Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[३१९] श्री. ११ जुलै १७५४.
पुरवणी राजश्री जगन्नाथ चिमणाजी गोसावी यांसी :-
उपरी श्रीचे पुण्यतिथीस जिन्नस धोंडजी राटवल्याबरोबर पाठविला. वजन खरें. जिन्नस
एकूण सहा मण अडीच शेर पाठविला असे. प्रविष्ट जाहल्याचें उत्तर पाठवणें. जाणीजे. र॥. छ. १९ माहे रमजान. बहुत काय लिहिणें. पौ. छ. ६ शौवल सनखमसरवमसैन.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[३१८] श्री. १२ जानेवारी १७५२.
श्री परमहंस समाधिस्थ स्वामीचे सेवेसी :-
अपत्यें मानाजी आंगरे वजारत माब चरणावरी मस्तक ठेऊन विज्ञापना तागाईत माघ शुध्द सप्तमी रविवार जाणोन स्वामीचे आशीर्वादेंकडून वर्तमान क्षेम असें. विशेष. आशीर्वादपत्र पाठविलें. प्रविष्ट होऊन गौरवाभिवृध्दीस पावलों. प्रसाद व वस्त्र पाठविलें. शिरसां वंदिलें. समाधीच्या कार्याकरितां जिनसांविशीं आज्ञा केली, त्यावरून स्वामींचे आशीर्वादेंकडून तूर्त अनुकूल पडल्याप्रमाणें जिन्नस रवाना केले आहेत. याददास्त निराळी असे. त्याप्रमाणें पावेल. स्वामी समर्थ असेत. सेवेसी श्रृत होय. हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[३१७] श्री. ६ फेब्रुवारी १७४६.
राजश्री जगंनाथ चिमणाजी गोसावी यांसी :-
अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य स्नेहांकित मानाजी आंगरे वजारत माव रामराम उपरि येथील कुशल जाणून स्वकीय लिहीत जाणें. पत्र पाठविलें तें प्रविष्ट काळी कुशलार्थ श्रवणें संतोष जाहला. वरकड कितेक अर्थ श्रीस्थायांनी साहित्याविषयींचा लिहिला कीं, स्वामीमागें कितीकांचे भरवंशाने कारखाना खर्चवेच चालविला, सांप्रत कारखाने यांचे लोक तजावजा जाहले आहेत. यांचे खर्चाची बेगमी व लोखंड, शिसें, तांदूळ इत्यादिक अनुकूल करून घ्यावीं ह्मणोन तपसीलें लिहिले प्रमाणें श्रवण जाहलें ऐशियास, श्रीयांनींच साहित्य करावें हें श्रेयस्कर कृत्य लक्षप्रकारें लिहित असे. प्रसंगोचित श्रीकृपेने साधणें. प्रसंग प्राप्ती जाहली ह्मणजे विहित गोष्ट ते आदरपुरस्कर रूपास येऊन श्रीठाई अर्पण जाहालियास आपलेंही समाधान होतें. श्रीचे कारखाने यास श्रीस सर्व साहित्य अनेकप्रकारें करतील तरीच होईल. भांडी व समयास ऐवज राजश्री साबाजी प्रभू चिटणीस यांजवळ दिल्हा होता; त्याचें काम कारीगरपणेकर करीत आहेत. फाल्गुन पौर्णिमानंतर सिध्द होतील. वरकड सविस्तर वृत्त स्वामीचें पत्रीं लिहिलें आहे. तुह्मीही निवेदन करून विदित करणें. जाणिजे. रा छ २५ मोहरम. बहुत काय लिहिणें. लेखनसीमा.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[३१६] श्री. २८ आगष्ट १७४४.
