Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[१८५] श्री. १७५८.
यादी. राजश्री जानोजी भोसले यांजकडे ऐवज येणें. सु॥ समान खमसैन मया अलफ:
-------------------------------------------------------------------------------------रुपये.
२, ५०,००० | सेनासाहेबसुभा याची नजर अखेर साल पावेतो. |
५०,००० | हुजुराचा ऐवज कैलासवासी स्वामीचे नजरेचा व कर्जाचा वाड्यांतील दरसाल पावेतो. |
१०,००० | सरकारच्या असामीबद्दल. |
५,००० | कापड बाळापुरी. |
२,२५,००० | प्रांत वराड येथील बाबती सरदेशमुखीचा मक्ता. |
२,००००० पंतप्रतिनिधी १,००००० पूस अखेर १,००००० ज्येष्ठ अखेर -------------- २,००००० २५००० बावतीपैकी नजर, निमे पौष अखेर, निमे आषाढ. --------------- २,२५,००० |
|
------------------ | |
५,४०००० | |
११,००००० | मुधोजी भोसले यांस सन सबांत चांदेवराड प्रांत नेमून घ्यावा तो न दिल्हा सबब. |
------------------ | |
१६,४०,००० | |
याखेरीज राजश्रीकडील कर्जापैकी दोनतीन लक्षांचे हवाले घ्यावे. |
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[१८४] श्री. ३० सप्टेंबर १७५२.
* राजश्री कान्हेरपंत गोसावी यासी :-अखंडितलक्ष्मी अलंकृत राजमान्य स्ने॥ रघोजी भोसले सेनासाहेब सुभा दंडवत विनंति उपर येथील कुशल जाणून स्वकीय लेखन करणे. विशेष. आमचाहि वृद्धापकाळ व तुमचाहि वृद्धापकाळ. ऐशा प्रसंगामधी तुह्मीं व आह्मीं विभक्त असावें हे विश्वरास मानत नाहीं. याउपर कितेक गोष्टी तुह्मास व आह्मास सांगितल्या त्या उभयतांनी चित्तांत आणाव्या. पूर्ववत्प्रमाणें एकचित असलियाणें सर्व उत्तम आहें, ऐसें चित्तांत आनून, हे पत्र लक्ष पत्रांचे जागा माणून, तुह्मीं चिरंजीव बाबूरायास घेऊन येणें. हिकडील सर्वार्थ विसोबा सांगता कळूं येईल. तुह्मी यावयास अनमान कराल तर तुह्माला आमच्या गळ्याची आन असे. र॥ छ १ जिलकाद. बहुत काय लिहिणें. विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[१८३] १० एप्रिल १७०८.
राजश्री कृष्णाजी वेंकट सरसुभेदार सुभा प्रांत राजापूर गोसावी यांसी :-अखंडितलक्ष्मीअलंकृतराजमान्यराजश्री स्ने॥ परसोजी भोसले दंडवत. सु॥ समान मया अलफ. उपरि येथील कुशल जाणून स्वकीय लेखन करीत गेले पाहिजे. विशेष. राजश्री रामाजी नारायण कोलटकर, वास्तव्य कसबें नेवरें सुभे मजकूर हे राजश्री स्वामीच्या दर्शनास पाटगावीचे मुकामी आले. ते समयी राजश्री स्वामीस विदित केले कीं, आपण स्नानसंध्या करून निस्पृही राहून श्री यांचे भजन करून राहून. योगक्षे चालिला पाहिजे. तर स्वामींनी श्रीस व आपणास काही वृत्त वतन करून दिली पाहिजे. याजवरून स्वामी कृपाळू होऊन यांसी वृत्त कसबें नेवरेंपैकी करी दाभोळी पांचशे करून दिल्ही आहे. येविशी यादी राजपत्रे आहेत. ते व हे प्र॥ गांव देविले पाहिजे. यांचे चालवणें आह्मांस अगत्य आहे. तैसें आपणहि अगत्य धरून यांचें चालवणें येविशी विशेष खुलासा नलगे. कृपा असो दीजे. र॥ छ २९ हे मोहरम. हे विनंति.* *+ *++
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[१८१] श्री. २५ मार्च १७२९.
