Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तेरावा (थोरले माधवराव)
पत्रांक ६४.
१७६७ ता ३ दिसेंबर श्रीगजानन १६८९ मार्गशीष शुद्ध १३
राजश्री विसाजी कृष्ण का।।दार प्रा। १नंदुरबार व सुल-तानपूर गोसावी यांसिः
अखंडित-लक्ष्मी-अलंकृत राजमान्य स्ने।। संताजी २कदमराऊ दंडवत. सु।। सन समान सीतैन मया अलफ. तुह्माकडे सन *११७७च्या हत्प्यांपैकीं कार्तिक वद्य १३ त्रयोदशी रुपये ६२५ सवासासे विद्यमान रो हरबाजी पांढूरंग याचे मारफातीचें रोख रुपये पावले. बहुत काय लिहिणे? रो छ ११ माहे रजब.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तेरावा (थोरले माधवराव)
होळकर प्रकरण.
रायरीकरांच्या दप्तरांत होळकरसंबंधाचे कागदपत्र मुळींच नाहींत म्हटलें तरी चालेल. चिंतोपंत तात्या रायरीकरांस पागा नेमून दिल्याचा ऊल्लेख मात्र एकदोन पत्रांत आहे. या प्रकरणांत दोन तीन हिशोबाचे कागद छापिले आहेत, हे इतिहास-भक्तांनीं अवश्य वाचावें. व्याजाचा हिशेब करण्याची पद्धति, जमाखर्च ठेवण्याची पद्धति इत्यादि गोष्टी मनन करण्यासारख्याच आहेत.
पत्रांक ६३.
१७६७ ता. २९ ऑक्टोबर श्री. कार्तिक शुद्ध ७ शके १६८९
राजश्री माहादावा१ ना।मेढे गोसावी यांसिः-
अखंडित-लक्ष्मी-अलंकृत-राजमान्य श्रे॥ तुकोजी होळकर दंडवत. सु॥समान सितैन मया व अलफ. तुह्मा पासून सरकारांत घेतले रुपये ४२५०० साडे बेचाळीस हजार, हे सदरहू साडे बेचाळीस हजार रुपये उसने चैत्र-मीं देऊं. जाणिजे. छ ५ जमासिलाखर. बहुत काय लिहिणें? मित्तीं कार्तिक शुद्ध ७ सप्तमी शके १६८९ सर्वजित् नाम संवत्छरे. हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तेरावा (थोरले माधवराव)
पत्रांक ६२.
इ. स. १७७२ ता. ६ फेब्रुवारी श्री. १६९३ माघ शुद्ध ३
राजश्री महादजी सिंदे गोसावी यांसिः-
सकलगुणालंकरण-अखंडित-लक्ष्मी-अलंकृत-राजमान्य श्रे॥ माधवराव बल्लाळ प्रधान आशिर्वाद. उपरी. येथील कुशल जाणेन स्वकीय कुशल लिहित जाणें. विशेष. राजश्री त्रिंबकराव माहादेव यांचें कर्ज तुम्हां-कडून येणें. त्यास मशारनिलेनीं कर्ज नानाजी-ना। येवलेकर व महिपतीराव जगंनाथ नासिककर यांचे देणें होते. त्या ऐवजी यांणीं पंचवीस हजार रुपये तुम्हां-कडून देविले. तुह्मीं सदरहू ऐवराजाची वरात चिमाजी नारायण व अंताजी राम कमाविसदार पा। नवलाई येथें लाउन दिल्ही. असें असतां राघोराम यांनीं कमावीसदाराच्या हिशेबीं वरात गैरादा करून ऐवज तुमच्या सरकारांत घेतला. ऐवज मशार-निलेचा पावला नाहीं ह्मणून यांणीं हुजूर विदित केलें. त्याजवरून हें पत्र तुम्हांस लिहिलें असें तरी गैरादा वरात जाहली असेल तर दुसरा ऐवज मशार-निलेस लाऊन देणें. ये विशींचा फिरोन बोभाट नये तें करणे *जाणिजे छ १ जिलकाद सु।। इसन्ने सबैन मया व अलफ बहुत काय लिहिणे हे आशिर्वाद.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तेरावा (थोरले माधवराव)
पत्रांक ६१.
स. १७६८ ता. ६ एप्रील. श्री. चैत्र वद्य ४ शके १६९०.
