Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तेरावा (थोरले माधवराव)
सनदा.
पत्रांक १४७.
१६४१ आषाढ शुद्ध ५. श्री.
नकल
स्वस्तिश्री राज्याभिषेक शके ४६ विकारी संवछेर आषाढ श्रु।। ५ पंचमी गुरुवासरे क्षत्रिय-कुळावंतंस श्रीराजाशाहू छत्रपति स्वामी यानीं तपोनिधी वल्लभगीर गोसावी यांसि।
दिल्हें इनाम-पत्र ऐसाजे तुम्हीं हरिभक्तपरायण तपोनिधी. तुमचे मठीं अतीत अभ्यागत येत असतात. त्यांस अन्न-पाणीं पावल्यानें स्वामीस व स्वामीच्या राज्यास कल्याण; ऐसें जाणोन स्वामी तुम्हांवर कृपालू होऊन मौजे आंबवली ता। मुठें-खारें प्रों। मावळ हा गांव पेशजीच्या मोकासीयाजकडून दूर करून कुलबाब कुलकानु खेरीज इनामदार व हक्कदार चतुःसीमा-पूर्वक करून दिल्ही असे. तरी मौजे मजकूर आपले दुमाला करून घेऊन तुम्हीं व तुमचे शिष्य-परंपरेनें इनाम अनभवून सुखरूप राहाणें. जाणिजे. लेखनालंकार मोर्तब.
वारसुरू वारसुरूसूद बारसुमंत बारमंत्री.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तेरावा (थोरले माधवराव)
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तेरावा (थोरले माधवराव)
पत्रांक १०७.
१७६८ ता. २५ जानेवारी श्री. १६८९ माघ शुद्ध ६.
श्रीमंत राजश्री १मोरोपंत नाना स्वामीचे सेवेसीः—
विनंती-सेवक बाबाजी मल्हार कुळकर्णी मौजे साकेगांव पा। सेवगांव सां नमस्कार विज्ञापना ऐसीजे. आपण साहेबास विनंती नासीकचे मुकामीं केली कीं मौजे मजकूरचा जिम्मा आपला करून द्यावा. त्यावरून कृपा करून मौजे मा।र साहेबी आपले जिम्मा केला. त्यास सन ११७७ सु।। सन समान सितैन मया व अलफ या सालची बरहुकूम जमा वसूल जमाबंदीची बाकी ता। छ ४ रमजान स्त्रो ५५०७॥ पंचावनसे साडेसात व बाकी सन ११७४ व सन ११७५ पैकीं या सालांत घेणें ठरविले स्त्रो ६०० साशें येकोन स्त्रो ६१०७॥ सहा हजार एकशे साडे सात याचा जिम्मा आपण आपले रजाबंदींने करून घेतला आहे. सदरहू ऐवजाचा वायदेबंदीप्रों रोखा आपण राजश्री बाजी विश्वासराव याचा, आजपासून पंधरा राजा साहेबापासीं पाठवून देऊं. गांवची कमावीस बहुजूर असे. यांत जें होईल ते चौकशीनें अंतर न करता दाखल करूं. साल हाल दाखल करूं. आयंदे सालची करारवाकई (?) करूं. एक बिघा जमीन पडों न देऊं. रयतेस राजी राखों. पेशतर सालची छावनींत कमी पडली तर जिम्मा आपला असे. छ ४ रमजान सन ११७७, बहुत काय लिहिणें ? हे विज्ञप्ति२
गोही
पत्राप्रों साक्ष
नारो केशव हेजीब प्रा। नासौक.
रो. सोयेजी पा।
मौजे सबदरी प्रा। नासीक
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तेरावा (थोरले माधवराव)
पत्रांक १०६.
१७६७ ता. ११ सप्तंबर. श्री. १६८९ भाद्रपद वद्य ३.
