Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

[१७३]                                                                       श्री.                                                    २५ मार्च १७२१.

वेदमूर्ति राजश्री धर्माधिकरणी व उपाध्ये मौजे आंबवली त॥ खेड गोसावी यांसि :-
सेवक कानोजी आंगरे सरखेल दंडवत सु॥ इसने अशरीन मया अलफ. रामजी चोरघा, बापूजी पारठा याचा लेक व मानाजी आंबवला हरदूजण यांही माहाद माहाला नाहावी, मौजे गांवतळें, याणें आपलें नांव पवार ह्मणोन सांगितलें, याजकरितां न कळतां सोयरिका केल्या. त्याउपरी नाहावी ऐसें दखल जाहलें. यावर हरदूजणांस पश्चात्ताप होऊन, बायका दूर करून, प्रायश्चित्त घ्यावें, येविशी हुजूर रसालगडचे मुक्कामी येऊन विनंति केली, अपभ्रवशें शरीरसंबंध केले. याकरितां हरदूजणाच्या बायका दूर करून प्रायश्चित्ताची आज्ञा केली असे. श्रीभीमाशंकर व श्रीमहाबळेश्वर व श्रीहरिहरेश्वर येथील यात्रा करवून यात्रा करून आल्यावर यथाविध प्रायश्चित्त देऊन, शुध्द करणें. जाणिजे. र॥ छ १२ जमादिलाखर.
                                                                                                                                                                                 
                                                                                              173

अतीत, ब्राह्मण, कितेक फकीर फौजेत होतें. त्यांजला नानाप्रकारें द्रव्य, अलंकार देऊन, बाहेर बिदा करून दिल्हे. श्रीमंत भाऊसाहेब हत्तीवरून उतरोन अमरसाहित्य अंगातील काढोन टाकून, जिमा घातला. एक तलवार फिरंग घेऊन घोडयावर स्वार जाहाले. जयजय, हरहर शब्द संपूर्ण फौजेत जाहाला. शिपाई, वीर यांणी दरोबस्त तरवार मेणांतून बाहेर केली. तयार जाले. आह्मी आपले मिसलेस मातोश्री पार्वतीबाईस घेऊन गेलीं, तों अबदलअल्ली, अगस्ती, सैन्यसागरशोषक, फतेनिशाण पुढें देऊन, जे ठिकाणी उभा होता तेथून गलबल पाहून, एकसमयावच्छेदें सर्वांनी तरवार वोढिली. तेव्हां भाऊसाहेबीं आह्माकडे निरोप पाठविला कीं, तुह्मी हत्यार न लावणें, आमची व त्यांची तरवार लागली ह्मणजे तुह्मी सहस्त्रयोगें न विचारतां निघोन जावें. यांत अंतर कराल तर गोब्राह्मणवधाचे पातक कराल, जीवित्व अथवा मृत्यू आह्मास असो. असें शपतपूर्वक सांगोन पाठविलें. अबदलअल्लीपठाण (याणें) हत्यारें वोढून, एकसमयावच्छेदें आपले पीर मूर्छाचें स्मरण करून, घोडे चालविले. रायांनी तम तोफखाना व गाडदी यांसी ताकीद केली कीं, जेव्हा माऱ्यांत येतील तेव्हां तोफ सुरू करावी. यावर अबदलअल्ली समीप आले. त्यावेळेस इकडून दोन शिलका ह्मणजे दोन फैरा एका क्षणांत केल्या. माणसे व घोडीं कितेक उडालीं. त्याचा लेख कोणीहि केला नाहीं. त्यांनी दृढ निश्चय करून खंदकापावेतों आले. मागाहून घोडे वगैरे यांची घटणी फार जाहाली. कितेक स्वार खंदकांत प(डले) xxxxxxx (यापुढें किती पाने गेलीं आहेत तें न कळे) आहेत. राव व भाऊसाहेब यांणीं आपला पुण्यप्रताप, लौकिक करून वैकुंठवास केला. शोक किमपि न करावा. याउपरि जसे बेतेल तसें सेवेसी श्रुत करूं. विशेष, बहुत काय लिहू ? हे विज्ञापना. शके १६८२ विक्रमनाम संवत्सरे, पौष शुध्द ८ अष्टमीचे दिवशी जालें वर्तमान लिहिले. हें विज्ञापना.

