Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[३७८] श्री. ३ मार्च १७५१.
पै॥ फाल्गुन वद्य १० सोमवार
शके १६७२
वेदशास्त्रसंपन्न राजमान्य राजश्री दीक्षित स्वामीचे सेवेसी :-
विद्यार्थी नागोराम भागवत चरणावरी मस्तक ठेवून साष्टांग नमस्कार विनंति विज्ञापना त॥ फाल्गुन वद्य द्वितीया मु॥ हसनाबाद, नजीक बेदर येथे स्वामीचे कृपादृष्टीकरून सेवकाचें वर्तमान यथास्थित असे. विशेष. स्वामीची आज्ञा घेऊन स्वार जाहलों ते मजल दरमजल श्रीमंतांजवळ नांदेडाअलीकडेस कापशीचे मुक्कामी पावलों. श्रीमंतांस खानाचें पत्र देऊन वर्तमान स्वमुखें जें त्यांहीं सांगावयास सांगितलें होतें ते सर्व निवेदन केले. त्यास श्रीमंताचीही मर्जी माघारें फिरावयाचीच होती. परंतु नांदेड टाकून अलीकडेस आले. दुसरें, नवाब निजामअल्ली यांची पत्रें आली व तमाम पाळेगार ये प्रांतीचे येऊन भेटले. तमाम मुलकाच्या खंडण्या घेत, भागानगर डावें टाकून कर्नूल कडप्याचे रोखें लष्करचे सुमारें चालले. खानास पत्र श्रीमंतांही लिहिलें, त्यावरून सर्व वर्तमान कळेल. सदैव आशीर्वादपत्रीं सांभाळ करावा. रा. फत्तेसिंग भोसले येऊन भेटले. सेवेसी श्रुत होय हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[३७७]A श्री. १ मार्च १७५१.
सेवेसी विद्यार्थी नरसिंगराऊ सा. नमस्कार विनंति उपरि येथील कुशल वर्तमान फाल्गुन वद्य प्रतिपदा जाणोन स्वामीनी आपले स्वानंद वैभवलेखन आज्ञा करीत असिले पाहिजे. विशेष. कृपापत्र पाठविलें ते पावलें. वर्तमान विस्तारें विदित झालें. आपण वर्तमान लिहिलें तें सर्व यथास्थित. राजश्री रामदासपंताचें पत्र ता. छ २६ रबिबलावल आज छ १३ रबिलाखरीं पावले. सविस्तर वर्तमान आदि अंत लिहिलें आहे. पठाणास मारून घेतलियावर मुजफरजंगास तीर लागला. डोल्यांतच शांत झाले. परंतु पं मजकुरांनी त्यांजला उठून बसवून, लोकांत ऐसे जाणविलें की जिवंत आहे. सर्व लोकांस हिंमत देऊन, डेरेदाखल जालियावर प्रगट केलें व सलाबतजंगास मुबारकबाद दिली त्यास सलाबतजंगानीं यांजला बोलावून बहुत समाधान केलें व बहादुरीचा खतबा दिला व काम दिवानीचें यांजवर बहाल राखिलें. यांचा हेतु होता कीं, धनी कदरदान गेला असतां काय मामला करावा. परंतु त्यांचा हेत बहुत पाहिला, उपाय नाहीं. फिरून इनायत पत्रें अबदुल खैरखान वगैरेचे नांवें व आमचे नावें सत्वर स्वार होयानिमित्त पाठविली, व स्वामीस पंत मजकुरांनी नमस्कार लिहिला, ऐसें पत्र पावलें. इंद्रप्रस्थींहून गाजुदीनखानाची ही पत्रें समस्तांस आमचेच हातें प्रविष्ट झाली. फर्मान बागलाणियाचा अबदुल खैरखानास आला. आमचेच हातें प्रविष्ट झाला. मर्यादेप्रमाणें घेतला. आह्मांस बहुमान वस्त्रें दिली. आतां सलाबतजंगाचीं पत्रें आली आहेत. उदयिक पावती करितों. पहावें काय विचार होतो व लोक कोणाकडे होतात. ता. छ २२ रबिलोवल. गाजुदीखान दिल्लीतच आहेत, बाहीर निघाले नाहीत.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[३७७] श्री. २१ फेब्रुवारी १७५१.
