Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तेरावा (थोरले माधवराव)
पत्रांक ५४.
स. १६६७ ता। २६ आक्टोबर. श्री. कार्तिक शुद्ध ४ शके १६८९
राजश्री नरहर लक्ष्मणराव का।दार पा सेवगांव गोसावी यांसिः-
अखंडित-लक्ष्मी-अलंकृत-राजमान्य स्ने।। केदारजी सिंदे दंडवत. सु॥समान सितैन मया व अलफ. स्वदेशचे सरसुभ्याचें कामकाज राजश्री सदाशिव केशव याजकडे सांगितलें असें. तरी तुह्मी मा।रनिलेसी रुजू होऊन पा। मजकूरचा बंदोबस्त मा।रनिले करून देतील त्याप्रो आंमल करणें. मागील हिशेब मा।रनिलेस समजाऊन देऊन पुढील बंदोबस्त सरसुभे करून देतील त्याजप्रों वर्तणूक करून सरकारचाकरी एकनिष्टपणें करणें. जाणिजे. छ २ जमादिलाखर. बहुत काय लिहिणें ? हे १विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तेरावा (थोरले माधवराव)
पत्रांक ५३.
स. १६६७ ता। २६ आक्टोबर. श्री. कार्तिक शुद्ध ४ शके १६८९
राजश्री बळवंतराव गोपाळ का।दार पा। श्रीगोंदे वगैरे गांव गो।। यांसिः-
अखंडितलक्ष्मीआलंकृत राजमान्य स्ने।। केदारजी सिंदे दंडवत. सु।। समान सितैन मया व अलफ. स्वदेशचे सरसुभ्याचे कामकाज राजश्री सदाशिव केशव याजकडे सांगितलें असे तुम्ही मा।रनिलेसी रुजू होऊन पा। मजकुरचा बंदोबस्त मा।रनिले करून देतील त्याप्रों अंमल करणें. मागील हिशेब आहेत ते मारनिलेस समजाऊन देऊन पुढें बंदोबस्त सरसुभे करून देतील त्याजप्रों वर्तणूक करून सरकारचाकरी करणें. जाणिजे. छ० २ जमादिलाखर. बहुत काय लिहीणें! हे विनंती
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तेरावा (थोरले माधवराव)
पत्रांक ५२.
स. १७६७ ता. २६ अक्टोबर श्री. १६८९ कार्तिक शुद्ध ४
राजश्री रामकृष्ण गोविंद का।दार पा। पैठण वगैरे गोसावी यासिः-
अखंडित लक्ष्मीआलंकृत राजमान्य स्ने।। केदारजी शिंदे दंडवत. सु। समानसीतैन मया व अलफ स्वदेशचे सरसुभ्याचें कामकाज राजश्री सदाशिव केशव यास सांगितलें असे. तरी तुह्मी मा।निलेसी रुजूं होऊन पा। मजकूरचा बंदोबस्त मा।निले करून देतील त्याप्रमाणें अंमल करणें. मागील हिशेब मानिलेस समजाऊन देऊन फडशा करून पुढें बंदोबस्त मामलत संबंधें करून देतील, त्याजप्रों वर्तणूक करून सरकारचाकरी करणें. जाणिजे. छ २ जमादिलाखर बहुत काय लिहिणें ? हे विनंति.
बार
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तेरावा (थोरले माधवराव)
पत्रांक ५१.
स. १७६७ ता. २६ अक्टोबर श्री. १६८९ कार्तिक शुद्ध ४
राजश्री का।दार पा। शिंदखेड गोसावी यांसिः-
अखंडित-लक्ष्मी-अलंकृत-राजमान्य स्ने।। केदारजी शिंदे दंडवत. सुभा समास सितैन मया व अलफ. स्वदेशचे सरसुभ्याचे कामकाज राजश्री सदाशिव केशव यांजकडे सांगितले असे तरी तुह्मीं मारनिलेसी रुजू होऊन पा।मजकूरचा बंदोबस्त मा।रनिले करून देतील त्याप्रों अमल करणें. मागील हिशेब मारनिलेस समजावून देऊन फडशा करून देतील मामलतेसंमधे, त्याजप्रों वर्तणूक करून चाकरी एकनिष्ठपणे करणें. जाणिजे,छ१ जा।खर बहुत काय लिहिणें हे विनंति.
