Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक १००
१५८४ श्रावण वद्य १४
.॥ अज रखतखाने मो अनाम राजश्री रायाजी राजे घोरपडे साहेबु दामदौलतहू ता। हुदेदारानि मोकदमानि मौजे एरोले पा। कर्हाड सु॥ सलास सितैन अलफ कमलनयन गोसावी मठ सदानद (मौजे) नींब यासी पेसजीचे इनाम +दे जमीन बिघे
५ आहेत ते त्याचे दुमाला करणे दरीबाब ताकीद असे मो। (शिक्का)
तेरीख २७ जिल्हेज
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ९९
१५८४ आषाढ वद्य ६
(शिक्का)
आज दिवाण ठाणा ता। तारगाऊ ताहा हुदेदारानी व मोकदमानी मौजे निगडी किले सतारा सुहूर सन सलास सितैन अलफ दरीविले खुर्दवत बतेरीख १९ जिलकाद दरवझबदल इनाम बो। कलमनयन गोसावी मानभाव सो। समय निंब पा। वाई यास बदल धर्मादाऊ जमीन बिघे १५ दर सवाद मौजे मजकूर पैकी देखील मळा बिघे
२ नजीक समाधी अजरामहर्हामत करून दिल्हे असे देखील महसूल व नख्तयाती व बाजे उजूहाती कुलबाब व कुलकानूनात दिल्हे असे दुमाला कीजे हद महदूद घालून देणे दरसाला ताजा खुर्दखताचे उजूर न करणे या इनामास हिदू अगर मुसलमान इस्कील करील त्यास महजब बा। सौगद असे तालिक लिहून घेऊन असल खु॥ इनामदारमजकुरास परतोन देणे ह्मणौन मौजे मा। खु॥ रवा असे बा। खुर्दखतप्रमाणे गोसावी यास देखील मळा बिघे दोनी व इनाम जमीन बिघे
१३ + + + + बिघे
१५ दिल्हे असे हद महदूद घालून दुमाला कीजे तालिक लिहून घेऊन असल खुर्दखत मिसेली परतोन देणे दरसाला ताजा मिसलीचे उजूर न करणे मोर्तब (शिक्का)
तेरीख ९ माहे जिल्हेज
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ९८
१५८३ माघ शुध्द ३
(शिक्का)
अज रखतखाने खुदायवंद खा। शर्जाखान साहेब खुलीदयामदौलतहू बजानेब कारकुनानि व हाल व इस्तकबाल देशमुखानि पा। वाई बिदानद सु॥ इसने सितैन अलफ दरीविला कमलनयन गोसावी मोकाम मठ सदानंद मोजे नीब पा। मा। हुजूर येऊन मालूम केले जे आपणास इनाम जमीन बिघे .।. तीस दर सवाद मौजे इडमिडे ता। कारवे पा। कर्हाड जहाती भंडारा बा। खु॥ धारोजी राजे मोहिते व मुकासाइयानि माजी भोगवटा तसरुफात सालाबाद ता। सालगु॥ चालिले आहे हाली मौजे मा। किले खा। सरंबजखान पणीयासि साहेब मुकासा दीधला आहे व साहेबास मुकासा नवा अर्जानी जाला आहे माहाली कारकून ताजा खु॥ उजूर करून दुमाले करीत नाहीत फकीराचा इनाम आहे नजर इनायती फर्माऊन दुमाले खु॥ मर्हामत केले पाहिजे बराय मालुमाती गोसावीमजकूर खातिरेसी आणऊन सरदहू इनाम दे॥ माहासूल नखतयाती व बाजेपटीया व वेठी बेगारी व फर्मायती कुलबाब कुलकानू बा। खु॥ मोकासाइयानि माजी भोगवटा व तसरुफाती ता। सालगु॥ चालिले असेल तेणेप्रमाणे दुमाले केले असे दुमाले करून चालवीजे दर हर साला ताजा खु॥ उजूर न कीजे तालीक घेऊन असल खु॥ परतून दीजे हिंदू अगर मुसलमान होऊन इस्कील करील त्यास आपले महजदाची सौगंद असे पा। हुजूर
तेरीख १ माहे जमादिलाखर (शिक्का)
जमादिलाखर रुजु शुरुनिवीस
पौ छ १ रजब
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ९७
१५८२ आश्विन वद्य १४
सदानंद
अजरख्तखान मशरुल अनाम राजश्री अंबाजी राजे घोरपडे साहेब दामदौलतहू ता। हुदेदारानी हाल व इस्तकबाल व मोकदमानी मौजे चिचणारे किले ताथोडे बिदानंद सु॥ इहिदे सितैन अलफ कमलनयनगिरी सन्यासी मठ मा। मौजे निंब हुजूर येऊन मालूम केले जे आपणास धर्मादाऊ गला गहू कैली कुडो .।. पाच मौजे मा। प्रा। नख्त खरीदपैकी साल दरसाल देविले होते ते पावत गेले सालमजकुराकारणे महाली कारकून ताजे खुर्दखताचे उजूर करितात ह्मणौन मालूम केले तरी सन्यासी मजकुरास धर्मादाऊ देविले असे त्यास साल दरसाल ताजा खुर्दखताचे उजूर करणे काय माना आता बा। खु॥ धर्मादाऊ गहू कुडो पाच दो साला प्रा। ना। खरीद कि॥पैकी देत जाणे दरसाल ताजा खुर्दखताचे उजूर न कीजे तालिक लेहून घेऊन असल परतोन दीजे (शिक्का)
तेरीख २७ माहे सफर
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ९६