पै॥ फाल्गुन वद्य १०
सोमवार शके १६७२
वेदशास्त्रसंपन्न राजश्री दीक्षित स्वामीचे सेवेसी :-
विद्यार्थी नागोराव भागवत चरणावरी मस्तक ठेवून साष्टांग नमस्कार विनंति विज्ञापना ता. फाल्गुन शुध्द १४ मु. कापशी नजीक बेदर येथे स्वामीचे कृपादृष्टीकरून सेवकाचें वर्तमान यथास्थित असे. विशेष. स्वामीची आज्ञा घेऊन स्वार जाहलों तें लष्करांत येथेंच मुक्कामी पावलों. सकल वर्तमान खानांनी सांगितल्याप्रमाणे सर्व निवेदन करावयाचें तें केलें. श्रीमंतांची मर्जी माघारी फिरावयाची होती, परंतु लांब आलें. दुसरें, ये प्रांतीचे पाळेगार तमाम येऊन भेटले. घास, दाणे, खंडण्या तमाम मुलकांत घेत भागानगर डावें टाकून कडप्याचे सुमारें निजामअल्ली कडेस जावें हा हेत धरिला आहे. त्याची पूर्तता जाहालियावर त्यांस समागमें घेऊन गंगेचे कांठी शहर औरंगाबादेजवळ येऊन राहावें हा विचार आहे. आपणही खानास पत्र लिहिले आहे तें खानास पावतें करावें. रा. चिंतामण नाईक यांचे जासुदासमागमें सरकारचें पार्शी पत्र व आमचें पार्शी पत्र ऐशीं दोन पत्रें पाठविली, ती खानास पावती करून वर्तमान येथील सांगावें. आपण वामोरीस कागद घरास लिहिला तो अगत्यरूप पावता करून उत्तर आणवावें. कामाचा कागद आहे. अगत्यरूप पावता करावा. बहुत काय लिहिणें. लोभ असो द्यावा. हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
येथेंही स्वस्थ नाहीह. गयेकडेही हरिभक्तांची नित्य हूल पडत्ये. चहूंकडे उपद्रव आहे. यानंतर येथील हिशेबाचा चिठा पाठविला आहे त्यावरून कळेल. सवदा करावयाचें सांगितलें होतें, त्यास मी आल्यपासून उपद्रव आहे, याजकरितां बनत नाहीं. येथेंही स्थिरता दिसत नाहीं. पहावे. यानंतर, परभू, ब्राह्मण कऱ्हाडे यांनी दहाजणांही प्रायश्चित्तें केली. रहातां पटवर्धन चार, वझे तिघे, ऐसे दहापांच राहिले आहेत. मोठे उत्पात करितेत. तेथून आलियापासून आह्मांवरच कमरबंदी केली होती; परंतु फजीत वरचेवर होतेत. परंतु लज्जा सोडिली. निर्लज्य झाले आहेत. पठाणाचे सांगातें वकीलाचा गुमास्ता सिवरामपंत आहे, त्यांकडे मनुष्य पाठविले होते. त्यांचें पत्रही आज आलें. जे कोतवालास परवाणा तयार जाहला, मोहोर उदईककरून पाठवितो. त्यास आज उदईक परवाणाही येईल. दक्षिणी ब्राह्मण आहेत त्यांस बाळकृष्ण दीक्षित तेथें आहेत, त्यांची खातरदास्त करून ते सांगतील त्याप्रमाणें करणें. फिरून त्यांनी नालीश नये. त्यांचे रजावंदीचें पत्र पाठवून देणें, ऐसे पत्र आलें. बापूजी महादेवाकडे पत्रें गेली आहेत. पातशाहाची परवाणे नवाब पठाणास येतील. वडिलांचे पुण्येंकरून उत्तमच होईल. वरकड होईल तें मागाहून पाठवून देऊं. गयेस खर्च हजार दीड हजार लागेल. कळलें पाहिजे. काशींत कांही बरें होईल हें दिसत नाहीं. लोकांस उपद्रवच आहे. प्रयागी अमदखान पठाण, नवाब यासी ह्मणताती, त्याचे भेटीस राजा बळवंतसिंग गेला. भेटी जाली. द्रव्य मुलुकाचा कबूल केला. राजे यासी सिरपाव दिला. कोतवाल मात्र काशीत नवाब अमदखान बागस याचा. बाकी सर्व राजा बळवडसिंग याजकडे पाहावें. होईल तें लिहून पाठवून देऊं. मलठणकर वैद्य स्त्री ३२०१ व वासुदेव भट मुने कऱ्हाडे यांस रु॥ ४० देविले ते दिले, कळले पाहिजे. मी आजीच गयेस गेलों. र॥ बाबाजवळी कोणी नाहीं. धामधुमी तिकडे आहे. अभयतां जालियावर श्रीत येऊं. कळलें पाहिजे. मिती फाल्गुन ११ शनिवार. हे विनंति. श्रीत पठाणाचा अम्मल जाला.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[३७६] श्री. १३ फेब्रुवारी १७५१.
