Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[३४०] श्री. १६ जुलै १७३४.
श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य भृगुनंदनस्वरूप बावा स्वामीचे सेवेसी :-
अपत्यें लक्ष्मीबाई साष्टांग दंडवत् प्रणाम विनंति उपरी येथील कुशल आषाढ बहुल द्वादशी भौम वासर पावेतों स्वामीचे आशीर्वादेंकरून यथास्थित असे. विशेष. बहुता दिवसांनीं स्वमींनीं कृपोत्तरें गौरवून आशीर्वादपत्र पाठविलें तें प्रविष्टकाली हर्ष जाहला. तो श्री जाणें ! याचन्यायें सार्वकाल आशीर्वादपत्र पाठवून सांभाळ करावया स्वामी सर्वज्ञ समर्थ आहेत. यानंतर हरणैस देवालय नूतन केलें त्याची स्थापना केली ह्मणोन आईकोन संतोष पावल्याचा अर्थ; व हे राज्यांतून जात असतां बाजीरायांनी फिराऊन वैशाखशुध्द त्रयोदशीस धावडशीस आल्याचा वृत्तांत; व हस्तीचे वेळेस श्रमी कैलासवासी यांनी केल्याचा भावार्थ; व सुवर्णदुर्गी असतां मैत्री करून पंधराशें होन दिल्हे; कुलाबां चित्तवित्त दिल्हें घेतलें तें तुह्मांस विदित आहे ह्मणोन; व त्याचें बरें होऊन आपलें बरें न जाहालें; चित्तवित्त तुह्मांकडे बुडालें व रसाळगडी नास जाला तो तुह्मांस कळलाच आहे; जयसिंगानें तुह्मी उदक घालून कृष्णंभटाचे देशमुखीच्या सनदा करून दिल्या त्याही तुझ्या लेकानें दूर करून अनंत प्रभूस निमे वतन करून दिल्हें ते तुह्मांस कळलेंच असेल; आता रुका पैका नलगे; मळविलें राजरक्षण जाहल्यास आपण सुखी ऐसा कित्येक विस्तार व देवकार्यावर अथवा स्वामिकार्यावरी एकसान असावें याचा उपदेश; व प्रपंच सोडून कृष्णास्नानास ह्मणून दर्शन घ्यावयाचा पर्याय; व अननासें, कालींगणे काशीफळें पाठवावयाचा विचार; कैलासवासी यामागें तुजला कर्तेपणाचा आटोप असोन कोणास मानत नाहीं; ह्मणोन आज्ञाविलें तछूवणें आनंदाश्रुपातलहरी प्राप्त होऊन समाधान वाटलें. स्वामीच्या अमृतोत्तराचें उत्तरप्रत्योत्तर म्यां करावें ऐसें सामर्थ्य नाहीं.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[३३९] श्री. १७ मे १७३१.
श्रीसच्चिदानंदकंद भृगुनंदन स्वरूप श्रीमत् परमहंसबावा स्वामीच्रे सेवेसी :-
अपत्यें मथुराबाईनें साष्टांग दंडवत् प्रणाम विनंति येथील कुशल ता वैशाखवदि सप्तमी इंदुवार पावेतों सुखरूप असो. विशेष. स्वामीकडून प्रस्तुत आशीर्वादपत्र आलें नाहीं. याजकरितां चित्त साक्षेप असें. तर ऐसें नसावें. सदैव आशीर्वादपत्र पाठवून सांभाळ करणार स्वामी समर्थ आहेत. विशेष चिरंजीव रा सेखोजी बावा यांजकडून दुलई व कागद लखोटा आला तो सेवेसी रवाना केला असे. व येथून आपणाकारणें कुंकू वजन खरें पावशेर पाठविलें असे. आपण अंगीकार केला पाहिजे. श्रीस गोठणेंयांस कुंकू येथून पाठविलें असे. पाठविले आहे. त्याचा व्यय आपण केला पाहिजे. यानंतर रसाळगडी चंफी बटीक ठेविली होती ती येथें आली असे. तिजला येथें ठेवावीं. अथवा कोठें रवाना करावी हें कांहीच न कळे. याजकरितां काय आज्ञा ते केली पाहिजे. व आपणाकारणें आंबे, फणस पाठविले असे. घेऊन पावल्याचें आशीर्वादपत्र पाठविणार स्वामी समर्थ आहेत. बहुत काय लिहिणें. कृपा वर्धमान करावी. हे विज्ञापना. यानंतर त्रिंबकराव दाभाडे युध्दप्रसंगी देवआज्ञा जाहले. ईश्वरें उमाबाई यांजवर मोठे संकट जाहालें ! हें वर्तमान आपणास विदित जालेंच असे. परंतु वर्तमान स्वामीस कळावें ह्मणोन लिहिलें असें. हे विज्ञापना + हे विज्ञापना. आपणाकारणें नारळ शहाळी सुमार पन्नास रवाना केली आहेत. घेऊन पावल्याचें उत्तर पाठविलें पाहिजे. सेवेसी श्रुत जालें पाहिजे. कृपा केली पाहिजे. हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[३३८] श्रीभार्गवराम. १२ एप्रिल १७३१.
