[२८७] श्री.
श्रीमत् भार्गवस्वरूप परमहंसबावा स्वामीचे सेवेसी :-
अपत्यें संभाजी आंगरे चरणावरी मस्तक ठेऊन दंडवत विनंति उपरि स्वामींनीं पत्र पाठविलें प्रविष्ट होऊन लिहिलें वर्तमान कळों आलें. घाटगे यांजकडील वर व घरस्थित पाहावयासी एक शाहाणा माणूस पाठवून देणें ह्मणोन आज्ञा. ऐशास, आपण वर पाहिला व घरस्थित पाहिली आहे ती आह्मीं पाहिली. तेथें दुसरा विचार नाहीं. लग्नास आल्यावरी लग्ननिश्चय होईल. तेव्हां वर आणावयाचीं माणसें पाठवून. तेव्हां आपण होऊन यावें. बहुत लिहावें तरी आपण वडील आहांत. कृपा लोभ असो द्यावा. हे विनंति.