Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक १२०
१५९१ आश्विन वद्य ११
(शिक्का)
अज सुभा पा। वाई ता। मोकदमानि मौजे नीब सा। मा। सु॥ सन सबैन अलफ फकीर मठ सदानंद मालूम केले जे आपले इनामतीपैकी उचाती करिताती ह्मणउनु तरी याचे इनामतीपैके उचाती करणे बाजीत नाही याचे इनामास तसवीस न देणे याची फिर्यादी येऊ ने दणे सालाबादप्रमाणे दुमाला केले असे दुमाला करणे पेस्तर दफतर रुजू मिसेली घेणे मोर्तब (शिक्का)
तेरीख २४ जमादिलोवल
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ११९
१५९१ श्रावण वद्य १०
रुजू + + + (शिक्का)
सदानंद मठी
खान अजम सिताबखान सरनाइकवाडी किले सतारा व किलेनहाय ता। बाजी पटेल मोकदम व मोकदमानी मौजे निगडी किले मजकूर सु॥ सबैन अलफ चे इनाम मोजे मजा। बिघे
१५ असेती याबाबे तुह्मास साल दरसाल मिसली सादीर होत असेती की इनामाचे जरा बजरा पावते कीजे आणि तुह्मी हरकत करून इनामाचे जरा बजरा हिसेबुप्रमाणे आदा करीत नाही ऐसे बरे नव्हे इनाम खैरातीचे तुकडा असे व याचे इनामावरी काय पैका कोण बाब कैसे कैसे घेता दखल होत नाहीं आता जरा बजरा पावते कीजे फिर्याद येऊ न दीजे फिर्याद आलीया तुह्मी आपले केले पावाल खैरत नव्हे जाणिजे ताकीद असे मोर्तब (शिक्का)
तेरीख २३ माहे रबिलावल
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ११८
१५८९ पौष वद्य ७
रुजू + + + (शिक्का)
अज दिवाण ठाणे पा। कर्हाड ता। मोकदमानी मौजे इडमिडे पा। मजकूर सु॥ समान सितैन अलफ मोजेमजकूर कमलनयन सदानद गोसावी याचे इनाम चावर पाऊण मदतकदम चालत आले आहे तरी गोसावी मशारनुलेचे इनामपैकी उचापती न करणे ते हुजूरन खुर्दखत आणितील तेणेप्रमाणे मिसेल सादर होईल मोर्तब (शिक्का)
तेरीख २० माहे रजब
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ११७
१५८७ फाल्गुन वद्य २
मोकदमान मौजे निंब पा। वाई सु॥ सीत सितैन अलफ जोगीदर गोसावी यासि मोजे मजकुरी इनाम चावर ॥ निम चालत आले आहे ह्मणौन मालूम केले तरी सालाबद ता। सालगु॥ चालत आले असेल तेणेप्रमाणे सालमजकुरी चालवणे उजूर न करणे छ १५ रमजान मोर्तब
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ११६
१५८७ फाल्गुन वद्य २
मोकदमानी मोजे गोवे पा। वाई सु॥ सीत सितैन अलफ जोगीदरनाथ गोसावी याचा इनाम मौजे मा। चावर ॥ निम आहे हे सालाबाद ता। सालगु॥ चालिले असेल तेणेप्रमाणे सालमजकुरी चालवणे उजूर न करणे छ १५ रमजान
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ११५
१५८७ फाल्गुन वद्य २
ता। मोकदमानि मौजे इरमडे ता। कर्हाड सु॥ सीत सितैन अलफ जोगीदर गोसावीयासि मौजे मा। इनाम बिघे तीस आहे सालाबाद चालिले आहे ह्मणौन मालूम केले तरी सालाबाद भोगवटा चालिला तागाईत सालगु॥ चालिले असेल तेणेप्रमाणे सालमजकुरी चालवणे उजूर न करणे छ १५ रमजान (शिक्का)
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ११४
१५८७ कार्तिक वद्य ३
(शिक्का)