जन्माचें सार्थक व्हावे ह्मणून हा प्रसंग जगदीशें परमपुण्येकरून याजिला, मृत्यू योजिला हे मुख्य आहे, याजपेक्षां अधिक पुढे विशेष काय करणें ? घरी अथवा दुर्गी, पर्वती, पाताळी, कोठेहि चुकत नाही. अशा प्रत्ययपूर्वक गोष्टी ऐकोन, लाचार होऊन, उगाच राहिलो. मातोश्रीस गजारूढ करून, श्रीमंत विश्वासराव यांजला घेऊन, आह्मी चालिलो. इतिकयांत इभ्रामखान गाडदी यास वर्तमान कळलें. त्याजवरून तयार होऊन बोलिला कीं, हे कर्म अनुचित करता, रायाची नेमणूक पहिली दरोगी तोफखान्याचे केली होती, आणि हा उपाय करता! परंतु उपयोगास येणार नाहीं, जसे पूर्वी आह्माजवळ होते तसेच असावे, मी जिवंत असता सात पातशाहा एकत्र होऊन चालून आले तरी तीन वेळां फिरवीन, तशांत अबदलअल्लीची बिशात काय आहे ? असें असतां आश्चर्य दर्शवून फौज बेहिंमत करता! असे उपाधियुक्त वाक्य करता जाहला. लाचार! नाइलाज! त्याजपुढे अवघे संकटार्णवी स्तब्ध राहिले. श्रीमंत विश्वासराव यांणी त्याचें बोलणें ऐकून चित्तांत विचार करून, धैर्य धरिले कीं, भाऊसाहेबीं आपला वियोग करून आह्मी वांचावें असे निर्मिले हे आह्मास विहित नाही; सारांश जो मार्ग त्यांचा तोच आमचा, आह्मी धाकटे आहों, आदौ पुढे जाऊन, मोक्षमार्ग सिध्द करून, स्थळ उभयतांचे पाहूं. असे मनांत धरून कोणास न पुसतां, इभ्रामखान गाडदी याजकडे हत्ती डुलवून आणला. देव व वृद्ध ब्राह्मण व वडील यांचे वंदन करून, अंगांतील कवच होतें ते काढून, निश्चयपूर्वक सर्वांस गोष्ट सांगितली कीं, जो प्राणी वाचेल त्याणें आजचे प्रसंगाचें आमचे कौतुक पाहून दक्षणेत तीर्थरूप नानासाहेब यांजवळ सांगावें. असे बोलून, हत्ती पेलवून दारूखान्याजवळ गेले.

