Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौदावा (खाजगीवाले दफ्तर)
पत्रांक १७
पे।। छ ९ जिलकाद श्रीआईआदिमायाप्रसन्न
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री गोविंदपंत स्वामी गोसावी यांसि
सेवक श्रीनिवास गंगाधर प्रतिनिधी नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीयें कुशल लेखन केलें पाहिजे विशेष सांप्रत तुम्हांकडून पत्र येऊन वर्तमान कळत नाहीं त्यास इष्टत्वास हे गोष्ट उचित कीं काय याउपरि वरचेवर पत्र पाठवून परामृश घेत असावा इकडील वर्तमान सविस्तर राजश्री आप्पाजी गंगाधर कारकून याजबा। सांगून पाठविलें आहे हे सांगतां कळोन येईल त्यासा तुम्हीं त्या प्रसंगी आहा इकडील सर्व अगत्यवाद आपणास आहे जो बंदोबस्त करणें तो उत्तम प्रकारें करून साह्यावरीं पडे ती गोष्ट केली पाहिजे सर्व भरवस आपला आहे बहुत काय लिहिणें हे विनंति
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौदावा (खाजगीवाले दफ्तर)
पत्रांक १६
पे।। छ ५ बिलावल श्री शके १६८६
राजश्रिया विराजत राजमान्य राजश्री तात्या स्वामी गोसावी यांसि
पोष्य त्रिंबक सदाशिव कृतानेक नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीयें कुशल लेखन केलें पाहिजे विशेष तुमचीं पत्रें पावलीं सविस्तर कळलें कुरणाविसी लिहिलें त्यावरून श्रीमंतांस विनंति केली त्याचीं उत्तरें दोन पाठविलीं आहेत पावलीं असतील सारांश तुमची कुरणें खासगत खडकवासलें बावधन हीं कुळाकडे करार राखिलीं आहेत अण्णाकडील पांच कुरणें पैकीं तीन सरकाराकडे घेतलीं दोन अण्णाकडे पाषाणाचें व कुड्डुच्यांचें राखिलें तीन कुरणें सरकारांत घेतलीं त्यांचा मोबदला अंबी नाणेमावळची येथील दिल्हे आहे असें नेमणुकेंत लिहिलें आहे त्यास तिन्ही कुरणें जीं घेतलीं तीं तूर्त कारभारियांचे मर्जीस्तव देतां नये असें बोलण्यांत आहे पुढें तजविजीनें होईल असें बोलतात त्यास लिहिल्या प्रों कुरणें जीं राखलीं आहेत हीं हि चालतात किंवा अटकाव आहे हे नीट उमजून ल्याहावें म्हणजे ताकिदी पाठऊन देऊं तुमची पागा हिंदुस्थानांतून आली आहे त्यास बरी आहे ऐशास येथें द्वारकोजी निंबाळकर याजकडे बोली म्हणाल तर होत आहे तीनशे रुपये निवळ शेरानालबंदी तिजाई शंभर याप्रमाणें आहे जर सोईस येत असेल तरी पागा तयार करून भाद्रपद अखेर पाठवणें लिहिल्या प्रा। निकाल करून घेऊन येऊं गोपाळरावाकडे ऐवजाविशीं फार बोललों शेवट असा प्रकार तूर्त तीस हजार देवितात मंगळवेढ्यावर चिटी वीस हजार आश्विनमासीं देतात बाकीं मार्गशीर्षमासीं देऊं म्हणतात राजश्री परशरामाकडील पंचवीस तो देतो असें आहे बहुत निकडीचे प्रकार गोपाळरावांस बोललों परंतु त्याचा ही शेवटाल जाबसाल हा आहे याचें उत्तर पाठवणें जो वसूल येईल तो घेतों इकडील वर्तमान तर हैदरनाइकाकडील राजकारण सलुखाचें होतें आज दीडमहिना घोळले शेवट लबाड कारभार तो सल्ला करीत नाहीं साफ याप्रमाणें जाहालें या उपरि श्रीमंत दादासाहेब लवकर येतील पारिपत्य होईल मजकूर काय आहे परंतु तूर्त असा प्रकार आहे महादजी शिंदे हिंदुस्थानांत गेले दहा बारा हजार फौज जमा आहे मल्हारबा ते एक जाहाले पुढें जबरदस्ती पाडावी असें आहे हें वर्तमान तुम्हांस तेथें कळत च आहे क-हाडाकडे माहुलीकडे भूमिकंप जाहाला हे वर्तमान तुम्हांस कळलें असेल च वरकड वर्तमान यथास्थित आहे आम्हीं नवी घोडी साडेपांचशा रुपयास एक विकत घेतली कां घेतली म्हणाल तरी पांच घोडे थोरले च लष्करांत येथें मेले म्हणून घेतली तुमच्या पागेंतील भीमा घोडी रोग होऊन मेली वरकड सारी पागा बरी आहे. जयरामपंत चाकरी चुकरी चांगली करितो बारगिरानीं कामकाज चांगलें केलें चार घोडीं हैदरनाइकाकडील आणली शेंदोनों गुरे आणलीं बरें आहे कर्ज हा कालवर केलें नाहीं आम्हीं एक गाय जयरामपंतापासून चांगली आपल्यास आणिली तुम्हास समजावें तुमचे येणें कधीं होइल हें ल्याहावें राजश्री नारोपंत पाळंदे यांचे लेकास लग्नसमई घोडी दिल्ही नाहीं देऊ केली आहे त्यास मुलाजोगी घोडी चांगली तुम्ही तिकडे पागेंतून एक द्यावी सावनुरांत होते ते आले कळावें रा।। श्रावण वद्य दशमी मु।। नजीक कितूर लोभ असो दीजे हे विनंति
स्नेहांकित अंगोजी जगथाव रामराम
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तेरावा (थोरले माधवराव)
पत्रांक १६५.
