[२८६] श्री.
पुरवणी श्रीमत् भार्गवस्वरूप परमहंसबावा स्वामीचे सेवेसी :-
विनंति. उपरि मौजे गोठणें येथील बागाईताची पाहाणी न करावी ह्मणोन आज्ञा केली. ऐशास दिवाणांतून पाहाणी केली. तरी स्वामीचा फायदा करून हे गोष्ट न करावी ऐसें आपण लिहिलें. त्यावरून पाहाणी मना केली आहे. स्वामीचे चित्तास येईल तशी करवावी. मौजें डोरलें व माहाळुंगे येथें विशालगडकरी यांचा उपद्रव होतो. घरपट्टीचे वरातदार बाहेर घालणें ऐसी आज्ञा आपण केली.
ऐशास येव्हां आज्ञेप्रमाणें बाहेर घालवून. परंतु कटकट होईल तेव्हां उरवरी लागेल. तुह्मांस लिहिलें. आणि उत्तर आल्यावरी आज्ञेप्रमाणें वर्तणूक करून. हे विज्ञापना.