Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तेरावा (थोरले माधवराव)
पत्रांक ८७.
स. १७६५ ता. ७ जून श्री. १७८७ ज्येष्ठ वद्य ४
*किले किल्याच्या आसाम्या लोकांच्या बहुता दिवसांच्या आहेत, त्या प्रस्तुत दूर होतात. बाह्यात्कारी तरी ऐसी चर्चा आहे आहे कीं रसदी असाम्या किल्याचे कामावर न ठेवाव्या’ ऐसें आहे. परंतु आंतील मर्जी कळत नाहीं. आह्मांस तरी वडिलांचे मर्जीपेक्षां अधी ( क ?) कोणी एक गोष्ट नाहीं. सविस्तर विष्णु नरहरी सांगतील, त्यावरून कळेल. याचा बंदोबस्त करणें तर दुस-यास न कळत करणें. सारांश वडिलांचे मर्जीपेक्षां अधिक मला नाहीं. तेव्हां वडिली बाहेर वाईट न दिसेसें मर्जीस आल्यास करावें. हे सविस्तर प्रकार दुसन्यास न कळतां वडिलांस युक्तीचे वाटेनें श्रुत करणें. दुस-यास येकंदर कळऊं नये.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तेरावा (थोरले माधवराव)
पत्रांक ८६.
स. १७६७ मे जून श्री. १६८९ ज्येष्ठ.
अबाजी माहादेव याचा गांव कोकणांत आहे तो गांव सातशें रुपये परयंत आहे. बद्दल मुशाहिरा मशारनिलेचे लिहोन गांव देवावा. सु॥ समान मया अलफ, सदाशिव माहादेव याचे नावें करार करून सनद देवावी ‡देणें.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तेरावा (थोरले माधवराव)
पत्रांक ८५.
स. १७६५ ता. २६ मे श्री शंकर. १६८७ ज्येष्ठ शुद्ध ६
राजश्री चिंतो विठ्ठल गोसावी यांसिः-
२सु।। खमस. हकीमजीकडील पत्र आलें. त्यांत लिहीलें होतें कीं मुरादखान३ व त्याचे बंधु कैद केले. सरदारखान वगैरे आवरंगाबादेत कैद केले. आद्यापि धोंडो१ रामाचें लिहीलें आलें नाहीं. परंतु बहुधा मागाहून लिहिलें पोहचेल. हे गोष्ट बहुत वाईट जाहाली. याची तोड कसी करावी, तो विचार बहुत लांब केला पाहिजे. बहुतकरून भासतें कीं आम्हांसी बिगाड करावा ऐसा डौल मोगलाचा आहे. सबब खानास कैद केले. त्याकडे २आणके-टणके किले आहेत. त्याची तजवीज कसी करावी ? बहुतच लांब३ विचार केले पाहिजेत. भोंसले लबाडकी करावयास चुकावयाचे नव्हेत. येविसी लांब विचार पाहिजेत. भोसले, मोगल, हैदर, जाधव च्यार येके जागा जाहले. तेव्हां इतक्यांसी साद४ बांधणें दुरापास्त आहे. खजानपूर५ आहों तें कळतच आहे. सालमजकुरीं आमचें वर्षप्रवेशकाळीं लग्नीं गुरु६-शुक दोन्ही साहावे पडले आहेत, ते दोघेहि चैन पडों देणार नाहींत. अबरु बचतां संकटच दिसतें. परंतु एक ईश्वरकृपा आहे, तरी कांहीं भीत नाहीं. गुरु-शुकहि अनुकूळ होतील. असो. हा दैवी विचार आहे. परंतु मानवी विचार कसा करावा याची योजना बहुत लांब विचार करून करावी. तोडीवर तोडीवर बोलाव्या. पुढें कसें करावें तें सारें