Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[३४७] श्री. २५ जानेवारी १७४३.
श्रीमत् तीर्थस्वरूप परमहंसबावा स्वामी वडिलाचे सेवेसी :-
अपत्यें तुळाजी आंगरे चरणावर मस्तक ठेवून साष्टांग दंडवत प्रणाम विनंति माघ शुध्द एकादशी भौमवासरपर्यंत स्वामीचें कृपेकरून सेवकाचें वर्तमान यथास्थित असे. विशेष. स्वामीचें आज्ञापत्र सादर जाहालें. प्रविष्टकालीं आनंदाच्या काठी प्राप्त होऊन सनाथ जाहालों. पत्री कितेक अपत्यांस बुध्दिवादाचें शिक्षापन व पूर्वी वडिलांचे निष्ठेचा अर्थ लेखनें आज्ञापून, पुढें अविनाभावें चरणाजवळ वर्तावें ह्मणजे तेणेंकरून सर्व कल्याणें प्राप्त होऊन विजयता पावाल व माझा हस्त मस्तकी ठेविला जाईल. ज्यांणी माझा अनादर केला त्याची गत काय जाहाली हें समजणें व पुढेंही वर्तणूक निष्ठायुक्त करीत जाणें. येविशी बहुतप्रकारें अपत्यास बुध्दिवाद लिहिला. ऐशास, हें दार पूर्वी वडिलांपासून स्वामीच्या आशीर्वादाचें आहे. त्यास, एकादे समयीं अंतर जाहालें व स्वामीनीं कोप केला, तथापि, आपले वरदी आहेत त्याचें कल्याणच होईल. येथें संदेह मानावा ऐसा नाहीं. निमित्य कीं स्वामीची सेवा वडिलांही करून कृपा संपादून घेऊन वंशपरंपरागत स्वामीचें चरणाशी जोड संपादिली आहे. याचा सविस्तर अर्थ पूर्वोत्तर सेवेस विदित असेल. वरकड सेवकाचे निष्ठेचा व आचरणाचा अर्थ तरी सेवकास स्वामीचे चरणाविरहित अन्यथा हित जाणत नाहीं, व सेवकाचे मनोरथ पूर्ण होतील हाच निश्चय मानिला आहे. राजश्री मानाजी आंगरे व तूंही एका विचारें असिल्याचें उत्तम आहे. येणेंकरून इतरांचा हात चालणार नाहीं, ह्मणोन लिहिलें. तरी सेवकाचे चित्ती हाच अर्थ अंत:करणापासून आहे. एका विचारें चालल्यास वडिलांचा मामला जागोजगानामोश सर्वही सिध्द आहेत. गेले जागे तेही स्वामीचे आशीर्वादें स्ववश्य होईल. यांसी अगाध आहे ऐसें नाहीं. सारांश याप्रमाणें त्याचे वर्तणुकीचा विचार प्रत्ययास आल्यावर आह्मांपासून अंतर किमपि नाहीं. मुख्य पदार्थ स्वामीचा आशीर्वाद सेवकाचे मस्तकी असतां इतराचा विषय मानीत नाहीं. सर्वांविषयीं वडील मायबाप स्वामी आहेत व सेवकापासून स्वामीचे चरणाजवळ आचरणांत तीळमात्र अंतर होणार नाहीं. कृपा वर्धमान करावी. हे विज्ञापना. हे विज्ञप्ति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[३४६] श्री. १५ नोव्हेंबर १७४२.
अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य राजश्री धोंडोपंत गोसावी यांसी :-
सेवक सदाशिव चिमणाजी नमस्कार. सु॥ सलास आर्बैन मया व अलफ. श्रीपरमहंस स्वामींनीं कापड सनगें आह्माकडे पाठविली कीं, धावडशीस पाठवून जाब आणवणें त्यास सनगें पाठविलों, बितपशील.
येकूण बारा दागिने, बरोबर धोंडजी आढाव जासूद तुह्मांकडे पाठविले असेत तरी घेऊन पावलियाचें उत्तर पाठवून देणें. जाणिजे. छ २८ रमजान. आज्ञा प्रमाण.
लेखन सीमा.
पो। जमा सनगें लि॥ प्रा. छ ३ शौवाल, मार्गशीर्ष सु, सलास आर्बैन.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[३४५] श्री. २१ जानेवारी १७४२.