श्रीमत् भृगुनंदनस्वरूप परमहंस बावा स्वामीचे सेवेसी :-
विनंति चरणरज मथुराबाई कृतानेक विज्ञापना विनंति येथील कुशल चैत्रवदि प्रतिपदा इंदुवासर जाणून स्वकुशल लेखन करायासी आज्ञा करणार स्वामी समर्थ आहेत. विशेष. चिरंजीव संभाजी बावा कुलाबास गेले आहेत. उभयतां बंधूंच्या भेटी संतोषें करून जाहाल्या. चिरंजीव राजश्री सखोजी बावा व संभाजी बावा येथें येऊन आमची भेटी घेतली आणि चिरंजीव संभाजीबावाची रवानगी विजयदुर्गास केली आणि चिरंजीव राजश्री सखोजीबाबा छ १४ शौवाली कुलाबास स्वार होऊन गेले. सविस्तर वृत्त स्वामीचे सेवेसी पत्रें लिहून सारंश पाठविला आहे. त्यावरून सविस्तर श्रुत होईल, कृपावृध्दीनें पावावयास स्वामी समर्थ आहेत. कलिंगणाविशीं स्वामीनीं आज्ञा केली. त्यासी गैरहंगाम जाहाला. प्रस्तुत लहानशीं होतीं ती रवाना केली आहेत. सेवेसी श्रुत होय. हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[३३७] ५ एप्रिल १७३१.
मातुश्री सकवारबाई यांसी आज्ञा : तुह्मी राणोजीबराबर सांगोन पाठविलें तें विदित जालें. गंगावन, चवरी कोठून आली ह्मणजे पाठवितों.
शाहाळी महाची :- | |
२ | अंबाजी. |
१ | नारशेणवी. |
१ | बहिरोपंत. |
१ | व्यंकटराऊ. |
---- | |
५ | |
१ | यमाजीपंत. |
---- | |
६ | |
१ | हरी मोरेशर. |
---- | |
७ |
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[३३५] ५ एप्रिल १६७१.
मथुराबाईस आज्ञा : तुझा मोठासा उपकार जाला! शाहाळी पाठविलीं ते कोवळीं उनानें जाहाली ! अननसें पाठविली ते कोवळी ! कामाची नव्हत ! अशी कशास पाठविली ? उकिरड्यावर टाकिली. जशी संतुबाईनें धन केली तशी तूं कोणाची करणार ती कर ! कळला तुझा भावार्थ ! चवरी श्रीचे वस्त पाठविली ते पावली असें कागदी लिहिलें नाही. असा एकाएकीं महालांचा गर्व आला कीं काय ?
[३३६] ५ एप्रिल १७३१.
