Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[२९०] श्री.
राजश्री बाजीराव पंडित प्रधान दाजी गोसावी यांसी :-सकल गुणालंकरण अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य स्नेहांकित संभाजी आंगरे सरखेल रामराम विनंति. उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लेखन केलें पाहिजे. विशेष. आपण पत्र पाठविलें. प्रविष्ट होऊन सविस्तर अर्थ कळोन संतोष जाला. अंतप्रभू कानडा याची देशमुखी काढून कृष्णंभटास करार करावा आणि अंतप्रभूस घाटावरी लावून द्यावा. ऐशास तीर्थस्वरूप राजश्री कैलासवासी खासे यांणीं मनसुबी करून मजहर करून दिला. अलीकडे कैलासवासी राजश्री दादा यांणीं श्रीमत् भार्गवस्वरूप बावा यांचे आज्ञेवरून अंतप्रभूस दूर करून कृष्णंभटास कागद दिल्हा. तेव्हां आपलें नांवें पत्र दादांनीं लिहून पाठविलें कीं, बावाचे भाडभिडेनें कागद दिले आहेत. तोच कागद बजिनस अंतप्रभूनें येथें दाखविला. त्यांस थोरले खाशांनीं केलें त्याप्रमाणें आह्मीं करार करून दिले आहेत. तरी चित्तास नये तरी बावांनीं दोघांची समजावीस करून द्यावी. वरकड बावाची वस्तभाव रसाळगडी आहे, ती पेशजी देविली आहे. हल्लीं आपण लिहिलेवरून तेथील किल्लेदारांस पुरवणी पाठविली आहे. आपणांस कळावी. ह्मणून लिहिलें आहे. जाणी चंद्र २२ जमादिलाकर. बहुत काय लिहिणें. लोभ असो देणें. हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[२८९] श्री.
श्रीमत् भार्गवस्वरूप परमहंसबावा स्वामीचे सेवेसी :-
अपत्यें संभाजी आंग्रे सरखेल सेवेसी. विज्ञापना. येथील कुशल स्वामींचे कृपेकरून वर्तमान कुशल असे. विशेष. राजदर्शनास स्वारी काली सातारास जाहली. आजी तिसरे प्रहरी राजदर्शन होईल. राजदर्शन जाहलियावरी आज्ञा होऊन स्वामींचे भेटीस येतों. आह्मीं आल्यावरी आपणास येथें आणून. आपण अगोदर न यावें. बहुत लिहावें तरी आपण वडील आहांत. हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[२८८] श्री.
पुरवणी श्रीमत् तीर्थस्वरूप राजश्री परमहंसबावा स्वामीचे सेवेसी :-
विज्ञापना. जिनसांविसीं लिहिलें, तरी मागाहून पाठविला जाईल. चिरंजीव बयाबाईस वराची योजणूक करून वर घेऊन येतों, ह्मणून आपण निश्चितार्थ केला होता. ऐशास, हल्लींही आपणांस हें पत्र लिहून पाठविलें आहे. तरी वर योजून लग्नास खालीं घेऊन आलें पाहिजे. बहुत काय लिहिणें लोभ असो दिला पाहिजे. हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[२८७] श्री.
श्रीमत् भार्गवस्वरूप परमहंसबावा स्वामीचे सेवेसी :-
अपत्यें संभाजी आंगरे चरणावरी मस्तक ठेऊन दंडवत विनंति उपरि स्वामींनीं पत्र पाठविलें प्रविष्ट होऊन लिहिलें वर्तमान कळों आलें. घाटगे यांजकडील वर व घरस्थित पाहावयासी एक शाहाणा माणूस पाठवून देणें ह्मणोन आज्ञा. ऐशास, आपण वर पाहिला व घरस्थित पाहिली आहे ती आह्मीं पाहिली. तेथें दुसरा विचार नाहीं. लग्नास आल्यावरी लग्ननिश्चय होईल. तेव्हां वर आणावयाचीं माणसें पाठवून. तेव्हां आपण होऊन यावें. बहुत लिहावें तरी आपण वडील आहांत. कृपा लोभ असो द्यावा. हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[२८६] श्री.
पुरवणी श्रीमत् भार्गवस्वरूप परमहंसबावा स्वामीचे सेवेसी :-
विनंति. उपरि मौजे गोठणें येथील बागाईताची पाहाणी न करावी ह्मणोन आज्ञा केली. ऐशास दिवाणांतून पाहाणी केली. तरी स्वामीचा फायदा करून हे गोष्ट न करावी ऐसें आपण लिहिलें. त्यावरून पाहाणी मना केली आहे. स्वामीचे चित्तास येईल तशी करवावी. मौजें डोरलें व माहाळुंगे येथें विशालगडकरी यांचा उपद्रव होतो. घरपट्टीचे वरातदार बाहेर घालणें ऐसी आज्ञा आपण केली.
