पत्रांक ९२ (अस्सल प्रो नकल).
१७६७ ता. १७ नोव्हेंबर. श्री. १६८९ कार्तिक वद्य ११
चिरंजीव राजश्री राव१ यांसि. रघुनाथ बाजीराव आशिर्वाद उपरी येथील कुशल जाणोन स्वकीय कुशल लिहित जावें. २विशेष. मौजे साकरे पो माणिकपुंज हा गांव राजश्री त्रिंबक सुर्याजी याजकडे आहे. तो त्याकडे चालवावा, एविशिंचा करार सालमजकुरी सन समान सितैनांत आलाच आहे. तर आपले जवळ मशारनिलेचे गांवविशीं कोण्ही घालमेल करील, तर त्याचें न ऐकावें, गांव मशानिलेकडच सुदामत चालत आल्याप्रों सुरळी चाले तें करावें. राजश्री चिंतामण हरी मौजे मजकुरास उपद्रव करतात, त्यांस ताकीद करावी. रा। छ २४ जमादिलाखर. बहुत काय लि।। हे आशिर्वाद.