आह्मी आपले मिसलीत तयार होऊन उभे होतांच, ते दिवशींचा समय सर्वांस विचित्र भासला. उपप्लव नानाप्रकारचे होऊ लागले. आकाशमार्गी घंटानाद व पक्ष्यांचे शब्द भयउत्पन्न होऊं लागले. दिशा, आकाश, रक्तवर्ण पाहून आह्मी श्रीमंताजवळ गेलों. तेथेंही सर्वांची क्षीण चित्ते देखिली. भाऊसाहेब, धैर्याचे मेरू, आह्मांस आज्ञा करिते जाले कीं, याप्रसंगी सर्वप्रकारे आह्मांस तुह्मी वडील आहां, तीर्थरूपापासून सांभाळ केलात, आजचा प्रसंग आमचे समाप्तीचा आहे, ब्रह्मलिखित निश्चय असे, त्यास, दोन प्रकारे संकट मोक्षमार्गास पाशवत् जाहले आहे, हे आपणा वेगळे मुक्त करून मनोरथ पूर्णकर्ता कोणी दिसत नाहीं, संकटे कोणती ह्मणाल तर चिरंजीव विश्वासराव यांस मातापिताविरहित हा प्रसंग व दुसरे आमचे कुटुंब समागमे, त्यास, स्त्रीचा वध करावा तर आमचा क्षात्रधर्म नव्हे, ब्राह्मणास स्त्रीहत्या वर्ज्य, त्यांणी सहगमन करावें, तर आह्मी धारातीर्थी देह ठेवणार, याचें फळ होणार नाही, पुढे संबंध दुष्टाशी, या संकटापासून आह्मास दूर करून मोक्षमार्गाचा पंथ आमचा शुध्द निर्मळ केला पाहिजे, याजकरितां उभयतांस तुह्मी आपलेजवळ घेऊन एका बाजूवर जावें. अशी शास्त्रवत् उत्तरे केली. तेसमयीं ही वचनें, तो प्रसंग वैरियासही पाहावणार नाही. एक घटकापर्यंत आह्मी मूर्छागत जाहलों आणि श्रीमंत भाऊसाहेब यांजवळ जाऊन समजाविले कीं, हे कर्म किं निमित्य करिता ? बाहेर आणीक लोकांस कळता फौज चकित, नाकर्ती होईल. असें आह्मी खंबीरता बोलतां आपण बोलले कीं, अंदेशे क्षणश: काय करावें ? तूर्त तुह्मी कांहीं न विचारितां उभयतांस घेऊन जाणें. प्रसंग फार समीप आला आहे ह्मणून बोलिले. आह्मी उत्तर केले कीं, असे कर्म काय ह्मणोन ? असत्या आयुष्यास मृत्यूचा अंगिकार करिता. आपलेजवळ सर्व योग्यता आहे. द्रव्य, फौज, कांही प्राणांपेक्षा अधिकोत्तर नाहीं. पेशजी पठाणलोक आपलेकडून कितेक वेळा सलूख करीत असतां तुह्मी न केला. बरें ! असो ! सांप्रतहि सामोपचार करतों. आह्मांस आज्ञा जाहाली पाहिजे. बोलणे ऐकोन क्षणभर स्तब्ध राहून वचनोत्तर निष्ठुरतेचे दिल्हें कीं, नेमणूक कर्तव्य विधि पूर्वीच करून गेला, षण्मास जाणतो, तो प्रसंग सांगावयास येत नाहीं, अन्यथा करणार कोण आहे ?

इभ्रामखान गाडदी यांणी अर्ज केला कीं, आज निकड फार होईल, पठाण फार पोळले आहेत, कसूर होणार नाहीं, साहेबीं एक ठिकाणी चाल होतांच धैर्य धरून असावें. अशा विचारांत आहे तों तोफांचा मार चुकवून पठाण येऊन उभे राहिले. त्यास, पुढें चाल करावयाचा लाग दिसेना. फौज जैशी तैशीच तयार आहे हें पाहून अबदलअल्ली फिरोन बेहिंमत जाला. आघाडीस होते ते पिछाडीस जाले. पातशाहाजादी मलकाजमानी तयार होऊन