Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तेरावा (थोरले माधवराव)
पत्रांक १५७.
इ. स. १७५३ ता. २८ ऑक्टोबर श्री. कार्तिक शुद्ध २ शके १६७५.
नक्कल.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री नारे शंकर गोसावी यांसिः-
सेवक बाळाजी बाजीराव प्रधान, नमस्कार उपरी येथील कुशल जाणोन स्वकीय लिहीत जाणें. विशेष. मौजे सातपूर प्रा। नाशिक येथील कमाविशी सालमजकुरी तुम्हांस सांगतली असे. तरी मौजेमजकुरची कमाविष इमानें इतबारें करित जाणें मौजेमजकूरचा तनखा रुपये ९०० नवशें याशीं हाल वसूल रुपये एकविशें यासी बितपशील.
१००० जहागीर सरदेशमुखी, चौथाई, मोकाशी व बाबती ऐवज निका तपशील.
७०० जागीरदार
३०० मोकाशी.
---------
१०००
११०० तुम्हास संवसाराचे बेगमीस ज्यास्ती तैनात घ्यावे घास-दाणा व फर्मास व वाटबेगार तुम्हीं घ्यावी.
१३१। सरदेशमुखी वसूल रुपये एकविसें दरसद्दे रुपये १२॥ रुपये दोनशें साडे बासष्ट पैकीं तुम्हांस माफ केले. निम्मे मोकदमीबदल रुपये १३१॥ बाकी निमे सरकारांत घ्यावे.
------------
२२३१।
येणें-प्रमाणें २२३१। रुपयाची नेमणूक करून दिल्ही असे. सदर्हूपेक्षां धरण बांधणार; धरण बांधून गांवची लावणी करून ज्यास्ती आकार होईल तो धरणास जो पैका लागेल तो फिटे तों पावेतों जो ज्यास्ती पैका होईल तो धरणाकडे द्यावा. धरणाचा पैका फिटल्यावर ज्यास्ती आकाराचा ऐवज निम्मे सरकारांत द्यावा. निम्मे तुम्हांस बक्षीस द्यावा ऐसा करार केला असे. जाणिजे. छ १ माहे मोहरम सु।। अर्या खमसैन मया अलफ बहुत काय लिहिणें.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तेरावा (थोरले माधवराव)
(कृष्णाजीचें लिखित २७) पत्रांक १५६.
इ. स. १७३० ता. १ नोव्हेंबर, श्री. १६५२ कार्तिक शुद्ध २.
राजश्री भगवंत राऊ सोमवंशी हवादार व कारकून किल्ले सिंहगड गोसावी यासिः-
॥ अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य-स्ने।। नारो शंकर सचीव आशिर्वाद व नमस्कार. सु।। ईहिदे सला-सैन मया अलफ. रा। कोंडाजी पवार याची असामी पेशजी पंचहजारियांत घालून किल्लेमारीं नामजाद ठेविले होते. त्याप्रमाणें सालमारी हुजरून करार करून हें पत्र तुम्हांस सादर केलें आहे. त्यास यांणीं आपले तर्फेनें मालजी दिघा व कृष्णाजी मान्या किल्ले मारीं चाकरी करावयास ठेविले आहेत, तरी तुम्हीं यांजपासून किल्लाचाकरी घेत जाणें. यांच्या बेगमीस मौजे मुडखेल ताा कर्यात मावळ हा गांव किलियाचे निसबतीनें मकासा देविला असे. तरी मौजे माा रचा मुकास-बाबेचा ऐवज यांजकडे वसूल देवणें. रा। मानाजी चाकणे यांस उडरी अगर मुडखेल या दोहीं गांवापैकीं एक गांव त्याचे खातरेस येईल तो देणें म्हणून पेशजी किलियास पत्र सादर केलें आहे. त्यावरी नव जाणें. त्यांजकडे उदरी करार केली असे. देणें. मौजे मुडखेल याजकडे चालवणें. मौजे मा।रच्या ऐवजीं किलियाकडे वसूल जाहला असेल तो वजा करून उरला ऐवज मुकासबाबेचा याकडे देवणें, यांचें चालवणें अगत्य जाणून यांची पेशजीप्रमाणें किल्लेची असामी करार करून यांचे तर्फेनें दांग लोक किल्लाचाकरीस ठेविले आणि मौजेमार यांजकडे मुकासा दिल्हा आहे. तरी लिहिल्याप्रमाणें चालवणें. छ १ जमादिलावल पाा हुजुर.
