्तमान रवाना करणें. येविशी विस्तारे ल्याहवें ऐसें नाहीं. वरकड कितेक वर्तमान राजश्री भास्करपंताकडील व आह्माकडील, राजश्री, जिवाजी अनंत पाठविले आहेत, हे सांगता कळो येईल. र॥ छ २९ माहे रजब. + आतां वारंवार ल्याहवें ऐसें नाहीं. तर बाबूची रवानगी फौजेसुध्दां सत्वर करणें. निदानचें हे पत्र आहे. तर आतां आळस करावयाचें काम नाहीं. कळले पाहिजे. बहुत काय लिहिणें. लोभ असू देणें. हे विनंति.

    222                                                                                                    112 2

 [२२२]                                                                       श्री.                                                                   १८ सप्तंबर १७४२.                 

... ... ... ... ... ... ... ... ... ... ... ... ... ... ... ... ... ... ... ... ... ... ... ... ... ... ... ... ... ... ... ... ... ... ... ...
... ... ... ... ... ... ... ... ... ... ... ... ... ... ... ... ... ... ... ... .. आहे. वरकड लिहिलें कीं, राजश्री बाबूरावजीचें रवानगीची तरतूद जे करावयाची ते करीत असो. ह्मणोन तपशिले लिहिलें. ऐशियासी मशारनिलेची रवानगी फौजेसहवर्तमान सत्वर करून दसरेयासी आह्माजवळ येऊन पोहचत असे करावें, ह्मणोन मशारनिलेजवळ सांगोन पाठविलेंच होतें. त्याउपरांतहि राजश्री भास्करपंताकडोन पत्रें आली ती बजिनस तुह्मांकडे पाठवून, मशारनिलेचे रवानगीनिशीं सविस्तर अर्थ लेहून पाठविलेवरहि, वरचेवर हाकालपर्यंत पत्रें पाठविली. व राजश्री बाबूराव रघुनाथ यांसीहि साद्यंत वृत्त सांगोन पाठविले. ते प्रविष्ट होऊन मशारनिलेंनी सविस्तर सांगितलेच असेल. ऐशियासी, दसरा तो समीप येऊन चारी दिवस निघोन गेले. आणि आमचे रवानगीचा प्रसंग तो केवळ तुह्मावरच आहे, हाहि अर्थ तुमचे चित्तांत येत असेल. आह्मी तुह्मास वारंवार ल्याहावे ऐसाहि अर्थ नाहीं. गतवर्षी लोकांही नाकर्तेपण करून घारे फिरोन आले, त्यामुळे कित्येक मनसुबेयांसी अंतर पडोन आले. याचा विचार साद्यंत राजश्री भास्करराम याच्या पत्रांवरून ध्यानांत आला असेल. आह्मी तपशिलें ल्याहावें ऐसें नाहीं. यंदाचें मुलूकागिरीचा प्रसंग तुह्मास लिहिलाच आहे. पुढे राजश्री भास्करपंत यांहीं मकसुदाबादेस जाऊन कस्त मेहनत केली आहे. त्याचे सार्थक विना इकडोन फौज गेलिया विरहित होईल न होईल हें कळतच आहे. यास्तव केल्या कर्माचें सार्थक होणें, व कर्जवामाचा परिहार व्हावा लागतो, याजकरितां या प्रसंगी कोणएक यत्नास अथवा तरतुदीस अंतर करितां येत नाहीं. सारांश, फौज सत्वर मशारनिलेकडे जाऊन पोहोंचली पाहिजे. प्रस्तुत राजश्री भास्करराम यांजकडोन राजश्री केसो नरसिंह व राजश्री जिवाजी अनंत हे उभयतां छ २६ रजबीं येथे येऊन पोहचलें. त्यांजकडील यासमागमें पत्रेंहि आलीं. त्यांमध्ये सारांश अर्थ हाच कीं, फौजसुध्दा लवकर येऊन पोहचणें. ह्मणोन बहुत तपशिलवार मजकूर लिहिला आला. तत्त्वार्थ, फौज गेली पाहिजे. यास्तव, आह्मी विजयादशमीचे मुहूर्त येथून स्वार होऊन जात असों. याउपरि तुह्मी राजश्री बाबूराव यासी फौजेसहवर्तमान सत्वर आह्माकडे रवाना करणे. दुसरे पत्राचा मार्ग सहसा न पाहता याच पत्रावरून लोकांचे पदरी ऐवज झाडेयानसीं घालून लौकर लौकर फौजेसुध्दां जलदीनें रवाना करून पाठविणे. लोकांध्ये कोणी हैगै करील, याजकरितां पत्रांमागून पत्रें व जासूदजोडया रवाना करून फौजेची गाहा येई ते करणें.

