Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तेरावा (थोरले माधवराव)
पत्रांक ९७.
१७६८ ता. २९ एप्रिल. श्री. १६९० वैशाख शुद्ध १३
चिरंजीव राजश्री राव यांसः—
रघुनाथ२ बाजीराव आसीर्वाद. उपरी येथील कुशल जाणोन स्वकीय कुशल लिहीत जावे. विशेष. अनूबाई कुलकर्णी मौजे सिनवली तो घोडें पो जुन्नर इनें अवगत केलें की “आपले सासरे त्रिंबक कृष्ण व चुलत सासरे नानाजी कृष्ण, या उभयतांचे मौजे मजकूरचें कुलकर्ण निमेनीम आहे. त्यास नानाजी कुलकर्णी मखमल१ अलमाचे (?) कैदेंत पडल्यावरी त्रिंबक कुलकर्णी यांणीं मोरो गोपाळ गोळे यांचे तिनसे स्त्रो कर्ज घेऊन नानाजी कुलकर्णी यास सोडून आणिलें. त्यापैकीं गोळ्यांस दोनसे स्त्रो कमज्यादा दिल्हे. बाकी शंभर रुपये अजमासें देणें राहिले आहेत. त्यास गोळ्यांनीं व्याजाचे व्याज करून शंभर रुपयांचे पंधरासे रुपये केले आहेत; आणि नानाजी कुलकर्णी याच्या पुत्रास नेऊन मौजे मारचें कुलकर्ण कर्जात लेहून घेतलें आहे. ऐशास नानाजी कुलकर्णी याचे लेकानीं आपले वाटणीचें द्यावें. माझे वाटणीचें कुलकर्ण द्यावयास अधिकार नाहीं व आपल्यावरी बहुताचें कर्ज आहे. त्यास सर्वास दामाशाईप्रों ऐवज वतनाचे विक्रयाचा येईल तो घेऊन फडशा करावा व मी जीवंत आहें तों माझे अन्नवस्राची बेगमी करून वतन घेणें तरी घ्यावें. ते न करितां वतन जबरदस्तीने घेतलें. त्याजमुळें दुसरे कर्जदार तगादे करितात व पोटास अन्नवस्र नाहीं; याजकरितां माझा वांटा कुलकर्णाचा मजकडे चालता करून कागदपत्र लेहून घेतले आहेत ते माघारे देवावे." म्हणोन. त्याजवरून हें पत्र आपल्यास लिहिलें असे. तरी सदरहू वर्तमान वाजबीचे रीतीनें मनास आणऊन विल्हीं लावावें. रा। छ ११ जिल्हेज, बहुत काय२ लिहिणे ? हे ३आसीर्वाद.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तेरावा (थोरले माधवराव)
पत्रांक ९६.
१७६८ ता. २९ एप्रिल. श्री. १६९० वैशाख शुद्ध १३
अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य राजश्री १मोरो गोपाळ यांसिः-
सेवक रघुनाथ बाजीराव नमस्कार सु।। समान सितैन मया व अलफ. अनूबाई कुळकर्णी मौजे शिन्नवलि तो घोडे प्रो जुन्नर इने हुजूर विदित केलें की आपले सासरे त्रिंबक कुळकर्णी यांनी मोरो गोपाळ याचे तीनशें रुपये कर्ज घेतले होते. त्यापैकीं दोनसे रु।। कमजादा दिल्हा-बाकी शंभर रुपये अजमासें देणे राहिले आहेत. त्यास गोळ्यांनी व्याजाचे व्याज करून शंभर रुपयांचे पंधरासे रु।। केले आहेत. आणि आपले चुलतसासरे नानाजी कुळकर्णी याच्या पुत्रास नेऊन मौजेमा।।रचे कुळकर्णाचे कर्जात खरेदीखत जबरदस्तीनें करून घेतलें. याजकारितां ताकीद जाली पाहिजे म्हणून. त्यावरून येविशीं चिरंजीव राजश्री राव यांस पत्र लिहिलें आहे, तरी तुम्हीं त्यांजकडे जाणें. चिरंजीव वाजबीचे रीतीनें मनास आणवून अज्ञा करितील त्याप्रमाणें वर्तणूक करणें. जबरदस्तीनें वतन घेतलियास कार्यास येणार नाहीं. जाणिजे छ १२ जिल्हेज बहुत काय लिहिणें ?
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तेरावा (थोरले माधवराव)
पत्रांक ९५.