योजावें. मजला तरी पुढील चिन्ह बरें दिसत नाहीं. मानवी विचारावरूनहि फटकाळ दिसतें. दैवी म्हणावा तरी गुरु-शुक्र दोन्ही प्रबळ ग्रह षष्ट-स्थानीं सालमजकुरी आहेत. हे ब्राह्मणशत्रूचा व दैत्यशत्रूचा दोघाचाहि उत्कर्ष करावयास चुकणार नाहीं (त.) त्याजवरून परम विचारांत पडलों आहों. ईश्वरकृपा आहे हें तरी खरेंच. परंतु ईश्वराजवळ आम्हांस त्याचे कृपेखेरीज दुसरी यांच्या (याञ्चा) करणें नाहीं. जें तो आपले संतोषें करील तें करो. आमचा निश्चय हाच कीं, प्राण गेले तरी दुसारि यांच्या (याञ्चा ) न करावी. प्रसंगास आली म्हणोन गोष्टी तुह्मास खोलून लिहिली. असो. आमचें अंतर्यामीं तोच आहे, व आमचा निश्चय चालविणें हेंहि त्याचेच हातीं आहे. जसें करणें तसें करील. तूर्त प्रपंचरीतीनें उपायस आळस नच करावा. उपाय७ कोणता ह्मणाल तरी मोगलास परिच्छिन्न जास्ती कांहीं कबूल करून, बहुत आशेस लावून, फौज, तोफा कुमकेस आणावाव्या. मुरादखान कैदच जाहला असिला तरी निंबाळकर व खंडागळे, खंदारकर ऐसे आणवावे. कांहीं तोफा आणवाव्या. निदानीं *देवदुर्गहि देऊं करावें. जाधवराव देखील पंचवस तीस चाळीसपर्यंतहि जागीर देऊ करावी. काबू पहावी तसें करावें. इतकेंहि द्यावयास पुरवलें. परंतु दोघे मोंगल व भोसले, जाधव ऐस येक करून मग लढाया घ्यावयास पुरवणार नाहीं. यास्तव चहूंकडे तर्तुदी कराव्या. मल्हाररावास वारंवार पत्रें ल्याहावीं. महादजी सिंद्यास समजाविसीचें पत्र ल्याहावें. चाकर आहे रुसोन गेला आहे. त्यास च्यार पत्रें समजाविसीचीं गेलियास दोष काय ? बहुत युक्तीनें गळ घालून ल्याहावी. आला तरी आला; न आला तरी पारपत्य श्रीकृपेंकरून होतच आहे. चिंता नाहीं. चिरंजीव १आबा येतीलच. पुरंदरचे जसें कळेल तसें च्यार रु॥ये हाताखाली आलियास बहुत उपयोगी. गंकारपूर्वकाचे२ राजकारण विना तेथें ताणल्यासिवाय गोडीस येणार नाहीं. वाचून, सविस्तर मनन करून, उत्तर कलमवार जलद पाठवणें. तुह्मीं व आबाजी माहादेव, चिंतो अनंत व त्रिंबक विनायक, ३चवघे बसोन माणसें बंगल्याखालीं घालऊन वाद-प्रतिवाद करून सिधांत करून उत्तर लिहिणें. व कागद चहूंकडे पत्रांचे पूर चालवणें. पत्रामागें पत्र व बातम्या ऐशा चालवणें. प्रयत्नास आळस तिळमात्र न करणें. केवळ हेच तपश्चर्या समजोन याच उद्योगांत राहाणें. गाई, ब्राह्मण, देव यांचें रक्षण करणें. हेंच४ तप. हाच जप. यामध्यें जें पुण्य लागेल तें च्यार माळा ओढल्यानें लागणार नाहीं. दिवसास निजत न जाणें. रात्रौ दीड प्रहर दोन प्रहर कारभार करणें. रवाना सोमवार. रुजु.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तेरावा (थोरले माधवराव)
पत्रांक ८४.
