पत्रांक ८८.
१७६५ ताा ७ जून श्री. १६८७ ज्येष्ठ वद्य ४
राजश्री चिंतो विठ्ठल गोसावी यांसिः-
उपरी. ‘मोरो नरहरी यांस जामिनाविसी तगादा जाहला आहे. त्यास मशारनिलेकडे गुंता नाहीं. तरी तीर्थरूपास विनंती करून सोडून देवणें’ म्हणून तुम्हांस पूर्वी लिहिलेंच होतें. परंतु त्यास अद्यापि सोडलें नाहीं. जामिनाविसींच अटकाव असलाच तर तुम्हीं दरम्यान होऊन यास सोडणें. कदांचित् याजकडे मुद्दाच लागू जाला तरी याजपासून जाबसाल करून घेतला जाईल. हे मुलूख फोडून कोठें जाणार आहेत? तरी तीर्थरूपाचा कागद देऊन सातारियास लाऊन देणें. हें पत्र कोणास न दाखविणें. लिहिल्याप्रमाणें करून आपल्या जिम्मा करून घेणे. *जाणिजे छ १७ जिल्हेज बहुत काय लिहिणे