 [२२१]                                                                       श्री.                                                                   २८ अक्टोबर १८४०.                   

128म॥ अनाम देशमुख व देशपांडे प्रांत गढें यांसी राणोजी भोसले सु॥ इहिदे अर्बैन मया अलफ. प्रांतमजकूर सालदगुस्ता चिरंजीव राजश्री रघोजी भोसले सेनासाहेबसुभा याजकडे कमाविशीबद्दल दिल्हा आहे. सालमजकुरीं तेणेंप्रमाणें करार आहे. चिरंजीव आपले तर्फेने कमावीसदार पाठवितील त्यास रुजू होऊन जमाबंदीप्रमाणे माल व जकात व फरोई कुलबाब कुलकानू मुकासबाबेचा उसूल सुरळीत देणें. उजूर न करणें. छ १७ साबान.


           221                                                                                     186 1

 [२२०]                                                                       श्री.                                                                   २३ सप्टेंबर १७४२.                    

राजश्री रामचंद्र कोनेर गोसावी यांसी :-
मशरुलअनाम अखंडितलक्ष्मीअलंकृतराजमान्य राजश्री स्ने॥ रघोजी भोसले सेनासाहेब सुभा दंडवत उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लेखन करीत जाणें. विशेष. तुह्मी पत्र पाठविलें ते पावोन लिहिलें वर्तमान कळो आलें. राजश्री कोनेरपंतास सांगोन नंतर तरतूद करणें ते करवीत आहों. राजश्री जयरामभटजी राजश्री सन्निध आह्मास निविस्त करीत नाहींत; फौजेची परवानगी देत नाहींत; चित्तांत संशय धरतात; व राजश्री शामजी नाईक तळेगावांहून आलेयाचा मजकूर लिहिला तोहि कळों आला; राजश्री बाबूजी नाईक जोशी यांही फौज ठेविली आहे. त्यास बनले तरी आंगेजणी करावी न करावी हे लिहिणे; ह्मणोन लिहिलें. ऐशियासी, येविशी सविस्तर राजश्री कोनेरराम यांसी लिहिले आहे. जर त्यांजकडील गोष्ट बनून आली तरी खामखा पदरीं घ्यावी आणि अनमान न करितां आह्माकडे पाठवावे. आह्मी सर्वप्रकारें निर्वाह करू. अंतर होणार नाही. जयरामभट व यशवंतराव थोरात व राजश्री विसाजीगोविंद यांची समजूत जैशी करावयाची तैसे करून, तुह्मी तयारी करून, फौजेसहवर्तमान सत्वर, जलदीनें येऊन पोहचणें. आह्मी दसरेयाचे दुसरे रोजीं एकादशीस दोन प्रहरा येथून कूच करून मजल दरमजल जात असो. दसरेयासी तुह्मी येऊन सामील व्हावें. हा करार करून तुह्मांस पाठविलें आणि तुह्मीं अद्यापवर तपशील लिहिता ! यावरून अपूर्व दिसून येतें की राजश्री भास्करराम यांजकडे फौज जाऊन पोहोंचावी कीं न पोहोचावी, हाही विकल्प चित्तांतील कळो येत नाहीं. दसरा तो होऊन गेला, पुढे दिवस कांहीं राहिले नाहीत, आणि आह्मास तो जलदीने गेले पाहिजे. असे असोन हा काळपर्यंत तरतुदीचा विचार लिहिता ! बरें ! याउपरि तुह्मी फौज घेऊन सत्वर येतां तरी उत्तम आहे ! आह्मी तो थोडया बहुतनशी येथून कुच करून जात असो. या उपरि वारंवार ल्याहावें असाहि अर्थ नाहीं. जे गोष्टी सत्वर फौज घेऊन दसरेयापलीकडे चहूं रोजांत येऊन सामील व्हा ते गोष्ट करणें. कितेक वृत्त राजश्री कोनेरराम यांसी लिहिलें आहे. त्यावरून कळो येईल. या उपरि तुह्मास तपशीलवार ल्याहावेसारिखे नाही. बहुत सत्वर सत्वर येऊन पोहोचणें. राजश्री बाबूजीनाईकाचा विचार मनास आणावयास वरचेवर राजश्री कोनेरपंतास उत्तेजन देऊन आधीं आधीं कार्य साधणें. जाणिजे. छ ४ माहे शाबान + बहुत सत्वर येणें. कळले पाहिजे. बहुत काय लिहिणे. हे विनंति.