१७६५ मे, जून श्री १६८७ ज्येष्ठ
ही दौलत मोठी. या दौलतेस सर्व लहान मोठ्यांनीं अनुकूळ असून जेणेंकरून दौलत नीट होय तेंच सर्वांनीं करावें; तें येकीकडे राहून दौलत दोहो जागा करावी हेच तीर्थस्वरूपाचें मानस. त्यास आम्हांस कांहीं करणें नाहीं. कारण कीं ही दौलत पहिल्यापासून एकांनींच करावी, वरकडाचा भार करणारावर असावा; याप्रमाणें चालत आलें असतां, आतां वडिलाचें मानस कीं 'आम्हास गुजराथ द्यावी. आणि सर्व किल्याचा बंदोबस्त आम्हीच करूं.' म्हणतात त्यास आम्हांस कांहीं करणें नाहीं. कांकीं अशानें ही दौलत चालणार नाहीं. व दोहों जागा दवलत जाल्यानें लवकीकहि वाईट, यास्तव सर्व वडिलांनीच करावें. आम्ही स्वस्थ भलते जागा राहूं. आपल्या आपल्यांत भांडून दौलत बुडविली हा लवकीक कशास १पहिजे ? सर्व त्यांनीच करावें हें फार चांगलें. आम्ही स्वस्त राहूं. वडिलांना नीट केल्यावर आम्हांस सांगतील तेव्हां आम्ही जवळच आहों. हेंच प्रस्तुत काळीं बरें. तुम्हांस लिहावयाचें कारण इतकेंच कीं सर्व लोक म्हणतात; 'ही दौलत थोर, तीर्थस्वरूप राजश्री दादासाहेब चिंतोबाचे हातीं, तेव्हां चिंतोबांनीं वडिलांस समजून सांगावें, आणि या गोष्टीचा बंदोबस्त पाडावा.' हे येकीचकडे राहून नव्या गोष्टी निघतात हें काय ? तेव्हां या गोष्टीचा शब्द तुम्हांवर लोक आणतात. तुह्मी तर वडिलास आपल्यातर्फेनें सांगतच असाल. परंतु वडिलाचा इतबार तुम्हावर, तेव्हां शब्द तुम्हांवर आणितात. तुह्मी तर नीट करतां, परंतु लवकीक बाहेर कसा आहे हा तिराइतास पुसावा. ही चीटी वाचून फाडून टाकणें. दुस-यास एकंदर कळऊं न देणें. दुस-यास कळवाल तर शफत असे. हेंच बोलणें रुबरु बोलावेंसें होतें, परंतु वर्तमान ऐकिलें कीं तुम्हांस बरे वाटत नाहीं यास्तव चिठी लिहीली असे.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तेरावा (थोरले माधवराव)
पत्रांक ८३.
१७६४ ता. ६ आगष्ट श्री १६८६ श्रावण शुद्ध ९
३राजश्री चिंतो विठ्ठल गोसावी यांसि सेवक माधवराव बल्लाळ प्रधान नमस्कार. उपरी, येथील कुशल जाणून स्वकीय लिहिणें विशेष. तुम्ही पत्र पाठविलें तें पावलें. पत्र लिहिलें कीं ‘आप्पाजी गणेशास ताकीद होऊन गोपाळ-रामचे हवालीं ठाणें हो तें करावे' म्हणून संशय धरून लिहिलेत व ‘तीर्थस्वरूप राजश्री दादासाहेबांचे मनांत संशय आला आहे.’ म्हणून लिहिलें तें कळलें. त्यास तुम्हीं वडिलांस विनंती करून आप्पाजी गणेशास ठाणे न द्यावयाविसी आम्हीं पत्रें लिहिलीं असतील तीं पत्रें खामखा आणवणें. वडिलांचे चित्तांत संशय आणणारे आणतात. येथें तरी वडिलांचे मर्जीशिवाय दुसरा अर्थच नाही. असें असतां लहान माणूस वडिलांचे चित्तांत विपर्यास आणून देतात. हें काय? हें पत्र वडिलांस विदित करणें. या मजकूराविसीं वडिलांची खातरजमा केलीच असेल. आम्हींच ल्याहावेंसें काय आहे? परंतु हें पत्र ल्याहावयाचें कारण हेंच कीं इकडील मजकूर सविस्तर तुम्हांस ठाऊक असतां चित्तांत संदेह आणून या गोष्टीचा अंदेशा न करितां पत्र लिहिलें याचें कारण कळलें नाहीं. परंतु असेंही वाटते कीं वडिलांचे मर्जीचा भाव पाहून पत्र लिहिलें असें वाटतें. पत्र संदेह धरून लिहिलें याचें कारण पत्र लिहून पाठवणें, जाणिजे. छ ७ सफर बहुत काय लिहिणें. तेथील वृत्त कळावें म्हणून लिहिलें तें कळलें. तुम्हांविसीं संदेह नाहीं. छ मजकूर पा। छ २४ सफर श्रावण मास सु।। खमस
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तेरावा (थोरले माधवराव)
पत्रांक ८२.
१७६४ ता. १६ मे श्री १६८६ वैशाख वद्य १
*राजश्री चिंतो विठ्ठल गोसावी यांसि--------------------------------
सेवक माधवराव बल्लाळ प्रधान नमस्कार. उपरी एथील कुशल जाणून स्वकीय लिहिणे. विषेश ( विशेष ? ). ‘पुरंधरेचे२ जुने लोकांनीं आमचें नांव करून दग्यानें किल्ला घेतला’ म्हणोन परस्परें वर्तमान विदित जालें. त्यास हे गोष्ट आम्हांस किमपि ठाऊक नसतां मधीं लबाडी करून कर्म केलें. त्याचें पारपत्याविशीं तीर्थस्वरूपांस लिहिलें आहे. तुम्हीहि विनंति करून लबाडी केली त्यांचें पारपत्य करवणें. वडिलांच्या चित्तांत संशय न ये तें करणें. जाणिजे. छ १८ जिलकाद बहुत काय लिहिणें.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तेरावा (थोरले माधवराव)
पत्रांक ८१.