बार
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तेरावा (थोरले माधवराव)
पत्रांक ५०.
स. १७६७ ता. २६ अक्टोबर श्री. १६८९ कार्तिक शुद्ध ४
राजश्री नारो हरी का।दार पा।र येदलाबाद गोसावी यांसिः -
अखंडितलक्ष्मीअलंकृत राज्यमान्य स्ने।। केदारजी सिंदें दंडवत. सु।। समान सितैन मया व अलफ. स्वदेशचे सरसुभ्याचें कामकाज राजेश्री सदाशिव केशव याजकडे सांगितले असे तरी तुम्हीं मा।रनिलेसी रुजू होऊन पा।मजकूरचे बंदोबस्त करून देतील, त्याप्रों अंमल करणे. मागील हिशेब मा।रनिलेस समजावून देऊन पुढें बंदोबस्त करून देतील त्याजप्रों वर्तणूक करून सरकारचाकरी एकनिष्टपणें करणें. जाणिजे. छ २ जमादिलोखर. बहुत काय लिहीणें ? हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तेरावा (थोरले माधवराव)
पत्रांक ४९.
१७६७ ता. २६ अक्टोबर. श्री. १६८९ कार्तिक शुद्ध ४
राजश्री नारो बल्लाळ व बाजी विश्वासराव का।।दार महालानिहाय सरदेशमुखी गो यांसिः-
अखंडितलक्ष्मी-अलंकृत राजमान्य स्ने।। केदारजी शिंदे दंडवत सु॥ समान सितैन मया व अलफ. स्वदेशचा सरसुभा सालमजकुरापासोन राजश्री सदाशिव केशव यास सांगितला आहे. तरी तुह्मीं मा।रनिलेसी रुजू राहून मागील हिशोब मा।रनिलेस समजावून देऊन पुढें बंदोबस्त करून देतील त्याप्रों वर्तणूक करून सरकार चाकरी एनिष्टपणें करणें. जाणिजे छ २ जमादिलाखर बहुत काय लिहिणे ? हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तेरावा (थोरले माधवराव)
पत्रांक ४८.
१७६७ ता. २४ आक्टोबर श्री. १६८९ कार्तिकशुद्ध २
राजश्री चिंतोपंत तात्या गोसावी यांसिः-
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नो माहादजी सिंदे दंडवत. विनंती उपरी. येथील कुशल जाणोन स्वकीये कुशल लिहित जावें. श्रीमंत१ इकडे आले त्यासमागमें राजश्री २आबाजीपंतहि आले. भेटी जाहल्या. पंत मशारनिलेनीं या प्रसंगी बरीच मेहनत करून श्रीमंताची मर्जी ठिकाणी आणिली. श्रीमंतासह आम्हीं कुच करून नर्मदातीरास आलों. पुढें येथील भाव कितेक राजश्री बापूस३ समजावें याअर्थे राजश्री निळो गोपाळ पाठविले आहेत, इकडील सर्व अर्थ सांगितल्यावरून कळेल. राजश्री आबाजीपंत यांनी कितेक सांगितले तें लिहिलें. ज्या गोष्टीनें आमचें बोलणें श्रीमंताजवळ ठीक राहून बोलल्या गोष्टीप्रमाणें घडे तें तुम्हीं राजश्री बापूस सांगून करावें. इकडील संशय कोणेविसीं चित्तांत न आणावा. रवाना छ ७ जावल++बहुत काय लिहिणे ? लोभ कीजे हे विनंती.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तेरावा (थोरले माधवराव)
पत्रांक ४७.
स. १७६७ ता. १४ आक्टोबर. श्री. १६८९ अश्विन वद्य ७.