अवघ्यांचे मागें होती. पठाण फौजेची अधैर्यता पाहून चिंतागत जाली कीं, मी यांजला बहुत प्रकारें तेज दिल्हें, परंतु योग अघटित आहे, सांप्रत त्यांणीं युध्यही न केल्याचा इलाज कांही चालत नाही, मैदानची लढाई असती तर होणार समर्थ मानून घोडे चालवितें, आता कितेक प्रकारे जंगी सरंजाम गलिमाचा, व दुसरा, खंदक. यास काय करतील हे मनांत आणून चिंतार्णवी पडली. हातिणीवर अंबारीत स्वारी होती ती खाली डेरा उभा केला. उजूतवाजू ह्मणजे हातपाय धुवून तमाम चकताईत ह्मणजे मोंगल यांचे पातशाहीत; औरंगजेब, महाबली, पातशाहा, पुण्यश्लोक, अवलिया, अवतारी पूर्वी होऊन गेला, त्यांचे स्मरण निश्चयपूर्वक करून मान्यता केली. त्याचे पातशाही निशाण जामदारखान्यांतून काढून बिनियावर चढवून सेवकास आज्ञा केली कीं, दरोबस्त फौजेचे अघाडीस घेऊन जाणें. सेवकानें हुकुमाप्रमाणे काठीसहित निशाण, फौजेचे पुढे येऊन उभे करून रोविले. सुजायतदौला व अबदलअल्ली वगैरे मुख्य सरदार यांस तब्रुक, उदी वस्त्रें, मिठाई व अंगारा प्रसादिक पाठविला. प्रसादस्पर्शनी अधैर्य अधीरपणा होता तो सर्वांचा जाऊन, पुन्हां शत्रुर्दनाविशी निष्ठा दृढतर जाली. तम सरदार एकत्र होऊन स्वतां इमानें केलीं. सत्तर हजार फौज एकदिल करून, फरा बांधोन, आह्मांकडील फौजेवर पाहू लागले. व आह्माकडील फौजेस ते दिवशीं तेज अधिक, प्राणघातक, असे दिसोन आलें. दिशा, आकाश, पृथ्वी, शोभाविशोभा, उत्कर्ष जाली. पूर्वी कृष्णावताराच्या समाप्तीत भिल्लबाणें चरणकमळीं निमित्य करून निजधाम करिते जाले. तसे श्रीमंत विश्वासराव व भाऊसाहेब संनिध करून मायावंत केले. आज आमचे आयुष्य तडीस विसरोन दूर ठेविले. पंचप्राण एकत्र एकविचारें निशीथ मृत्यु अंगणी उदित केला. परंतु धारातीर्थी प्रायश्चित्तस्नान करून मार्गावलोकन मात्र आहे. स्वर्गाचे ठायीं देव, गंधर्व यांची विनें कौतुकार्थ दाटली. ही आज चिन्हें, परिच्छिन्न आपण दृष्टांत अवलोकिला. श्रीमंत बाईसाहेब ही वार्ता ऐकोन परम महार्णवी पडली. रायाचे ललाटप्रदेशीं धरून रुदनास प्रारंभ केला. परस्परे श्रमीं जाले.

मी स्त्रीनें युक्त विचार सांगावा, हा पदार्थ नाही. तुमचे विचारास जसें येईल तसे करावें. ह्मणोन तरवार वोढून त्याचे स्वाधीने केली कीं, तुह्मी आपले हातें माझी गर्दनछेद करावा, नंतर तुह्मांस विहित कर्तव्य असेल ते असो. अशी मलकाजमानीची उत्तेजनवचनें ऐकोन, जसे पंकार्त ह्मणजे चिखलानें भरोन आर्त जाले ते गंगाप्रवाहीं निर्मल होतात, तसें सुजायतदौला कुबुध्दिमलें व्यापिले होते ते मलकाजमानीचे वचनगंगोदकजलें प्रक्षाळून पूर्वीपेक्षा सुशोभित जाले. आणि ते समयीं शाहाजानी नौबत केली. चित्तांत धैर्य धरून अबदलअल्ली यास बोलावूं