श्रीमत परमहंस बावा स्वामीचे सेवेसी:-
सेवक कान्होजी आंगरे सरखेल साष्टांग दंडवत विनंति उपरी येथील कुशल चैत्र शुध्द चतुर्दशी मंगळवारपर्यंत जाणून आशीर्वादलेखन आज्ञा केली पाहिजे. विशेष. आपण पत्रें सुवर्णदुर्गीचे मार्गी पाठविली व लिमयाबराबर पत्र पाठविले ते प्रविष्ट होऊन साद्यंत वर्तमान कळले. त्याचीं उत्तरें व स्वामीनें जिन्नस सुरण व द्राक्षे व दारू व नारायणतेल याविशी लिहिले, ते सुवर्णदुर्गास पाठवून देतो. तेथून स्वामीजवळी प्रविष्ट होईल. स्वामीनें वर्तमान लिहिले होते, त्याचे उत्तरहि त्या जिनसासमागमें पाठवून देऊन. बहुत काय लिहिणे. हे विज्ञप्ति.
[१८२] श्री.
श्रीमत परमहंस गोसावी बावा स्वामीचे सेवेसी:-
सेवक कान्होजी आंगरे सरखेल साष्टांग दंडवत विनंति उपरी येथील कुशल जाणून स्वामीनें आशीर्वादलेखन करविले पाहिजे. विशेष. रामा बिन महादशेट सोनार अलिबागामध्ये गेला. त्यास तो सांप्रत अटकेंत आहे. त्यास मुक्त करणें, ह्मणून आज्ञा लिहिली. तरी त्याचा व अलिबागीचा सोनार याचा भुताचा कथळा लागला. त्याजवरून हरदूजण अटकेंत होते. त्यास स्वामीचे पत्रापूर्वी अगोदर पंधरा वीस दिवस सोडिला असे. बहुत काय लिहिणे. कृपा लोभ असो दीजे. हे विज्ञप्ति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[१८०] श्री. १७२८.
श्रीसच्चिदानंदकंद भृगुनंदनस्वरूपेभ्यो श्रीपरमहंस स्वामीचे सेवेसी :-
सेवक कान्होजी आंगरे सरखेल साष्टांग दंडवत विनंति उपरी येथील कुशल जाणून स्वामींनी स्वकीय कुशल ल्याहावयास आज्ञा केली असे. विशेष. स्वामींनीं पत्रें पाठविली ती प्रविष्ट होऊन बहुत समाधान जाहले. वरघांट जावयाची आण मोकळी केली. यास्तव जातों. परंतु दोन पत्रें पाठविली पाहिजेत ह्मणोन लिहिले, त्यावरून कानोजी भोसलें व नारायणभट यांसी ऐशी पत्रे पाठविली आहेत. स्वामींनी ते प्रांतीं जाऊन, सर्व जनाचा उद्धार करून, पुन्हां आगमनाचाहि विचार अविलंबेच केला पाहिजे. स्वामी वरघाटे जात आहेत. ते प्रांती मोतियाचे जोडियाचा यत्न करावा ह्मणोन पूर्वी स्वामीस लिहिले आहे. हल्लीहि स्मरण लिहिले असे कीं, उत्तम जोडी, गोत्रशुध्द, तेजवत, अडीच तीन मासे वजन, ऐशी जोडी मोतियाची तलास करून, किंमत पडेल ते देऊन, आणिली पाहिजे. विशेष काय लिहिणें. कृपा असो दीजे. हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[१७९] श्री. २२ सप्टेंबर १७२८.