बार सुरुसुद बार.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तेरावा (थोरले माधवराव)
पत्रांक १५५.
इ. स. १७६७ आगष्ट सप्तंबर. श्री. १६८९ भाद्रपद.
श्रीमंत राजश्री चिंतोपंत तात्यासाहेब स्वामींचे सेवसी:-
आज्ञाधारक बावाजी मल्हार कुळकर्णी मौजे साकेगांव पा। सेवगांव सा। नमस्कार. विज्ञापना. मौजे मजकूरचे हिशेब कितेब मूळ रयतेचा व आपला लढा पडला, हें वर्तमान हुजूर विदित जालें, त्याजवरून स्वामींनीं रो। राघोपंत बाबा यांस मौजे मा।स चवकसीस पाठविलें. पंत मा।रनिले यांनीं गांवचे वर्तमान मनास आणून आज्ञा केली कीं, सन हजार ११६८ ता। सन हजार ११७५ चा हिशेब १कुलारघवार कच्चा जमाखर्च समजाविल्याखेरीज रयतेची समजूत पडत नाहीं. त्याजवरून हा मुचलका लेहून दिल्हा असे. सदरहू लि।।प्रों अडुसष्ट ता। पंचाहत्तरपावेतों कच्चा हिशेब आपल्या सालाचा कुलारघवार समजून देऊं. हिसेबामुळें आपले अंगीं स्त्रो लागतील त्याची निशा करूं. सरकारची गुनेगारी देऊं. रो नरहरराव लक्षुमण याचे कर्जाचा हिशेबाचा १अडताळा पडला आहे, तो हिशेब देऊं. छ १५ रोज ता। छ २२ माहे जलादिलावल पावेतों फडशा करूं. हे मुचलका लि।। सही. सन हजार ११७७ सु।। सन समान सितैन मया अलफ.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तेरावा (थोरले माधवराव)
पत्रांक १५४.
इ. स. १७६६ ता. २८ आगष्ट. श्री. १६८८ श्रावण वद्य १.
राजश्री माहादाजी अनंत गोसावी यासिः-
सु। सबा सीतैन मया व अलफ तुम्हाकडे कर्जाचा ऐवज करार केला त्यांपैकीं बदल देणें दि।। तोफखाना आकार पो स्त्रो
२०००० दि।। तोफखाना थोरला
१०००० नाईकजी खुद
----------
३००००
तो (तपशील).
८००० आषाढ शुद्ध एकादशी आठ हजार देविले नाईकजी खुद
२२००० श्रावण शुद्ध दशमी बेवीस हजार देविले.
------------
३००००
येणेप्रों तीस हजार रुपये देविले असेत. तरी पावते करून पावलियाचे कब ज घेणें. सदरहू मित्याबरहुकूम तुह्मीं ऐवज जिकडील तिकडे पावता केला, त्याप्रों व्याजास मित्या लागतील, जाणिजे, छ २१ रबिलावल. आज्ञाप्रमाण.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तेरावा (थोरले माधवराव)
पत्रांक १५३.