पाठविलें. तो त्यांणीं एकमेकांशी जावयाची सिद्धता करून, प्रस्थान करावयाचे विचारांत आहेत, इतकियांत सुजायतदौला याजकडील बोलावणारा मेला. त्याणे सांगितलें कीं, पातशाहाजादी व सुजायतदौला एके ठिकाणी आहेत, तुह्मांस बोलाविलें आहे. अबदलअल्ली याणें उत्तर केलें कीं, आह्मी निश्चयांत आहों. ह्मणोन मृत्यूवधूलग्नसाहित्य दाखविले. बोलावणारा चाकर माणूस होता. त्यानें उत्तर केले कीं, हे कर्म काय करिता? आपली चिंता सर्व ईश्वरास पडली आहे. गलिमास नसती सलाबत जाली, गलीम तळ व तोफखाना व बुणगे सोडून पळतात, तमाम सरदार पळाले, मूळ करारास आले, याजवर नोबतखाने सुरू करून सुजायतदौला सिध्द जाहाले, साहेबीं चलले पाहिजे, सांप्रत मरत्यास मारणें कठीण नाहीं, ऐशियांत जाऊन तमाम फौज कत्तल करावी. ऐसें ऐकोन जयश्री वस्त्रें भूषणें सुशोभितशी अनृत वार्तिकवचनें सत्य मानून नौबत करविली आणि आपण मलकाजमानीजवळ येऊन खुरनिशात केली. बोलावणारा वार्तिक अबदलआली याचे येण्याचे अगोदर पुढें येऊन सांगितलें कीं, मी याप्रें॥ बोललों आहें, त्यांप्र॥ च त्याशीं उत्तरें करावीं, दुसरें बोलल्यास विचार अनुकूल पडणार नाहीं. याणेंही अबदलअल्ली येतांच निरोपी बोलिला त्याप्रे॥ उत्तरें केली. गहजब भासला. गोरवर्णीस जसे तेज तसेच तेंचक्षणी पुढें होणार याप्रे॥ पुनरावृत्ति बुध्दीस धैर्यसंचार जाहाला. आणि कितेक लोक शिपाई बोलावून सज्ज करून रात्रक्रमण केली. प्रात:कालसमयीं हुंकार देऊन तमाम गळित फौज त्या मुक्कामी टाकून निवडक सत्तर हजार स्वार पठाण शाबुदींत निघाले. तों इकडे आह्मांस बातमी आलीं, श्रीमंत भाऊसाहेब व इभ्रामखान गाडदी यांणी बरा पराक्रम करून तळ उठवून माघारे लष्करात आले. नौबती सुरू करून पांच लक्ष रुपये धर्म केला. दुसरे रोजीं चार घटका दिवसास बातमी आली कीं, पठाण सावर धरून येतात. असें ऐकतांच पूर्ववत्प्रमाणे मिसला तमाम शिबंदी पाठवून फौज सिध्द करून उभे राहिले.

उभयतां बोलू लागलें कीं, तुह्मी आह्मास बुडविलें. अशी परस्परें उत्तरे जालीं. आता आह्मी जातों. अशा कजियांत चारशे माणूस उभयतांचे कामास आले. ते समयीं मलकाजमानी दरम्यान येऊन उभयतांची स्थिरता केली आणि तेथेंच मुक्काम करविला. फौजेत कांही जीव राहिला नाहीं. कित्येक लोक जखमी व एक हिस्सा चांगले. गलीम जेर होतां दिसत नाहीं. आता विचार काय ? कसे करावें, कोणीकडे जावें, व लोकांस मुख काय ह्मणोन दाखवावें, जहराचे प्याले घेऊन मरावें. अखेरी जमा. सारांश, मोठे मोठे अमीर, अबदलअल्ली, सुजायतदौला यांणीं नेमणुकी कितीएक फकीर फकरा लोक बोलावून, ईश्वरप्रीत्यर्थ दानधर्म मृत्युमार्गाचा संग्रह जो करावयाचा तो करून, रात्रीचे ठायीं विषप्रयोग करून अखंडदडायन