श्रीमत् तीर्थस्वरूप राजश्री परमहंसबावा वडिलाचे सेवेसी :-
अपत्यें तुळाजी आंगरे चरणावरी मस्तक ठेवून कृतानेक विज्ञापना येथील कुशल तागायत पौष बहुल एकादशी सौम्यवासरपावेतों वडिलाचे कृपेंकरून सुखरूप असो. विशेष. तीर्थरूप राजश्री सरखेल साहेब यांचे शरीरी अनारोग्यता तीनमासपर्यंत होऊन पौष बहुल तृतीया भौमवारी संध्याकालचें तास दिवसास कैलासवास केला. ऐसा प्रसंग ईश्वरें आह्मांवर केला. बरें ! होणारास यत्न काय आहे ? वडिलाचे पुण्येंकरून व स्वामीचे आशीर्वादेंकरून कल्याणच होईल. परंतु वडिलांनी कृपेकरून अपत्यावर पाहोन परामर्ष करावा. वरकड हा मामला आहे हा वडिलांचा आहे. तरी अभिमान न धरून मनसबा चालोन जग नामोश होई तो अर्थ करणार आपण वडील आहात. सदैव पत्र पाठवून परामर्ष करीत असिलें पाहिजे. बहुत ल्याहावें तरी आपण वडील आहांत. सेवेसी विदित जाहालें पाहिजे. हे विज्ञापना. हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[३४४] श्री.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री जगन्नाथपंत स्वामी गोसावी यांसी :-
पोष्य रामाजी महादेव स॥ नमस्कार विनंति उपरी येथील कुशल जाणोन स्वकीय कुशल लिहित असिलें पाहिजे. विशेष. आपण पत्र पाठविलें ते पावलें. लेखनाभिप्राय सविस्तर कळला. ऐशास, श्रीस्थळीं यावें. आपणांस बोलावूं पाठवावें, हा संकेतच. परंतु इंग्रजांचे बखेडे यामुळें प्रस्तुत उरणपर्यंत जाणें प्राप्त जालें आहे. जाऊन मनोदयानुरूप कार्यसिध्दी जाली ह्मणजे तिकडून येतां श्रीचें दर्शनास येऊन हर्षयुक्त आनंद उत्साह करून, मग श्रीची आज्ञा घेऊन पुढें जाऊं. आपण श्रीची प्रार्थना बहुत प्रकारें करावी आणि जातांच कार्य मनोदयानुरूप होय तें करावें. पेढे येथील पूर्ववत्प्रमाणें श्रीकडे वसूल द्यावा ह्मणोन गोविंदगडी लिहिलें असे. सारांश, इंग्रेजांनी नजर फिरविली आहे. त्याचें पारपत्य श्रीनें करावें. आपण प्रार्थना करावी. वे॥ नरजोशी व बाळकृष्णभट गणपुले पेढेयाचे वसुलीविशीं कजिया करतील. तरी तैसें नसावें. तो ऐवज श्रीचा कोठींत राहून खर्चवेच श्रीचे आज्ञेप्रमाणें व्हावा याप्रमाणें करावें. ब्राह्मण भांडों लागतील, बखेडा होईल, ऐसे नसावें. सूचनापूर्वक लिहिलें आहे. निमित्य, आपणाजवळ सारा अर्थ बोलिलों असो. हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[३४३] श्री. २१ सप्टंबर १७४०.
श्रीमत्परमहंस स्वामी यांही बाजी अनंत मुक्काम पिंपरी यांस आज्ञा केली ऐसीजे :-
तुह्मांस कार्यास एके जागीं पाठविणें आहे. तरी तुह्मी आश्विन वदि त्रयोदशीस धावडशीस निघोन येणें. गांवचें एक घोडें स्वारीस पाठवावयास बराबर गांवक-यांजवळ मागोन घेऊन येणें. त्रयोदशीस येथें आलास नाहीं ह्मणजे तूं आमचा चाकर न्हवस. चाकरीवरून दूर केला जाईल ऐसें समजोन त्रयोदशीस येणें. धरफळेबाबद रु ॥ दीडशें जेतजी चौगुल्याकडेस तेथें ठेविले आहेत ते त्याजपासून मागोन घेऊन येणें. जाणिजे. छ १० रज्जब. हे आज्ञा. बेरड एक माळशिरसचा बराबर घेऊन येणें. जाणिजे. हे आज्ञा.
श्री.
राजश्री जगन्नाथ चिमणाजी यासी आज्ञा केली ऐसीजे :-
तुह्मी आपले लोक व गांवकरी व तमाम जमावानिशीं धावडशीपासून मोरखिंडीपावेतों रान काढावयाची आज्ञा केली आहे. तरी तुह्मी जाऊन रान काढणें. बहुत काय लिहीन.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[३४२] श्री. १६ जुलै १७३९.
