लेखांक ९६
१५७९ आश्विन शुध्द ३
अज दिवाण ठाणा देहाय ता। पाली ता। हुदेदारानी व मोकदमानी मौजे उडतरे सु॥ समान खमसैन अलफ दरी वख्त खुर्दखत छ २७ माहे जिल्हेज पैवस्ती छ २५ माहे मोहारम तेथे रजा जे सदानद गोसावी साकीन निंब यासी मौजे मजकुरी इनाम जमीन बिघे । तीस दिल्हे आहे बा। भोगवटा कारकीर्दी पेशजी दस्तीबाद आहे त्याणेप्रमाणे दिल्हे असे दुबाला करणे मणून बा। खुर्दखत इनाम जमीन । बिघे तीस दिल्हे असे जेणेप्रो। भोगवटा सालाबादप्रमाणे दिल्हे असे दुबाला करणे तालिक लेहून घेऊनु असल मिसेली परतूनु दीजे मोर्तब
तेरीख २ माहे मोहरम