पै॥ चैत्र शुध्द ६ गुरुवार
शके १६७३ प्रजापतिनाम.
तीर्थस्वरूप दादा वासुदेव दीक्षित स्वामी वडिलांचे सेवेसी :-
केशवाचे शिरसाष्टांग नमस्कार विनंति उपरी येथील क्षेम फाल्गुन वद्य १४ बुधवार जाणोन वडिलांचे आशीर्वादें समस्त सुखरूप असों. विशेष. येथील वर्तमान बाळकृष्ण दीक्षित व मी, दोघे गयेस गेलों होतों. वडिलांचें गयावर्जन उत्तम जाहालें. ब्राह्मणभोजन होत होतें. येवढयामध्ये बापूजीपंतांचें पत्र गेलें जें, पठाण प्रयागास आले, नवें शहर लुटिलें, बायका बंद नेल्या. काशीस येणार, काशीमध्यें मोठा आकांत जाहाला, दोन दिवस दिवा शहरांत लागत नाहीं. हें ऐकून, नवाबास गयेमध्यें ठेवून, मी स्वार होऊन, चौथे दिवशी घरास आलों. बाबाचे स्त्रीसही गयेस मागाहून पाठविली आहे. दहा दिवस काशीमध्यें मोठा प्रलय जाहाला. ऐशीं रुपये गाडीचें भाडें पटण्याचें जाहालें. ओझ्यास मनुष्य मिळेना. साव सहा सर्व पळोन गेले. मनुष्य निघोन बाहेर कोणी मिरजापुराकडे, कोणी अजमगडाकडे, कोणी गंगापार ज्यांस जिकडे वाट फावेल तिकडे गेले. तव पठाणास वर्तमान कळलें. तेव्हा त्यानें साता सावकारांचे नावें परवाणे पाठविले जे, तुह्मीं काशीतून कां पळता ? मी पादशाही बंदा आहें, शहर लुटावयासी आलों नाहीं, मला बदलामी न करणें, लोकांस दिलासा देऊन शहरांत सुखरूप राहणें, रयतेशी काय आहे ? नवाबाचे अम्मलदार असतील त्यांस पुसों, रयतेशीं काय आहे ? हे परवाणे आले, व कोतवालही गंगापुरेयास पांचा स्वारांनिशीं पाठविला. उदयिक बसावयाची साइत आहे. आतां लोक फिरोन शहरास येऊं लागले. यात्रा प्रयागाहून निघाली. मिरजापुराहून मोहनच्या सराईस आली. तेथें रात्रीस येऊन डाका दोनशें मनुष्य येऊन पडलें. चाळीस पन्नास मनुष्यें जीवेंच मारिलीं. सदाशिवभट इंगळे व त्याची भावजय तेथेंच वारली व नारो महादेव मुळे पारोळेकर, त्याचा बाप व तो दोघे मेले. त्यांच्या बायका सत्या जाहाल्या. शता दोहों शतांस जखमी जाहाले. सत्यानास यात्रेचा जाहाला. लुटून गेले. असें कधी जाहाले नवतें. शहरांतही असें कधी जाहालें नाहीं. केवळ लोक भयभीत आहेत. अद्याप स्वस्थ नाही. लोक बहुत हडबडोन गेले आहेत. पुढें विश्वेश्वर काय करील ते पाहावें.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[३७५]A श्री. २१ फेब्रुवारी १७५१.