 [२१९]                                                                       श्री.                                                                                              

राजश्री कोन्हेरपंत बावा गोसावी यांसी :-
मशरुलअनाम अखंडितलक्ष्मीअलंकृतराजमान्य राजश्री स्ने॥ बावजी रायजादे दंडवत विनंति उपरी येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लेखन करीत गेलें पाहिजे. यानंतर आह्मी वाडीकडून आश्विन शुध्द षष्ठीस देवरास आलों. त्यास, तुह्मास कळावें यास्तव लिहिले आहें. तुमचा आमचा स्नेह पहिलेपासून. तुमचे वडील देखील चालवीत आले. या उपरी तुह्मीहि स्नेहाची वृध्दि करीत गेलें पाहिजे. अनमान न कीजे. सुज्ञाप्रती विशेष काय लिहावें ? कृपा निरंतर असों दीजे. हे विनंति. आमचा हेत आहे जे तुमची सेवा करावी. त्यास तुह्मी बहुत लोकांचा चालविता. कीर्ति लौकिकांत फारशी जाली आहे. तरी तुह्मी ते प्रांतीं आहां, आमचा रोजगाराचा विचार होऊन येईल ते गोष्टी करणें. अनमान न कीजे. हे विनंति.

 [२१८]                                                                       श्री.                                                                                              

राजश्री कोनेर राम गोसावी यांसी :-
मशरुलअनाम अखंडितलक्ष्मीअलंकृतराजमान्य राजश्री स्ने॥ रघोजी भोसले सेनासाहेब सुभा दंडवत विनंति उपरी येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लेखन करीत गेले पाहिजे. विशेष. राजश्री यशवंतराव थोरात हे आह्माबरोबर चाकरीस होते. त्यास, मशारनिलेनीं आह्माजवळ वचन प्रमाण केलें की आह्मी पुढें तुह्माजवळ राहून चाकरी करून देऊ. ऐसा करार केला. त्यावरून आह्मीं मशारनिलेस हत्ती दिल्हा. असें असोन शेवट आपले करारास अंतर करून, आह्मास न पुसतां रिघोन गेले. त्यांजकडे आमचे इजाफा रुपये ६०४० सहा हजार चाळीस आहेत. त्याची याददास्त अलाहिदा पाठविली आहे. तरी तुह्मीं याजकडोन हत्ती व सदर्हू रुपये तगादा करून घेणें. येविशी राजश्री त्रिंबकजी थोरात यासीहि पत्र लिहिले आहे. तरी सदर्हूचा निकाल करून घेणें. जाणिजे. छ १० माहे जमादिलाखर. बहुत काय लिहिणें. लोभ असू देणें. हे विनंति.

 

[२१६]                                                                       श्री.                                                                           ९ डिसेंबर १७६०.                    

पे॥ छ ३० रबिलाखर.
राजश्रियाविराजितराजमान्यराजश्री. यशवंतराव कोन्हेर स्वामी गोसावी यांसी :-
पे॥ सदाशिव चिमणाजी नमस्कार विनंति उपरी येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहीत जाणें. विशेष. तुह्मी प्रस्तुत कोठें आहां? तुह्माबरोबर फौज काय आहे? व राजश्री बाबूराव कोन्हेर कोठें आहेत? व लक्ष्मण कोनेर कोठे आहेत? (तें कळविणें.) जाणिजे. र॥ छ ३० रबिलाखर सु॥ इहिदे सितैन मया व अलफ. बहुत काय लिहिणें. हे विनंति.



[२१७]                                                                       श्री.                                                                           १७ जुलै १७४३.                  