श्रीमंत राजेश्री तात्या स्वामीचे शेवेसीः—
आज्ञाधारक देशमुख व देशपांडे पा। सेवगांव साष्टांग नमस्कार विनंति, येथील ता। छ १७ रा।खर पावेतों स्वामीचे कृपा अवलोकनेंकरून सेवकानें यथास्थित असे विशेष. पा।गणे मजकुरीं श्रीमंत साहेबी कबूतरा बा। पट्टी पेशजीची बाकी शहाजादी याची, तो ऐन सरकारांत घ्यावासा जाला. त्यावरून आज्ञा जाली कीं, पट्टी करून देणें. राजश्री नारो बाबाजी सुभेदार याजकडे तहशील सांगितली. त्यावरून दुतर्फा जाहागिरदार सिंदे व होळकर याजकडील तहशील वसूल जाली. तनखा दर शेकडा बत्तीसप्रमाणें घेतलें. श्रीमंत राजश्री बापूसाहेबाचे जागिरीचें गांव तो ऐवज गांवगन्ना यानें देविला नाही. सबब कीं तमाम कच्चा अंमल त्यांचा. पन्नास हजाराची वांटणी त्याजकडील. गांवतनखा दरशेकडा बावीसप्रमाणें, त्यांनीं राजश्री यशवंतराव गंगाधर याजकडे आपणापासून दिधले. गांवबगाव तहशील करूं दिधली नाहीं. त्यांनीं आपणापासून दिधले. स्वामीकडील गावचें काम पट्टीचे राजेश्री राघोपंतबाबापाशीं विल्हे लाऊन दिधले. पंतांनीं बहूत रदबदल सक्त केली. समर्थाचें काम; आमचा उपाय काय? त्यांच्या संतोषास आलें त्याप्रमाणें दर शेकडा एकोणीसाप्रमाणें करार करून दिधला. बरें, समर्थाच्या पायाची जोड आहे. आम्हांस संकटांतून पार करणार आपण माहेत. सारांश, धन्यांनीं आमचे गरिबीवर दृष्टी देऊन स्थापना केली, हा निर्वाह करणार आपण समर्थ आहेत. बहूत काय लिहिणें. कृपा निरंतर असों द्यावी हे विज्ञाप्ती. गांवचा हिशेब व शिवाय परगणे अलाहिदा शेवेची पाठविला असे. विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तेरावा (थोरले माधवराव)
पत्रांक १०५.
१७६७ ता. ४ आगष्ट. श्री. १६८९ श्रावण शुद्ध ९.
दर्या पो मोकदम व समस्त दाहीजन मौजे साकेगांव पा। सेवगांव सु।। सन ११७७ कारण साहेबाचे सेवेसी लिहून दिधलें ऐसाजे. राजश्री बापूजी नीळकंठ याचे विद्यमानची बाकी सन खमस सितैन व सन सीत सितैन दुसाला गांवाकडे राहिली आहे, त्याचा तगादा साहेबीं केला. त्यास साहेबीं एक कारकून गांवास पाठवावा आणि जरीबा (१) करावें. जरीबाचे रुईनें बाकीचा ऐवज ज्याजकडे देणेंस निघल तैसा साहेबाचे अंमलापासून देऊं. त्यांत अंतर होणार नाहीं. जरीवास आपण योग्य असों. हे लिहलें सही.
छ ८ रावल. नि।। नांगर.
हा माणकोजी शामराज कुळकर्णी मौजे मा।र.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तेरावा (थोरले माधवराव)
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तेरावा (थोरले माधवराव)
पत्रांक १०१. नकल
१७६२ ता. ३० आक्टोबर श्री. १६८४ कार्तिक शुद्ध १३
अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य राजश्री त्रिंबक सुर्याजी गोसावी यांसिः-
स्नो रघुनाथ बाजीराव आशिर्वाद सु।। सलास सितैन मया व अलफ. किल्ले त्रिंबक येथील कारखानिसी पेशजीपासून गणेश सूर्याजी याजकडे आहे. त्याप्रमाणें करार असे. तरी तुम्ही मशारनिल्हेचे हातून कारखानिसीचे कामकाज घेऊन वर्तन पावित जाणें. जाणिजे. छ १२ रबिलाखर. आज्ञा प्रमाण.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तेरावा (थोरले माधवराव)
पत्रांक १००.
