Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ११०
१५८६ मार्गशीर्ष वद्य ४
(शिक्का)
अज दिवाण ठाणे ता। तारगाउ ता। हुदेदारानि व मोकदमानि मौजे निगडी किले सतारा सु॥ खमस सितैन अलफ मोजे मजकुरी कलमनयन गोसावी मो। नीब याचे इनाम बिघे १५ पंधरा आहे त्यास हरएकविसी तसवीस ने दणे गोसावियाचे इनाम आहे जर तसवीस ने दणे उजूर न करणे मो। कुलास लाविले आहे त्यास तोसीस ने दणे मो। (शिक्का)
तेरीख १७ माहे जमादिलोवल
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक १०९
१५८६ कार्तिक वद्य २
(शिक्का)
अज दिवाण पा। वाई ता। कुभारानी मौजे निंब पा। मजकूर सुहुजूर सु॥ सन खमस सितैन अलफ हुजूर मालूम जाहले की तुह्मी मालूम जाहले की तुह्मी मठ सदानद त्यानजीक माती खाणौन तसवीस देता तरी नवी जिकीर करून मठानजीक माती खाणावया तुमचे काय अबाजा आहे सालाबाद जे जागा माती खाणत होतेस तेथे माती खाणे मठानजीक मातीसाठी खाटिलिया ताकीद होइल उजूर असेल तरी हुजूर एणे मोर्तब
तेरीख १५ माहे रबिलाखर
रबिलाखर
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक १०८
१५८६ कार्तिक वद्य २
(शिक्का)
आज दिवाण पा। वाई ता। मोकदमानी मौजे निंब पा। मजकूर सु॥ सन खमस सितैन अलफ मौजे मजकूरी सदानंद गोसावी याचे मठ आहे त्यानजीक कुभार नवी जिकीर करून माती खाणताती आणि तुह्मी त्यास ताकीद करीत नाहीस यावरून मालुम होते की तुह्मी कुंभारास सागोन ऐसे अमल करविता तरी ऐसे न करणे आता सालाबाद कुभार जे जागा माती खाण(त) होते ते जागा माती खाणवणे नवी जिकीर होऊ न देणे नवी जिकीर जाहाली तुह्मी जाणा मोर्तब (शिक्का)
तेरीख १५ माहे रबिलाखर
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक १०७
१५८६ वैशाख वद्य १
शनिवार
राजश्री सदानद गुरुराज मठ नीब
कलमनयन गोसावी
०॥ सौजनसागर इस्टजन मनोहर श्री मोकदमानि मौजे अबवडे का। बालाघाट किले पनाला सु॥सन अर्बा सितैन अलफ प्रती नरसो रामाजी देसकुलकर्णी किले पनाळे आसीर्वाद उपरी आमचे हक मोजे मजकुरी असे त्यापैकी बदल नदादीप व भडारा राजाधिराज माहाराज पा। वाई स्वामीयासि होन २
दोनी देविले असेती ते राजाधिराज श्री यापासी हर साला देत गेले पाहिजे दुसरे उजूर न कीजे साल दर साल कागदाचे उजूर न कीजे औलियाद व अफवाद देविले असे गोसावियासि देणे काही अनमान न करणे हे विनती या कामासि जो कोणी इसिकील करील त्यासि श्री स्वामीची आण असे तालीक लिहून घेऊन असल परतून देणे जाणिजे हे मो।
तेरीख १४ माहे सौवाल क्रोधीनाम सवछरे
वैशाख *शुधी प्रतिपदा शनिवार
विनती
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक १०६
१५८५ ज्येष्ठ वद्य ३
श्रीसदानंद गोसावियाचे मठ
अज रखतखाने मा। अनाम राजश्री अबाजी राजे घाटे साहेब दामदौलतहू ता। हुदेदारानि हाल व इस्तकबाल व मोकदमानि मौजे निगडी किले सातारे सु॥ अर्बा सितैन व अलफ दरीविला जोगीद्रगिरी सन्यासी नि॥ हुजूर मालूम केले आपणास मौजे मजकुरी इनाम बिघे
१५ आहे अनछेत्र चालीस पनास सन्यासी जेविताती त्यास पटेल व कुलकरणी इस्केल करिताती सुरलीत चालवीत नाही त्यास साहेबी ताकीद देविले पाहिजे ह्मणौनु तरी याचे इनामास खलल करणे तुमचे काय अदाजा आहे आता त्याचे इनाम जैसे सालाबाद भोगवटा चालते तेणेप्रमाणे चालवणे इस्कील व खलल न करणे सदरहू जमीन हद महदूद घालून दुमाला करणे त्यानी च लावणी करून घेतील दुसरेयानी फिर्यादी येऊ न दणे तालीक लेहून घेउनु असल खुर्दखत परतोन देणे मोर्तब (शिक्का)
तेरीख १९ माहे जिलकाद
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक १०५
१५८५ वैशाख वद्य ३
सदानंद (शिक्का)