१७६४ ता. १३ मे श्री १६८६ वैशाख शुद्ध १३
राजश्री चिंतो विठ्ठल गोसावी यांसिः-
उपरि. विष्णु नरहरी सातारकर याचे बंधु मेरो नरहरी सातारियास होते. त्याजवरी वेंकाजी माणकेश्वर याणीं नांदगार किल्ल्याचा आरोप आणून मोरोपंतास धरून नेलें व विष्णू-पंताचे घरीं चौकी बसविली. त्यास विष्णूपंत जातापळता नव्हे. एथें आम्हांजवळ असतां अशा गोष्टी दरम्यान १त्यांनीं कराव्या हे रीत सेवकपणास उचित नसे. आह्माकडे लिहून पाठवावें होतें; अथवा तीर्थरूप राजश्री दादा-साहेबांस श्रुत करावयाचें होतें; तें न केलें. असो तेथें तुम्ही. तुह्मांसही बारिक मोठें वृत्त कळलेंच असेल. यांज-करतां तीर्थरूपास विनंती करून मोरोपंतास सोडून देणें. व याचे घरची चौकी उठवणें. नांदगिरीचे राजकारण मा।रनिलेनीं आम्हांस लिहून पाठविलेंच होतें. यांजकडे गुन्हा लागू होत नाहीं. तथापि जालातर तुह्मींच त्यास जामीन राहून यास सोडून देणे व चौकी उठवणे. $लिहिल्या-प्रों जरूर करणें. दुसरियास कागद न दाखवणें. तुम्हीच वाचून फाडून टांकणें. लिहिल्या प्रों जरूर करणें. दुसरियास हें पत्र नच कळावें. तूर्त जामीन घ्यावा. पुढें अंतर त्याजकडे ठरल्यास, केलें१ पावतील. तरी लिहिल्या-प्रों करणें जाणिजे. छ ११ जिल्काद बहुत काय लिहिणे.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तेरावा (थोरले माधवराव)
पत्रांक ८०.
इ. स. १७६४ मे श्री १६८६ वैशाख.
राजश्री चिंतो विठ्ठल गोसावी यांसिः-
सेवक माधराव बल्लाळ प्रधान. नमस्कार. उपरी. एथील कुशल जाणून स्वकीय लिहिणे. विशेष. तुह्मां-कडून अलीकडे पत्र येऊन वर्तमान कळत नाहीं. तरी प्रस्तुत तीर्थस्वरूप ३राजश्री दादासाहेबांची मर्जी कशी आहे ? शरीर-प्रकृति कशी ? अवषध कोणाचें घेतात ? हें लिहिणें. मोंगला-कडून ४हिम्मतखान आले होते त्यांसी सलुखाचें बोलणे कसें जाहलें ? हिम्मतखानाचा भाव कसा आहे? सलुख जाहला हा किती दिवस चालेल ? हा प्रकार व त्याचा बोलण्याचा आशय कांहींच कळत नाहीं. जी दिल्ही जागीर ती घ्यावी आणि पुढें नीट चालावें हा आशय नबाबाचा व त्याचे कारभा-याचा कसा आहे ? हें लिहिणे. वरकड वर्तमान मल्हारबाकडील व शिंद्याकडील लिहून हमेशा पा। जाणें. वरकड वर्तमान बारिक मोठें हमेशा लिहिणें. इकडील वर्तमान तर सविस्तर तीर्थस्वरूपांचे पत्रीं पूर्वी लिहून पाठविलें आहे त्यावरून कळेल. प्रस्तुत हैदरनाईक मायन-हळीस५ गेला आहे तेथें एक दोन मु॥ होईलसें दिसतें. त्याचें मानस हेंच की ‘चार दिवस घालवावे. ‡हे छावणीस रहात नाहींत. हें त्याचें मत आहे.’ झाडी सोडून झुंजायास यावयाचा प्रकार दिसत नाहीं. रात्रीस छापा घालावा हे इच्छा धरीत आहे. दुसरा प्रकार तर किमपि दिसत नाहीं. नबाबाकडेहि पत्रें पाठवित आहे, कीं, “तुह्मीं यावे.' हाही प्रकार करितच आहे. नबाबही काडळूर संगमावर येणार आहे. पुढें पहावें. याचें त्याचें कसें आहे हें नकळे. याचें पारपत्याचा मजकूर तर प्रस्तुत तो झाडीत आहे. पर्जन्य बहूत, म्रहरगता विशेष, असा प्रकार आहे. च्यार रुपये मिळवावे ते दिवस मागेंच गेले. प्रस्तुत एवजाचा प्रकार कोठेंहि दिसत नाहीं. असा प्रकार आहे. याचें पारपत्य जाहल्या खेरीज यावयाचें कसें ठीक पडतें? तोही आपले छावणीची वाट पाहात आहे. त्याचेहि लोक फुटतात व राजकारणें एतात. परंतु आपले फौजेस रोज-म-यास ठिकाण नाहीं तेव्हां ते कसे येतात? हे सर्व अर्थ वडिलांस विदित करणें. आपले*
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तेरावा (थोरले माधवराव)
पत्रांक ७९.