श्रीमत्सकल तीर्थरूप श्री परमहंसबावा स्वामीचे सेवेसी :-
अपत्यें मानाजी आंगरे चरणावरी मस्तक ठेऊन कृतानेक विज्ञापना तागाईत छ माहे रजब पावेतों स्वामींच्या कृपावलोकनेंकडून अपत्याचें वर्तमान यथास्थित असें. विशेष. आशीर्वादपत्र पाठविलें तें प्रविष्ट होऊन लेखनार्थ श्रवणें कोटयवधि आनंद जाहाला. प्रसादवस्त्र शालेची जोडी अंगावरील पाठविली आहे हे परिधान करणें ह्मणोन आज्ञा केली. स्वामींची आज्ञा व वस्त्र शिरसा वंदोन सनाथ जाहलों. समाधिसमयीं प्रतिवार्षिकाप्रमाणें परामृषास माणसें पाठवावी, हा दंडक तुह्मीं टाकिलात, परंतु आह्मा तुह्मांस टाकीत नाहीं, ह्मणोन आज्ञा. तरी आह्मीं स्वामीस टाकून सेवेसी विस्मरण करूं नये, सर्वात्मना घडणार नाहीं व स्वामी तरी समर्थ आहेत. हें सर्व आहे हें स्वामींचे आशीवार्दाचें आहे. तेथें आपण आह्मांस सोडितील हें कसें होईल ? सर्व प्रकारें आमची चिंता स्वामीस आहे. आह्मी आपले आज्ञांकित असें दुसरा विचार नाहीं. प्रतिवार्षिकाप्रमाणें माणसें रवाना केलीं आहेत. ती सेवेसी जाऊन पावलीच असतील. अपत्यापासून अंतर पडलें नाहीं. जिनसांची आज्ञा केली कीं, तूप, दारू, ह्मैसी, बिजाईत दोन जरूर पाठवणें, अनमान न करणें, संग्रहीं नसल्या तर विकत घेऊन पाठवणें. त्याजवरून प्रेत्नेंकडून अनकुलता जाहालियाप्रमाणें रवानगीं केली असे.
ह्मैसी, दुभत्यायोग्य, गाभण्या, दाणेशुध, शीघ्रविणार, ऐशा पाहून २ पाठविल्या असेत. |
वजनी जिन्नस ॥ तूप वजन खरें. ![]() |
येणेंप्रमाणें पाठविलें असे. कृपापूर्वक मान्य करून पावलीयाचें उत्तर आशीर्वादपत्रीं पाठविलें पाहिजे. तांब्या जाया झाला ह्मणोन पाठविला तो पुन्हा नूतन करून रखमाजीसमागमें पाठविला आहे. वरकड आह्मांकडील सविस्तर वर्तमान रखमाजी मुखवचनें सेवेसी निवेदन करितां श्रृत होईल. सुरणकंदाची आज्ञा केली याजवरून स्वदेशी व मुंबैकडेस प्रेत्न करविला. परंतु या समयांत सुवर्णकंद जून उत्तम मिळत नाहीं. माघमासीं हंगाम होतो. सांप्रत आज्ञेप्रमाणें कंद पाठविले आहेत. परंतु उपयोगास येतील असे नाहीं. परंतु पाठविले आहेत. सेवेसी श्रृत होय. हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[३१५] श्री. १५ सप्टंबर १७४३
पुरवणी तीर्थरूप श्री परमहंसबावा स्वामीचे सेवेसी :-
विज्ञापना. विशेष. स्वामीचे आज्ञेप्रमाणें ह्मैसी दोन पाठविल्या आहेत. परंतु स्वामीयोग्य उत्तम नाहींत. वरकड अपत्यांनी तर असते पदार्थांत उत्तम पाहून रवाना केल्या आहेत. सारांश, एक दोन वर्षे स्वामीचे आज्ञेप्रमाणें ह्मैसी पाठवावयास अंतर न केलें. परंतु ह्मैसी उत्तम संग्रहीं नाहीत. आणि स्वामीची आज्ञा वर्षासनाची येते. या आज्ञेप्रमाणें रवानगी न जाहाली तरी स्वामीचे चित्तांत काय येई हें न कळे. यास्तव अपत्यांची विज्ञापना कीं, ह्मैसीचे वर्षासनाची क्षमा केली पाहिजे. येविशीं विस्तार विज्ञप्ती लिहावी ऐसें नाहीं. सेवेसी श्रृत होय. हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[३१४] श्री. १५ सप्टंबर १७४३