व्हावें, अशी शरम गालिब जाली. ही खबर मलकाजमानी बादशाहाजादीस आली. तों स्त्रीधैर्य पूर्वीपासून महत्, असें शास्त्रीं पुराणीं प्रमाण, ते दृष्टोत्पत्तीस आले, की सरदार विषाचे प्याले घेऊन मरतात, हें आश्चर्य करून, आपण पडदा लाऊन, जातीनें सुजायतदौला याचे डेऱ्यास आलियाची बेअदब माफ करून, डेरादाखल जाली. सुजायतदौला यांणी खुरनिशात बजावून, हात बांधून, उभे राहिले. काय आज्ञा ह्मणोन अर्ज केला. पातशाहाजादीनें प्रत्योत्तर तेज:पुंज दिल्हें कीं, तुमचे पिते मनसूरअल्लीखान वगैरे अमीर होते, त्यांचा पराक्रम या दक्षण या हिंदुस्थान दोन मुलकांत जाणतात. त्याची अमर्यादा तुह्मी करून त्याचे यशचंद्री कालिमा का लाविता? आणि वैरियासी विन्मुख होऊन विषप्रयोग करितां, हे अनुचित. पहिलेच असें. किंवा कितेक विचार कळला असतां, तर हा विचार तुह्मांस दिला नसता. पुरुषजन्मास येऊन सार्थक काय करावें. आदौ, मृत्यू, आज अथवा शतवर्षप्रमाण. दुसरें, येश कोणे प्रकारे मृत्यु, द्रव्य, राज्य, कबूल करून संपादावें. तिसरे, ज्यानें जो शब्द गोविला, तो प्राणांतिक अन्यथा होऊ नये व अन्य मुखीं देऊ नये. चवथें, जो व्यापार जाणावा, त्याची अभिमानता असावी. पांचवी गोष्ट धर्मवासना असावी. हें पुरुषजन्माचे सार्थक. तेंच तुमचें कफन असतां, तुमचें ठायीं प्रसंगी एकही प्रकार दिसोन न आला. ही गोष्ट कोण जाली ? ठिकाणीं जहर खाऊन मरावें, जगांत अपकीर्ति करावी, हें मरण कबूल केलेच आहे. तेव्हा असें कां मरावे ? शत्रुसन्मुख घेऊन मेल्यास काय चिंता आहे ? जहर खाऊन मरावें यांत वैकुंठप्राप्ती व तरवारेचे धारेनें मरावें यांत नर्क, असें कांही आज तहकीक तुह्मांस कळले असेल कीं काय? सर्व गोष्टीनें तुह्मी पढेफाजल आहां व सर्व किताब जाणून अकलपुरे आहां.

असें बोलोन पत्राचें उत्तर त्यास लिहिले कीं, तुह्मी ह्मणता ते आह्मास कबूल, परंतु सातशे कोस आह्मी चालोन आलों, फौज किती अपार जाहाली आहे. सात कोट रुपये खर्च जाला तो तुह्मी आह्मास द्यावा आणि आपले मुलखास जावें, नाहीं तर जें होणार तें होईल. अशी बोलण्याची त्यांची व यांची रदबदली लागली. कांही रुपये द्यावयास त्यांनी कबूल करावें असा प्रसंग जाहला. माणूस शंभर रदबदली करावयास लागलें. इतकियांत राजश्री गोविंदपंत बुंदेले तमाम कहीवाले लोक दहा हजार फौज घेऊन कही आणावयास बाहेर विसा कोसांवर गेले. मुलूख तमाम हैराण जाहला. दोन्हीं लष्करांत महर्गता जाली. ते समयीं त्याजकडील पठाण वीस हजार फौज घेऊन कहीस गेला. परस्परें दरम्यान कही कहीचा कज्जा मोठा घोरंदर जाहाला. मारामारी जाहली. राजश्री गोविंदपंत बुंदेले हजार स्वारांनिशी एक उजाड जागा गांवाजवळ होती तेथें आराबा पहात उभे राहिले