Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ९०
१५७५ मार्गशीर्ष शुध्द १३
(शिक्का)
(फारसी मजकूर)
अज दिवाण किले चदन ता। मोकदमानि देहाय पा। कुडाल मु॥ किले मजकूर सु॥ अर्बा खमसैन व अलफ दरीविला जोगीइद्र गोसावी मोकाम मौजे नीब पा। वाई मालूम केले जे वझ भडारा श्री मोकाम मौजे मजकूर दर गावगाना व्रीतीपत्र चालिले असे ते ताकीद करून देवणे ह्मणौऊन वृत्तीपत्रे दाखविली तरी बा। वृत्तीपत्र साबिका प्रमाणे वझ भडारा देव सदरहू आदा कीजे फिर्यादी येऊ न दीजे मो (शिक्का)
तेरीख ११ माहे मोहरम
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ८९
१५७२
आनंदगीर गोसावी
बि। बो। एसाजी कोकाटा प्रा। नीब यास भीमाजी कदम यास जमान जबानी पा। मौजे अरले सा। नीब पा। वाई सु॥ इहिदे खमसईन अलफ तुह्मास कागद लेहून दिधले जे वाणिवे रीती गहू .।३ एकून दुणी .lll१ देऊन यास मुदती आहे सिमगामधे देऊन जरी ने दु तरी दुणीप्रमाणे देऊन हा कतबा सेहे
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ८८
१५७१ माघ वद्य १०
(शिक्का) (फारसी मजकूर) (शिक्का)
अज दिवाण पा। वाई ता। मोकदमानि मौजे गोवे सा। नीब पा। मजकूर बिदानद सु॥ खमसैन अलफ मौजे मजकुरी कालवा पाणीयाचा धरिला आहे त्यास आठ रोजास सारोन पाणी तुह्मी घेणे व दोनी ++++++++++++ देणे एणेप्रमाणे मोईन केली आहे तेणेप्रमाणे चालवणे उजूर न कीजे मोर्तब (शिक्का)
तेरीख २३ माहे सफर
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ८७
१५७१ ज्येष्ठ वद्य १३
(शिक्का)
(फारसी मजकूर)
अज रखतखाने खोदायवद खाने अलीशान खा। अफजलखान महमदशाही खुलीदयामदौद्यलतहू बजानेब कारकुनानि हाल वा इस्तकबाल व देसमुखान पा। वाई बिदानद सु॥सन खमसैन अलफ दरीविले गोविंदगीर मुरीद कमलनयन हुजरु येउनु मालूम केले जे अपुले इनामत मळे मौजे गोवा सा। नीबासी सालाबाद धरण कलवायत असे तरी हाली महिमाजी पटेल मौजे मजकूर जाजती करून पणीसी खलील करून दर हफतेसी दोनी रोज घेणे ह्मणुनु बोलत असे साहेबी नजर इनायत फर्माउनु सालाबाद अपुले कलवा कैसे चालत होते त्याणेप्रमाणे दुबाला करून चालवावया रजा होय ह्मणुनु मालूम जाहले मेबायद के गोविंदगीर मुरीद कमलनयनाचे मलेसी सालाबाद तागाईत साल गुदस्ता कलवा पाणी कैसे आलाहिदा चालत होते त्याणेप्रमाणे चालवीजे नवे जिकीर करणे निसबत नाही दरी बाब फरीयाद येऊ ने दीजे बऔलाद वा अहफाद चालवीजे दर हर साला खुर्दखताचे उजूर न कीजे तालीक लेहून घेउनु असल खुर्दखत परतुनु दीजे पा। हुजरु रा। देवीदास मोर्तब सुदु सालगु॥ इस्कील जाली आहे त्याचा उजूर न करणे मोर्तब सूद (शिक्का)
रुजु सुरनिवीस
तेरीख २६ जमादिलोवल सुरु सूद
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ८६
१५७० मार्गशीर्ष वद्य ३
(शिक्का) (शिक्का)
