Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तेरावा (थोरले माधवराव)
पत्रांक ७७.
१७६३ ता. ३० दिसेंबर श्री १६८५ मार्गशीर्ष वद्य ११
राजश्री चिंतो विठ्ठल गोसावी यांसिः-
उपरि. येथील कुशल जाणोन स्वकीय लिहिणें. विशेष. श्री देवदेवेश्वर वास्तव्य पर्वती येथील खर्च पेशजीपासून राजश्री जिवाजी गणेश याजकडून पावत. होती ( ? ) त्यास साल मजकुरीं ऐन जिनसी खर्च व इमारत खर्च व चौकीस प्यादे वगैरे लोक आहेत त्याचा खर्च पूर्ववत् प्रों मा।रनिलेनी चालवावा या प्रों करार करून पत्र सादर केलें आहे. नख्ती नेमणूक देवाची वगैरे हुजूर खासगीकडून करून घ्यावयाविशीं तुह्मांस पत्र सादर केलें आहे. तुह्मी नख्ती नेमणूक करून देणें. नेमणूकेस रा। बाजी बाबूराव याचे तसलमातीस दोन हजार रुपयेपर्यंत ठेवावे लागतात. सबब कीं, नेमणूक करून खर्चाची दिल्ही-यांत कमी येईल; यास्तव मोघम दोन हजार रुपये तसलमातीस द्यावें. या ऐवजी मा।रनिलेनीं कार्याकारण देवाच्या पूजेच्या साहित्यांत न्यून न पडे या त-हेनें खर्च करावा. मा।रनिलेच्या तसलमातीस ऐवज दिल्हा म्हणोन वावगा खर्च मनमानेसा केल्यास कामास येणार नाही. याप्रों साफ ताकीद करावी. देवाचे पूजेस वगैरे खर्च नेमणूक प्रों यथास्थित करावा. कमी करूं नये. सारांश देवेश्वरचा खर्च यथास्थित चाले व कांहीं तोटा न पडे ते करणें, व हिशेब बाजीपंतांनीं सालिना आणून समजवावा. कमी ज्याजती आज्ञा होईल त्याप्रों बंदोबस्त करीत जावा. येणें प्रों बंदोबस्त करून घेणें. जाणिजे. छ २४ जमादिलाखर बहुत काय लिहिणे ?
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तेरावा (थोरले माधवराव)
पत्रांक ७६.
१७६३ ताा २९ दिसेंबर श्री १६८५ मार्गशिर्ष वद्य १०
राजश्री चिंतो* विठ्ठल गोसावी यांसिः-
उपरी. श्रीदेवदेवेश्वर वास्तव्य पर्वती येथील बेगमी ऐनजीनसाची व इमारतखर्च वगैरे जें कर्णे ते खाजगी नि।। जिवाजी४t गणेश यांणी करून द्यावी. येविसी मारनिलेस अलाहिदा पत्र सादर आहे, त्याप्रों मानिले बेगमी करून देत जातील. नख्ती बेगमी ५खाजगीकडून नसावी, §हुजूरून करून द्यावी, ऐसा करार करून बाजी बाबूराव याजबरोबर यादी पाठविल्या आहेत. तरी तुम्ही यादीप्रमाणें देवदेवेश्वरचा ६बेहडा नख्ती खर्चाचा करून देणें. ऐनजिनसाचा वगैरे खर्च चालावयाविसी तुम्हीहि गोविंद१ सिवराम यांसि ताकीद करून देवणें. जाणिजे. छ २३ जमादिलाखर सा अर्बा सितैन मया व अलफ बहुत काय लिहिणे२?
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तेरावा (थोरले माधवराव)
पेशवे प्रकरण.