राजश्री कोनेर राम मजमदार गोसावी यासी :-
मशरुलअनाम अखंडितलक्ष्मीअलंकृतराजमान्य स्ने॥ रघाजी भोसले सेनासाहेब सुभा दंडवत विनंति उपरी येथील कुशल जाणोन स्वकीय कुशल लेखन केले पाहिजे. विशेष. आह्मी बंगालियाहून नागपुरास आलियावर सविस्तर वर्तमान लेहून पत्रे रवाना केलीं आहेत त्याजवरून कळों आलें असेल. त्यावर तुचें पत्र आले. व महाराज राजश्री यांची आज्ञापत्रें सादर जाली. तेथें आज्ञा की दर्शनास येणें. त्यास, आह्मी तत्समयींच स्वार होवयाचा विचार केला होता. परंतु, राजश्री भास्कराम यांस बंगालियांत ठेविले होतें त्यांचा मार्ग लक्षीत होतों. प्रस्तुत फौजेसहवर्तमान ज्यामार्गे पेशवे यांची फौज आली त्याच मार्गे एका दों मजलीचे अंतरें आले. त्यांची फौज माळव्यांतून आलियावर म॥निले मजल दरमजल शिवनीछपारेयावरून आह्मापाशीं आले. भेटी जाल्या. तुह्मास कळावें ह्मणून लिहिलें असें. याजउपरी गुंता नाहीं. मजलदरमजल राजश्री स्वामीचे शेवेसी येऊन पोहोंचतों. जाणिजे. र॥ छ ६ जमादिलाखर. याउपरी तत्प्रांतें सत्वरींच येत असो. बहुत काय लिहिणें. हे विनंती.
                                                                                                                                                                                    मोर्तबसूद.

[२१४]                                                                       श्री.                                                                                                   

राजश्रियाविराजितराजमान्यराजश्री बाबूराव गोसावी यांसी :-
पोष्य बाळाजी बाजीराव प्रधान नमस्कार विनंति उपरी येथील कुशल जाणोन स्वकीय कुशल लिहीत जाणें. विशेष. खासा स्वारी हिंदुस्थानास येते. बैल प्रांत झांशी वगैरे येथील ऐवजीं खरीदी करून पाठविणें. बैलाचे तरतुदीस हैगई न करणे. खासा स्वारी समागमें नबाब निजामअल्लीखानसहवर्तमान नर्मदातीरास सत्वर येऊन पोहोंचणार. तर बैल लवकर लिहिल्याप्रमाणें खरिदी करणे. सर्वत्र वर्तमान प्रकट करणें की दरमजल निजामअल्लीसुध्दां मार्गशीर्षात येतों, देखील जानोजी भोसले. गोविंद बल्लाळ यास वर्तमान प्रविष्ट करणे. नारो शंकरास प्रविष्ट करणें. बुंदेलखंडचे राजे, कमाविसदारांस वगैरे जरूर वर्तमान खासा स्वारी, निजामअल्लीसुध्दा, भोसले पन्नास हजार फौज, र्गशीर्षात येते, नवरी कोट पावली. तुह्मी...



[२१५]                                                                       श्री.                                                                           १४ फेब्रूवारी १७४१.                        

पै॥ फाल्गुन वद्य १०
छ २३ जिल्हेज.

तीर्थस्वरूप सौभाग्यवती आकाबाई वडिलाचे सेवेसी :-
अपत्यें विसाजी गोविंद साष्टांग नमस्कार विनंति येथील कुशल त॥ फाल्गुन शुध्द १० जाणून मु॥ अर्काट क्षेमरूप असो. विशेष. श्रीमंत यजमानसाहेब व तीर्थस्वरूप समस्त त्रैतनापल्लीस मोर्चे लावून बैसले आहेत. समस्त सुखरूप आहेत. चिरंजीव व जावई सर्व मंडळी क्षेम असेत. कांही चिंता न कीजे. यानंतर श्रीमंत राजश्री कृष्णाजी नाईक जोशी याजकडून ५०००० रुपये देविले आहेत ते वडिली घेऊन पावलियाचें उत्तर पाठवणे. वडिली सदैव आशीर्वादपत्र पाठवून सांभाळ केला पाहिजे. बहुत काय लिहिणें. कृपालोभ असो दीजे. हे विनंती.

[२१३]                                                                       श्री.                                                                                                   