राजश्री जयराम पांडुरंग का।दार माहालनिहाय प्रांत मावळ (?) गोसावी यासि
अखंडितलक्ष्मीअलंकृतराजमान्य स्ने।। माहादजी शिंदे दंडवत. विनंति उपरी. येथील कुशल जाणून स्वकीय लिहिणें. विशेषः पा रतलाम येथील मजमूची असामी बापूजी गोपाळ नि।। राजश्री चिंतो विठ्ठल यांस पेशजी दिल्ही आहे. त्यास सालमजकुरापासून करार-करून दिल्ही असे. तरी त्याचे हातें मजमूचें काम घेऊन वेतन सालिना पेशजीचे सनद-प्रमाणे महालमजकूरचे ऐवजीं साल-दरसाल पावीत जाणें. आत्फगी-या व मसालची-ची नेमणूक पूर्वी करून दिल्ही आहे त्याजप्रों चालवणें. छ १८ जिलकाद सु।। समान सितैन मया व अलफ बहुत काय लिहिणें हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तेरावा (थोरले माधवराव)
पत्रांक ६०.
स. १७६७ ता. १६ दिसेंबर श्री. मार्गशीर्ष वद्य ११ शके १६८९
श्रीमंत् राजश्री पंत प्रधान स्वामीचे सेवेसीः—
विनंति सेवक माहादजी सिंदे दंडवत विज्ञापना तागाईत छ २४ रजब पावेतों मुक्काम बराणपूर येथें स्वामीच्या कृपेंकरून वर्तमान यथास्थित असे विशेष. आम्हांस हुजूर येणेविशीं पांचसात पत्रें आलीं कीं, तुम्हीं भेटीस येणे. तुमच्या लक्षानें सरदारीचा बंदोबस्त करून देऊन तुमची रवानगी हिंदुस्तानांत करावी लागती त्यास तुम्हीं लौकर येणें. त्यांजवरून येथील निर्गत कळेल तैशी कर्जवाम करून मजलदरमजल मुक्काम मजकुरास दाखल जाहालों, तों पुण्याहून बातमी आली त्यांत मजकूर कीं स्वामीनीं बाजीनरशी व राघोराम यांस उभें करून नजर दहा लक्ष रुपये करार केले. त्याजपैकीं पांच तुर्त द्यावे व पांच निशा द्यावी. याजप्रमाणें करार करून सरदारीचीं वस्त्रें आमचें नांवें दिल्हीं. आमचें पत्र दाहा रोजाच्या मित्तीचें स्वामीस समजाऊन त्यांनी हा कारभार केला आणि खावंदानी–ही कृपा करून सांगितला. त्यास आमचा उजूर काय ? सारांष. खावंदानीं दौलत दुसरियाच्या जिम्मा केल्यासही आमचा गुंता नाहीं, परंतु आम्हीं खावंदाच्या आज्ञे प्रों येत असतां हा मजकुर न घडावा. *सेवेशी श्रुत होय हे विज्ञापना. सेवेशी त्रिवर्ग बराबर येत असो श्रुत व्हावे हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तेरावा (थोरले माधवराव)
पत्रांक ५९.
ता ९ माहे दिसेंबर. १७६७ श्री. मार्गशीर्ष वद्य ४, १६८९
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य राजश्री चिंतो विठ्ठल गोसावी यांसिः
सेवक माधवराव बल्लाळ प्रधान नमस्कार. उपरि. येथील कुशल जाणोन स्वकीय लिहित जाणे. विशेष. शिंदे दिढा महिनियांत येतात ऐसें तुम्हीं खासा स्वारी अनंदवल्लीस असतां बोलत होतेस त्यास मुदत होऊन गेली. त-ही त्यांचे येणें न जालें. ते उज्जनीसच आहेत. सरकारचें काम नासतें. यास्तव राजश्री नारो शंकर राजेबहादर यांची दिवाणगिरी शिंद्यांची होती ते मोघम राखून राजश्री बाजी नरसिंह यांस शिंद्यांची दिवाणगिरी करार करून देऊन शिंद्यांचे सरदारीचा बंदोबस्त करविला, हें वर्तमान तुम्हांस कळावे यास्तव लिहिले असे. जाणिजे. छ १७ रजब सु।। समान सितैन मया व अलफ. *बहुत काय लिहिणें ? नारो शंकराचे तर्फेनें यांनी कारभार करावा. याप्रमाणें ठरलें. फडनिशीविशीं ताकीद केली आहे. तेही चालवितील. छ० मा।र पौ छ ३ शाबान उर्फ पौष सन समान मुकाम जनस्थान संध्याकाळ.१
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तेरावा (थोरले माधवराव)
पत्रांक ५८.