श्रीसच्चिदानंदकंद भृगुनंदनस्वरूप पारावारीण यमनियमाद्यष्टांग योगसाधन श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य स्वामीचे सेवेसी :-
सेवक कान्होजी आंग्रे सरखेल कृतानेक साष्टांग दंडवत विनंति उपरी येथील कुशल भाद्रपद वद्य अमावस्या रविवासरपर्यंत स्वामीचे कृपावलोकनेकरून सेवकाचे वर्तमान यथास्थित असे विशेष. स्वामीनीं आशीर्वाद पत्र पाठविलें ते प्रविष्ट होऊन बहुत समाधान जाहलें. पूर्वऋणानुबंधेकरून कोंकणांत येणें जाहलें, व तुह्माकडेस तुलसीदल आहे, ते नकदी तुह्माकडेस आहेच, व्याजाचा हिशेब येणें, व हत्तीमुळें पंचवीस हजार रुपये पडिले इत्यादिक, व गोठणे श्रीस द्यावे, ह्मणोन लि॥, तें विदित जाहले. ऐशास, ऋणानुबंधेकरूनच अवघे पदार्थ घडतात. ते गोष्टीचे सामान्य पक्ष असतील त्यांणी सुखदु:ख न मानावें. आणि स्वामी तो परमहंस, सुखदु:खातीत स्वामी असतां क्षणक्षणा फलाण्यामुळें फलाणें जाहलें. हत्तींमुळे फलाणें गेले, या प्रकारें स्वामी लेहून पाठवितात, याचा विचार काय? हा मोह मनुष्यास न व्हावा. यास्तव याविशी कितेक श्रुति, स्मृती प्रवर्तल्या आहेत. ऋणानुबंधिन: सर्वे पशुपत्निसुतादय: ॥ऋणक्षये क्षयं यांति का तत्र प्रतिवेदना ॥ १॥ इत्यादिक शास्त्रार्थावरून कोणाचे काय गेले व कोणीं नेले ? याउपरी स्वामीस उचित नाहीं कीं, जाहले गोष्टीची क्षीत मानून लिहून पाठवावें. सर्व गोष्टीस भगवदिच्छा प्रमाण असे. वरकड इकडेस तुलसीदल आहे त्याच्या व्याजाचा अर्थ लिहिला, तरी ऐसे विचार तोंडीच असत नाहीं. आमचें काहीं लिहिले पुसले स्वामी जवळ असिले तरी आह्मी व्याज देऊन. अन्यथा एक टक्काहि व्याज ह्मणोन देणार नाही. आह्माकडून प्रतिवर्षी स्वामीस पावतें. त्याचा आजि त॥ हिशेब करून स्वामीकडेस बाकी निघेल ते स्वामीस कळलीच आहे. गोठणेयाचा मजकूर तरी, भटास दिल्ही वोसरी तो भट पाय पसरी,हा लेख जाहला. असो. स्वामीपेक्षां आह्मांस विशेष काय आहे ? गोठणेयाची सनद पाठविली असे. गांवीची लावणी संचणी होऊन माहूर गांव होय ते गोष्टी केली पाहिजे. वरकड स्वामीनीं आज्ञा केली, त्याचें उत्तर अलाहिदा पत्रीं लि॥ आहे, त्यावरून कळेल. बहुत काय लिहिणें. कृपा वर्धामान करावी. हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[१७८] श्री. ९ आगष्ट १७२८.
राजश्री चिमणाजी कृष्ण गोसावी यासी :-स्ने॥ कान्होजी आंग्रे सरखेल रामराम. सु॥ तिसा अशरीन मिया अलफ. तुह्मास आंबसोले वजन .॥. अदमण पाठविली असेत. तीं घेणें. जाणिजे. छ १४ मोहरम.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[१७७] श्री. ८ आगष्ट १७२८.
राजश्री चिमणाजी कृष्ण गोसावी यासी :-स्ने॥ कान्होजी आंगरे सरखेल रामराम विनंति उपरी सु॥ तिसा अशरीन मया अलफ. तांदूळ प्रयोजन असे तरी बारीक तांदूळ कैली पें .।. पांच मण व मोठे तांदूळ केली मापें .।. पाच मण एकूण दाहा मण तांदूळ पाठवून दिल्हे पाहिजेत. र॥ छ १३ मोहरम.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[१७६] श्री. ३ एप्रिल १७२७.