श्रीमत् तीर्थरूप परमहंसबावा स्वामीचे सेवेसी :-
अपत्यें सौभाग्यादिसंपन्न गिरजाबाई कृतानेक साष्टांग दंडवत विनंति उपरी येथील कुशल तागाईत आषाढ बहुल अष्टमी इंदुवारपावेतों स्वामीचे आशीर्वादेंकरून वर्तमान यथास्थित असे. विशेष. बहुत दिवस स्वामीकडून आशीर्वादपत्र येऊन परामर्ष होत नाहीं. तरी सदैव आशीर्वादपत्र पाठवून परामर्ष करीत असिलें पाहिजे. वरकड पेशजी स्वामीकारणें किंचित् जिन्नस पाठविला होता. ता :-
बदाम १.
खारीक १.
नाबदसाखर १.
इलाची १.
काजूच्या बिया १.
अत्तरकुपी १.
पिंजर १.
येणेप्रमाणें जिन्नस स्वामीकारणें पाठविला होता; परंतु पावलियाचें उत्तर आलें नाहीं. तरी पावलियाचें उत्तर पाठविणार स्वामी समर्थ आहेत. बहुत काय लिहिणें. लोभ असो दीजे. हे विज्ञापना. छ १७ रबिलाखर आषाढवदि.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[३४१] श्री. १३ एप्रिल १७३८.
श्रीमत्सकलतीर्थास्पदीभूत श्रीमत्परमहंसबावा स्वामीचे सेवेसी :-
चरणरज रघुनाथ हरी कृतानेक साष्टांग दंडवत प्रणाम विनंति उपरी येथील कुशल वैशाख शित पंचमी गुरुवारपर्यंत स्वामीचे कृपावलोकनें करून असे. बहुत दिवस स्वामीचें आशीर्वादपत्र सेवकास येत नाहीं. येणेंकरून चित्त परम उद्विग्न होऊन बहुत श्रमी होतात. तें पत्रारूढ केले जात नाहीं. तरी याउपरी कृपाळू होऊन आशीर्वादपत्री दर्शनाचा लाभ देऊन कृतार्थ केले पाहिजे. आह्मांस स्वामीवेगळें दुसरे आराध्य आहे नाहीं हें स्वामीस विदित असेल. आमचे निष्ठेनुरूप आह्मांस फलप्राप्ती होईल. सर्वविशी कैलासवासी सरखेल याजमागें आमचा सांभाळ करावयासी स्वामी वडील आहेत. बहुत काय लिहिणें. कृपा वर्धमान केली पाहिजे. हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[३४०] A श्री. १७ मार्च १७३५.
श्रीमत् परमहंस भृगुनंदनस्वरूप बावा स्वामीचे सेवेसी :-
अपत्यें लक्ष्मीबाईनें चरणावरी मस्तक ठेवून दंडवत् विनंति येथील कुशल ता चैत्रशुध्द चतुर्थी इंदुवार पावेतों स्वामीचे आशीर्वादेंकरून कुशल असे. विशेष बहुत दिवस जाले; परंतु, पत्रद्वारें परामर्ष न जाहाला. येणें करून चित्त सापेक्षित असे दार ऐसें न करावें. सदैव आशीर्वादपत्री अपत्याचा सांभाळ करावयासी आपण वडील आहात. आपणाकारणें कोन वजन खरें व मेवा गाडगें १ येणेंप्रमाणें पाठविलें असे. स्वीकारलें पाहिजे. बहुत काय लिहिणें. अपत्यावरी लोभ केला पाहिजे. हे विनंति. कुंभकोनी तांब्या कस्तरापाशी करावयासी दिला असे. सिध्द जाल्यावरी पाठवितो. कळलें पाहिजे. विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
तरी जो कैलासवासीयामागें प्रसंग जाहाला तो चिरंजीव बावास न कळे ऐसा नाहीं. प्रस्तुत अंत:प्रभूस निमें वतन करून दिल्हें तें तुजला कळलें असेल असें लिहिलें. तरी पहिल्या प्रसंगा अलीकडेस काय जालें असेल ते न कळे. चिरंजीव बाबाचा रुका पैकी नलगे, जोडिले राज्य जतन करावें, येणेंकरून आपण सुखी आहों ह्मणोन आज्ञा. तरी यांत अपूर्व काय आहे ? कैलासवासीयांचा आपला याच रीतीचा अकृत्रिम, नि:सीम, ऋणानुबंध होता. ते निघोन गेलें. स्वामी मागें आहेत. त्यांच्या वंशाचें इष्ट इच्छून न्यून पूर्ण करावें हें तों स्वामीस उचितच आहे. अनिष्ट चिंतिलें तरी स्वर्गीं स्वामीस हांसतील ! एतदर्थी संशय