श्रीमंत राजश्री पंतप्रधान साहेबाचे सेवेशी
विनंती सेवक माहादजी शिंदे दंडवत विज्ञापना तागायत छ २० जमादिलावल पावेतों साहेबाचे कृपे-करून सेवकाचें वर्तमान यथास्थित असे. विशेष छ ५ जमादिलावलचें आज्ञापत्र सादर जाहलें त्या पत्रांत आज्ञा कीं ‘तुह्मांकडील निष्ठेचा मजकूर राजश्री चिंतो विठ्ठल यांनी निवेदन केला. त्याजवरून तुह्मीं खातरजमा राखून हुजूर येणें, सरदारीचा बंदोबस्त करून पुढें हिंदुस्तानांत उपयोग पडिला पाहिजे. याजकरितां जरूर पत्रदर्शनीं स्वार होऊन यावें येविशीं चिंतो विठ्ठल यांनीं लिहिलें आहे’ म्हणोन पत्रांत आज्ञा त्यांस हुजूरजी आज्ञा-पत्र आल्यानंतर यावयासी दिक्कत नाहीं. आज्ञेप्रों दक्षणेस प्रस्थान केलें. एथील बंदोबस्त करून मजल दरमजल सेवेशीं एतच आहों. पुढें खावंद आज्ञा करतील त्याजप्रों वर्तणूक करूं. आह्मांविशीं राजश्री चिंतो विठ्ठल पेशजी साहेबाशीं बोलले आहेत व हालींही बोलतील. त्यास तें बोलणें आमचे आहे. दुसरा प्रकार नाहीं. वरकड कितेक बोलत असतील ते ध्यानांत न आणावें, मशारनिले बोलतील त्याजप्रों जो बंदोबस्त करणे तो करावा. आम्हींही मजल दरमजल येवून पोहचतच आहों. खावंदाची भेट होऊन दर्शनाचा लाभ घडेल तो सुदिन असे. उत्तरेस जावयाकरितां विजयादशमीस डेरे दिल्हे होते; परंतु आज्ञापत्र हुजूर यावयाशीं आलें, याजकरितां दक्षणेस डेरे दिल्हें. मजल दरमजल लौकरच *येतो. एथील प्रकार स्वामीचे लक्षा विरहित नाहीं. एथील प्रकार तो लोकांचें देणें बहुत व सेरसाल घेऊन परिना(म) लागत नाहीं. पांच चार लाख रुपये घेऊन निर्गम करून सेवेसी सत्वर येतों. दुसरे, स्वामीनीं आज्ञापत्रांत कितेक बंदोबस्त करावयाची आज्ञा केली तर सेवेशी येतों. सेवेशीं श्रुत होय हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तेरावा (थोरले माधवराव)
पत्रांक ४६. *
इ. स. १७६७ आक्टोबर ८. श्री. अश्विन वद्य १ शके १६८९
राजश्री चिंतोपंत तात्या गोसावी यांसिः-
अखंडित-लक्षुमी-अलंकृत-राजमान्य श्रे॥ माहादजी सिंदे दंडवत विनंति उपरि. पत्रें आपनाकडून बाळाजीपंत यास आलीं तें वर्तमान त्यांनी सांगितलें त्यावरून कळलें. ‘रा। गंगोबातात्यांनीं सर्व सरदारीचें निमित्य आपनाकडे आनून श्रीमंत रा। रावसाहेबास समजाविलें. तो आर्थ त्याच्या ध्यानांत होता. परंतु आपल्या त्याच्या भेटीनंतर चित्तांतील किंतु दूर जाला. परंतु ते वरचेवर समजावितात. एनकरून संषय जात नाही. आह्माविसी श्रीमंताचे व आपलें बोलने होऊन निच्चय आह्माकडी (ल) लक्षाचा जाहला. परंतु दुसरा आर्थ समजावितात याजमुळें अंतर पडतं. याजकरितां आत्मसंतोषानं, (१) दूरदेशीनं, वर्तन् (क) करुन आप्रमानिकत न ये तें १करावें ह्मनून आपन बाळाजीपंताचे पत्रीं लि॥ त्याजवरून त्यांनीं सर्व आर्थ सांगितला. ऐसास आमचें बोलनें एकच आहे. दु(स)रा अर्थ नाहीं. जाते समई आपलें आमचें भाषन जालें त्याच निश्चयावर आह्मीं आहों. दरमियान कितेक गोष्टी निर्मान जाहल्या होत्या त्यांची दखल खातरजमा शपतपूर्वक बाळाजीपंत याजपासीं केली. त्यांनी सविस्तर आर्थ आपनास लि॥ आहे. मुख्य आमचा निच्चय हाच कीं त्याजउपरि जें करनें तें आपल्या लक्षानें करावें. ऐसा मजकूर आहे. त्यांनी दाहा लक्ष नजर द्यावी आनी दाहादस्त (,बंदोबस्त ?) कराव. त्या(स?) सरदारींतील आर्थ ऐवज कसी आहे हे सर्व तुह्मास उमजलाच आहे. त्यांसी (हीं ?) मधें लोकांच्या देन्यापासून मुक्त होण्याचें संकट, तेथें दुसरा प्रकार कोठून ? याजउपर एथील निर्गम करून स्वारीस जावयाचे तरतूद आहे. घडे तें खरें. कां कीं सेर आणाल्या (?) ऐवज घेऊन दिला; परंतु निकाल पडत नाहीं त्यामुळें मुल(ख)गिरी व देसची नजर देणें हे घडनें कठिन आहे. यांत पुढें म(ज)कूर कोनता करून सरदारी राखे तोच पडला आहे. पुढें काय तें लि॥ श्रीमंताच्या चित्तांतील संषय जाय तें करनें, याजकरितां पूर्वी लि॥ आहे. रा। बाळाजीपंत आमचे लक्षानंच वर्तनू(क) करितात. बहुत काय लि॥ हे विनंति
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तेरावा (थोरले माधवराव)
पत्रांक ४५.
इ. स. १७६७ आक्टोबर श्री. आश्विन वद्य प्रारंभ शके १६८९
राजश्री चिंतोपंत तात्या गोसावी यांसी
अखंडित-लक्ष्मी-अलंकृत राजमान्य स्नो माहादजी शिंदे दंडवत. विनंती उपरी. येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहित जावें. विशेष आपण पत्रें पाठविलीं तीं पावलीं व राजश्री बाळाजीपंत यांस वर्तमान लिहिलें तें त्यांनी निवेदन केलें. सारांश, आपण दोन पत्रें व एक श्रीमंतास व एक पत्र बापूंस आणविलें त्याजप्रमाणें पत्रें पाठविलीं आहेत. तीं पत्रें त्यांस प्रविष्ट करून जें बोलणें तें आपण बोलावें. मुख्य आमचें आपलें बोलणें जाहलें, त्यांत दुसरा अर्थ नाहीं. आपण लिहिल्याप्रों यावयाची तरतूद करून दक्षणेस प्रस्थान केलें आहे; परंतु लोकाच्या देण्याचा पेंच भारी, तीन वर्षांचें देणें, यांजकरितां गवगवा बहुत जाहाला आहे. येथील निर्गम करून लौकरच येतों. आपण तेथील अर्थ पक्का करून उत्तर लौकर पाठवावें. वरकड वर्तमान बाळाजीपंत लिहितील त्याजवरून कळेल. *तुमचें व आमचें बोलनें जालें होते त्या बोलन्याचा अर्थ व येथील अर्थ कितेक प्रकारचा अर्थ सर्व लिहिला, बाळाजीपंत याजला सांगितला. ( स ? )विस्तर कळेल. मधी कितीक लिहितील व सांगतील तो चित्तांत न आनावा. आमचें व तुमचें बोलनें जें जालें तेंच आहे तेंच प्रमान आहे. तरतुदी (म्ही ?) सरकारचा (सरदारीचा?) बंदोबस्त करून घ्यावा दुसरा अर्थ नसे. ज्यानें आमची स्थिति राही ते करावें. बहुत काय लिहिणे लोभ असो दीजे हे विनंती.