श्री सकल तीर्थस्वरूप श्री परमहंस बावा स्वामीचे सेवेसी :-
अपत्यें मानाजी आंगरे चरणावरी मस्तक ठेऊन कृतानेक विज्ञापना तागाईत भाद्रपद बहुल त्रयोदसी सौम्यवार पावेतों अपत्यांचें व ये प्रांतींचें वर्तमान स्वामीचें कृपावलोकनेंकडून यथास्थित जाणून आपणांकडील संतोषवृत्त निरंतर आशीर्वादपत्रीं लेखन करावयास आज्ञा करून अपत्यांचा परामृष करीत गेलें पाहिजे. विशेष. कृपापूर्वक आशीर्वादपत्र पाठविलें तें प्रविष्टकाली लेखनार्थश्रवणें आनंदावाप्ती होऊन प्रसाद व वस्त्र शिरसावंदोन गौरवाभिवृध्दीस पावलों. याच न्यायें सदैव सांभाळ केला पाहिजे. वरकड कितेक जिनसांविशी आज्ञा केली, त्याजवरून ह्मैसी वगैरे जिन्नस समयानुसार सिध्द होता, त्याची रवानगी केली आहे. याद आलाहिदा असे. याजवरून श्रृत होईल. अपत्यांवरी कृपा करून मान्य केला पाहिजे. देव्हाराही सिध्द करवून पाठवून देतों. स्वामीचे सेवेसी अपत्यांपासून अंतर पडणार नाहीं. तथापि आज्ञेप्रमाणें रवानगीस दिसगत लागली तरी कृपा करावयास स्वामी समर्थ आहेत. अपत्यांचा हेत तरी कायावाङ्मनसा स्वामीचे चरणावर विदित आहे. अन्यथा दुसरा विचार नाहीं. अंतरसाक्ष स्वामी आहेत. तेथें विस्तारयुक्त लिहावें असें नाहीं. सेवेसी श्रृत होय. हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[३१३] श्री. १५ सप्टंबर १७४३.
श्रीमत् तीर्थस्वरूप श्री परमहंसबावा स्वामीचे सेवेसी :-
अपत्यें मानाजी आंगरे चरणावरी मस्तक ठेऊन कृतानेक विज्ञापना अत्रत्य कुशल भाद्रपद शुध्द त्रयोदशी सौम्यवासर पावेतों स्वामीचे कृपावलोकनेंकडून येथील वर्तामानें यथास्थित असे. विशेष. आशीर्वादपत्रें पाठविली ती प्रविष्टकालीं परम आनंदातिशय जाहला. प्रसाद व वस्त्र तिवट कळसपाकी पाठविलें तें शिरसा वंदिलें. त्याजवरी स्वामीची आज्ञा जाहली कीं, सखलादी आंगी व जिन्नस ऊद व दारू व डाळ उडिदाची व तुरीची व दुबत्यास ह्मैसी दोन व गाई दोन व खर्चाची अनकूलता व दोनशें बैलाचे दस्तक देऊन बावाजी हरकारे यासमागमें रवाना करणें, ह्मणून त्याजवरून आज्ञेप्रमाणें सखलादी कुडती एक व गाई दुबत्या दोन व ह्मैसी दोन दुबत्या विजाईत पाहून पाठविल्या आहेत व तूप पांच मण व दारू चार मण पाठविलें आहे. दस्तकाविसी आज्ञा केली तरी अलाहिदा पुरवणी सेवेसी लिहिली आहे. त्याजवरून विदित होईल व सुरणकंद वजन एक मण पाठविला आहे. आज्ञेप्रमाणें कांहीएक जिन्नस मिळाला नाहीं. याजकरितां रवाना करावयासी अंतर जाहलें. वरकड अपत्यांची निष्ठा ऐसी आहे कीं स्वामीचें सेवेसी अंतर सहसा करणार नाहीं. याजकरितां जिन्नस पाठविला आहे. तो कृपा करून मान्य केला ह्मणजे अपत्यांचें गौरव होऊन कृतकोटी केलें असें होईल. आह्मांस आपले चरणापेक्षां दुसरा अर्थ आहे ऐसें नाहीं. परंतु प्रस्तुत कालें प्रसंग येऊन पडला आहे. त्याचा अर्थ लिहितां पुरवत नाहीं. आपले आशीर्वादेकरून अनकूलता होऊन येईल. येतद्विषयीं बावाजी हरकारे सेवेसी श्रृत करितां अवगत होईल. सेवेसी श्रृत होय. हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[३११] श्री. २५ सप्टेंबर १७४०.