अज दिवाण पा। वाई ता। मोकदमानी दुदेहे मोजे निब मौजे गोवे सा। निंब पा। मजकूर बिदानद सु॥ इहिदे खमसैन अलफ बा। खु॥ रा। छ ९ रबिलोवल दरसाल सन तिसा अर्बैन अलफ सादर जाहले जे दरीविले गोविंदगिरी गोसावी मुरीद कलनयन गोसावी हुजूर येऊन मालूम केले जे आपणास इनाम जमीन चावर १ एक दर सवाद मौजे निंब निम .॥. चावर मोजे गोवे निम .॥. चावर कारकीर्दी दर कारकीदी्र मोकासाईयानी माजी मुतैन रवा अस्त सालाबाद भोगवटा व तसरुफाती चालत आहे हाली पा। मा। साहेबास मोकासा अर्जानी जाहले आहे महाली कारकुनानी ताजा खुर्दखताचा उजूर करिताती तरी साहेब नजर इनायत फर्माउनु बरहुकूम भोगवटा व तसरुफाती सालाबाद दुबाली फर्मावया रजा होय ह्मणून तरी बराय मालुमाती इनामदार मजकूर खातीरेस आणून सदरहू इनाम दुबाला केले असे बरहुकूम भोगवटा व तसरुफाती सालाबाद तागाइत सालगु॥ कैसे चालिले असेल त्याणेप्रमाणे रुजू पाहौन दुबाला कीजे दर हर साला खु॥चे उजूर न कीजे तालिक लेहोन घेऊनु असल परतौनु खुर्दखत दीजे परवानगी हुजूर इनाम गोवासी फुलाचे झाडासी पाट सालाबादप्रमाणे चालवणे ह्मणौनु रजा बा। रजा सदरहू इनाम दुमाला केले असे भोगवटा व तसरुफातीप्रमाणे दुमाला कीजे तालिक लेहोन घेऊनु असल परतौनु दीजे
तेरीख १६ जिलकाद
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ८५
१५६९ पौष शुध्द १
अज रखतखाने खुदायवद सिदी अजम सिदी मुझार खुली दयामदौलतहू बजानेब कारकुनानि सा। नीब पा। वाई बिदानद सु॥सन समान अरबैन अलफ गोविंदगीर मुरीद कमलनयन गोसावीयासि इनाम जमीन चावर १ एक दर सवाद मौजे नीबमधे असे बा। खुर्दखत चालत आहे त्याप्रमाणे चालावीजे बिमोजीब बरहुकुम फर्मान व खुर्दखत कारकीर्दी दर कारकीर्दी यता। सालगु॥ भोगवटा व तसरुपत पाहून सालाबादप्रमाणे दुमाला कीजे तालीक लिहून घेऊन असल खुर्दखत परतून दीजे दर हर साल खुर्दखतचा उजूर न कीजे छ २९ माहे जिलकाद (शिक्का)
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ८४
१५६७ ज्येष्ठ वद्य २
(शिक्का)
(फारसी मजकूर)
अज रखतखाने खुदायवद खान अलीशान खाने अजम रुस्तुम जमा खुलीदयामदौलतहू बजानेब कारकुनानि हाल व इस्तकबाल व देसमुखानि पा। वाई बिदानद सु॥ सीत अरबैन अलफ जोगीद्रगिरी व गोविंदगिरी मुरीद कमलनयनगिरी सन्यासी मठ सदानद सो। मौजे नीब पा। मजकूर हुजूर मालूम केले जे आपला गुरु कमलनयनगिरीस इनाम बा। खु॥ बडेखान साहेब जमीन चावर १ एक दो। नखतयाती व खा। गला व बेलकटी व मोहीमखर्च व बेठी बेगारी व बाजे बाब कुलबाब कुलकानु भोगवटा तसरुफाती चालत होता गोसावी समवले त्यामधे कोण्ही चालवणार नव्हता आपण यात्रेस गेलो होते याबदल भोगवटा तुटला साहेबी नजर एनायती फर्माउनु आपला इनाम सदरहू मर्हामती होय बराय मालुमाती खातिरेस आणौउनु इनाम दर सवाद मौजे नीब चावर १
थल पवाहा खुर्द दे॥ मा। ना। व खा। गला व बेलकटी व मोहीमपटी व बाजे बाब कुलबाब जमीन हद महदूद घालून दीजे बा। खु॥ पेसजी बडेखान कमलनयनगिरीस चालत आले आहे तेणेप्रमाणे दुमाला कीजे दरम्यान भोगवटा जाला नाही त्याचा उजूर न कीजे बा। खु। बडेखान साहेब प्रमाणे हुजुरुन देविले आहे दुमाला कीजे इस्कील न कीजे औलाद अफलाद चालवीत जाणे तालीक घेउनु असल खुर्दसत फिराउनु दीजे पा। हुजूर मोर्तब सूद (शिक्का)
रुजू दफतरखास रुजू सुरुनिवीस
तेरीख १५ माहे रबिलाखर
रबिलाखर
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ८३
१५६६
.॥ सदानंद गोसावी मु॥ मौजे नीब प्रती दताजी नाईक देसाई पाा वाई सु॥सन खमस अर्बैन अलफ तुह्मास इनाम जमीन चावर १ एक दर सवाद बिाा
मौजे नीब चाा मौजे गोवे चावर
.॥. .॥.