इ. स. १७६७ ता. ८ आक्टोबर श्री. शके १६८९ आश्विन वद्य।
पु।। राजश्री सखारामपंत बापू गोसावी यांसिः-
विनंती२ उपर कितेक मजकूर राजश्री निलो गोपाल यासी सांगितला आहे आणि राजश्री आबाजी महादेव यांचे समक्ष निदर्शनास आलें आहे, त्याणीं राजश्री चिंतो विठ्ठल यांसी लिहिलें आहे ते आपणासी बोलतील ते आमचे बोलणें जाणावें र।। छ १४ जमादिलावल ३बहुत काय लिहिणें लोभ किजे हे विनंती.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तेरावा (थोरले माधवराव)
पत्रांक १६४.
इ. स. १७७७ ता. १५ जून श्री. १६८९ ज्येष्ठ शुद्ध १०
राजश्री रामचंद्र कासी का।दार मौजे दारणा-सागवी वगैरे गोसावी यांसि सु।। समान सबैन मया व अलफ. तुह्मांकडे पेस्तर साळचे रसदेचा ऐवज येणें तो बा। देणें दि।। चिंतो१ विठल यास सिलेदाराचे आठवडयापो रु २००० दोन हजार देवीले असेत. तरी पावते करून कबज घेणें. जाणिजे छ ८ जमादिलावल
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तेरावा (थोरले माधवराव)
पत्रांक १६३.
१७६७ ता. १३ दिसेंबर श्री. १६८९ मार्गशीर्ष वद्य ८
राजश्री धोंडो बल्लाळ का। प्रा सुलतानपुर गोसावी यासिः- अखंडितलक्ष्मी अलंकृत राजमान्य स्नो तुकोजी होळकर दंडवत सु।। समान सितैन मया व अलफ मौजे भाप परगणेमजकूर हा गांव सालमजकुरीं सरकारांतून राजश्री चिंतो विठ्ठल यांजकडील रावतास सरंजाम नेमून दिल्हा आहे त्यास तेथील वसूल सनमजकूरीचा तुह्मीं घेतला असेल तो फिरून मशारनिलेकडे देणें जाणिजे छ २१ रजब बहुत काय लिहिणें
बार
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तेरावा (थोरले माधवराव)
पत्रांक १६२.
१७६७ ता. ९ दिसेंबर श्री. १६८९ मार्गशीर्ष वद्य ४
राजश्री वेंकटराव असी कासी का। पा। सिरोंज गोसावी यांसि अखंडित-लक्ष्मी-अलंकृत-राजमान्य स्नो तुकोजी होळकर दंडवत सु।। समान सितैन मया व अलफ
राजश्री चिंतो विठ्ठल याजकडील राजश्री माहादाजी गोविंद यांची बोली सरकारांत करून ह्यास पा।मजकूर ऐवजी जागीर रुपये १४२४९॥ चौदा हजार दोनशें साडेयेकूणपन्नास रुपयांची खेडीं द्यावींसा करार करून हे सनद तुम्हांस सादर केली असे तरी तुम्ही सालमजकूरीं पा।मजकूर पा। सदरहूचे चौदा हजार दोनशें साडेयेकूणपन्नास रुपयांचे तनखियाचीं खेडीं मशारनिलेचे दुमाले करून देणें येणेंप्रो पेशजीं पत्र दिल्हें होतें तें गैर विल्हे लागले सबब हालीं मुसन्ना सनद हे दिल्ही असे जाणिजे छ १७ रजब. गहूत काय लिहिणें
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तेरावा (थोरले माधवराव)
पत्रांक १६१.
