Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक १३०
१५९३
श्रीदत्त
.॥ श्री दसनाम मानभावा
बहिरवगीर दिगांबर राजेंद्रपुरी दिगंबर
रामेस्वरगिरी दिगंबर गोविंद भारती दिगांबर निर्बाणी
पोकरपुरी मंडीलीक दोरकागीर बोधले
भोवानगीर मंडीलीक शाम परवंत दिगांबर
गंगाबन मलीक मणकंठगीर मेघनाथी
गरीबपुरी दिगंबर दयाहरीपुरी बडे आखाडे
निर्वाण निरंजनी
येणेप्रमाणे दसनाम बालगोपाल मिलोन मठ रााश्री माो मौजे नीबगोवे पा। वाई सु॥ इसने सबैन अलफ येथे आलेयावरी मठामधे मठधारी गोसावी होते ताा
मोहनगीर मनसागीर
आनंदगीर रामचंद्रगीर
येणेप्रमाणे होते तेथे त्यामधे बोलीचाली पाहाता मठीचे कुणबीण बुली होती थिने आपले जीव दिल्हे ऐसे समाचार कलला त्यावरी दसनाम गुरूने मनास आणून भाडारा घेउनु मठपतीयास सेले देउनु मोकलीक केले आता कुणबिणीचे जीव दिल्हे त्याचे काही लिगाडी नाही दसनामानी येउनु अनपाणी घ्याचे यास फुडे कोणी बोलेल त्यास दसनामाचे आण व राजश्री चे आण असे यास बिला हरकत करावयास कोणासी निसबत नाही दसनामाचे हे गोस्टी माफ केले असे पेस्तर जो कोणी बिला हरकत करील तो दसनामाचे गुनेगार वमली कागद सही मठधारी मोहनगीर आहेत त्याचे सेवा मठामधे जे बालगोपाल आहे त्यानी करावी येणे
गोही
तुलोजी पा। सुरियाजी बसराऊ वा
मलजी पा। व माहादजी अभगीराउ
अंताजी पा। नाइकवाडी
(निशाणी नांगर) (निशाणी कट्यार)
भिकोबा कुलकर्णी
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक १२९
१५९३ कार्तिक शुध्द १०
श्री सदानंद गोसावी
मसुरुल हजरती राजश्री गोविंदराऊ नामजाद व कारकून मौजे उझर्डे यास विठल दतो सुभेदार व कारकून सुभा ता। जाउली नमस्कार सु॥ इसने सबैन अलफ मौजे मा। श्री मो। निंब पा। वाई याचा इनाम आहे ह्मणऊन मालूम जाहले तरी सालाबाद ता। सालगु॥ श्री यास इनाम व तसरुफती चालिले असेल त्याप्रमाणे हाली सालमजकुरी चालवणे उजूर न करणे छ ८ रजबु
तेरीख १५ माहे जमादिलाखर
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक १२८
१५९३ आश्विन शुध्द ७
सदानंद
(शिक्का)
अजरख्तखान खोदायवद खान अलीशान सिताबखान सरनाइकवाडी किले सतारा व किलेनिहाय ता। हुदेदारानी व मोकदमानी मौजे निगडी किलेमजकूर सु॥ सन इहिदे सबैन अलफ जोगीद्रगिरीबावा मोकाम मठ मौजे निंब पा। वाई याचे इनाम मौजे मजकुरी बिघे १५ असेती ऐसीयास त्याचे जैसे सालाबाद साल दरसाल चालत असे त्या मवाफीक चालो दिजे व पेशजी भिस्त रोजी खानमशारनुलेचे ताकीद होती तैसेच चालो दीजे नवी जिकीर न कीजे दरीबाब ताकीद असे बादज फिरयाद येऊ न दीजे जाणिजे सालाबाद चालिलेप्रमाणे दीजे इस्कील न कीजे ताकीद असे (शिक्का)
तेरीख १५ माहे जमादिलाखर
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक १२७