दिल्लीचे वर्तमान, र॥ उधोपंत हरकारे :-
वजीर छ २६ रबिलावलीं रुकसत होऊन महाबतखानाचे रेतींत डेरेदाखल जाहाले. छ ३ माहे रबिलाखरीं तेथून कूच करून किसनदासाचे तळ्यावर डेरेदाखल जाहाले. मल्हारजी नजदीक आले. सांप्रत विचार यमुनेपार होऊन पठाणाशीं युध्दप्रसंगच करावा. पुढें युध्दाचा प्रसंग मोठा आहे. यानंतर फेरोजंग बहादूर यांणी दक्षणेस यावयाची तयारी केली. जागा जागा कागद पाठविले. दहा हजार स्वार जमा होतील. कितेक उमराय सांगातें तैनात होतात. आपले लेकास हुजुरांत ठेवितात. पहावें. होऊन येईल तें खरें. पंतप्रधान यांची उमेद बहुतशी त्यांस आहे. वकिलांनी त्यांची खातरजमा बहुत केली आहे. छ ५ माहे रबिलाखर, सन ३. छ ६ जमादिलावल सन ४.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[३७५] श्री. २० जानेवारी १७५१.
स्वामी वडिलाचे सेवेसी. तापीपूरस्थ विद्यार्थी याचा स॥ नमस्कार विनंति उपरि माघ शु॥ ४ जाणून आपलें वैभव लिहीत गेलें पाहिजे. यानंतर आपलें आशीर्वादपत्र पावलें. संतोष झाला. सनाथ केलें. बहुत दिवस आपल्या दर्शनास जाहाले. चित्ताचा उत्कट हेत समयावर प्रमाण. मजला पूर्ण भरवसा आपले आशीर्वादाचा आहे. त्याच आश्रयें योगक्षेमो चालतो. यास संदेह नाही. यद्यपि बाह्यात्कारे पत्रें पाठविण्यांत अंतराय होत होता, परंतु अहर्निश स्मरणांत आहेत. प्रस्तुत राजश्री रामदासपंतांचा बहुत उत्कर्ष जाला व मुख्याची कृपा बहुत, हें वर्तमान आपणास विदित जालेंच असेल. माझा त्यांचा बहुत स्नेह. एक जीव व दोन शरीर, ह्मटले पाहिजे. त्यांची अजूरदार जोडी मजपाशीं आली. मजला बहुत लिहिलें आहे की, सैन्यास येणें, मुख्याचें सत्कारक्षपत्रही पाठवून देतों. खडकी, तापीपूर येथील कामापैकी जें काम चित्तांत असेल तें लिहिलियाने करून पाठवीन, तूं सैन्यास येणें, अनुकूल न पडे तरी सैन्य खडकीस आलिया अगत्य येणें. ऐशा कितेक गोष्टी लिहिल्या आहेत. म्या उत्तर लिहिलें की, मजला केशवरावजीची चाकरी टाकणें नाहीं, हें वतन आहे. राखिलें (पाहिजे) तुह्मी खडकीस आलियावर येईन. रामदासपंत बहुत गृहस्थ उदार आहे. इ. इ. इ.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[३७४] श्री. ८ जानेवारी १७५१.
पे॥ पौष वद्य ८ मंगळवार,
शके १६७२ प्रमोद.
