पत्रांक ९१.
१७६७ ता. १७ नोव्हेंबर. श्री. १६८९ कार्तिक वद्य ११
सेवेसी राजश्रियाविराजीत राजमान्य राजश्री
१सखाराम भगवंत स्वामी गोसावी यांसि
पो रघुनाथ बाजीराव नमस्कार. विनंति उपरी येथील कुशल जाणोन स्वकीय कुशल लिहित जाणे. विशेष. मौजे साकरे पा माणिकपुंज हा गांव २राजश्री त्रिंबक सुर्याजी याजकडे दरोबस्त आहे. तो याजकडे चालवावयाचा करार करून (?) सालमजकूरीं सन समानांत जालाच आहे. त्यास ‘गांवची घालमेल राजश्री *चिंतामण हरी करितात. गांवास उपद्रव देतात.’ ह्मणोन कळों आले. त्याजरून राव३ यांस पत्र लिहिलें आहे तरी तुह्मीं चिरंजीवास सांगोन याचे गांवची घालमेल कोण्ही करतील तर करूं न देणे. सुदामतप्रमाणें गांव याजकडे चालवित तें करणें. चिंतामण हरीस ताकीद करवणें. रा। छ २४ जमादिलाखर सा। समान सितैन मया व अलफ. बहुत काय लिहिणे हे विनंति.