[३३४] श्री. ५ एप्रिल १७३१.
श्रीमत् भृगुनंदनस्वरूप परमहंस बावा स्वामीचे सेवेसी :-
चरणरज अपत्यें मथुराबाईनें चरणावरी मस्तक ठेवून साष्टांग दंडवत् प्रणाम विनंति उपरी येथील कुशल त॥ चैत्रशुध्द दशमी इंदुवार पावेतों स्वामीचें कृपावलोकनेंकरून यथास्थित जाणोन स्वामदष्टत लेखन करावी अशी आज्ञा केली पाहिजे. विशेष. आनंदी व राधेस कुलाबास रा करावयाबद्दल पाठविल्या त्या सुखरूप आह्मा जवळी पावल्या. याउपरी गलबतें जातील ते समयीं रा करून माणसें पावावयासी आलीं त्यास पाठविलीं आहेत. स्वामी कारणें मवेयांची शहाळीं रवाना करविली आहेत. विदित जालें पाहिजे. बहुत ल्याहावें तरी स्वामी समर्थ असत. हे विज्ञापना.