या प्रकरणांतील कांहीं पत्रे फारच महत्वाचीं आहेत. केंदूर गायकवाडांस दिलें ह्यांत राघोबादादांची धूर्तता दिसून येते. पर्वतीसंस्थानच्या खर्चाची व्यवस्था स्मरणीय आहे. चिंतो विठ्ठल रायरीकर हे फडनीशीचें काम बघत म्हणून त्यांच्या संग्रहांत ह्या पर्वतीच्या सनदा सांपडतात. पत्रांक ७९ मध्यें मल्हारराव होळकरांसंबंधें झालेले रावसाहेब माधवराव यांचे मत स्पष्ट दिसत आहे. १७६४ च्या मे महिन्यांत दादासाहेबांनीं राज्याची उठाठेव करण्यास सुरवात केली. याचवेळीं मोरो नरहर नांवाच्या मनुष्यावर आरोप आणणें, ( पहा पत्रांक ८१) पुरंदर किल्ला कोव्यांनी घेतला तो रावसाहेब पेशव्यांच्या फुसलावणीनें घेतला अशा कंड्या पिकविणे, ठाण्याची आदलाबदल करूं देत नाहीं म्हणून दादांनी तट्ट फुगून बसणे इत्यादि आनंदीबाईच्या अघोर आगलावीपणाचे चाळे सुरू झाले. ८१-८३ पत्रांकवरून चिंतोपंतांची रावसाहेबांनी कशी कान उघाडणी केली आहे व परोक्षतः दादासाहेबांस किती छान उपदेश केला आहे हे समजून येतें. पत्रांक ८५ मध्यें दादासाहेबांची भोळसर कुटिलता दृग्गोचर होते. पत्रांक ८७, ८८ व ८९ हीं रावसाहेबांची देशाभिमानी नम्रता कशी उज्वळ होती, याची साक्ष देतात. बाकीचीं पत्रें न्याय, नेमणुकासंबंधांचीं आहेत. मुख्य गोष्ट ही कीं, रावसाहेबांविरुद्ध आमच्या बाइलबुद्धि दादासाहेबांनीं नांहीं नाहीं ती बालंटें आणली आणि त्या बिचा-या सात्विक व सत्वशील राजबिंड्याच्या पाठीमागें हरणकाळजीचा घातक ससेमिरा लाविला; ही महत्वाचीं गोष्ट रायरीकरांच्या पत्रांवरून सिद्ध होते. नारायणरावाचा साक्षात् खून करणाच्या आनंदीबाईने माधवरावास परोक्षतः क्षयरोगी केलें असे कोणी विधान केलेंच तर तें सत्यापासून फारसे दूर असणार नाहीं.
पत्रांक ७५.
स. १७६३ दिसेंबर आरंभ श्री १६८५ कार्तिक अखेर
केंदूर१ दमाजी२ गायकवाड याजकडे दरोबस्त द्यावें. त्याचे ऐवजीं मौजे मजकूरचा आकार अदमासें सात हजार व ३कित्ता दरसाल रुपये दहा हजार एकूण सतरा हजार रुपये-याचा सरंजाम श्रीमंताकडे रेवातीरीं द्यावा. विद्यमान खासा मशारनिले. हस्ताक्षर रामचंद्र यसवंत सन अर्बा सितैन कार्तिक अखेर.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तेरावा (थोरले माधवराव)
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तेरावा (थोरले माधवराव)
पत्रांक ७०.
१७७१ ता. ३ सप्तंबर श्री. १६९३ श्रावण वद्य ९
राजश्री विसाजी कृष्ण गोसावी यांसिः-
अखंडितलक्ष्मीअलंकृतराजमान्य स्ने। हरकूबाई होळकर दंडवत. सु।। इसन्ने सबैन मया व अलफ. तुम्हीं पत्र पाठविले ते पावलें. हरी-रामभवानीदास याजकडील ऐवजाचा मजकूर लिहिला त्यास मशारनिले तुम्हांपासी शिरपुरास आले आहे ( त ) तुह्मीं (व) ते समजाऊन पुरशा (फडच्या ?) करोन घेणे. आह्मांस दर घडी वारंवार लिहितां, याचें कारण काय ? आम्हीं कांहीं जामिन नाहीं. जामिन-रोखाही तुह्मांस दिल्हा नाहीं. तुमचे माणसांस पुसावें. ताकीद करोन तुम्हांकडे पा। आहे. पुरशी (फडच्या ?) करोन घेणें जाणिजे. छ २३ जमादिलावल बहुत काय लिहिणें ? ।
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तेरावा (थोरले माधवराव)
पत्रांक ६९.
१७७१ ता. २४ जून श्री. १६९३ अधिक आषाढ शुद्ध १२
हें राजश्री विसाजी कृष्ण मुक्काम तारिवे ( ? ) गोसावी यांसिः-
अखंडितलक्ष्मी-अलंकृतराजमान्य स्ने। १हरकूबाई होळकर दंडवत. सु॥ इसन्ने सबैन मया व अलफ. हरीराम-भवानीदास याजकडे तुमचा ऐवज येणें, त्यांचा फडशा करावयासी प्रा(ण ?)नाथ भवानीदास सिरपुरास आले आहे(त?). तरी तुम्ही त्यासी तगादा न करीतां सोहलतीनें ऐवज वसूल करोन घेणें. ऐवजाचें काम, यास्तव लिहिलें असे. जाणिजे. रा। छ १० रबिलावल बहुत काय लिहिणे ?