श्रिया सहस्त्रायु चिरंजीव राजश्री अबा यासी प्रती रामचंद्र कोनेर आशीर्वाद उपरी येथील कुशल त॥ ज्येष्ठ बहुल पंचमी, मुक्काम श्रीकृष्णा दक्षिण तीर नजीक सौंजुति येथे समस्त स्वस्ति क्षेम जाणोन स्वकीय कुशल वर्तमान लिहीत जाणें. विशेष. सांप्रत तुह्माकडून पत्र येऊन वर्तमान कळत नाही, येणेकडून चित्त सापेक्षित असे. तरी हरघडी कुशल वर्तमान लिहोन संतोषवीत असले पाहिजे. इकडील मजकूर तरी या पत्रापूर्वी सविस्तर लेहोन जिवाजी जासूद पाठविला आहे. त्याजवरून साद्यत कळो आले असेल. सांप्रत राजश्री पंत प्रधानासह वर्तमान श्रीकृष्णासंनिध आलों असो. नदीस पाणी बहुत. विचारे उतरोन पेशवे खुद्द पार जाले. कोणी उतरावे आहेत. आह्माकडील कोण्ही उतरले. कोण्ही उतरावे आहेत. झाडोन उतरल्यानंतर आह्माकडील मनसुबियाचा गुंता उरकोन अविलंबेंच येत असो. कारभाराचें तोंड पडिले आहे. ईश्वरइच्छेकडून उत्तमच होऊन येईल. काही चिंता न करणे. येथून आजी शुक्रवारी सप्तमीस प्रात:काळी श्रीकृष्णा उतरून उत्तर तीरास आलों. राजश्री पंतप्रधान कुडचीजवळ उतरले आहेत. आज आठ मुकाम यांचे उतरून आले, आमचे यजमान दक्षिण तीरी सौंजत्तीनजीक आहेत. चिरंजीव त्यांजवळ ठेविले आहेत. एक उंट, एक राहुटी ठेविली. सबब जे नदीस पाणी आलें. दुसरे, अर्धे लोक उतरले, अर्धे उरतात. तो आज पांच रोज सौ॥ दर्याबाईचें पोट दुखते. गरोदर आहेत. तारळ्यास एक थडीने रवाना केली, पालखीत बसावे तो हा उपद्रव पोटाचा जाला. याजवर राहिली. पेशव्यांनी चार पांच चिट्या यजमानास लि॥ जे राजश्री त्रिंबकजी राजे व राजश्री बाबूराव, कितेक बोलणे आहे, सत्वर प॥ त्याजवरून चार रोज से॥ दर्याबाईंची वाट पाहिली. अद्याप प्रसूत नाही. याजकरिता यजमानांनी पेशव्यांकडे प॥ तिकडे आजी कृष्णाबाई उतरून आलो. त्याजकडे जातो. बोलणे पेशव्यांचे व यजनांचे पूर्ववत् आहे. पेशवे उद्यां कूच करून मिरजेवरून मजल दरमजल पुण्यास येतील. यजमान बारा दिवस दक्षिण तीरास अडकले, ते, बायको अडली आहे. ईश्वर श्री रघुबिर निवाडा करतील तेव्हा, बारा दिवसांनंतर अलीकडे उत्तर तीरास येतील. दोही जीवांचा निवाडा श्रीनें सत्वर करावा. पुण्यास येणे प्राप्त झालेसे दिसतें. पेशवे दरकूच येतील. आह्मी त्यांचे लष्करांत आज जातों. यजमानाची काहीं खर्चाची बेगमी करून आह्मी पेशव्यांचे लष्करासमागमें तिकडे येतो. मोरोपंत दामले व गोविंदभट काका व विश्वनाथ गणेश यांस सत्वर सत्वर पुढे पे॥. राजश्री विश्वनाथ भटजीबावांस सांगणे जे सत्वर सत्वर येणें, ह्मणून सांगणे. बंगाल्याकडील ऐवजाविषयीं थोडीशी घालमेल आहे. सत्वर येणें, ह्मणून सांगणे. दोघा भावांचा मजकूर आजवर पूर्ववतच आहे. याप्रसंगी ते असावे. दुसरे, आह्मांस दरबारास जाणें प्राप्त. आमचे जाले आहे. तेही बोलावितील. विसोबांस सांगणे जे सत्वर सत्वर आले पाहिजे. खुद्द जाऊन सांगणे. वोढे याचें धरण तयार रातचा दिवस करून करवणें. पलीकडील विहीर पंचगंगेची तयार करवणें. हौदासारखी करवणें. पांढरीवरील भोगांवची विहीर तयार करणें. कारखाने व तोड चालतीच असों देणें. शेंदोनशे तीनशें रुपये अधिक उणेकडे न पाहाणें. यजमानास आजी चार घटिका दिवसास कन्या जाहाली. ईश्वरें बरें निवडिले. चौदा मुकाम जाले. बहुत काय लिहिणे. हे आशीर्वाद. देवाची सेवा करवीत जाणें. हे आशीर्वाद.