अज रखतखाने मा। अनाम राजश्री नरसोजी अबाजी राजे घोरपडे साहेबु दामदौलतहू यता। हुदेदारानि व मोकदमानि मौजे चिचणी किले ताथोडा बिदानद सु॥ सीत सितैन अफल दरवज बदल धर्मादाउ कमलनयनगिरी सन्यासी मठ मुकाम मोजे नीब पा। वाई यासी गहू कैली .।. पाच कुडो देविले असेती आदा कीजे पेस्तर दर हर सालास ताजा खुर्दखताचे उजूर न कीजे तालीक लेहून घेउनु असल परतून दीजे माजी खुर्दखत सन समान छ २३ जिल्हेजी दुमाले केले असे त्याप्रमाणे दुमाले कीजे मो। (शिक्का)
तेरीख १६ माहे जमादिलोवल
जमादिलोवल
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ११३
१५८७ कार्तिक वद्य २
(शिक्का)
अज रखतखाने खुदायवद खा। शर्जाखान खलदयामदौलतहू (बजानेबु) कारकुनानि पा। वाई बिदानद सु॥ सीत सितैन अलफ दरीविले गोविंदगिरी मुरीद कमळनयन + + हुजूर येउनु मालूम केले जे आपला इनामतीचा मळा मोजे गोवे सा। नीब पा। मजकूर तेथे धरण कालवा सालाबाद अज महतकदम पाणी मळियासि येत असोन हाली मोकदम हरकत करून मळियासि पाणी मिळो देत नाही मळा इनाम निसबती मठ सदानद आहे जागा रवा नेक आहे आपण दुवागीर फकीर आहो साहेबी मेहेरबान होउनु धरण पाणी सालाबाद जैसे आहे तेणेप्रमाणे चाले ऐसा सरजाम फर्माविला पाहिजे ह्मणौउनु ता। हुजूर मालूम केले तरी तुह्मी माहाली कारकून आता फकीराचे इनामास तसवे पाणियास तसवीस होणे अजब आहे हाली रसीदन मिसाल गोविदगिरी मुरीद कमलनयण याचे इनाम मळा जागा रवानेक दर जागा गोवे सालाबाद कारकीर्दी दर कारकीर्दी यास पाणी जैसे हाते तेणेप्रमाणे देवीत जाणे मोकदम तकरार पाणियासि करितो तरी त्यासि ताकीद होय हे काम सहाबाचे आहे बिलाकसूर सालाबाद दरण पाणी देउनु रवानेक जागा जैसा पेसजी होता त्याहून ज्यादा होय ऐसे करून देवणे उजूर न करणे अवलियाद अफवाद चालवणे दर हर साला ताजा खुर्दखताचा उजूर न करणे तालीक लेहोनु घेउनु असेली खुद इनामदार मजकुरास परतू नु देवणे पा। हुजूर मोर्तब सूद (शिक्का)
तेरीख १५ माहे जमादिलोवल रुजु शुरुनिवीस
जमादिलोवल पौ छ ७ माहे जमादिलाखर
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ११२
१५८६ फाल्गुन शुध्द ६
श्रीसदानंद
अज सुभा राजश्री परसोडी माहाडिक सुभेदार नामजाद महाछानिहाय ता। मोकदमानी मौजे निगडी किले सातारे बिदानद खमस सितैन अलफ मोजे मजकुरी श्री याचा इनाम आहे त्याच पैकी लाविले आहेत तरी तुमची खंडणी केली आहे ते इनाम खेरीज करून केली आहे तरी तुह्मी याच्या नामास एक जरीयाची तसवीस न देणे तसवीस दिल्ही अगर काही अजार दिल्हीया तुह्मी जाणा ऐसे समजोन अमल करणे पेस्तर फिर्यादी येऊ न देणे मोर्तब सुद (शिक्का)
तेरीख ४ साबान
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक १११
१५८६ फाल्गुन शुध्द ६
गोसावी सदानंद
मसुरल हजरती राजश्री कारकुनानि पा। कुडाल प्रति वीरो राम सुभेदार ता जाउली सु॥ खमस सितैन अलफ सदानंद गोसावियाचे धर्मादाउ रयती नि॥ दर गावास गला मण एक आहे ह्मणौउनु गोसावियानी सुभा येउनु मालूम केले तरी सालाबाद भोगवटा पाहोन सालाबादप्रमाणे ताकीद करून देविजे धर्मकृत्य आहे उजूर न करणे छ ३ साबान मोर्तब सूद (शिक्का)
शके १६८६