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तेरावा (थोरले माधवराव)
पत्रांक ६८.
स. १७६८ ता. ५ मार्च श्री. १६८९ फाल्गुन वद्य २
†मो। अनाम चौधरी कानगो पा। शिरोंज यांस तुकोजी होळकर. सु।। समान सितैन मया व अलफ. ३राजश्री चिंतो विठ्ठल यांचे पागेची बोली सरकारांत करून त्यांचे तैनात येवजीं पा-मजकुर पो गांव तनखा रुपये १५००० पंधरा हजाराचे पेस्तर साला-पासोन करार करून देऊन हे सनद तुम्हांस सादर केली आहे. तरी पा।-मजकुरचे पंधरा हजारांचे गांव इस्तावियानें लावणी होऊन उमेदीस पंधरा हजार रुपये आकार होतील ऐसे गांव एकास एक लगते पेस्तर साला पासून नेमून देणें. जाणिजे. छ १ सवाल.
बार
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तेरावा (थोरले माधवराव)
पत्रांक ६७.
स. १७६८ ता. २० फेब्रुवारी श्री. फाल्गुन शुद्ध २ शके १६८९
राजश्री विठ्ठल हरी गोसावी यासिः-
अखंडित-लक्ष्मी-अलंकृत-राजमान्य श्रो तुकोजी होळकर. दंडवत. सु।। समान सितैन मया व अलफ. राजश्री १माहादाजी गोंविद नि।। राजश्री चिंतो विठ्ठल यासी *नालबंदी ऐवजी रो २६०० दोन हजार सहासे तुम्हाकडून देविले आहेत. तरी सदरहू तुम्हाकडील रसदे ऐवजीं सविससे रो मशारनिलेस पावते करुन २कबज घेणें, छ १ सवाल बहुत काय लिहिणें ?
बार
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तेरावा (थोरले माधवराव)
पत्रांक ६६.
इ. स. १७६८ ता. १० फेब्रुवारी श्री. १६८९ फाल्गुन शुद्ध २
राजश्री व्यंकटराव कासी का। दार पा। सीरोज गोसावी यांसिः
अखंडित-लक्ष्मी-अलंकृत-राजमान्य स्ने॥ तुकोजी होळकर. दंडवत. सु॥ समान सितैन मया व अलफ. राजश्री चिंतो२ विठ्ठल याचे पागेची बोली करून त्याचे तैनात ऐवजीं पा। मजकूर पैकीं गांवे३ तनखा रु॥ १५००० पंधरा हजाराचे पेस्तर सालापासून करार करून हें पत्र तुह्मांस सादर केलें आहे. तरी पा। मजकूरचे पंधरा हजाराचे गांव इस्तावियानें लावणी होऊन उमेदीस४ पंधरा हजार आकार होतील ऐसे गांव एकास एक लगते ५पेस्तरसालापासून नेमून देणें. साल मजकुराचा ६फडच्या येथे जाला असे. जाणिजे. छ १ सवाल बहूत काय लिहिणें?
बार
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तेरावा (थोरले माधवराव)
पत्रांक ६५.
१७६७ ता. ९ दिसेंबर श्री. १६८९ मार्गशीष वद्य ४
राजश्री माधवराव ३बांडे वगैरे समस्त बांडे गोसावी यांसिः-
अखडितलक्ष्मी-अलंकृत राजमान्य स्ने।। चिंतामण हरि सुभेदार †आशिवार्द. उपरी. येथील कुशल जाणोन स्वकीये कुशल लिहीत असावें. विशेष प॥ नंदुरबार येथील तुम्हाकडील मुकासा सरकारांत जप्त करून कमावीस $सुभां सांगितली. सुभाहून पा।मा।रचे मुकासियाची कमावीस राजश्री शंकराजी खंडेराव यास सांगितली असे. तरी सदरहू मुकासियाचा अंमल मानिले करितील. तुम्ही १दखलागिरी न करणे. रा। छ १७ रजब सु॥ समान सितैन मया अलफ. बहुत काय लिहीणें ?
बार