इ. स. १७६६ ता. ६ मार्च. श्री. १६८७ फाल्गुन वा १०
राजश्री चिंतो विठ्ठल ६इ। प्रभाकर जोशी राईरीकर गोत्र अत्री सूत्र अश्वलायन सरकानगो सुभे खानदेश गोसावी यांसिः-- अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य स्नो। राजे भारतशाहा हटियाराय संवस्थान कालिभांत मकडाई, सरकार हांडे सुभे मजकूर रामराम. विनंति. उपरि सन ११७५ कारणें इनामपत्र लिहून दिन्हें ऐसे जेः-गंभीरराव कानगो पूर्वी सुभे मजकूरचे होते. त्यांसीं आमचे वडिलांनीं सरकानगोइचें वृत्तीमुळें दाने गांव तीन हजारचे तनखाहचे इनाम करून दिल्हे. उपरांतिक कदीम गंभीरराव यांची अवलाद बुडाली. त्यांनीं दत्तपुत्र घेऊन वृत्तीची स्थापना केली. परंतु कोण्ही जिमीदारीचे कसबांत व कामकाजांत १फहमिदा न जाहला. सबब सदरहू गांव इनाम दिल्हे होते, त्या गांवांचा उपभोग त्यांजकडेस चालिला नाहीं. हालीं तुम्हीं सुभे मजकूरचे कानगोईचे निम्मे वतन खुषखारिदी खंडो गंभीरराव कानगो यापासून केलें, त्याचे खरीदखत मोंगलाई व स्वराज्यांतील सनदा भोगवटियास करून घेतल्यात. त्याप्रमाणें तुमचा कानगोईचा भोगवटा चालूं जाला. संस्थानपैकीं आमचे वडिलांनी पूर्वी कानगो यासी गांव इनाम दिल्हे होते, ते ‘आमचे आम्हांकडेस यावे’ म्हणून तुम्हीं विदित केलें. त्याजवरून मनास आणितां निमे वृत्ति तुम्हीं घेतली तेव्हां तुम्हांकडेस निम्मे तनख्याचे गांव द्यावा, बाजवी रीतीने जाला. परंतु खंडो गंभीरराव कानगो निमे वतनाचे हालीं विद्यमान आहेत. त्यांनीं आम्हांकडील गांव तीन हजार रुपये तनख्याचे तुम्हांस देऊन संस्थान मजकूरचे इनाम गांवासी आम्हांस समध नाहीं ऐसे पत्र तुम्हांस करून दिल्हे. तें पत्र मनास आणून हालीं आम्हीं पुस्त दरपुस्त जमीदारीच करीत आलों व तुम्हीं सरकानगोई वतन खरीदी करून जमीदारच जालेत. सबब आमचे वडिलांनी गांव इनाम दिल्हा त्याचा लोभ आम्ही, त्याचे वंशीचे, आम्हांपासून न व्हावा. आम्हांस व आमचे राज्यास अनिष्ट जाणोन तुम्हांस सदरहू तीन हजार रुपये तनख्याचे गांव बितपशीलः-
२००० मौजे आबसेल गांव एक तनख्या एकूण दोन हजार.
१००० मौजे कांचनगांव गांव एक तनख्या एकूण एक हजार
----------
३०००
सदरहू गांव दोन तपें जून व ज्यां यांची (?) तनख्या एकूण तीन हजार तुम्हांस इनाम कुलबाब व कुलकानू खेरीज हकदार करून देऊन हें इनामपत्र करून दिल्हें असे. तरी तुम्हीं व तुमचे पुत्रपौत्रादिवंशपरंपरेनें सदरहू गांवाचा उपभोग घेत जाणें, ये विषयीं तुम्हीं अगर आमचे वंशीचा कोण्हीं खलेल करील तो ईश्वराचा अन्यायी. वछ देवीची शपत असे. मि।। १० वद चैत्र सं १८२२ ता। २४ रमजान सन ११७५
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तेरावा (थोरले माधवराव)
किरकोळ.
पत्रांक १५२.
इ. स. १७६५ ता. ३१ आक्टोबर श्री. १६८७ कार्तिक वद्य ३ (?)
तीर्थस्वरूप राजश्री १तात्या वडिलांचे सैवेसीः—
आपत्यासमान २रघुपतरायानें कृतानेक सां नमस्कार विनंति. येथील कुशल ता। छ १५ जमादिलावलपर्यंत वर्तमान येथास्थीत असे. विशेष. पा। अमळनेर येथे राजश्री नारो कृष्ण यांणी उपद्रव केला, हें वर्तमान पेशजीं सविस्तर लिहीलें आहे, त्याजवरून अवगत जालें असेल. प्रस्तुत राजश्री आपाजी त्रिंबक याचें पत्र पा। मजकुरींहून आलें. त्यांत वर्तमान कीं राजश्री रामाजी आणाजी यांनी परगण्यांत येऊन मुकाम केला. गांवगना स्वार पाठऊन बखेडा आरंभिला आहे. कारकून व हुजरे यांणी ३आट करून अनेक प्रकारचे उपद्रव आरंभिले आहेत. ऐसियासि छावणीचे दिवस. या समयांत हा प्रसंग जाला ! तेणेंकरून नुकसानीची गोष्ट आहे. पंचवीस हजार स्त्रो ध्यावे येविषयीं सरकारची आज्ञा नारो कृष्ण यास आहे. त्यावरून त्यांणीं बहुत च उपद्रव केला. त्यास येविषईचा दरबारीं आपण बंदोबस्त करून रो नारो कृष्ण याचें नांवें ४मनाईपत्र सत्वर पाठवावे. पत्रास दिवसगत लागली, तर माहालीं स्थीत राहणार नाहीं. पंचवीस हजार स्त्रो घ्यावे, हा दुराग्रह राजश्री ५नानाचा असेल तर पुण्यांत सदरहू ऐवजाची निशा द्यावी आणि मनाई लवकर पाठवावी. वरकड कित्येक आर्थ राजश्री राजाराम विठल यांशीं भाषणांत आला आहे. आपणांस विनंती करतील. त्यावरून ध्यानास येईल. राजश्री जानराव कदम व भवानीसिंग फौजसुद्धा आले. त्यांचें देणें एक लक्ष सात हजार स्त्रो निघाले, त्याचे तडजोडींत असों. माहालची अवस्था परस्पंरे आपणांस विदित आहे. देण्याचे पेंच मातबर. सर्व मा।र राजारामपंत विदित करितील. बहुत काय लिहीणें लोभ करावा हे विनंती.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तेरावा (थोरले माधवराव)
पत्रांक १५१.