विनंति उपरि. आपण सांडणीस्वारासमागमें पत्रोत्तर पाठविलें तें प्रविष्ट जाहलें. खानाचा आशय लिहिला कीं, दहा पंधरा पावेतों खर्चास देऊं, वरकड आमच्यानें कांही होत नाहीं, शेकडा पंधराची जागीर द्यावी, ह्मणून खुलासा लिहिला. ऐशियास :-
नवाब थोरले याची कृपा खानावर आपले इतबारी ऐसी होती. परंतु नबाब कृपण. उत्तम प्रकारें खानास जागीर मनसब देऊन न वाढविलें. नासरजंगाची तो यांजवर अवकृपाच होती. हे मात्र रंग राखून होते. कालगतीनेंनासरजंग (मारले गेले. त्यांच्यामागें यांचा) इतबार येतां कठिण! येथे नासरजंगाचा पुत्र असला अगर भाऊ असला तर उभा करावा. आह्मांस मातबर ऐवज द्यावा. सामील करून घ्यावें. फेरोजंगास ल्याहावें कीं, खामखा तुह्मांत जोर असला तर येणें, आह्मींही जमा होतों, नाना आह्मांस रफीक जाहाले आहेत, फिरोन कडाचा कर्नोळकर यांस मारून घेतों, आले तरी बरें, नाही तर आह्मी एकले श्रीकृपेनें पारपत्यास समर्थ आहों. खजाना जमा करावा. तूर्त पंचवीस तीस आह्मांस द्यावा. आपण बाहेर निघावें. आह्मास (कर्तव्य असल्यास) मोहिदीखानाचा काय मजकूर आहे. तिकडे पठाण मातलें. लटकी वजीर मारावयापावेतों पातशहाशी खुशामत करतात. वजीर मेलिया पातशहात गेली ऐशी समजावी. इकडे हे पठाण मातले. कोणी वर्षभरात आटोपणार नाहीं. रोग नवा आहे तोंच दूर केला पाहिजे. खानास योग्यता मोठी. आह्मी जाणतों कीं, नासरजंग मेले तर फेरोजंगाचें नांव घ्यावें. आह्मांस त्यांस एकविचार करावें. आमचें कार्य मातबर करावें. आणि हिदायत मोहिदीखानास (दाबांत ठेवावें) असें करतील तर तो (अ) वसांत होईल. नाही तर तो येईल, पठाण वाढतील. यांनी दिल्लीस पळत जावें. तेथे यांस कोण पुसतों? स्थलभ्रष्टता जालिया योग्य नाहीं. आमचें कर्ज फेडावें ह्मणजे सरदार बोलावितों. सर्व एकत्र होऊन पठाणास तंबी करितों. जर न करीत तर मग आहे तें जाऊन उफराटें पठाणाचे घरी वेरझारा घालाव्या लागतील. प्रथम कामापुर्ते जवळ या, जवळ या, ऐसा बहुमान करतील. पुढें निर्माल्य होतील. आमचें कांही जात नाही. | आह्मी जो जफ्ती केली. हिदायत मोहिदीखानावरी कमर बांधिली. श्रीकृपेनें प्रसंग पडल्यास नबाबाशी लढाईस बिलकुल न चुकलों. आह्मी या नव्याचा हिसाब धरीत नाहीं. तेव्हां मग खान +++ ++++++ नबाबाचे कबिले व सर्व शहरांत ठेवावे. आह्मांस ऐवज मात्र कांही शहरावर लोकांपासून तूर्त कांही खजान्यांतून द्यावा. गंगातीरावर येऊन भेटावें, तेंच पूर्वेच्या सुमारे चालत जावें. शहर आबाद मागें राहील तरच सलाबत पडेल. सुलतीनजाचा लेक हाताखाली घ्यावा. तेथील मराठेहि आमचे विचारांत येतीलच. सर्वांस वृध्दीची आशा आहे. जर खान हें न करीत तर जें होणें ते होईल असें न करावें. तिळमात्र दोष पदरी येत नसतां दिल्ली, लाहोर, मुलतान पावेतों लौकिक खानाचा होईल कीं, खानांनी प्रधानांस मेळवून घेऊन नवाबाच्या दौलतेचें नांव राखलें. असें न करतां जोर ज्याचा पोहोंचेल त्यास जाऊन भेटल्यास अखेर वक्र जाऊन काम कांहीच होणें नाहीं. बहुता दिवसांची त्यांची आमची मैत्री त्यांचें बरें व्हावें, आमचे कार्य व्हावें, नवाबाच्या वंशी मुख्य असेल (त्याचा नक्ष व्हावा, हा आमचा हेत आहे.) नवाब यांनी या मनसबेयास दोष ठेविला, नवाबाचा तोरा कोणी तेथें नसला, व गाजुद्दीनखानांनी गांडीत शेपूट घातलें आणि आमचेंही न ऐकिलें, ह्मणजे जो येऊन शहर वेढील त्याचे हवाला करूं. मग भेटावें, निरोप घेऊन दिल्लीस जावें अथवा मकेस जावें, ऐसे करावें, यांत काय फळ आहे ! जो जवान मर्द आहे त्यानें दोष येत नाही ऐसास् समय पाहून आपलें कार्य, मित्रकार्य संपादून कीर्तीस पात्र व्हावें, उचित असे. |
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[३७३] श्री. ८ जानेवारी १७५१.
पे॥ पौष वद्य ८ मंगळवार
शके १६७२, नायकजी व कान्होजी.
जासूद, जमात मुकुंदजी नाईक.