ऐशास येव्हां आज्ञेप्रमाणें बाहेर घालवून. परंतु कटकट होईल तेव्हां उरवरी लागेल. तुह्मांस लिहिलें. आणि उत्तर आल्यावरी आज्ञेप्रमाणें वर्तणूक करून. हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[२८५] श्री. १२ एप्रिल १७४०.
पुरवणी श्रीमत् भार्गवस्वरूप परमहंसबावा स्वामीस :-
विनंति उपरी. खंडोजी बराबरी केवडा दरकाम पाठविला आहे. घेतला पाहिजे. आपण येथें आले होते तेसमयीं आपण नेम केला होता कीं, आपण कुलांबास जाऊन राजश्री मानाजी आंग्रे याची भेटी करून देतों. त्यास तो प्रसंग अद्याप जाला नाहीं. आह्मीं तों शकूनगांठी बांधोन ठेविली आहे. स्वामीनीं बोलिले गोष्टीचें स्मरण धरून सिद्धीस नेऊन त्याची आमची भेटी करून दिली पाहिजे. फार लिहावें तों आपण आह्मांस वडील आहेत. सर्वांविशी आपणांस अगत्य आहे. विस्तार काय लिहिणें लोभ असो देणें. हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[२८४] श्री. १२ एप्रिल १७४०.
श्रीमत् सकल तीर्थस्वरूप परमहंसबावा वडिलांचे स्वामीचे सेवेसी :-
अपत्यें संभाजी सरखेल साष्टांग दंडवत विनंति उपरि येथील कुशल ता। चैत्र बहुल पंचमी मंदवार पावेतों मुक्काम अलिबाग स्वामीचे कृपेनें जाणून स्वकीय कुशल लेखन करावयास आज्ञा केली पाहिजे. विशेष. आरमारसहवर्तमान साकरियाचे खाडींत शिरोन अलीबाग, हिराकोट, थलचा कोट, राजकोट, सागरगड हे जागे स्वामीचे कृपेनें फत्ते जाहले. पालीस निशाण पाठविलें होतें; परंतु राजश्री बाजीराऊ प्रधान यांचा जमाव येऊन निशाण चढलें. राऊत व जमाव पालीखालीं आला आहे. मानाजीच्या कुमकेस अलीबागेस येऊन आह्माबराबरी घसघस करणार. इंग्रजही आला आहे. याउपरि आपला आशीर्वाद समर्थ आहे. यासमयीं कुमक करावी व स्वता राजश्री स्वामीनीं यावें ह्मणोन विनंतिपत्र लेहून देऊन राजश्री विसाजीराम व दत्ताजीराऊ विचारे पाठविले आहेत. आपणही राजश्री स्वामीपावेतों जाऊन सांगोन हे गोष्टीचें सार्थक होऊन येई तें करावें. हा समय अडचणीचा आहे. आह्मीं येथून निघत नाहीं. राजश्री स्वामी येऊन सनाथ केलें तरी बरें. आह्मीं एक स्वामीवांचून दुसरा वगवशीला जाणत नाहीं. सर्व भार आभार धण्यावरी आहे. हें जाणोन यांस पाठविले आहेत. राजश्री स्वामीनीं येऊन मनसबा सिद्धीस नेला तरी उत्तम जाहलें. नाहीं तरी ईश्वरीछा प्रमाण ! दुसरा विचार नाही. आपणास जें सुचेल व उचित असेल तसें करावें. ज्या ज्या कडून जसजसें साहित्य होईल तसें करावें. सर्व भरवसा वडिलांचा आहे. विस्तारें काय लिहावें. कृपा वर्धमान केली पाहिजे. हे विज्ञापना. सविस्तर रा। विसाजीराम स्वामीस सांगतील. त्याप्रमाणें राजश्री स्वामीजवळ आपण खासा जाऊन रा। चिमाजी आप्पास कागद व इंग्रजास कागद व मानाजीस कागद देवावे. हें काम अगत्य करावें. हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[२८३] श्री. १० डिसेंबर १७३८.
