Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[१९७] श्री. २२ नोव्हेंबर १७६०.
राजश्रियाविराजितराजमान्यराजश्री बाबूराव कोनेर स्वामी गोसावी यांसी :-
पोष्य बाळाजी बाजीराव प्रधान नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणोन स्वकीय कुशल लिहीत जाणें. विशेष. खासा स्वारी हिंदुस्थानांत सत्वर होणार. ऐशास, स्वारीबरोबर तोफखाना मातबर आहे. जलद स्वारीमुळें बैल थकतील. त्यांस, कुमकेस दुसरे बैल पाहिजेत. यांजकरितां हें पत्र तुह्मांस लिहिले असे. तर बैल चांगले, मजबूत, तरणे, तोफाजोगे, सर ४०० चारशें खरिदी करून झांशी तालुक्याचे सरहद्देस स्वारीच्या मार्गाच्या सुमारें ताबडतोब पाठवून देणें. गवताची तरतूद करणें. जाणिजे. चंद्र १३ रबिलाखर. बहुत काय लिहिणें. हे विनंति.
[१९८] श्री.
राजश्रियाविराजितराजमान्यराजश्री बाबूराव कोनेर स्वामी गोसावी यांसी :-
बाळाजी बाजीराव प्रधान नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणोन स्वकीय कुशल लिहीत जाणें. विशेष. खासा स्वारी मकडाईवर आली. दरमजल देवरीवरून बिल्हेरीवरून पुढें येत असो. तुह्मांस तेथें कार्यभाग बहुतसा नसेल तरी तुह्मीं पत्रदर्शनीं भेटीस येणें. जरी कामकाज असेल तरी तुह्मी रहाणें, आपलेकडील मातबर पुढे दर्शनास पाठविणें. विलंब न लावणें. दिल्लीकडील वगैरे वर्तमान लिहिणें. हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[१९६] श्री. ३० जुलै १७५७.
राजश्रियाविराजितराजमान्य राजश्री बाबूराव कोनेर स्वामी यांसी :-
पो बाळाजी बाजीराव प्रधान नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहीत जाणें. विशेष. शहानवाजखान आमचे, आमच्या विचारें चालतात, हा आरोप नवाब सलाबतजंगीं ठेवून, बसालतजंग कनिष्ठ बंधू व आपण एक होऊन, शहानवाजखान यांची मुतलक वकिली तगीर करून, बसालतजंगास सांगितली. त्याजवरून शहानवाजखान यांणी संदेह चित्तांत आणून दौलताबादेस गेले, किल्ला बळकाविला आहे. इतका मनसुबा केला, यास संमत निजामअल्लीचें घेतले असेल. त्याचे विचाराखेरीज केलें नसेल. व तेहि अवरंगाबादेस येणार. आह्मास या गोष्ठीचा इतल्ला किमपि दिल्हा नाही. तस्मात्, त्यांच्या कर्तव्याचा प्रकार एक प्रकार दिसतो. निजामअल्ली अवरंगाबादेस यावयाचा मनसुबा करितील. तर तुह्मीं युक्तीने व स्नेहाच्या वाटेनें सांगून त्यांचें येणें अवरंगाबादेस न होय तें जरूर करणें. गोड बोलूनच त्यांचा येण्याचा मनसुबा मोडावा. कदाचित् तुमचें सांगितलें न ऐकतां येऊंच लागले, तरी बराच कजिया करून आपले जागा स्थिर होऊन रहात तें करावें. येवशीं जानोजी बावास लिहिले असे. तरी याप्रमाणें करणें. जाणिजे. छ १३ जिलकाद. + जरूर निजामअल्ली अवरंगाबादेस न येत तें करणें, हरप्रकारें. बहुत काय लिहिणें. हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[१९५] श्री. १७ नोव्हेंबर १७४९.
X राजश्री कोन्हेरपंत गोसावी यांसी :-अखंडितलक्ष्मी अलंकृतराजमान्य स्ने॥ रघोजी भोसले सेनासाहेब सुभा दंडवत विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लेखन केले पाहिजे. विशेष. आह्मी गंगा उतरोन अलीकडे आलों. फौजेसुध्दां दोन चार रोजां येत असो. ऐशियासी राजश्री फत्तेसिंगबावा यांसी फौजेसुध्दां तुळजापुरास घेऊन येणें. तुमच्या आमच्या भेटीअंती सर्व मनसुबे मनोदयानुरूप होऊन येतील. याउपरि दिवसगत न लावतां अविलंबे येऊन पोहोचणें. तुमच्या लिहिल्यावरून, व राजश्री विसाजी रघुनाथ व विसाजी गोविंद यांणी कितेक अर्थ सांगितल्यावरून, सर्व कामकाज सोडून, याप्रांते आलों असो. तरी जेणेकडून तुमच्या आमच्या भेटी होऊन, पुढें कितेक मनसुबे होऊन येत तें करणें. राजश्री विसाजी रघुनाथ वकील व विसाजी गोविंद याची रवानगी येका दोन रोजा करून पाठवीत असो. याजवरून सविस्तर अर्थ कळो येईल. र॥ छ १७ हे जिल्हेज. बहुत काय लिहिणें. लोभ असो दीजे. हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[१९४] श्री. नोव्हेंबर १७४९.