१७६८ ता. २९ एप्रील श्री. १६९० वैशाख शुद्ध १३
राजश्रिया विराजीत राजमान्य राजश्री सखाराम भगवंत व गोविंद सिवराम स्वामी गोसावी यांसिः-
पो रघुनाथ बाजीराव नमस्कार विनंती उपरी येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहीत जाणें. विशेष. अनूबाई कुलकर्णी मौजे सिनवली तो घोडें पो जुनर इनें हुजुर विदित केले की, “आपले सासरे त्रिंबक कृष्ण व चुलत सासरे नानाजी कृष्ण या उभयताचें मौजे मारचें कुळकर्ण निमेनीम आहे. त्यास नानाजी कुलकर्णी मखमल अलमाचे (?) कैदेंत पडल्यावरी त्रिंबक कुलकर्णी यांणीं. मोरो गोपाळ गोळे याचे तीनशें स्त्रो कर्ज घेऊन नानाजी कुलकर्णी यास सोडून आणिलें. त्यापैकीं गोळ्यांस दोनशें स्त्रो कमजादा दिल्हे. बाकी शंभर रुपये अजमासें देणे राहिले आहेत. त्यास गोळ्यांनीं व्याजाचे व्याज करून शंभर रुपयांचे पंधराशें स्त्रो केले आहेत. आणि नानाजी कुलकर्णी याच्या पुत्रास नेऊन मौजे मारचे कुलकर्ण कर्जात लेहून घेतलें आहे. ऐशास नानाजी कुलकर्णी याच्या लेकानीं आपले वाटणीचे कुळकर्ण द्यावें. माझे वाटणीचें कुलकर्ण द्यावयास अधिकार नाहीं व आपल्यावरी बहुतांचे कर्ज आहे. त्यास सर्वास दामाशाईप्रों ऐवज वतनाचे विक्रयाचा येईल तो देऊन फडशा करावा व मी जीवंत आहे तों माझे अन्नवस्त्राची बेगमी करुन वतन घेणें तरी घ्यावें. तें न करितां जबरदस्तीनें वतन घेतलें त्याजमुळें दुसरे कर्जदार तगादे करितात व पोटास अन्नवस्त्र नाहीं. याजकरितां माझा वांटा कुलकर्णाचा मजकडे चालता करून कागदपत्र लेहून घेतले आहेत, ते माघारे देवावयाची आज्ञा करावी." म्हणोन. त्याजवरून हें पत्र तुम्हांस लिहिलें असे. तरी सदरहू वर्तमान तुम्हीं वाजवीचे रीतीनें मनास आणून विल्हें लावणें. जाणिजे. छ ११ जिल्हेज सु।। समान सितैन मया व अलफ, बहुत काय लिहिणें? हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तेरावा (थोरले माधवराव)
पत्रांक ९४.
१७६७ ता. १७ नोव्हेंबर श्री. १६८९ कार्तिक वद्य ११.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री गोविंद१ शिवराम स्वामी गो।।
पो रघुनाथ बाजीराव नमस्कार विनंति उपरी येथील कुशल जाणोन स्वकीय लिहित जाणें. विशेष मौजे २साकरें पो माणिकपुंज हा गांव राजश्री त्रिंबक सूर्याजी यांजकडे आहे, त्याची घालमेल होणार म्हणून विदित झालें. ऐशास ३इकडे जे रहातील व तुकाजी सिवराम वगैरे यांची गावखेडीं जीं असतील तीं सुदामत प्रो चालावी म्हणोन करार जाला आहे. त्यास ४कराराबमोजीब मशारनिलेचा गांव वैगरे जे इकडे आहेत त्यांचीं गांवखेडीं जी असतील तीं सुदामत५ प्रों चिरंजीव राजश्री राव यांस सांगोन चालवणे. जाणिजे छ२४ जमालादिखर सु॥समान सितैन मया व अलफ. बहुत काय लिहिणें हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तेरावा (थोरले माधवराव)
पत्रांक ९३.
१७६७ ता. २१ मार्च श्री. १६८८ फाल्गुन वद्य ६.
चिरंजीव राजश्री चिंतो३ विठ्ठल गोसावी यांस
उपरी. महिपतराव जगंनाथ याजवरी नासिकपरगणियाची ४रयत फीर्याद आली आहे. थोडी बहुत तक्रार केली आहे. थोडी म्हणावी तर फारही आहे. परंतु तूर्त तक्ररारीचा मजकूर असो. रयतच त्यास रजाबंद नाहीं. याजकरितां त्याजकडून मामलत दूर करून दुसरियास सांगावी लागती. तरी कोणी मामलेदार असिला तरी तुम्हीं योजणें, नाहीं तरी हुजरून योजिला जाईल. जाणिजे, छ २० सवाल
या छ २० सवाल.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तेरावा (थोरले माधवराव)
पत्रांक ९२ (अस्सल प्रो नकल).