जाब रवाना, पौष वद्य १० गुरुवार,
चार घटका दिवस.
वेदमूर्ति राजश्री वासुदेव दीक्षित स्वामीचे सेवेसी :-
विद्यार्थी बाळाजी बाजीराव प्रधान सा॥ नमस्कार विनंति. अलाहिदा विस्तारें पत्र पाठविलें आहे, हें बनाजीपंत तुह्मी बसून उत्तम प्रकारें तीनदा वाचून,अर्थ ध्यानांत आणून, खानास सविस्तर अक्षरश: समजावणें. येसमयीं आमचें कार्य त्यांनी करावें, त्यांचे आह्मी करावें. ऐसा समय येणार नाहीं. सांप्रत महादोबास बरें वाटत नाही व कांही रुसवाहि करून घरास गेले. आह्मीं, भाऊ, रामचंद्रबावा नवे मनसब्यास निघालों आहों. आमचे महत्तर कार्य स्वामीचे आशीर्वादावर व्हावें, हे इच्छा आहे. विस्तार लिहिणें उपरोध आहे. सर्व मोगल व मराठे (एक होऊन सत्ता त्याचे) हातास जाऊं न द्यावी. उत्तम पक्ष, फेरोजंगास स्थापावें. तो नामर्द, न येई, तर नासरजंगाचा लेक स्थापावा. तेंहि न होय, तर आमचेंच कार्य मातबर करावें. खानास दोष नाहीं. यांत तिळमात्र निमकहरामी येणार नाहीं. बहुतांची राजकारणें, चंदाकडे हिदायत मोहिदीनखानाकडे होतीं. दोन एकनिष्ठ. हे त्यांजकडे नसले तर ते यांस तिळमात्र चहाणार नाहींत. कदाचित् कांही हिरायत मोहिदीखानानें चाहिले तर पठाण मातले. त्यांजपुढें काय चालणार ? तेथेहि बहुनायकी आहे. या काळी पाया पडल्यास पुसत नाहीं. हरएक गोष्ट वक्तानें आह्मीं त्यांनी मिळून करावीं. त्यांतच ऊर्जित आहे. खानाचें मतें मनसबा आह्मीं त्यांनी मिळून करावी. त्यांतच ऊर्जित आहे. खानाचे मतें मनसबा आह्मी लिहिला. त्याप्रमाणेंच करावा असें आहे. +++++++
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[३७२]B श्री. ३१ डिसेंबर १७५०.
पे॥ पौष शुध्द १५
शके १६७२.
श्रीमंत राजश्री पंतप्रधान यांप्रती :-
वासुदेव दीक्षित अनेक आशीर्वाद उपरि येथील क्षेम पौष शुध्द पौर्णिमा सोमवार जाणून स्वकीय कुशल लेखन केलें पाहिजे. विशेष. आपण सांडणीस्वाराबराबर पत्र पाठविलें तें पौष शुध्द ९ बुधवारी संध्याकाळी पावोन वर्तमान कळों आलें. त्यासमयीं स्वार होऊन गेलों. खानाची भेट घेतली. एकांतीं पत्रार्थ सांगितला. तें ऐकोन उत्तर दिल्हें कीं, यजमानाचें विपरित वर्तमान आल्यावरी आह्मांस कयाम तशी भासली, अत्यंत फिकिरीत होतों. त्यास, हें तुह्मी वर्तमान सांगितलें व त्यांचे पत्र आलें, येणेकरून चित्तास समाधान जाहालें. तो बयान कोठवर करावा. सर्व आश्रय तुमचाच आहे. दोन मतलब लिहिले, अवरंगाबाद व बऱ्हाणपूर दोनी सुभे व खजाना ऐसे आमचे हवाला करावा, जेणेंकरून कर्जपरिहार होय ते अर्थ करावा, आपले सर्व प्रकारें जागीर मनसब घेऊन आमचे हातून आपलें बरें करून घ्यावें, हा उत्तम पक्ष. दुसरा प्रकार :- नासरजंग यांचे लेक अथवा भाऊ यांस उभे करून आह्मांस कर्जपरिहारार्थ व फौजेचे एक वर्षाचे बेगमीस ऐवज देऊन आह्मांस सामील करून घ्यावें, वराड वगैरे जागांची फौज व तोफखाना जमा करून आह्मांसमागमें *चलावें.