राजश्री कोन्हेरपंत गोसावी यांसी :-अखंडित लक्ष्मी अलंकृत स्ने॥ रघोजी भोसले सेनासाहेब सुभा दंडवत विनंति येथील कुशल जाणोन. स्वकीय कुशललेखन केले पाहिजे. विशेष. वेदमूर्ति राजश्री रघुनाथभट येथें आलें. त्यांणी तुह्मास पत्र पाठविले आहे. त्यावरून कळो येईल. राजश्री फत्तेसिंगबाबा भोसले यांचा व आमचा करार तुमचेच विद्यमाने जाहाला आहे. त्यास, हाली राजश्री अंबाजीराम पाठविले आहेत हे सविस्तर अर्थ सांगतील. तो अर्थ चित्तांत आणून मशारनिलेनीं सत्वर निघावयाचा विचार केला पाहिजे. व तुह्मी सत्वर येतो ह्मणोन आह्मापाशीं करार केला आहे, अद्यापि आला नाहीं. तरी पत्र पावतांच अविलंबे आले पाहिजे. र॥ छ ११ माहे रमजान. + तुह्मीं आह्मासी करार केला होता कीं, मागून दों महिन्यां येतों. ते आजून आलां नाहीं. तर आता देखत पत्र आता येणें. अनमान सहसा न करणें. कळले पाहिजे. बहुत काय लिहिणे. हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[१९३] श्री.
राजश्री याविराजित राजमान्य राजश्री बाबूराव कोन्हेर स्वामी गोसावी यांसी :-
पोष्य बाळाजी बाजीराव नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणोन स्वकीय लिहीत जाणे. विशेष. आमच्या नजरेचें रुपये व चिरंजीव राजश्री भाऊचे नजरेचे रुपये करार केले ते अद्याप दिल्हे नाहीं. आमचे कारकून समागमें नेले त्यास हा कालवरी ठेविले. रुपये देत नाही. असो. नजरेच्या रुपयांची चिंता काय ? तुह्मी कबूल केल्याप्रमाणें द्यालच. राजश्री मुधोजी भोसलें येथें असतां अकरा लक्षांचे महाल द्यावयाचा करार ठहरला. त्यांचे कमाविसदार समागमें नेले. त्यांस महाली दखलकार केलें नाहीं. महालचा पैका मन माने तो वसूल घेतला. महाल खराबींत आणिला. मशारनिल्ले आमच्या वचनावरून मोहिमेस हिंदुस्थानात गेले. सावकारापासून कर्जे रुपये सरकारचे मध्यस्तीने मशारनिल्हेस दिल्हे. त्यांचा रुपया त्यास न पावला. तर हे गोष्ट कशी ठीक पडेल! मशारनिलेचे कमाविसदार समागमें नेले त्यास महाली दखलकार केले असते तरी कांही वसूल त्यांजकडे पडता, कांही तुह्मांकडे सनदपैवस्तीपासून पडता. ते गोष्ट न करितां बिलकुल वसूल तुह्मी घेतला. हालसालचाहि घेतां ह्मणोन कळों आले. ऐशास, आह्मीं बोलाचालावयाची गोष्ट बाकीस ठेविली असें नाहीं. मशारनिलेंनी सावनूरच्या मुक्कामी चाकरी केली ते सालचे चार लक्ष रुपये तुह्मी वाजवी त्यास द्यावे ते न देतां आह्मावरी पाडिले. आह्मी त्यास दिल्हे. सालगुदस्ताचें तो तुह्मी त्यांस अकरा लक्ष रुपये द्यावे, त्यास घालमेल करून वसूल झाडेयानशीं घेतला त्याचे, कमाविसदार बैसवून ठेविलेत. हे कोण गोष्ट! अकरा लक्ष रुपये तुह्मास सुटतात ऐसा अर्थ नाहीं. पत्रदर्शनी अकरा लक्ष रुपये पाठवून देणें. येविशी राजश्री जानोजी भोसले सेनासाहेब सुभा यांस लिहिले आहे. तुह्मी त्यांचे यख्तियारिही तुह्मी आहा. दीर्घदर्शत्वें सर्व आपण समजावून व तुह्मीहि उचित रीतीनें ध्यानास आणून रुपये पाठवून देणें. वरकड गोष्ठी आणीक एखादे जागा चालतील. आह्मांजवळ बोलोन चालोन करार जाहाला असतां त्यास नवदीगर करावें ह्मणावें हें कसें ठीक पडेल ? अशा गोष्टी सहसा तुह्मी सरकारी करूंच नये. अशा गोष्टीनें परिणाम लागेल न लागे तो तुह्मास न कळेसा काय ? या उपरि अकरा लक्ष रुपये सत्वर पाठवून देणें + करार केल्या गोष्टी वरकडाप्रमाणें येथील ढकलीत न्याव्या, गोड ल्याहावें, असे सहसा न करावें हेच उत्तम. सत्वर यथार्थ काय तें उत्तर पाठवणें. छ २५ सवाल हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[१९१] श्री. २७ सप्टेंबर १७६०.