बाकाजीस आज्ञा : तुमचा मोठा उपकार जाला ! सुखें पाठविलें तें पावलें. शाहाळी पाठविलीं ते कोवळीं न्यासलीं. अननसें कोवळीं पाठविली ते उकिरड्यावर टाकिली. असे तुह्मी थोर लोक ! वस्त पाहोन रवाना करावी. कुणबी तुमचे आठ रोज जातां येतां कष्टी जाहालें ! कळावें ह्मणून लिहिलें असें. जाणिजे. हे आज्ञा. पूर्वी मोहीन हजार नारळ वर्षांत पावत असत. त्यास, अलीकडे पावत नाहीं. यंदा अक्षयत्रितियेस देवळीं नारळ शंभर पाठवणें व धावडशीस जुनसे एकशें पाठवणें.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[३३४] श्री. ५ एप्रिल १७३१.
श्रीमत् भृगुनंदनस्वरूप परमहंस बावा स्वामीचे सेवेसी :-
चरणरज अपत्यें मथुराबाईनें चरणावरी मस्तक ठेवून साष्टांग दंडवत् प्रणाम विनंति उपरी येथील कुशल त॥ चैत्रशुध्द दशमी इंदुवार पावेतों स्वामीचें कृपावलोकनेंकरून यथास्थित जाणोन स्वामदष्टत लेखन करावी अशी आज्ञा केली पाहिजे. विशेष. आनंदी व राधेस कुलाबास रा करावयाबद्दल पाठविल्या त्या सुखरूप आह्मा जवळी पावल्या. याउपरी गलबतें जातील ते समयीं रा करून माणसें पावावयासी आलीं त्यास पाठविलीं आहेत. स्वामी कारणें मवेयांची शहाळीं रवाना करविली आहेत. विदित जालें पाहिजे. बहुत ल्याहावें तरी स्वामी समर्थ असत. हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[३३३] श्री. ३१ जानेवारी १७३१.
श्रीमत्तीर्थरूप परमहंस बावा स्वामीचे सेवेसी :-
अपत्यें चरणरज लक्ष्मीबाई चरणावरी मस्तक ठेवून साष्टांग दंडवत. विनंति उपरी येथील क्षेम तागायत माघ शु ५ रविवार पावेतों स्वामीचे कृपावलोकनें करून वर्तमान यथास्थित जाणोन स्वानंदलेखनाज्ञा करावयासी स्वामी समर्थ आहेत. विशेष. अलीकडे आशीर्वादपत्र येऊन भाळ न जाला. ऐसें न करावें. सदैव येणारा माणसा समवेत असेपर्यंत कुशल वृत्त लेखन करून आशीर्वादपत्रीं दर्शनाचा लाभ घडून येईल. चित्तास आनंदातिशय होईल. स्वामीचे दर्शनाची अपेक्षा बहुत आहे. दर्शन जालियासी बहुत दिवस क्रमले. यांजकरितां चित्त सापेक्ष असे. कृपाकरून चरणदर्शनाचा लाभ होय तो अर्थ केला पाहिजे. यानंतर स्वामीकारणें येथून जिन्नस -
१ भोपळेयाचे बीज सोलीव, पिशवी १. |
१ कचरिया कंद पिशवी १. |
१ मध घागर १. | ० लंग ० |
येणेंप्रमाणें सेवेसी रवाना केलें आहे. अंगिकार करावयासी स्वामी समर्थ आहेत. बहुत काय लिहावें. विदित जालें पाहिजे. सेवेसी श्रूत होय हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[३३२] श्री. २५ आक्टोबर १७३०.
० श्री
राजा शाहू नरपति हषनिधान
बाजीराव बल्लाळ मुख्य प्रधान.
आज्ञापत्र राजश्री पंतप्रधान ता मोकदमानिहाय अहद मु मुखई तहद धावडशी सु इहिदे सलासैन मया व अलफ. श्री परमहंसभार्गव याचा तास हजिराबजीर पाठविला आहे, तो धावडशी पावून जाब आणून राजश्री मल्हारपंताचे घरी पुणियास देणें. जाणिजे छ २३ रबिलाखर. आज्ञा प्रमाण.
लेखनसीमा.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[३३१] श्री. ८ आक्टोबर १७३०.