१५९३ ज्येष्ठ शुध्द १५
खान अलीशान फतेखान व मिराखान नामजाद किले सतारा ता। मोकदमानी मौजे निगडी किले मजकूर सुहूर सन इसने सबैन अलफ मौजेमजकुरी इनाम सदानंद बिघे
१५ असेत मधे आबचे झाडे आहेत तुवा त्याचे दुमाले केले असे फर्याद येऊ न दीजे मोर्तब
तेरीख १३ सफर
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक १२६
१५९२ पौष वद्य ८
(शिक्का)
अज दिवाण पा। वाई ताहा मोकदमानि देहाय
मौजे नीब मौजे गोवे
सा। नीब पा। मजकूर सु॥सन इहिदे सबैन अलफ दा। बदल इनाम मोहनगिरी गोसावी मुरीद आनदगिरी बा। खु॥ रा। छ २७ जमादिलाखर पौ छ २१ माहे साबान सादर जाहाले तेथे रजा जे दरीविला मोहनगिरी गोसावी मुरीद आनदगिरी गोसावी हुजूर नेउनु मालूम केले जे आपणास इनाम जमीन चावर १ एक दर सवाद दुदेह मजकूर
मौजे नींब चावर नीम मौजे गोवे चावर नीम
.॥. .॥.
बिमोजीब खुर्दखत मुकासाइयानि माजी व जिनत असावी + + साहेब भोगवटा व तसरुफती चालत आले आहे माहाली कारकून ताजा खुर्दखताचे उजूर करिताती ह्मणऊन तरी मेयाबद के खातिरेसी आणून मोहनगिरी गोसावी मुरीद आनदगिरी गोसावी इनाम जमीन चावर १ एक दर सवाद
मौजे नींब चावर मौजे गोवे चावर नीम
.॥. .॥.
दुमाले करून दीधले असे दुमाले करणे सालाबाद ता। सालगुदस्ता भोगवटा व तसरुफाती जैसे चालिले आहे तेणेप्रा। अवलियाद व अफवाद चालवीजे दर हर साला ताजा खु॥चे उजूर न कीजे तालीक लेहून घेऊन असल खु॥ फिराऊन दीजे ह्मणऊन रजा रजेबा। सदरहू इनाम जमीन चावर १ दर सवाद दुदेह
मौजे नींब चावर मौजे गोवे चावर
.॥. .॥.
बा। भोगवटा व तसरुफाती सालाबाद ता। सालगुदस्ता बा। भोगवटा मिसेली ठाण छ २७ जमादिलाखर दर सालगुदस्ता सन सबैन अलफ जैसे चालिले असेल तेणे तेणे दुमाला कीजे तालीक लेहून घेऊन असल मिसली इनामदारमारासी परतून दीजे मोर्तबू सूद (शिक्का)
तेरीख २१ माहे साबान
शाबान
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक १२५
१५९२ कार्तिक शुध्द ७
सदानंद
खान अलीशान सिताबखान सरनाईकवाडी किले सतारा व किलेनहाय ता। हुदेदार व मोकदमानी मौजे वरीये किले मजकूर सु॥ सन इहिदे सबैन अलफ जोगिंद्रगिरी मोकाम मौजे निंब पा। वाई मठ याचे इनाम ता। मौजे मजकूर बिघे
५ असे तरी ऐसीयास जैसे सालाबाद साल दरसाल चालिले असे त्याप्रमाणे चालो दीजे या बाबे पेशजी भिस्त रोजी खानमशारनिलेचेही ताकीद असे त्या मवाफीक चालविजे सालाबाद चालिले असेल त्यास नवी जिकीर न कीजे व इस्काल न कीजे दरी बाब ताकीद असे (शिक्का)
तेरीख ५ माहे जमादिलाखर
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक १२४
१५९२ कार्तिक शुध्द ७
सदानंद