अज दिवाण किले सतारे साहेब सदर ता। हुदेदारानी हाल व इस्तकबाल व मोकदमानी व रयानी मौजे वरीया किले मजकूर बिदानद के हर्ची सुहुर सन सलास सितैन अलफ दरीविला अजरामर्हामत इनाम जोगीद्रगोसावी मोकाम मौजे निंब परगणे वाई दर नजीक यास इनाम बदल खैराती बिघे 6 ५ पाच देखील महसूल व नख्तयाती व जमे लवाजिमात व अखदुलबदिवानी व पटी सिके हुमायून व कारइमारती व बाजेपटे मुबारका व मुतखरका माखनलअमान हरीअलसुरूर व कानू व कानूनात इस्मी व रसमी व कलमी व कदमी व नकदी व जिनस खा। गला व रोगन व लवाजिमा वर्तना हकदार ठाणा देह मजकूर व पटी सादिलवार व फर्मायती वेठबेगार मोकुलबाब कुल खुर्दखत दुबाले केले असे दुबाला कीजे यास अगर कोण्ही इस्कील करील त्यास महजबप्रो। सौगद असे तालीक लेहून घेऊन असल मिसेली परतून दीजे इनामास हदमहदूद घालून दीजे मिसेलीचे उजूर हर साला न कीजे (शिक्का)
तेरीख १६ माहे रमजान
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक १०४
१५८५ चैत्र वद्य १
सदानंद
खान अजम सिताबखान नाइकवाडी किले सतारा ता। हुदेदारानी हाल व इस्तकबाल व मोकदमानी मौजे वरीये किलेमजकूर सु॥ सलास सितैन अलफ वा सन अर्बा सितैन अलफ जोगिंद्रगिरी गोसावी मुकाम मौजे निंब प्रा। वाई नजीक यास इनाम बिगे 6 ५ बदल खैराती देखील माहसूल व नख्तयाती व बाजे उजूहात व वेठबेगार कुलबाब कुलकानू दुंबाले केले असे दुंबाला कीजे यास अगर कोण्ही इस्कील करील त्यास सौगद महजबप्रमाणे असे तालीक लेहून घेऊन असल मिसली परतून दीजे इनामास हदमहदूद घालून दीजे मो। (शिक्का)
तेरीख १५ रमजान
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक १०३
१५८४
(शिक्का)
तां। हुदेदारानि व मोकदमानि मौजे नीब पा। वाई बिदानं(द) सु॥सन सलास सितैन अलफ मौजे मजकुरी कमलनैन गोसावी राहाताती तरी त्याचे इनाम व मठ तेथे असे त्यास एक जरेचे तशवीश व आजार लागो न देणे एकजरेचे आजार तुमचे तर्फेने जाहले ऐसे खबर मालूम जाहालिया बवाजीबी ताकीद होईल हे एकीन समजोन बहुतवजा गोसावियाचे बरदास्त चालवणे दरीबात तकीद असे (शिक्का)
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक १०२
१५८४ माघ वद्य ९
(शिक्का) | शके १५८४ | |
(शिक्का) आज दिवाण किले चदन ता। मोकदमानि वा रायानी | ||
कसबे कुडाल मौजे मरडी मौजे दरे बु॥ मौजे साते मौजे सातारे |
मौजे आरडे मौजे सोनगाउ मौजे करदी मौजे सागवी मौजे रायगाउ |
मौजे महीगाउ मौजे करणोसी मोजे सोपन मौजे ह्मैसव मौजे सेरगाउ |
सु॥ सलास सितैन व अलफ दरीविला जोगीद्र गोसावी मौजे नीब मालूम केले जे आपले विलातीवरी भात कुडो असे ते मागितलेया देत नाहीत हे काय माना असे आता रसीदन मिसेली देखता चि जोगीद्र गोसावियास गला वा बाजे हक सालाबादप्रमाणे आदा कीजे मो। छ २२ जमादिलाखर (शिक्का)
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक १०१
१५८४ माघ वद्य ७
आज दिवाण ठाणे ता। देगाव किले सातारा ता। हुदेदारानी व मोकदमानी मौजे अनेवाडी पा। कुडाल किले चदन सु॥ सलास सितैन अलफ बा। खु॥ पा। छ ९ जमादिलाखर पौ। छ १५ मिनहू सादर जाले तेथे रजा जे दरवज बदल इनाम बो। कमलनयन महानभाव सो। सा। निंब पा। वाई बदल धर्मादाऊ जमीन बिघे २ दोनी अजरामर्हामत करून दिल्हे असे देखील मा। नख्तयाती व खा। गला कुलबाब कुलकानू दिल्हे असे हदमहदूद घालून दुमाले कीजे दस्तीदाद जाणून दीजे इनामास मुसलमान व हिंदु होऊनु इस्किल करील त्यासी त्याच्या महजबाची सौगद असे दर हरसाल ताजा खु॥ उजूर न कीजे तालिक घेऊनु असल इनामदारमजकुरासि परतोनी दीजे ह्मणौन रजा रजेबरहुकूम इनाम दुमाला कीजे (शिक्का)
तेरीख २० जमादिलाखर