श्रीमत्परमहंसबावा स्वामीचे सेवेसी :-
चरणरज बाकाजी नाईक महाडिक नामजाद प्रा जंजिरे सुवर्णदुर्ग कृतानेक साष्टांग विज्ञापना ता छ ८ जमादिलावेल पावेतों येथील वृत्त यथास्थित असे. विशेष. आशीर्वादपत्र पाठविलें तें पावोन समाधान जालें. गोवळ, अंजनवेलचे कार्यभागास फिरोन आलेत असाल ह्मणोन केळों आलें, तर सविस्तर लेहून पाठवावें, ह्मणोन आज्ञा. ऐशास पूर्वी गेलों तेव्हां चित्तायोग्य मनसबा नाहीं यांजकरितां जमावासहवर्तमान फिरोन आलों मागती जावें, त्यास येवेशीची आज्ञा श्रीमत् राजश्री बाबासाहेब यांची पाहिजे. विचारेकरून पाहतां नूतन विचार विजयदुर्गी होऊन साहेब स्वार होऊन किलोकिल्ल्यांचा बंदोबस्त केला ये जागा येऊन कुलाबेयास जाणें जाहालें आहे. तेथीलही मजबुदीचा अर्थ करून, आह्मांस मागती हरदू ठिकाणांचे कार्यभागास जाणें ह्मणोन आज्ञा करणें ते करतील. सध्यां खावंदाचे आज्ञेविना आह्मी कैसें जावें ? हें सर्व स्वामीस अवगतच असें. आह्मी जावें ऐसा हेत राजश्री प्रतिनिधीचा असे; परंतु हुकुमाविना आह्मांस निघतां नये. वरकड, सुवर्णदुर्गी कोणी असेल त्यास लेहून खरबुजीं रवाना करणें ह्मणोन आज्ञा. ऐशास, आह्मी बाणकोटीं कार्यास आलों होतों, तेथें स्वामीचें पत्र पावलें. खरबुजे यांचा यत्न केला. त्यास गैरहंगाम. हाल्लीं खरबुजीं तयार मिळालीं ते ८ सेवेसी पाठविलीं असेत. प्रविष्ट जाहाल्याचें उत्तर पाठवावयाची आज्ञा करावी. सदैव कागदीपत्रीं परामर्ष घेणार स्वामी समर्थ आहेत. हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[३३०] श्री. १९ आगस्ट १७३०.
श्रीमत्भृगुनंदनस्वरूप बावा स्वामीचे सेवेसी :-
चरणरज गणेश बल्लाळ मु परशराम साष्टांग नमस्कार विनंति येथील कुशल स्वामीचे आशीर्वादेंकरून ता छ १६ सफर बुधवारपर्यंत सेवकाचे व गावींचें वर्तमान यथास्थित असे. इकडील वर्तमान तरी बितपशील :-
राजश्री पंतप्रतिनिधि व सिद्दी साद यांची शनवारी सायंकाळी भेटी काशीबदरावरी जाहाली. घोडा शिद्दीस बसावयास एक दिला. शिद्दी बोलला जे आपण अंजन वेलीस जातो, तेथील बंदोबस्त करून येतों, आंगरे यांसी येथून घालवणें, ह्मणजे तुह्माबरोबर राजदर्शनास येतो, राजश्रीची चिट्टी आणून द्यावी. ऐशी बोली मात्र जाहाली. ते चिवळास गेले. हे देवालयास आले. यावरी जुंजाची तयारी करतात. इतका विचार असे. दिवस सुधें दिसत नाहींत. सेवेसी श्रुत होय. हे विज्ञापना. |
बाकाजी नाईक यांसी राऊ यांनी सोमवारी बोलावून आणिलें, कीं किल्ला तुह्मी आह्मी जवानमर्दीकरून घेऊं या. यास बाकाजीनें मान्य केलें. परंतु अंजनवेलीस सोडिलें नाहीं. डेरे यासी गेले. हालीं र॥ रघुनाथजीप्रभू बागेंत बाकाजीजवळ आले आहेत. त्यास रायानी बोलावूं पाठविले आहेत. आले ह्मणजे काय होईल पाहावें. |