[२२१] श्री. २८ अक्टोबर १८४०.
म॥ अनाम देशमुख व देशपांडे प्रांत गढें यांसी राणोजी भोसले सु॥ इहिदे अर्बैन मया अलफ. प्रांतमजकूर सालदगुस्ता चिरंजीव राजश्री रघोजी भोसले सेनासाहेबसुभा याजकडे कमाविशीबद्दल दिल्हा आहे. सालमजकुरीं तेणेंप्रमाणें करार आहे. चिरंजीव आपले तर्फेने कमावीसदार पाठवितील त्यास रुजू होऊन जमाबंदीप्रमाणे माल व जकात व फरोई कुलबाब कुलकानू मुकासबाबेचा उसूल सुरळीत देणें. उजूर न करणें. छ १७ साबान.