येणेप्रमाणे सालाबाद चालिला आसे हाली साल मजकुरी हुजूरुन खुर्दखत सादर जाहाले की पेसकसीबदल इनाम निमे हक घेणे त्यावरून गोविंदगीर हुजूर जाऊन मालुमाती करून खुर्दखत आणिले की सदरहू इनामासी पेसकसी माफ केली असे यास तसीस न लावणे इनाम बा। भोगवटा सालाबादप्रमाणे दुमाला करणे ह्मणौऊन खु॥ आणिले त्यावरून ठाणासी मिसेली ब॥ खु॥ प्रमाणे
सादर जाहाली असे आता सदरहू पेसकसी हुजरून माफ केली असे तुह्मी आपला इनाम सालाबाद बाा खाऊन सुखे असणे जाणिजे
हे विनती
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ८२
१५६६
॥ मोकदमानी मौजे निंब प्रती दत्ताजी नाइक देसाई पा। वाई लेहावया कारणे ऐसे जे सु।। खमस अर्बैन अलफ जोगीग्रगीर गोसावी हुजूर जाऊन खुर्दवत आणिले की मठ व इनाम आपले दुमाला करणे त्याप्रमाणे ठाणाचे ही मिसेली सादर जाली असे तरी बा। खु॥ व मिसेली मठ व इनाम जोगीद्रगिरीचे दुमाला करणे हरकोणी सोदाई करील त्यास ताकीद करीत जाणे जागीद्रगिरीचे मदत करीत जाणे व पटेलाचे घरी कागद व वस्तभाऊ मठीचे असेल ते देणे उजूर न कीजे मो।
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ८१
१५६६ चैत्र वद्य १०
श्रीगुरुपादुका नमस्तुते
स्वस्तिश्री नृपशालीवाहन शके १५६६ वरुसे तारण संवत्सरे चैत्र वदी दशमी वार सोमवार तदिनी तपोनिधी दसनामा संन्यासी ***** शंकरगौरी ॥१॥ गगा मोहनि ॥२॥ मकुंद भारथी ॥३॥ सहजपुरी ॥४॥ आचळगिरी ॥५॥ सहजगिरी अनतसागर ऐसे समस्त यदसनाम श्रीसंभुहून मौजे निंब मठ श्रीतपोधन सदानंद मठ मानभाव हिगलगिरी सामावले मग त्याचे सीश्य गोविंदगिरी यासी तेथे स्तापना करून पट दिले असे यासी कोणी काही ज्ञानीया कुसूर करील तरी श्री गुरुद्रोह घडेल व दसनामद्रोह घडेल गोविंदगिरीचे मठ करून दिले दुसरेस नाही सत्यापासी कोणी काही कुसूर करील तरी त्यासी श्री दतचे आज्ञा असे हस्त
राजेश्री दत्ताजीराजे देसाई मोकदम मोजे मजकूर
बीजी पटेल कृष्णोजी पटेल
(निशाणी नांगर) (निशाणी नांगर)