१७६७ ता. १७ नोव्हेंबर. श्री. १६८९ कार्तिक वद्य ११
चिरंजीव राजश्री राव१ यांसि. रघुनाथ बाजीराव आशिर्वाद उपरी येथील कुशल जाणोन स्वकीय कुशल लिहित जावें. २विशेष. मौजे साकरे पो माणिकपुंज हा गांव राजश्री त्रिंबक सुर्याजी याजकडे आहे. तो त्याकडे चालवावा, एविशिंचा करार सालमजकुरी सन समान सितैनांत आलाच आहे. तर आपले जवळ मशारनिलेचे गांवविशीं कोण्ही घालमेल करील, तर त्याचें न ऐकावें, गांव मशानिलेकडच सुदामत चालत आल्याप्रों सुरळी चाले तें करावें. राजश्री चिंतामण हरी मौजे मजकुरास उपद्रव करतात, त्यांस ताकीद करावी. रा। छ २४ जमादिलाखर. बहुत काय लि।। हे आशिर्वाद.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तेरावा (थोरले माधवराव)
पत्रांक ९१.
१७६७ ता. १७ नोव्हेंबर. श्री. १६८९ कार्तिक वद्य ११
सेवेसी राजश्रियाविराजीत राजमान्य राजश्री
१सखाराम भगवंत स्वामी गोसावी यांसि
पो रघुनाथ बाजीराव नमस्कार. विनंति उपरी येथील कुशल जाणोन स्वकीय कुशल लिहित जाणे. विशेष. मौजे साकरे पा माणिकपुंज हा गांव २राजश्री त्रिंबक सुर्याजी याजकडे दरोबस्त आहे. तो याजकडे चालवावयाचा करार करून (?) सालमजकूरीं सन समानांत जालाच आहे. त्यास ‘गांवची घालमेल राजश्री *चिंतामण हरी करितात. गांवास उपद्रव देतात.’ ह्मणोन कळों आले. त्याजरून राव३ यांस पत्र लिहिलें आहे तरी तुह्मीं चिरंजीवास सांगोन याचे गांवची घालमेल कोण्ही करतील तर करूं न देणे. सुदामतप्रमाणें गांव याजकडे चालवित तें करणें. चिंतामण हरीस ताकीद करवणें. रा। छ २४ जमादिलाखर सा। समान सितैन मया व अलफ. बहुत काय लिहिणे हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तेरावा (थोरले माधवराव)
पत्रांक ९०.
१७६७ ता २७ मे (?) श्री. १६८९ वैशाख वद्य ३० (?)
सेवेसी१ विज्ञापना. तागाईत छ २८ जिल्हेज पावेतों मुकाम देव-रायेदुर्ग येथें आपले कृपेकरून वर्तमान यथास्तीत असे. विशेष येथील वर्तमान पेशजी लेहून दोन पत्रें कासीदासमागमें नानाच्या२ रवाना केलीं आहेत. तीं पत्रें पावोन वर्तमान कळलेंच असल. त्या अलीकडील वर्तमान तरी, प्रस्तुत श्रीमंताचा बेत आपण स्वारीसमागमें असावें ऐसें होऊन आपणास यावयाविसीं पत्रें परभारा पुण्यास गेलीं आहेत. तीं पत्रें आपणापासीं येऊन पावतील. हें वर्तमान आम्हांस कळल्यानंतर आम्हीं जाऊन राजश्री हरीपंत तात्याची भेट घेऊन त्यांस भावगर्भ पुसीला. त्यास मानिलेनीं साफच सांगितले कीं ‘तुह्मी त्यास ल्याहा. दुसरा अर्थ किमपी नाहीं. स्वारीसमागमें असोन कामकाज सांगावें, ममता करावी, हाच अर्थ आहे.’ येणेंप्रमाणें त्यांनीं सांगितलें व मारनिलेनीं आपणास पत्रही याच अन्वयेंकरून लिहिलें आहे. तें पत्र बजीनस पाठविलें आहे त्याजवरून कळेल. त्यांनीं आम्हांपाशीं सांगितलें कीं “श्रीमंतासी आम्ही पक्कें करून घेतलें आहे. त्यांनीं यावें.” आम्ही “सरंजाम नाहीं. स्वारींत येणें होतें कैसें ?” हा अर्थ त्यास पुसील्यानंतर त्यांनीं सांगितले की “नाना फडणीस यास सरंजाम लागल तो, माणसे, राहुट्या, उंटें, घोडीं, वगैरे देऊन रवानगी करावी.’ येणेंप्रमाणें पत्रें घेऊन रवाना केलें आहे." येणेंप्रमाणें त्यांनी सांगितलें. सारांश मशारनिलेच्या बोलण्यांत तरी साफ आहे; आम्ही आणखी त्यास खोलून पुसिलें कीं ‘आम्हांस येणें प्राप्तच आहे. परंतु आंत-बाहेर कांहीं असिलें तरी सांगावें.’ त्यास संशयाचा अर्थ किमपी सांगितला नाहीं. त्यास येणेंप्रमाणें येथील मजकूर आहे. ऐसियासी पत्र पावल्यानंतर पुण्यास कोणी पाठवून सरंजाम आणून निघावयाची तरतूद लौकर करून स्वारीच्या रोकें यावें. लोभ करावा हे विज्ञापना. आपलें निघणें जाहाल्यानंतर पुढें पत्र रवाना करावें. त्याजप्रों वर्तमान तात्याच्या कानावरी घालूं. वरकड अर्थ भेटीनंतर सर्व सेवेसी निवेदन होतील. लोभ करावा हे विज्ञापना. २नानाचें पत्र आपणास आलें आहे त्याचें उत्तर पाठवावें हे विज्ञापना.