श्रीमत् सकल तीर्थस्वरूप परमहंसबावा स्वामीचे सेवेसी :-
अपत्यें संभाजी आंगरे सरखेल चरणावरी मस्तक ठेऊन दंडवत विनंति उपरि येथील कुशल तागाईत मार्गशीर्ष शुध्द एकादशी रविवारपर्यंत स्वामींच्या आशीर्वादेंकरून वर्तमान क्षेम असे. विशेष. आशीर्वादपत्र पाठविलें तें उत्तम समयीं प्रविष्ट होऊन बहुत संतोष जाहला. पत्रीं कितेक विचार व बुध्दिवाद लिहून पाठविला. ऐशास, स्वामी सर्वज्ञ व वडील व वडिलांचे जागां मानितों. तेथें जो विचार आचार लिहिला, तो उचितच व तदनुसार जें करणें तें यथाज्ञानेंच करून करितों. सिध्दीस जावयास स्वामींची कृपा समर्थ आहे. सर्वस्वें स्वामींचा आहे. दुसरा विचार नाहीं. दिनप्रतिदिनीं आशीर्वादपत्र पाठवून लेंकराचा सांभाळ करणार स्वामी वडील आहेत. स्वामींच्या पायांवांचून दुसरी जोड कोणती आहे ? पुढें दर्शनास यावयाचा अर्थ लिहिला. तरी स्वामींच्या चित्तांत अपत्यांस दर्शनाचा लाभ द्यावयाचा विचार आला असला तरी यांजहून दुसरें अधिकोत्तर काय आहे ? वरकड श्री गोठणें येथील बेगमीस गंधकाविशीं आज्ञा केली. त्याजवरून अदमण पाठविलें असे. सेवेसी श्रृत जाहालें पाहिजे. हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[२८१] श्री.
श्रीमत् परमहंसबावा स्वामीचे सेवेसी :-
विनंति उपरि खंडोजीबराबरी स्वामीनीं प्रसाद दिला. वस्त्र चादर एक पाठविली ते प्रविष्ट जाहली. विदित जाहलें पाहिजे. बहुत काय लिहिणें. कृपा वर्धमान केली पाहिजे. हे विनंति.
[२८२] श्री. १५ जुलै १७३८
श्रीमत् तीर्थस्वरूप परमहंसबावा स्वामीचे सेवेसी :-
अपत्यें संभाजी आंगरे सरखेल साष्टांग दंडवत विज्ञापना येथील कुशल श्रावण शुध्द दशमी मंदवारपर्यंत स्वामीचे आशीर्वादें कुशल असे. विशेष. पत्र पाठविलें तें प्रविष्ट होऊन लेखनार्थनवणें संतोष जाहला. कितेक पूर्वापार वडिलांपासून कर्तव्यतेचा विस्तार लिहिला. तरी मुख्य स्वामीचा आशीर्वाद. तदनुरूप होणें तें होत असे. समाधीहून उठलियानंतर भेटीस येऊन, ह्मणोन लिहिलें. तरी याजपेक्षां अधिकोत्तर दुसरें आहें असें नाहीं. उघाड पाहून आलें पाहिजे. राजश्री चिमाजी आप्पा यांजकडून पत्र पाठविलें व उभयपक्षींच्या स्नेहाची दृढता व्हावी ह्मणोन लिहिलें. तरी स्नेहाभिवृध्दी व्हावी ही गोष्ट उचितच आहे. ऐशास, स्वामी येथें येणारच आहेत. आल्यानंतर त्यांजकडील स्नेहाचा विचार स्वामीच्या विचारें केला जाईल. आपले वचनाचें आह्मांस प्रमाण आहे. सदैव आशीर्वादपत्र पाठवून सांभाळ करावा. रा। छ ८ रबिलाखर सेवेसी श्रृत होय. हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[२८०] श्री. १८ फेब्रूवारी १७३८
श्रीमत् तीर्थरूप परमहंसबावा वडिलांचे सेवेसी :-
अपत्यें संभाजी आंगरे सरखेल कृतानेक दंडवत विनंति उपरि येथील कुशल तागाईत फाल्गुन शुध्द दशमी मंदवासर पावेतों वडिलांचे आशीर्वादें सुखरूप असों. विशेष. स्वामीनें धोंडू तेली याजबराबरी आशीर्वादपत्र पाठविलें तें प्रविष्ट होऊन संतोषावाप्ती जाहली. ऐसेंच सर्वदा पत्र पाठवून सांभाळ करणार आपण वडील आहात. स्वामींनीं जिनसाविषयीं विशदें लिहिलें. ऐशास जो जिन्नस पाहिजे तो पाठवून देऊन ह्मणोन लिहिलें. दोन-चार वेळां स्वामीस लिहून गेलें असतां फिरून फिरून लिहितां यावरून वडिलपणांस योग्य आहे. बहुत काय लिहिणें. लोभ असों दिला पाहिजे. हे विनंति.