पु॥ श्रीमत्परमहंसबावा स्वामीचे सेवेसी :-
विनंति विशेष. स्वामीनीं पत्र पाठविलें तेथे लिहिलें कीं, गोठण्याहून स्वार होऊन गोव्याकडे गेलों, तेथून कोल्हापुरास जाऊन श्रीचें दर्शन जालें, तेथून उदाजी चव्हाणाची भेटी घेऊन पुढें घोरपडे यांकडे जावयाचा विचार केला. तो वाटेचें उष्ण व फार मार्गहि चालत नाहीं, गोमूत्र मिळण्याचे संकट जाणोन, तेथूनच फिरलो ते पालीस आलों, तो ज्वराची व्यथा निर्माण जाली. ह्मणोन लिहिले. तरी, श्रम करितां ज्वरे पीडा केली. त्यास उपाय करून, आरोग्यता करून घेतली पाहिजे. धावडशीस उदक असोन गुराणसास प्राप्त नाहीं, ऐसे देखोन, तळें थोर इमारतीचें बांधावयास जागा, उदकास पूर्ण पडे असा, पाहोन, तळेयाचे कामास कारखाना लाविला आहे, उदक आह्मास वाटेवरी आहे; सर्वांस कामास येईल, ह्मणोन सविस्तर लिहिले, त्यावरून कळले. तरी स्वामीनें जो उद्योग आरंभिला तो उत्तम आहे. पाणीहि लागेल. सर्वांस, गुरामाणसांस, कार्यास येईल. श्रेयस्कर आहे. बहुत काय लिहिणे. कृपा असो दीजे. हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[१७४] श्री. ९ एप्रिल १७२५.
श्रीमत् परमहंस गोसावी बावा स्वामीचे सेवेसी :-
सेवक कान्होजी आंगरे सरखेल साष्टांग दंडवत विनंति येथील कुशल चैत्र बहुल अमावस्या सौम्यवारसपर्यंत जाणून स्वकीय कुशल व आशीर्वादलेखन आज्ञा केली पाहिजे. विशेष. स्वामींनीं चंद्रज्योति, नळें, पाविशीं आज्ञा केली. त्याजवरून चंद्रजोती सुमार २५, नळें, शिंगे सुमार २५ पंचवीस चंद्रजोति व पंचवीस नळे पाठविले आहेत. हेमगर्भ मागाहून पाठवून देऊन. विदित जालें पाहिजे. कृपा निरंतर असों दिली पाहिजे. हे विज्ञप्ति.
[१७५] श्री. ३ एप्रिल १७२७.
श्रीमत् परमहंस बावा स्वामीचे सेवेसी :-
सेवक कान्होजी आंगरे सरखेल साष्टांग दंडवत विनंति विशेष. येथील कुशल चैत्र बहुल सप्तमी सौम्यवासरपावेतों जाणून आशीर्वादलेखन केलें पाहिजे. यानंतरीं स्वामींनीं पत्रें पाठविली ती पावलीं. लिहिले कीं, गोठणेयाहून निघोन घांटावरी धावडशीस आलों. परंतु वाटें उष्ण बहुत, त्या श्रमानें ज्वराची वेथा शरीरीं फार जाली. हे वर्तमान राजश्री यांस कळलियावरी साताराहून फालगून वद्य नवमी, बुधवारी, धावडशीस आले. तों आह्मी तळेयाचे कामावरी होतों. तो एका बाणाचे टपियावरून पायउतारा होऊन आह्मी येतों, तेथे आले. बहुतशी मर्यादेनें, परम निष्ठेने, भेट घेतली. भेटीनंतर स्वकीय कुशल सांगितले. तें आयकोन आपले स्वकीयहि सांगितले. ऐसें परस्परें संतोषाचें भाषण जाले. मग आंगावरी दुशालाची जोडी होती, ते राजश्रीचे आंगावरी प्रसाद घातला. मग तेथून राजश्री व आह्मी आपले वाडियांत आलों. अन्नप्रसाद सिध्द जाला. तो राजश्रीस व सडी बायका होते त्यांस भोजन घातले व राजश्रीच्या बायकांस अन्नप्रसाद, वस्त्रे राजश्रीबरोबर देऊन, सातारियास रवाना केलें. बहुतसे आदरें करून श्रीस संतोषविले. हें वर्तमान कळावे ह्मणून स्वामीने लिहिलें. त्याजवरून सविस्तर कळो आलें. व भेटसमयीं तुरकी घोडा दिल्हा ह्मणून स्वामीनें लिहिले. तरी स्वामीचें तेज सामान्य नाहीं! श्रीभार्गवस्वरूप आहेत. जो कोणी स्वामीस न मानी तोच अविवेकी आहे. जे स्वामीचें स्वरूप समजले आहेत, त्यास ते स्वामीचे मर्यादेस अंतर करीत नाहीं. बहुत काय लिहिणे. स्वामी समर्थ आहेत. कृपा असो दीजे. हे विनंति.