श्रियाविराजित राजमान्य राजश्री तात्याप्रति काशीनाथ भट्ट वैद्य कृतानेक आशिर्वाद. येथील कुशल जाणून आपलें कुशल इछितों. येथील वर्तमान रो बाळाजीपंताचे लिहिल्यावरून विदित होईल. बहुत काय लिहिणें? हे आशिर्वाद.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तेरावा (थोरले माधवराव)
पत्रांक ८९.
१७६६ ता. ११ आगष्ट श्री. १६८८ श्रावण शुद्ध ६
अखंडित-लक्ष्मी-अलंकृत राजमान्य राजश्री चिंतो विठ्ठल गोसावी यांसिः –
सेवक माधवराव बल्लाळ प्रधान नमस्कार. उपरी. येथील कुशल जाणोन स्वकीय लिहित जाणें. विशेष. ‘इकडील फौजेच्या वगैरे खबरा मनस्वी लोक १तीर्थरूपाजवळ सांगतात त्याजवरून तीर्थरूपाचे चित्तांत संशय येतो’ म्हणोन कळलें. ऐशास२ पर्जन्यकालीं पुण्यांत फौज कशास पाहिजे ? ठेऊन नफा काय ? दाहाहजार फौजेस खर्च काय पाहिजे ? तसेंच पागांचा अर्थ तर पागा खानदेश व बीड व गंगथडी वगैरे जागा सालाबाद आहेत ते घोड्याची निगा करीत नाहीं. दुसरे, आह्मीं कृष्णा, तुंगभद्रा उतरून जावें, तेव्हां येतात. यास्तव समीप जागा योजून ठेविले आहेत. आह्मी जाऊन राहातो या दशहतीने निगा चांगली होते इतका अर्थ. येविसी तीर्थरूपास विनंतिपत्र लिहिलें आहे. तुम्ही समजाऊन संदेह दूर होय ते करणें. आम्ही अविलंबेंच तीर्थरूपासन्निध येतो. आमचा विचार तीर्थरूपाचे आज्ञेशिवाय तिळप्राय नाहीं. तीर्थरूपानीं जातें समई करार केला त्याप्रमाणें त्यांनी करावा हे त्यास उचित आहे. *जाणिजे. छ ४ रबिलावल बहुत काय लिहिणे.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तेरावा (थोरले माधवराव)
पत्रांक ८८.
१७६५ ताा ७ जून श्री. १६८७ ज्येष्ठ वद्य ४
राजश्री चिंतो विठ्ठल गोसावी यांसिः-
उपरी. ‘मोरो नरहरी यांस जामिनाविसी तगादा जाहला आहे. त्यास मशारनिलेकडे गुंता नाहीं. तरी तीर्थरूपास विनंती करून सोडून देवणें’ म्हणून तुम्हांस पूर्वी लिहिलेंच होतें. परंतु त्यास अद्यापि सोडलें नाहीं. जामिनाविसींच अटकाव असलाच तर तुम्हीं दरम्यान होऊन यास सोडणें. कदांचित् याजकडे मुद्दाच लागू जाला तरी याजपासून जाबसाल करून घेतला जाईल. हे मुलूख फोडून कोठें जाणार आहेत? तरी तीर्थरूपाचा कागद देऊन सातारियास लाऊन देणें. हें पत्र कोणास न दाखविणें. लिहिल्याप्रमाणें करून आपल्या जिम्मा करून घेणे. *जाणिजे छ १७ जिल्हेज बहुत काय लिहिणे