→ रायरीकरांची वंशावळ पाहण्यासाठी इथे क्लीक करा
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तेरावा (थोरले माधवराव)
पत्रांक १५०.
१७६१ ता. २ फेब्रुवारी श्री. नकल १६८२ पौष वद्य १३.
राजश्री कृष्णराव बापूजी व भिवराव बापूजी उपनाम रामडोहकर, गोत्र विश्वामित्र सूत्र आश्वलायन, कुलकरणी कसबे मजकूर गोसावी यांसिः-- सेवक बाळाजी बाजीराऊ प्रधान नमस्कार सुहुर सन ईहिदे सीतेन मया -अलफ. तुम्हीं हुजूर के।। पुणें येथील मुक्कामीं विनंति केली कीं, आपणांस मोगलाईतून अलमगीर सानी बादषाहा याणीं कसबे रामडोह पो गांडापूर सरकार दौलताबाद सुभे खुजस्ते-बुनियाद हा गाँव दरोबस्त इनाम करार देऊन बादषाही फरमान करून दिल्दा. त्याप्रमाणें आपणांकडे भोगवटा चालत आला व सरकारतर्फेने सरदेशमुखी व बाबतीहि आपणांकडे चालतात. त्यांस आपण स्वामीच्या राज्यांतील पुरातन एकनिष्ठ सेवक. यास्तव स्वामींनी कृपाळू होऊन कसबे मजकूरचा मोगलाई अम्मल व सरकारांत आला, याजकरितां पेशजीचा बादषाही फर्मान आपणाजवळ आहे तो पाहून मोगलाई अम्मल व सरदेशमुखी व बाबती पेशजी आपणांकडे चालत आहे त्याप्रमाणें दरोबस्त इनाम करार करून देऊन भोगवटियासि सनद करून दिली पाहिजे १म्हणून. त्याजवरून मनास आणतां तुम्हीं राज्यांतील पुरातन एकनिष्ठ सेवक; तुमचें चालवणें आवश्यक जाणून तुम्हांवर कृपाळू होऊन तुम्ही बादशाही फर्मान आणून दाखविला तो पाहून को मजकूर हा गांव हक्कदार व इनामदार व मुकासी खेरीज करून बाकी मोगलाई अम्मल व सरदेशमुखी व बाबती पेशजी चालत आहेत त्याप्रमाणें देखील जलतरुपाषाणनिधिनिक्षेपादि दरोबस्त इनाम करार करून देऊन हे सनद करून दिल्ही असे. तरी सदरहूप्रमाणें कसबे मजकूरचा दरोबस्त अम्मल तुम्हीं आपले दुमाला करून घेऊन तुम्हीं व तुमचे पुत्रपौत्रादि वंशपरंपरेनें इनाम अनुभवून सुखरूप राहणें. जाणिजे छ २५ जमादिलाखर, आज्ञाप्रमाण. मोर्तब.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तेरावा (थोरले माधवराव)
पत्रांक १४९.
