[३३०] श्री. १९ आगस्ट १७३०.
श्रीमत्भृगुनंदनस्वरूप बावा स्वामीचे सेवेसी :-
चरणरज गणेश बल्लाळ मु परशराम साष्टांग नमस्कार विनंति येथील कुशल स्वामीचे आशीर्वादेंकरून ता छ १६ सफर बुधवारपर्यंत सेवकाचे व गावींचें वर्तमान यथास्थित असे. इकडील वर्तमान तरी बितपशील :-
राजश्री पंतप्रतिनिधि व सिद्दी साद यांची शनवारी सायंकाळी भेटी काशीबदरावरी जाहाली. घोडा शिद्दीस बसावयास एक दिला. शिद्दी बोलला जे आपण अंजन वेलीस जातो, तेथील बंदोबस्त करून येतों, आंगरे यांसी येथून घालवणें, ह्मणजे तुह्माबरोबर राजदर्शनास येतो, राजश्रीची चिट्टी आणून द्यावी. ऐशी बोली मात्र जाहाली. ते चिवळास गेले. हे देवालयास आले. यावरी जुंजाची तयारी करतात. इतका विचार असे. दिवस सुधें दिसत नाहींत. सेवेसी श्रुत होय. हे विज्ञापना. |
बाकाजी नाईक यांसी राऊ यांनी सोमवारी बोलावून आणिलें, कीं किल्ला तुह्मी आह्मी जवानमर्दीकरून घेऊं या. यास बाकाजीनें मान्य केलें. परंतु अंजनवेलीस सोडिलें नाहीं. डेरे यासी गेले. हालीं र॥ रघुनाथजीप्रभू बागेंत बाकाजीजवळ आले आहेत. त्यास रायानी बोलावूं पाठविले आहेत. आले ह्मणजे काय होईल पाहावें. |