राजश्री बाबूराव कोनेर स्वामी गोसावी यांसी :-
सेवक बाळाजी बाजीराव नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहीत जाणें. विशेष. श्रावण शुध्द प्रतिपदेचे पत्र पाठविलें तें छ १७ सफरीं पावलें. चिरंजीव राजश्री भाऊ दिल्लीस गेल्याचे वर्तमान लिहिलें ते सविस्तर कळलें. या उपरिही तिकडील वर्तमानविस्तार वरच्यावर लिहीत जाणें. छ १७ सफर. हे विनंति.
[१९२] श्री. २८ एप्रिल १७५६.
पै॥ छ १ सवाल
राजश्री याविराजित राजमान्य राजश्री बाबूराव कोन्हेर यांसी :-
पोष्य बाळाजी बाजीराव साष्टांग नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय लिहीत जाणें. विशेष. र॥ धोडाजी नाईक नवाळे यांचे कर्ज झांशीस लोकांकडे येणें आहे. त्यांस तुह्मी ताकीद करून मशारनिलेचें कर्ज वसूल करून देणें. मशारनिलेचें दुकान झांशी शहरांत आहे. याची हरेकविशीं गौर करीत जाणें. जाणिजे. छ २७ रजब. बहुत काय लिहिणे. हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[१८९] श्री. १० आगस्ट १७५७.
पु॥ राजश्री बाबूराव कोन्हेरी स्वामी गोसावी यांसी :-
विनंति उपरि. शहानवाजखान आमचे विचारें वर्तत होते, हें निमित्य यांजकडे ठेवून त्यांजपासून मुतलवकिली दूर केली, बिसालतजंगास सांगितली. निजामअल्लीही अवरंगाबादेस येणार. तेव्हां तेहि याच विचारांत असतील. सलाबतजंगांनी त्यांचे विचारें हे मसलत केली असेल. असो. येविशीं राजश्री जानोजी भोसले सेनासाहेबसुभा यांस लिहिले आहे. तरी तुह्मी मशारनिलेस सांगोन निजामअल्लीचें येणें अवरंगाबादेस न होय ते करणें. जाणिजे. छ २४ जिलकाद. बहुत काय लिहिणें हे विनंति.
[१९०] श्री. ९ एप्रिल १७६१.
राजश्री बाबूराव कोनेर स्वामी गोसावी यांसी :-
सेवक बाळाजी बाजीराव साष्टांग नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहीत जाणें. विशेष. तुह्मी छ १६ रजबचें विनंतिपत्र पाठविलें ते छ २९ मिनहूस पावलें. बुंधेले यांणी बहुत धुंद आरंभिली, जागा जागा किल्यांस मोर्चे लाविले. मातब्बर ठाणियांत आमचे लोक आहेत त्यांच्यानें कोणाची कुमक होत नाहीं. याउपरि ठाणी, किल्ले राहात नाहींत. राजश्री गोपाळराव यांस पांच सात हजार फौजेनशी पाठवणें. ह्मणजे बंदोबस्त होऊन येईल. ह्मणून लिहिलें. ऐशास राजश्री नारो शंकर यांस झांशीस रवाना केले असे. त्यांचे हवाली किल्ले व ठाणी कुल करून तुह्मी हुजूर येणें. जाणिजे छ ३ रमजान सु॥ इहिदे सितैन मया व अलफ. बहुत काय लिहिणे. हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[१८८] श्री.