होते. वरकड लोक बरोबर होते ते जिकडील तिकडे फौज गेली होती. तिकडे खटका जाहला. पठाण एक जमावानिशी होते. जेथवर त्यांचा हात पोहोंचला तेथवर कत्तल करीत गेले. तमाम कही व फौज पळों लागली. पंतमशारनिल्हे ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणी बातमी आली. तेव्हा बुंदेले समोर होऊन पठाण हाटकिले. परंतु समान स्वार एक हजार अगदी थोडे. बाकी फौज चोहोंकडे उधळोन गेली. कोणी यापाशीं आला नाहीं. पठाण निकड करून चालून आले. निरुपाय गोष्ट जाहली. ते समयीं तलवार एक प्रहरपर्यंत जाहली. शेवटी एक सहस्त्र सैन्य यापाशीं राहिलें तें व गोविंदपंत बुंदेले वैकुंठवासी जाहले. रणभूमीचे ठायीं देह पडला. उद्धट पराक्रम करून प्राण सोडिला. पठाण यांणी शिरच्छेद केला हे अशुभ वर्तमान खेदकारक श्रीमंत भाऊसाहेबीं ऐकिलें. सलूकाचा तह जाहाला होता, तो बिघाड होऊन दोनी फौजा प्रज्वलित जाहाल्या. श्रीमंत भाऊसाहेब आपण तोफखान्याजवळ येऊन तीनशें जरबा थोर तोर व इभ्रामखान गाडदी यास घेऊन लष्कराबाहेर निघाले. पठाण याची फौज तयार जाली नवती. अचानक साफी करोन जाऊन पोहोचले. आराबियाची देवड जरूर लाविली. पठाणफौजेतील दाहा हजार पठाण पायउतार होऊन बाहेर पडोन धीरवीर आले. सुजायतदौला व अबदलअल्ली वगैरे फौज तयार होऊन पळो लागले. जैसा मृत्युभयें प्राण पळतां काळ पाठीशीं आहे, तैसे तोफांचे गोळे जिकडे जो जाईल तिकडे मागेंच आहेत. या जंगेत पांच हजार मोहरे त्याजकडील मृत्यु पावले. त्यामध्ये चार हजार पुरजे पुरजे होऊन राहिले. ऐसा भयाभंग जाहाला. कित्येक शिपाई लोक व आणीक गरीब बाजारी लोक व जनावरसुध्दां अस्तिगतप्राण जाहले. तममा फौज सात कोस पळाली. ते दिवशीं त्याजकडील जिवलग योद्धे चांगले माणूस कामास आले. सात कोसांवर जाऊन सुजायतदौला व अबदलअल्ली परस्परें धुंदीस आले. उभयतांची लडाई सफेजंगी होऊं लागली.

[१७२]                   *   *+   *++  *+++  *++++  *+++++होळकराची थैली

पठाण यांणी दुसरे दिवशीं सावर धरून, कुंजपुरा घेऊन, आमचे फौजेभोवतां घेरा दिला, लढाईचा प्रसंग सोडिला. आमचे फौजेंत पहिले दिवशी साफी करून, पांच सात कोस जाऊन, तमाम कही वगैरे सामान पंधरा रोजाचें भरून आणिले होतें. तेव्हां रुपयास अन्न तीन शेर जाहलें. त्याजकडील पठाण लोक सभोवतें काम करीत, इकडील लष्कराची कही पाहून करीत. हत्ती, घोडे, व उंट व बैल ह्यांचे मृत्यू शेकडों पातले. माणसांची गणती काय ? तोफखान्याचे गोळे भारी केले. परंतु त्यांनी गोळेयांचा जिकडे हल्ला(तो जागा) सोडून दिल्हा; आणि हजार दोन हजार पठाण दावघाव पाहून अचानक येऊन पडोन, गाडदी वगैरेयांस जखमी करून, व कांही ठार मारोन माघारे जाईत. यामुळे इभ्रामखान गाडदी याणें तमाम फौजेस ताकीद केली की, लष्कराभोवती खंदक खणावा.