१५७९ आश्विन शुध्द ३
अज दिवाण ठाणा देहाय ता। पाली ता। हुदेदारानी व मोकदमानी मौजे उडतरे सु॥ समान खमसैन अलफ दरी वख्त खुर्दखत छ २७ माहे जिल्हेज पैवस्ती छ २५ माहे मोहारम तेथे रजा जे सदानद गोसावी साकीन निंब यासी मौजे मजकुरी इनाम जमीन बिघे । तीस दिल्हे आहे बा। भोगवटा कारकीर्दी पेशजी दस्तीबाद आहे त्याणेप्रमाणे दिल्हे असे दुबाला करणे मणून बा। खुर्दखत इनाम जमीन । बिघे तीस दिल्हे असे जेणेप्रो। भोगवटा सालाबादप्रमाणे दिल्हे असे दुबाला करणे तालिक लेहून घेऊनु असल मिसेली परतूनु दीजे मोर्तब
तेरीख २ माहे मोहरम
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ९५
१५७९ भाद्रपद शुध्द १
सदानंद
अज रखतखाने मा। अनाम राजश्री अबाजी राजे घाटे साहे दामदौलतहू ता। हुदेदारानि हाल व इस्तकबाल व मोकदमानि चिंचणेर किले ताथोटे बिदानद सु॥ समान खमसैन व अलफ दरवज बदल धर्मादाउ कमलनयनगिरी सन्यासी मठ मुकाम मौजे नीब पा। वाई यासि गहू कैली .।. पाच कुडो देविले असे आदा कीजे पेस्तर साल दर साल देत जाणे दर हर साला ताजा खुर्दखताचे उजूर न करणे तालीक लेहून घेउनु असल परतोन देणे मा। (शिक्का)
तेरीख २३ माहे जिल्हेज
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ९४
१५७९ भाद्रपद शुध्द १
कमलनयनगिरी सन्यासी मठ श्री मो। मौजे नीब पा। वाई सु॥ समान खमसैन अलफ कागद पाठविले मनास आले इनाम मौजे गोवे व नींबमधे आहे त्यास पैकेचे तगादा लाविला आहे ह्मणौन ऊन लिहिले तर या वकतास ताकीद लिहिले आहे तसवीस ने दीजे मोर्तब सूद (शिक्का)
तेरीख २९ माहे जिलकाद
जिलकाद
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ९३
१५७९ चैत्र वद्य १
रा। वेंकाजी नरसीह हुदेदार व मोकदमानि मौजे निंब पा। वाई सु॥ सबा खमसैन अलफ दरीविले जोगीद्र गोसावी सदानदाचे मठपतीयाचे फर्जद गोविदगीरी मालूम केले जे मौजे मा। लग्ना मुहूर्त होते तेथे जगम आह्मासी कुसूर करिताती पान- मान लग्न मोहूर्त यास आपणास टाकून जगम जातो ह्मणौऊन मालूम केले तरी सालाबाद चालिले अमलास नवी जिकीर करावया जंगमाचे काय अबजा आहे आता ताकीद पाहाताच जगमास ताकीद करून हाल खुद ठेऊन सालाबादप्रमाणे त्याचे पानमान औलाद अफलाद जैसे चालिले असेल त्याप्रमाणे चालवणे तालीक घेऊन असल परतून दीजे मोर्तब सूद (शिक्का)
तेरीख १४ माहे जमादिलाखर
जमादिलाखर
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ९२
१५७६ चैत्र वद्य १२
(शिक्का)
अज रखतखाने राजश्री संभाजी राजे दामदौलतहू बजानेबु कारकुनानि
हाल व इस्तकबाल का। बालाघाट किले पनाला बिदानंद सु॥ अर्बा खमसैन अलफ बो। मधुकरगिरी गोसावी हुजूर येऊन मालूम केले जे आपला मठ मौजे आंबोडे का। मजकूर तेथे आहे यास इनाम जमीन बिघे साडेच्यारी आहे यासि माहाली कारकून इनामपटी मागताती ह्मणोनु मालूम केले तरी गोसावियास इनामपटी माफ केली असे यासि एकजरा हली व पेस्तर तसवीस लागो ने देणे फिर्यादी येऊ ने देवणे तालीक लेहोनु घेऊन असेली खुर्दखत फिराऊन देणे दर हर साला ताजा खुर्दखताचा उजूर न करणे पा। हुजूर रा। गोविंद माहादेऊ मजकूदार मोर्तबु ता। सन इसने चालत असेली त्याणेप्रमाणे चालवणे (शिक्का)
तेरीख २५ रुजु सुरुनिवीस
जमादिळोवल सुरु सूद
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ९१
१५७५ मार्गशीर्ष शुध्द १४
(शिक्का) (फारसी मजकूर) (शिक्का)
अज दिवाण किले चंदन ता। मोकदमानि वा रयानी देहाय पा। कुडाल मु॥ किले मजकूर सु॥ अर्बा खमसैन व अलफ दरीविला जोगींद्र चेला कमळनयन गोसावी मोकाम मौजे नींब पा। वाई मालूम केले जे वझ भंडारा श्री --- देव मोकाम मौजे मजकूर दर गावगाना व्रितीपत्र गला गेहू वा तुरी तालुक देहाय किले मजकूर चालिले असे ते ताकीद करून देविले पाहिजे ह्मणौउनु व्रितीपत्र दाखविले तरी बा। विरीतीपत्र साबिकाप्रमाणे वझ भंडारा देव श्री ------ मोकाम मौजे नींब यासि आदा कीजे
→पुढे वाचण्यासाठी इथे क्लिक करा