स. १७६७ ता. २ नोव्हेंबर. श्री. कार्तिक शुद्ध ११ शके १६८९
श्रीमंत राजश्री पंतप्रधान स्वामीचे शेवेसी विनंति सेवक माहादजी सिंदे दंडवत विज्ञापना. तागाईत छ ९ जमादिलाखर पावेतों साहेबाचे कृपेकरून सेवकाचें वर्तमान यथास्थित असे. विशेष. आम्हाकडील बोलणें पेशजी जे प्रहस्त बोलत होते त्या गोष्टी झाडून खोटया. त्या जाबसालांत आम्ही नाहीं. हालीं राजश्री चिंतो विठ्ठल आपणापासीं आम्हांकडील लक्षाची विनंति करीत आहेत आणि पेशजीही केली आहे. ते बोलणें आमचें असें. त्याजप्रमाणें बंदोबस्त करणें तो मशारनिलेच्या विद्यमानें करावा. सारांश मशारनिलेच्या बोलण्यांत आम्ही असों. *येथील सर्व वर्तमान मशारनिले स्वामीस निवेदन करतील तें ध्यानास आनून बंदोबस्त करून देनार स्वामी समर्थ आहेत. जेनेकरून सरदारी उपयोगी स्वामीचे सेवेसी पडे ऐसे करनार धनी समर्थ आहेत. सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तेरावा (थोरले माधवराव)
पत्रांक ५७.
स. १७६७ ता. १ नोव्हेंबर. श्री. कार्तिक शुद्ध १० शके १६८९
राजश्री चिंतोपंत तात्या गोसावी यांसि अखंडित-लक्ष्मी-अलंकृत-राजमान्य स्ने।। माहादजी सिंदे दंडवत. विनंति उपरि. येथील कुशल जाणून स्वकिय कुशल लिहित जावें. विशेष. आपण पत्रें छ १८ जमादिलावलचीं पाठविलीं तीं पावलीं. पत्रों बंदोबस्ताचा अर्थ कितेक लिहिला व राजश्री बाळाजीपंत यांस तुम्ही लिहिलेत त्यांनीं सविस्तर अर्थ सांगितला. पेशजी बाजीनरसी गंगोबाच्या विद्यमानें नजरेचा जाबसाल बोलत होते ते गोष्ट श्रीमंताच्या ध्यानांत आहे. त्यास आम्हीं मागील देण्यास सेर [?] सालचा ऐवज झाडून घेऊन पेस्तर साल मागतों तेथें नजर देऊन पुढें फौज ठेऊन बंदोबस्त करणें या गोष्टी जरूर आहेत. हा सर्व अर्थ खावंदास समजाऊन करणें तें करावें. आम्हीं येथील निर्गम करून खावंदाकडे तुमच्या लिहिल्यावरून एतच आहों. परंतु थोरले श्रीमंत आनंदवल्लीस आहेत. त्यास त्यांची भेट घेऊन पुण्यास यावें किंवा परभारें यावें या गोष्टी सला पोख्त, पेच नपडे, ते ल्याहावी. पेशजीचे गृहस्त बोलत होते तें खोटें. आपल्या बोलण्यांत आमचें बोलणें यैसीं हस्ताक्षरें पत्रें श्रीमंतास व बापूस पेशजी एक दोन पाठवलीच आहेत व हालीं तुम्ही लिहिल्या-प्रमाणें दोन पत्रे पाठविलीं आहेत. वरकड वर्तमान बाळाजीपंत लिहितील त्याजवरून कळेल. +आम्हीं लिहिलेप्रमानें सत्वरच येतों. या छ ८ जमादिलाखर बहुत काय लि।। हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तेरावा (थोरले माधवराव)
पत्रांक ५६.
स. १७६७ ता ३१ आक्टोबर. श्री. कार्तिक शुद्ध ९ शके १६८९
श्रीमंत राजश्री पंत प्रधान स्वामीचे सेवेसी
विनंति सेवक माहादजी सिंदे कृतानेक विज्ञापना ऐसीजे बहुत दिवस स्वामी कडून क्रुपा-पत्र येऊन परामृष होत नांहीं. त्यास क्रुपा करून आज्ञापत्रीं सेवकाचा परामृष करनार स्वामी समर्थ आहेत. राजश्री चिंतो विठ्ठल आम्हा-विसई कितेक विनंती करतील ती मान्य करून आज्ञा करनार स्वामी धणी आहेत. दुसरे कोणी कितेक अर्थ समजावितील ते चित्तांत न आनावे. सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना+
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तेरावा (थोरले माधवराव)
पत्रांक ५५.
स. १७६७ ता ३१ आक्टोबर. श्री. कार्तिक शुद्ध ४ शके १६८९
राजश्री सखारामपंत बापू गोसावी यांसि
सकल-गुणालंकरण-अखंडित-लक्ष्मी-अलंकृत राजमान्य श्रे॥ महादजी शिंदे दंडवत. विनंति उपरी. येथील कुशल जाणून स्वकिय कुशल लिहित जावें. विशेष आह्मां-कडील बोलणें पेशजी जे गृहस्थ आपणासी बोलत होते त्या गोष्टी झाडून खोट्या आहेत. आमचें बोलणें तें राजश्री चिंतो विट्ठल आपणासी व श्रीमंतासी बोलतील तें प्रमाण. त्या बोलण्यांत आह्मीं आहों. जो बंदोबस्त करणार तो मशारनिलेच्या विद्यमानें करावा.*बहुत काय लिहिणें लोभाची वृद्धी करावी हे विनंति.