१७६७ ता. ९ दिसेंबर श्री. १६८९ मार्गशीर्ष वद्य ४
मा। अनाम चौधरी व कानगो पा। सिरोंज प्रांत माळवा यांसि तुकोजी होळकर सु।। समान सितैन मया व अलफ. राजश्री चिंतो विठ्ठल यांजकडील राजश्री महादाजी गोविंद यांची बोली सरकारांत करून त्याची सरंजाम ऐवजी पा।मजकूर पों खेडी रुपये १४२४९॥ चौदा हजार दोनशें साडेएकूणपन्नास रुपयाचे तनजीयाचीं नेमून द्यावयासी सरकारांतून राजश्री वेंकटराव कासी मामलेदार पा। मजकूर यांसी आज्ञा केली आहे, त्याप्रमाणें ते खेडीं देतील, तुम्ही मासारनिलेसी रुजू राहून सुरळित वर्तणे. जाणिजे. छ १७ रजब.
बार
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तेरावा (थोरले माधवराव)
पत्रांक १६०.
१७६७ ता. ९ दिसेंबर श्री. १६८९ मार्गशीर्ष वद्य १
राजश्री वेंकटराव कासी का। पा। सिरोंज गोसावी यांसि
अखंडितलक्ष्मी अलंकृत राजमान्य
स्ने।। तुकोजी होळकर दंडवत सु।। समान सितैन मया व अलफ. राजश्री चिंतो विठ्ठल यांजकडील राजश्री महादाजी गोविंद यांची बोली सरकारांतून करून त्यास परगणेमजकूर ऐवजी सरंजाम खेडीं नेमून घ्यावयास तुम्हांस अलाहिदा सनद सादर केली आहे, त्याप्रमाणें गांव करार करून घ्या; परंतु सालमजकुरी वसूल घेतला असेल तो फिरून द्यावा म्हणुन मशारनिल्हेनीं रदबदल केली त्यावरून हें पत्र लिहिलें असे. तरी पोमजकूरीं तुमचा अंमल दाखल जाल्यावर तुम्हाकडे वसूल आला असेल तो फिरून पंत-मशार-निल्हेकडे देणे, जाणिजे. छ १७ रजब. बहुत काय लिहिणें
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तेरावा (थोरले माधवराव)
होळकर वगैरे प्रकरण-पुरवणी
पत्रांक १५९.
१७६७ ता. ९ दिसेंबर श्री. १६८९ मार्गशीर्ष वद्य ४.
राजश्री चिंतो विठ्ठल गोसावी यांसीः- अखंडित-लक्ष्मी-अलंकृत राजमान्य श्रो तुकोजी होळकर दंडवत विनंती उपरी, तुह्मांस ऐवज येणेंप्रमाणें देणे
४२५००
३५०० ब्राह्मणाबाबद
--------------
४६०००
एकूण सेचाळीस हजार रुपये. पों साडेबेचाळीस हजार रुपयांची चिठी जनस्थानचे मुकामीं उसणे रु।। देऊं ह्मणून दिल्ही आहे. बाकी पस्तीससे राहिले ते व चिट्ठीबा। साडेबेचाळीस हजार, एकूण सेचाळीस हजार रुपये निव्याजी तुह्मां स्वारीतून पावते करून२ छ १७ रजब सु।। समान सितैन मया व अलफ. बहुत काय लिहिणे हे विनंती.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तेरावा (थोरले माधवराव)
पत्रांक १५८.
इ. स. १७६६ ता ६ मार्च. श्री. १६८७ फाल्गुन वद्य १०.
श्री महाराजाधिराज महाराज श्री राजा भारत साह हठिया रायेजी सा। बा। मौ। आवासेक व मौ। कंचनगांवके पटेल पटवारी व समस्त रयत ता। जुन वान्यादी वेळी-आगो (?) मौ। मजकूर हरदोगांव कुलबाब कुलकानू सुद्धां खेरीज हक्कदार राजश्री चिंतो विठ्ठल इ१ प्रभाकर जोशी राहुरीकर, गोत्र अत्री, सूत्र आश्वलायन, सरकानुगो सुबे खानदेशवाले इनकू इनाम पुस्तदरपुस्तकु देकर इनामपत्र मुसारनिलेकू लिख दिया है. और तुमकूं ताकीदपत्र लिखा है ऐसा जो तुमने मुसारनिलेके अमलदारोंसे रुजू होकर हरदो मौ। मजकूर का अंमल कुलबाब कुलकानू सुद्धां इनके सरकारमो देते जाना. विला हरकत काडीमात्रकी न करना, ताकीद जानना. इस ताकीदपत्र कीं नकल तुमने लेना, असल पत्र इनका इनके पास भागोटेकू रहने देना. ता। १० वद चैत्र संवत् १८२२.