यादी कलमें सरकार राजश्री जानोजी भोसले सेनासाहेबसुभा :-
हुजूर कैलासवासी स्वामीचे वेळेचा ऐवज नजरेचा व कर्जाचा वाड्यांतील, पैकीं दरसाल रुपये ५०००० पन्नास हजार तीर्थरूप कैलासवासींनी करार केले आहेत. त्याप्र॥ |
सेनासाहेबसुभा यांची नजर रुपये ७,५००००. याचे वायदे २५०००० सन समान साल अखेरपर्यंत. |
राजश्री राणोजी भोसले यांसी पेषजी तीर्थरूप कैलासवासीचे वेळेस. आपण दरसाल रुपये २५००० पंचवीस हजार मक्ता केले. त्याप्रमाणें साल दरसाल. |
२५०००० सन तिसा सालपर्यंत २५०००० सन सितैन सालपर्यंत २५०००० सन सितैन सालपर्यंत ---------------- ७,५००००० |
आपणाकडे रुपये १०,००० दहा हजार वेतनाच्या असाम्या नेमून दिल्या आहेत, बित॥ ५००० राघोपंत वोक २५०० आपाजी महादेव २५००० रामचंद्र महादेव ---------- १०००० |
एकूण साडेसात लक्ष वायद्याप्रमाणें. राजश्री राणोजी भोसले यांसी पेषजी तीर्थरूप कैलासवासीचे वेळेस आपण दरसाल रुपये ५०,००० पन्नास हजार आपले विद्यमानें करार. त्या प्र॥ दरसाल. |
बाळापुरी कापड पोषाखी रुपये ५००० पांच हजारांचे सालास. |
शेखमिराच्या परगणियाचा तह येथें ठरला आहे. त्याप्रमाणें दरसाल करारा प्रमाणे. |
कैलासवासी स्वामीचे नजरेचा व वाड्यातील कर्जाचा ऐवज आह्मी देणे, त्यापैकी दोन तीन लक्षांचा हवाला मुदतीप्रणे घ्यावा. ह्मणून आपण सांगितले त्यास, एक वर्षाचे मुदतीचे दोन तीन लक्ष पर्यंत हवाले. |
वराडचे गांव आपले मोकासे आहेत, तेथील इजारे आह्माकडील लोकांनी केले असतील ते सोडून देववूं. |
प॥ जामोद येथील जहागीर आपण आह्मांकडे दिली आहे. तेथील सरदेशमुखी दरसद्दे रुपये १२॥ साडेबाराप्रमाणें करार केले असेत. आपला कारकून द्यावा त्यांजकडे. |
प्र॥ वराड येथील बाबती सरदेशमुखीची |
प॥ वासीम परगणें वासीस व शिरपूर येथील असाम्या कैलासवासी तीर्थरूप यांनी दिल्या आहेत त्या प्र॥. |
एकूण दोन लक्ष पंचवीस हजार वायद्या- प्रमाणे द्यावे. सालची बाकी द्यावी. |
किले धोडप येथील जागीर वराड प्रांते आहे, त्याचा तह कैलासवासी तीर्थ- रूपांनी चालविले आहे. त्या प्र॥. |
चिरंजीव राजश्री मुधोजी भोंसले व बिंबाजी भोंसले यांसी सरंजामपैकी वाटणी तह रुपये १५००००० पंधरा लक्षांचा सरंजाम आपले विद्यनें द्यावयाचा तह ठरला आहे, बमोजीब याददास्त अलाहिदा करून दिल्या आहेत. येणेंप्रमाणें. लंग O |
एकूण चौदा कलमें रास सु॥ सबा खमसैन मया अलफ.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[१८७] श्री. लक्ष्मीकांत. १७५७.
राजश्री रामचंद्र कोनेर गोसावी यांसी :-
स्ने॥ जानोजी भोसले सेनासाहेब सुभा दंडवत उपरि. तुह्मी महादू जासूद यांजबरोबर पत्र पाठविले ते प्रविष्ट होऊन सविस्तर वर्तमान कळो आले. राजश्री आप्पा यांसी खर्चास दहा पंधरा हजार रुपये पाहिजेत, तेव्हां निघणें होईल, ह्मणून लिहिलें. वरकडही कितक मजकूर लिहिला. त्यास, तुह्मांस कळेल त्याप्रकारें समजोती काढून, दहा हजार पावेतों खर्चाची बेगमी करवून, सत्वर घेऊन येणें. पांढरियाकडील फैसला करणें. आह्मीही उदईक येथून कूच करीत आहोंत. तरी तुह्मीं दिवसगत लाऊन एकंदर न राहणें. अविलंबे येणें. र॥ छ ४ हे रमजान. बहुत काय लिहिणे.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[१८६] श्री. १० नोव्हेंबर १७४९.
राजश्री रामचंद्र कोनेर गोसावी यासी :-अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य स्ने॥ रघोजी भोसले सेनासाहेब सुभा दंडवत उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लेखन करणें, विशेष. तुह्मी पत्र पाठविले ते पावोन लेखनार्थ विदित जाहाला. आह्मी वराडप्रांतीहून गंगातीरप्रांते आलो असो. पुढे त्याप्रांतें येत असो. वरकड सविस्तर राजश्री कोनेरपंताचे पत्रीं लेखन केले आहे. त्याजबरून कळोन येईल. जाणिजे. छ १० हे जिल्हेज. बहुत काय लिहिणे.