पाणीपतनंतर सर्व फांटाफूट झाली, त्यावेळीं दादासाहेबानीं आपल्या पक्षाकडच्या लोकांस वाटतील तशा जाहगिरी, इनामें दिली. पुढें राक्षसभुवनाची लढाई होऊन पुनः स्थिरस्थावर झाल्यावर रावसाहेब, बापु इत्यादिकांच्या आग्रहावरून सर्व जहागिरदार आपल्या जहागिरीची चौथाई देण्यास कबूल झाले. पण मल्हारराव सुभेदार कबूल नव्हते. तेव्हां त्यांस कायल करून त्यांचीं कबुली मिळवावी, एतदर्थ हें पत्र रावसाहेबांनी दादासाहेबांचे हितचिंतक रायरीकर यांस लिहिले आहे.
स. १७६४ ता. ९ एप्रील श्री १६८६ चैत्र शुद्ध ८
पु।। राजश्री चिंतो विठ्ठल गोसावी यांसि
उपरी. राजश्री मल्हारजी होळकर याणीं चौथाई सरंजाम सरकारांत द्यावा असा करारे वचन तीर्थस्वरूपांजवळ केलें असतां ‘आतां बैजापूर, रावेर मात्र देऊं' म्हणतात ही गोष्ट अपूर्व आहे. सर्वांनीं केल्या करारा प्रमाणें द्यावें आणि यांनीं कां न द्यावें? 'तुम्हीं करार केला आतां कां देत नाही? वचन तुम्हीं केलें ते कोठें राहिले?' असे त्यांच्या आंगीं लाऊन बोलल्यास ( काम ? ) होईसे आहे. तर तुम्हीं तीर्थ-रूपांस विनंती करून त्यास १कायल करून चौथाई सरंजाम करारा-प्रों सरकारांत येई. ती गोष्ट करणें. येविशीं तीर्थरूपास विनंती लिहिली आहे. तुम्हीं वरचेवर स्मरण देऊन कार्य करून घेणें. जाणिजे. छ १० सवाल सुहूर-सन अर्बा सितैन मया व अलफ. मल्हारबाचा प्रकार २प्रत्ययास आलाच आहे परंतु जेथवर निकड होईल तितके करणें, छ मा।*
पो छ ५ जिलकाद वैशाख मु।। त्र्यंबक
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तेरावा (थोरले माधवराव)
पत्रांक ७८.
१७६४ ता. १५ जानेवारी श्री १६८५ पौष शुद्ध १२
नकल.
राजश्रि-याविराजित-राजमान्य-राजश्री जिवाजी गणेश स्वामी गोसावी यांसिः-
पो माधवराव बल्लाळ प्रधान नमस्कार विनंति उपरि. येथील कुशल जाणून स्वकीय लिहीत जाणें. विशेष. मौजे हिंगणे ता। कर्यात मावळ येथें रमण्याचा बाग सरकारचा आहे, तो राजश्री चिंतो विठ्ठल याजकडे १तसलमातीस दिल्हा होता तो हाली शाकभाजी, फुलें-संसाराचे सोईकरितां नेहमी मारानिलेकडे दिल्हा असे. तरी सदरहू बाग मा।रनिलेकडे देणें. जाणिजे. छ ११ रजब सु॥ अर्बी सितैन मया व अलफ बहुत काय लिहिणे ? हे विनंति.
बार