आहे ऐसें नाहीं. मनसबा जतन व्हावयास स्वामीचा आशीर्वाद पूर्ण असावा. त्यांणी स्वामींची कृपा संपादावी तरी त्यांचे लेंकु पण. त्यांचे बुध्दीची प्रागभ्यता जाहाल्वरी निष्ठेस अंतर न करीत. देकार्यांवरी किंवा स्वामिकार्यावरी तत्पर असावें ऐशी मजला आज्ञा: तरी जसा संस्कार असेल तसें घडेल. भेटीचा हेत, यास्तव प्रपंच सोडून श्रीकृष्णस्नानाचे निमित्यें येऊन भेट देणें. सर्व आहे तें तुझेंच आहे., ह्मणोन: तरी यांत अन्यथा नाहीं. भेटीची उत्कंठा अहोरात्र लागलीच आहे. तीर्थ आणि स्वार्थ ऐसे दोनी अर्थ सिध्द होतील, यास ईश्वरीच्छा प्रमाण ! प्रपंचाचा अर्थ : तरी प्रपंचच जेव्हां छत्र गेले तेव्हांच प्रपंचत्याग करून यथाज्ञानें कालपरत्वें जें होतां होईल ते भगवद्भजन होतेंच आहे. प्रपंचगुहेमध्यें वास असोन केवळ प्रपंचाचें दूरीकरण कसें होऊं पाहातें ? यास्तव, दोनी विचार स्वाधीन जालेच आहेत. वरकड कर्तेपणाचा आटोप असोन, बुध्दिनीत सांगोन, मनसबा चालघावा, हें कोणास मानत नाहीं हा अर्थ आज्ञापिला: तरी देवदेव करून कालक्रमणा करावी हाच विचार बरा आणि प्राप्त प्रसंगास उचित आहे. लाभलाभ विचार होणें तें समयीं होतात, तें उत्तम जाणोन राहाटी करावी. विचार कोठवरी लिहावा ? स्वामी सर्वज्ञ आहेत. कृपा करावी. हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
तथापि, संकलितार्थे विनंति करित्यें कीं, हरणैस देवालय नूतन करून स्थापना केली ऐसें ऐकोन, स्वामी संतोषी होऊन राहतां इतकेंच राहेल ह्मणोन आज्ञापिलें; तरी आरंभिल्या कार्यापासून उत्तीर्ण व्हावें याविचारें देवाची स्थापना करून, कुलाबां जातों ऐसें स्वामीचे सेवेसी लिहून पाठविलेंच होतें. कीर्ति अपकीर्ति रहावयाचा अर्थ; तरी शेवट होईल तो खरा. आपण हे राज्य टाकून जात असतां, राजश्री बाजीराऊ यांणी फिरविलें ह्मणून तरी हे गोष्टी त्यांणी उचितच केली. स्वामीसारिखे तपखि ज्या राज्यांत नाहींत तेथे श्रेयस्कर किंवा राज्याभिवृध्दी आहे ऐसे नाहीं. अन्यथा स्वामीस हे भूमंडळ अनुकूल. जेथें गमन करिजेल तेथें सन्मानच होईल. कैलासवासी यांजशी मैत्री केल्यापासून यावज्जीव त्यांचे गुणागुण व हस्तीचे वेळेचे श्रमाचे स्मरण करून आपण लिहिलेंत : तरी त्यांची व स्वामींचा ऋणानुबंध कोणेप्रकारचा होता तो अर्थ स्वामीचा स्वामीच जाणोत. अन्यत्रांस काय कळे? चित्तवित्त तुह्मांकडे बुडालें व अग्नीर्पण जाहालें ते निरुपायच गोष्ट होऊन गेली. आह्माकडे असेल त्याजविशी गतवर्षी सुवर्णदुर्गी असतां आपण लिहिलें होतें. त्याजवरून चिरंजीव सेखोजी बावा यांस लेहून पाठविलें त्यांनीही मान्य केलें जे शनि:शनि परिहार करून, स्वामीचा आशीर्वाद संपादून घ्यावा. ऐसें त्यांचे चित्तांत येऊन, आह्मांसही लेहून पाठविलें होतें. पुढे घडोन यावें तों त्यांचा प्रसंग तसा होऊन सर्वांसच श्रम प्राप्त जाहाले. त्याजमागें चिरंजीव संभाजी बावा आहेत. त्यांसही आह्मी सांगोन तेही स्वामीचे सेवेसी चुकणार नाहींत. स्वामीनीं त्यांचे ठायी कृपा करून, पूर्ण आशीर्वाद देऊन, एकाचे एकवीस श्रीनें विस्तार करावा. प्रस्तुत त्यांजवरी गगन कोसळतें यापरी मनसबियाचा भार येऊन पडला आहे. यास आधार एक स्वामीच्याच आशीर्वादाचा आहे. कृष्णंभटाचे देशमुखीचा विचार पूर्वील लिहिला.