गाडदी यांणी आपले सरहद्दीपुढें एक भाला खोल खायी खंदली. तेव्हा पठाणाचा लाग कमी येण्याचा पाहिला तेव्हा तेहि चोहोंकडून संकटांत पडले. पन्नास हजार खासे लोक त्याचे होते त्यांपैकीं पंचवीस हजार राहिले. आणि पुढे लढाईनें गलीम जेरदस्त होतां दिसत नाहीं, लढाई टाकून जावें तर मुलकांत काय सांगावे ? मालकाजमानी व सुयाजतदौला यांस पैका मागावा तर ते ह्मणतात कीं, आमचे काम फत्ते करून द्यावें आणि जो पैसा आह्मी कबूल केला तो घ्यावा, असा अघटित विचार जाहला. त्यास काय करावें ह्मणोन सुजायतदौला व मालकाजमानी व अबदलअल्ली वगैरे सरदार एकत्र होऊन तह केला कीं, कोणेही प्रकारें गलीमाशी सलूख करावा, सांप्रत कोणीं हरविलें नाहीं व कोणी जिंकिलें नाहीं, ऐशियास सामदाम करून यश संपादावें. ह्मणून अवघियांचे चित्तांत येऊन विचार केला आणि सांडणीस्वार याजबरोबर पत्र पाठविलें कीं, परस्परे भांडोन मुलूख बुडवावा यांत विशेष काय आहे ? जें जाहलें ते उत्तम, सांप्रत तुमचा सलूख हाच कीं सुदामतप्रमाणें जे ठिकाणी तुह्मी अंमल करतां ते ठिकाणी करावा, दिल्लीपतीची मर्यादा तुह्मीं व आह्मी रक्षावी. याप्रमाणे लिहिलें आले. ती पत्रें श्रीमंत र॥ भाऊसाहेबांजवळ दाखल जाहालीं. भाऊसाहेबीं तमाम सरदार लोक इभ्रामखान गाडदी यास बोलावून आज्ञा केली कीं, लढाई महकूब ठेवावी, व पत्रें आली होतीं तीं अवघ्यासं वाचून दाखविली, आणि विचारलें की याचें उत्तर काय लिहावें, आपल्या ठिकाणी लढाईची स्थीत येत नाहीं.

[१७१]    पे॥ छ १८ जमादिलावर                                 श्रीगणराज.                                       ९ मार्च १७५७.

सेवेसी गोपाळराव गोविंद कृतानेक साष्टांग नमस्कार विज्ञापना. सरकारची खंडणी सालदरसाल दोन हत्ती व चार घोडे बिदनूरकर देत असतात. त्याप्रमाणें सालमजकुरीं घ्यावे. त्यास संस्थानिकापासी चार हत्ती चांगले आहेत, त्यापैकी दोन हत्ती घ्यावे व घोडे चार येणें ते संस्थानी वर्षास चांगले देत नाहीत. घोड्याची रीझ सरकारात कशी आहे तें तुह्मास ठावकीच आहे. घोडे चार चांगले घेणे. अरबी घोडे चांगले घेणें. तुमची नजर तुह्मी घ्यालच. ह्मणोन आज्ञा केली. ऐशियास, बिदनूरकर सर्वप्रकारें पदरी पडले आहेत. स्वामीचे मर्जीशिवाय वर्तणूक करणार नाहींत. दोन हत्ती चांगले व चार घोडे सालाबाद देत असतील त्याप्रमाणें सालमजकुरीं जे उत्तम असतील तेच घेऊन सेवेसी पाठवितों. राजश्री नरसाप्पा नाईक उदैक बिदनुरास जाणार. ते जाऊन हत्ती घोडे चांगलेच पाठवितील. आह्मी बसवलिंगाप्पाच्या डे-यास गेलों होतों. दोन घोडे नजर त्यांनी दिल्हे. मध्यम आहेत. विदित होय. हे विज्ञापना.