[२२२] श्री. १८ सप्तंबर १७४२.
... ... ... ... ... ... ... ... ... ... ... ... ... ... ... ... ... ... ... ... ... ... ... ... ... ... ... ... ... ... ... ... ... ... ... ...
... ... ... ... ... ... ... ... ... ... ... ... ... ... ... ... ... ... ... ... .. आहे. वरकड लिहिलें कीं, राजश्री बाबूरावजीचें रवानगीची तरतूद जे करावयाची ते करीत असो. ह्मणोन तपशिले लिहिलें. ऐशियासी मशारनिलेची रवानगी फौजेसहवर्तमान सत्वर करून दसरेयासी आह्माजवळ येऊन पोहचत असे करावें, ह्मणोन मशारनिलेजवळ सांगोन पाठविलेंच होतें. त्याउपरांतहि राजश्री भास्करपंताकडोन पत्रें आली ती बजिनस तुह्मांकडे पाठवून, मशारनिलेचे रवानगीनिशीं सविस्तर अर्थ लेहून पाठविलेवरहि, वरचेवर हाकालपर्यंत पत्रें पाठविली. व राजश्री बाबूराव रघुनाथ यांसीहि साद्यंत वृत्त सांगोन पाठविले. ते प्रविष्ट होऊन मशारनिलेंनी सविस्तर सांगितलेच असेल. ऐशियासी, दसरा तो समीप येऊन चारी दिवस निघोन गेले. आणि आमचे रवानगीचा प्रसंग तो केवळ तुह्मावरच आहे, हाहि अर्थ तुमचे चित्तांत येत असेल. आह्मी तुह्मास वारंवार ल्याहावे ऐसाहि अर्थ नाहीं. गतवर्षी लोकांही नाकर्तेपण करून घारे फिरोन आले, त्यामुळे कित्येक मनसुबेयांसी अंतर पडोन आले. याचा विचार साद्यंत राजश्री भास्करराम याच्या पत्रांवरून ध्यानांत आला असेल. आह्मी तपशिलें ल्याहावें ऐसें नाहीं. यंदाचें मुलूकागिरीचा प्रसंग तुह्मास लिहिलाच आहे. पुढे राजश्री भास्करपंत यांहीं मकसुदाबादेस जाऊन कस्त मेहनत केली आहे. त्याचे सार्थक विना इकडोन फौज गेलिया विरहित होईल न होईल हें कळतच आहे. यास्तव केल्या कर्माचें सार्थक होणें, व कर्जवामाचा परिहार व्हावा लागतो, याजकरितां या प्रसंगी कोणएक यत्नास अथवा तरतुदीस अंतर करितां येत नाहीं. सारांश, फौज सत्वर मशारनिलेकडे जाऊन पोहोंचली पाहिजे. प्रस्तुत राजश्री भास्करराम यांजकडोन राजश्री केसो नरसिंह व राजश्री जिवाजी अनंत हे उभयतां छ २६ रजबीं येथे येऊन पोहचलें. त्यांजकडील यासमागमें पत्रेंहि आलीं. त्यांमध्ये सारांश अर्थ हाच कीं, फौजसुध्दा लवकर येऊन पोहचणें. ह्मणोन बहुत तपशिलवार मजकूर लिहिला आला. तत्त्वार्थ, फौज गेली पाहिजे. यास्तव, आह्मी विजयादशमीचे मुहूर्त येथून स्वार होऊन जात असों. याउपरि तुह्मी राजश्री बाबूराव यासी फौजेसहवर्तमान सत्वर आह्माकडे रवाना करणे. दुसरे पत्राचा मार्ग सहसा न पाहता याच पत्रावरून लोकांचे पदरी ऐवज झाडेयानसीं घालून लौकर लौकर फौजेसुध्दां जलदीनें रवाना करून पाठविणे. लोकांध्ये कोणी हैगै करील, याजकरितां पत्रांमागून पत्रें व जासूदजोडया रवाना करून फौजेची गाहा येई ते करणें.