राजश्री बाळाजी त्रिंबक यांसी :-
सू. इहिदें अबैन मया व अल्लफ. वेठयांचा रोखा जाहला आहे. त्याचे मनाचिटीविसीं लिहिलें, तरी मनाचिटी होत नाहीं. रोख्याप्रमाणें वेठया पाठविणें. जाणिजे. छ १४ रजब.
[३१२] श्री. ९ आगस्ट १७४३.
पुरवणी तीर्थस्वरूप राजश्री परमहंस बावा स्वामीचे सेवेसी :-
अपत्यें मानाजी आंगरे चरणावरी मस्तक ठेवून कृतानेक विज्ञापना तागाईत भाद्रपद शुध्द प्रतिपदा भौमवार पावेतों स्वामीचे कृपाकटाक्षेंकडून क्षेमरूप असों. विशेष. बहुत दिवस आशीर्वादपत्र येऊन अपत्यांचा परामृष होत नाहीं. याजकरितां चित्त सापेक्षीत असे. तरी सदैव पत्रीं सांभाळ करीत असले पाहिजें. यानंतरी प्रतिवार्षिकाप्रमाणें समाधिविसर्जनसमयीं वस्त्रें रवाना होत असतात त्याप्रमाणें वस्त्रें, शेला जाफरखानी कुसुंबी १, टोपी १, कटिसूत्र व कुपिड १.
येणेंप्रमाणें सनगें कोन्होजी सुर्वा व हरजी गोंधे यांसमागमें सेवेसी पाठविली आहेत. कृपापूर्वक अंगीकार करून आशीर्वादपत्रीं गौरविलें पाहिजे. बहुत काय लिहिणें कृपा असों दीजे हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[३१०] श्री. ३ सप्टंबर १७४०.
पुरवणी तीर्थस्वरूप राजश्री परमहंस बावा स्वामीचे सेवेसी :-
विज्ञापना. आशीर्वादपत्रीं आज्ञा केली की, कोण्हे गोष्टीचे पुष्टिबळ नसतां राजश्री आप्पा याजसीं विरुध्द दाखविता हे कोण गोष्ट; याउपरी ते सांगतील तें ऐकत जाणें; स्नेहामध्यें अंतर न पावणें; ह्मणोन कितेक प्रकारें आज्ञा केली. ऐशास त्यांचे आमचे वडिलपरंपरेपासून जो ऋणानुबंध चालत आला आहे त्यांजमध्यें ऐसें नाहीं कीं उभयपक्षी स्नेहांत अंतर जाहलें, व एकएकाचें संकट एकएकाही न वारिलें. असें हाकालपावेतों होऊन आलें नाहीं. सांप्रतकाळें उभयपक्षी वडिलांमागें त्यांचा आमचा ऋणानुबंध ह्मणावा तरी राजश्री राऊ व राजश्री आप्पा दाजी यांसी वडिलांची जागा मानून संकटांचे निरसन व सौख्याचें त्याचें, आगमन स्नेहेकडून समजून उभयतां दाजीखेरीज दुसरा अवलंब समजत नसों. व हरएकविशी बुध्दनीत आह्मांस सांगत आले आहेत, ते आह्मीहीं स्वहितास योग्य पाहून ऐकोन वर्तणूक करीत आहों. पुढेंही आह्मांस सर्वस्वें अवलंब त्यांचाच आहे. असें असतां आह्मीं त्यांचें ऐकत नाहीं या गोष्टीचा आपणांपावेतों लौकिक काय ह्मणून गेला आहे, त्याचा अर्थ आपल्यास काहीं कळत नाहीं. वरकड आपला आशीर्वाद व कैलासवासी आबासाहेबांचें पुण्य ऐसें नाहीं कीं वडिलांचे मनसबेयामध्ये न्यून पाहून राजश्री राऊ व राजश्री आप्पा दाजींचे स्नेहास अंतर करून घेऊन. ऐशी आमची वर्तणूक आहे व होईल असें नाहीं. हा आशीर्वाद आपला आहे. वडिलांची तप:श्चर्या आपले कृपेनुरूप तैसीच आहे ! आणि हाकालपावेतों त्याच सामर्थ्येकडून चालत असे व चालले व आपण कृपा करतीलच. यापेक्षां आणखी पुष्टिबळ आह्मांस कोणतें असावें ? येविसीं सेवेसी लिहावें तरी स्वामी समर्थ अंतरसाक्षी असेत. सेवेसी श्रृत होय. विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[३०८] श्री. जानेवारी १७४२.
स्वामीचे सेवेसी विज्ञापना.
सकल सौभाग्यादि संपन्न मातु:श्री गिरजाबाई याणी राजश्री सरखेल साहेबाबराबरी अग्निप्रवेश केला. त्याणीं आपणाकारणें सकलाद नारगी एक व चिकसाचें सामान पाठविलें आहे. कृपा करून घेतलें पाहिजे. हे विज्ञापना.
[३०९] श्रीभार्गवराम. २७ फेब्रूवारी १७३८.
श्री सकल तीर्थस्वरूप परमहंसबावा स्वामीचे सेवेसी :-
अपत्यें मानाजी आंगरे चरणावरी मस्तक ठेऊन साष्टांग दंडवत प्रणाम विनंति उपरि येथील क्षेम तागाईत फाल्गुन बहुल पंचमी पावेतों मुकाम जंजिरे कुलाबा सुखरूप जाणून स्वामींनीं आपणाकडील कुशलार्थ सदैव येणारांसमागमें आशीर्वादपत्रीं लेखन करून अपत्यवर्गाचा सांभाळ करीत गेलें पाहिजे. विशेष. आशीर्वादपत्र पाठविलें तें प्रविष्ट होऊन आनंदावाप्ती जाहाली. खाजगत कोठीचा हाशील पेणचे खोतांनीं घेतला आहे, ह्मणोन रखमाजी कोटवळा याणीं सांगितलें त्यावरून लिहिलें आहे. तरी कोठी देवाची आहे. जो हाशील घेतला असेल तो देववणें, ह्मणोन आज्ञा. त्याजवरून पेणेसे लिहून स्वामीचेंच माणूस तेथील अम्मलदाराजवळ पाठविलें होतें. त्याचा न्याय पाहतां रखमाजी यांनींच लबाडी केली. वरकड पूर्वी स्वामीचेंआज्ञापत्र आलें कीं पंधरा खंडी मीठ एक खेप पेणेस देववणें. त्याप्रमाणें दस्तक दिलें होतें. तें मीठ घेऊन गेला. दुसरें भरगत दस्तकाखेरीज केली त्याचा हाशील सहजच खोतास घ्यावा लागला असेल. वरकड आपले सनदेस नौदीगर करीसा कोण आहे ? येविशींचें वृत्त सविस्तर आपणाकडील मनुष्य सांगतां अवगत होईल. बहुत काय लिहिणें. कृपा निरंतर असो दीजे. रा छ १८ जिलकाद. हे विज्ञापना १००००.