पत्रांक ९४.
१७६७ ता. १७ नोव्हेंबर श्री. १६८९ कार्तिक वद्य ११.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री गोविंद१ शिवराम स्वामी गो।।
पो रघुनाथ बाजीराव नमस्कार विनंति उपरी येथील कुशल जाणोन स्वकीय लिहित जाणें. विशेष मौजे २साकरें पो माणिकपुंज हा गांव राजश्री त्रिंबक सूर्याजी यांजकडे आहे, त्याची घालमेल होणार म्हणून विदित झालें. ऐशास ३इकडे जे रहातील व तुकाजी सिवराम वगैरे यांची गावखेडीं जीं असतील तीं सुदामत प्रो चालावी म्हणोन करार जाला आहे. त्यास ४कराराबमोजीब मशारनिलेचा गांव वैगरे जे इकडे आहेत त्यांचीं गांवखेडीं जी असतील तीं सुदामत५ प्रों चिरंजीव राजश्री राव यांस सांगोन चालवणे. जाणिजे छ२४ जमालादिखर सु॥समान सितैन मया व अलफ. बहुत काय लिहिणें हे विनंति.