१७६२ ता. ३० आक्टोबर. श्री. १६८४ कार्तिक शुद्ध १३.
अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य राजश्री त्रिंबक सुर्याजी गोसावी यांसिः-
श्री।। रघुनाथ बाजीराव आशिर्वाद सु।। सलास सितैन मया व अलफ. मौजे साकेगांव पो माणिकपुंज हा गांव तुम्हांस जाहागीर देखील सरदेशमुखी दिल्हा असे. याचा करार रुपये
२००० इनाम दरसालिना
३००० तैनात देखील पालखी
१२०० कदीम
१८०० जास्ती
-------------
३०००
-----------
५०००
येकण पांच हजार रुपयांचा गांव तुम्हांस दिल्हा असे. सदर्हू गांवचा वसूल आकारामुळें कमी झाला तर कच्चा वसूल मनास आणून, तेथील वावती व मोकासा हरप्रकार ऐवज पुरऊन दिल्हा जाईल. ज्याजती झाल्यास सरकारांत घेतला जाईल. जाणिजे छ १२ रबिलाखर आज्ञप्रमाण.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तेरावा (थोरले माधवराव)
पत्रांक ९९ (अस्सलबाानकल ).
१७७० ता. १८ आगष्ट श्री. १६९२ श्रावण वद्य १२.
राजमान्य राजश्री बाबूराव रामचंद्र गोसावी यांसीः-
सेवक माधवराव बल्लाळ प्रधान नमस्कार. सुमा इहिदे सबैन मया व अलफ. तुह्मांस पेशजी तीर्थस्वरूप राजश्री दादासाहेब यांनी आनंदवल्लीस केशो गोविंद याजवळ ठेविलें होतें. त्यास केशो गोविंद याचे हिशेबी शिलक नख्त व ऐन जिन्नस वजनी सुपारी वगैरे बाकी उतरली आहे, ते कोण्हीकडे कसकशी दिल्ही त्याचा फडशा जाला पाहिजे. यास्तव हें पत्र सादर केलें असे. तरी देखत पत्र सदरहू बाकीच्या पावत्या (कबज्या) असतील त्या घेऊन हुजूर येणें. जाणिजे, छ २६ रबिलाखर आज्ञा प्रमाण. मोर्तब.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तेरावा (थोरले माधवराव)
पत्रांक ९८.
१७६८ ता. ४ मे. श्री. १६९० वैशाख वद्य २.
सेवेसी चिंतो विठल सां नमस्कार विज्ञापना. ता। छ १६ जिल्हेज पर्यंत येथास्थीत असे. विशेष. रो त्रिंबकपंत व नानाजीपंत यांचें कुलकर्ण मौजे सिनोली तो घोडें येथील आहे. त्यास नानाजीपंताचे पुत्रानें रो मोरोपंत गोळे याचें कर्ज होतें. त्यास कुलकर्ण कर्जाचे ऐवजी लिहून दिल्हें. मोरोपंत यांणीं संध (संधि) पाहून कर्जाकरितां निकड करून, बसऊन, सा-या वतनाचा दागद करून घेतला. त्यास नानाजीपंताचे पुत्रानें निमें वतन देणें तरी द्यावें. त्रिंबकपंताचे वांटणीचें द्यावयासी समंध नाहीं. येविसीचें वाजवी वर्तमान मनास आणून विल्हेस लावावें म्हणऊन श्रीमंतांनीं आपणास पत्र लिहिलें आहे. त्यास आपण वर्तमान मनास आणून वाजवीचे रीतीनें विल्हेस लाविलें पाहिजे, बहुत काय लिहिणें ? सेवेसी निवेदन होय हे विनंती.