१७६१ ता. २ फेब्रुवारी श्री. नकल १६८२ पौष वद्य १३
राजश्री देशाधिकारी व लेखकं वर्तमान भावी पा। गांडापूर गोसावी यांसिः-- अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य सेवक बाळाजी बाजीराव प्रधान नमस्कार व आसीर्वाद. सु।। इहीदे सीतैन मया व अलफ. कृष्णराव बापूजी व भिवराव बापूजी उपनाम रामडोहकर, गोत्र विश्वामित्र सूत्र आश्वलायन, कुलकर्णी कसबे मजकूर, यांनीं हुजूर कसबे पुणें येथील मुकामीं विनंति केली कीं, आपणास मोंगलाईतून बादशाहा अलमगीर सानी यांणी कसबे मजकूर हा गांव दरोबस्त इनाम करार करून देऊन फर्मान करून दिल्हा. त्याप्रमाणें आपणाकडे भोगवटा चालत आला व सरकार तर्फेने सरदेशमुखी व बाबती हि पेशजी इनाम दिल्याप्रमाणें चालतात. त्यास आपण स्वामींच्या राज्यांतील पुरातन येकनिष्ठ सेवक; यास्तव स्वामींनीं कृपाळू होऊन कसबे मजकूरचा मोगलाई अमल सरकारांत आला, याजरितां बादशाई फर्मान आपणाजवळ आहे तो पाहून मोगलाई अमल व सरदेशमुखी व बापती पेशजी आपणाकडे चालत आहे त्याप्रमाणें दरोबस्त इनामकरार करून देऊन भोगवटियास सनद करून दिल्ही पाहिजे १म्हणून. त्याजवरून मनास आणितां हे राज्यांतील पुरातन येकनिष्ठ सेवक, याचे चालवणें अवशक जाणून याजवर कृपाळू होऊन बादशाही फर्मान आणून दाखविला, तो पाहून कसबे मजकूर हा गांव हकदार व ईनामदार मोकासी खेरीज करून बाकी मोगलाई अमल व सरदेशमुखी व बाबती पेशजी चालत आहे त्याप्रमाणें देखील जल-तरु-पाशाण-निधीनिक्षेपादि दरोबस्त इनाम करार करून देऊन हें पत्र सादर केले असे. तरी सदरहूप्रमाणें कसबे मजकूरचा दरोबस्त अमल मशारनिलेच्या दुमाला करून यांस व यांचे पुत्रपौत्रादि वंशपरंपरेने इनाम चालवणें. प्रतिवर्षी नवीन पत्राचा आक्षेप न करणें. या पत्राची प्रत लेहून घेऊन असल पत्र मारनिलेजवळ भोगवटियास परतोन देणें. जाणिजे छ २५ जमादिलाखर. आज्ञाप्रमाण. मोर्तब असें.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तेरावा (थोरले माधवराव)
पत्रांक १४८.
१६४९ कार्तिक शुद्ध १५. श्री. नकल
स्वस्तिश्री शिका राजाचा.
स्वस्तिश्री राज्याभिषेक शके ५४ प्लवंग नाम संवत्सरे कार्तिक शुद्ध पौर्णिमा सौम्यवासरे, क्षत्रियकुलावतंस श्रीराजा शंभु छत्रपती स्वामी यांनीं वेदशास्त्रसंपन्न राजश्री त्रिंबकभट बिन सखंभट उपनाम थेटे गोत्र अत्री स्तव्य कडुस, यांसी दिल्हे इनामपत्र ऐसीजेः-
तुम्हीं अहमदनगरचे मुक्कामी स्वामीसन्निध विदित केलें कीं, “आपण पुरातन राजाश्रित, कुटुंबवत्सल, योगक्षेमाची अनकूलता नाही. महाराज धर्मपरायण आहेत. कांहीं स्वास्ता करून दिधलियानें महाराजास कल्याण चिंतून राहूं." म्हणोन. त्यावरून तुम्हीं बहुत थोर, पुरातन, आश्रित, यास्तव स्वामींनीं तुम्हांस मौजे सावुरडी तो वाडें प्रति जुन्नर हा गांव देहु येक इनाम कुलबाब कुलकानु हाली पट्टी पेस्तरपट्टी जलतरु पाषाण निधि निक्षेपसहित खेरीज हकदार व इनामदार करून इनाम सर्वमान्य करून दिल्हा असे. अलाहिदा सनदा सादर आहेत. तरी मौजे मा।री पूर्वमर्यादेप्रों आपले स्वाधीन करून घेणें आणि इनाम तुम्हीं व तुमचे पुत्रपौत्रादि वंशपरंपरेने अनभऊन सुखरूप राहणे. जाणिजे. निदेश समक्ष मोर्तब, मर्यादेयं विराजते.
रुजु सुरनवीस.
तेरीख १४
रबिलावल सुहुर चन समान बार.
सुरु सुद बार.