[२८५] श्री. १२ एप्रिल १७४०.
पुरवणी श्रीमत् भार्गवस्वरूप परमहंसबावा स्वामीस :-
विनंति उपरी. खंडोजी बराबरी केवडा दरकाम पाठविला आहे. घेतला पाहिजे. आपण येथें आले होते तेसमयीं आपण नेम केला होता कीं, आपण कुलांबास जाऊन राजश्री मानाजी आंग्रे याची भेटी करून देतों. त्यास तो प्रसंग अद्याप जाला नाहीं. आह्मीं तों शकूनगांठी बांधोन ठेविली आहे. स्वामीनीं बोलिले गोष्टीचें स्मरण धरून सिद्धीस नेऊन त्याची आमची भेटी करून दिली पाहिजे. फार लिहावें तों आपण आह्मांस वडील आहेत. सर्वांविशी आपणांस अगत्य आहे. विस्तार काय लिहिणें लोभ असो देणें. हे विज्ञापना.