खोदायवद खान अलीशान सिताबखान सरनाइकवाडी किले सतारा व किलेनहाय ता। हुदेदार व मोकदमानी मौजे चिचणारे किले ताथोडा सु॥ सन इहिदे सबैन अलफ जोगिंद्रगिरी बावा मोकाम मौजे निंब मठ यास मौजे मजकुरी साल दरसाल गहू कुडो । देत असा तरी जैसे सालाबाद चालिले असे तेणेप्रमाणे चालवीजे नवी जिकीर न कीजे सालाबाद चालिले असेल त्यास इस्कील न कीजे ताकीद असे फिर्याद येऊ न दीजे ताकीद असे मोर्तब (शिक्का)
तेरीख ५ माहे जमादिलाखर
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक १२३
१५९१ माघ शुध्द १
सदानंद
खान अजम सिताबखान सरनाइकवाडी किले सतारा व किलेनहाय ता। बालाजी अनत हुदेदार व मोकदमानी मौजे इडमिडे पा। कर्हाड सु॥ सबैन अलफ मठ मोकाम मौजे निंब पा। वाई याचे इनाम मौजे मजकुरी तीस बिघे इनाम असे सालाबाद चालत असे तुह्मी मिसलीचे उजूर करिता ह्मणे त्याचे इनाम त्यास दुबाले करविले असे दुबाले कीजे याचे फिर्याद येऊ न दीजे जाणिजे मो (शिक्का)
तेरीख २९ शाबान
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक १२२
१५९१ कार्तिक वद्य १४
(शिक्का)
(फारसी मजकूर)
अज दिवाण पा। वाई ता। मोकदमानि दुदेह
मौजे नींब मौजे गोवे
सा। नींब पा। मा। सु॥सन सबैन अलफ बा। खु॥ छ जमादिलाखर पौ। छ २७ जमादिलाखर सादर जाहाले तेथे रजा जे दरीविला गोविंदगिरी गोसावी मुरीद कमलनयन गोसावी हुजूर येऊन मालूम केले जे आपणास इनाम जमीन चावर १ एक दर सवाद दुदेह मजकूर बिता।
मौजे नींब चावर नीम मौजे गोवे चावर नीम
.॥. .॥.
बमोजीब खुर्दखते मोकासाइयानि माजी व कारकीर्दी दर कारकीर्दी भोगवटा व तसरुफाती सालाबाद चालत आहे हाली कारकून पा। मजकूर नसती इस्कील करून चौथाई बा। पैके घेऊन जाताती साहबी मेहरबान होऊन ताकीद खुर्दवत मर्हामत केले पाहिजे ह्मणौऊन तरी गोसावी मा।इलेस बदल खैरात इनाम दीधला आहे त्यास चौथाईची तोसीस देणे काय माना आहे सदरहू इनामास चौथाई माफ केली असे तो + + + + + भोगवटा व तसरुफाती सालाबाद ता। सालगु॥ जैसे चालिले असेल तेणे (प्र)माणे चालवणे दर हर साल खुर्दखताचा उजूर न करणे तालीक लेहून घेऊन (असल) खु॥ परतून दीजे पा। हूजूर ह्मणऊन रजा रजेबा। अमल कीजे तालीफ लेहून घेऊन असल मिसेली इनामदार मा। परतऊन दीजे मोरतब (शिक्का)
तेरीख २७ माहे जमादिलाखर
जमादिलाखर
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक १२१
१५९१ कार्तिक शुध्द ३
सदानंद
खान अजम सिताबखान सरनाईकवाडी किले सतारा व किलेनहाय ता। मोकदमानि मौजे निगडी किले मजकूर सु॥ सन सबैन अलफ जोगीद्रगिरी गोसावी मोकाम मठ मौजे नीब याचे इनामास हर एक बाबे आजार देता ह्मणे हे काय माना असे हे खैरातीचे टूकडा असे बाजे इनामाबराबरी गोसावीचे इनामास तोसीस न दणे ताकीद असे घडीघडी फिरयाद येऊ न दीजे व सरनाइकीचे पैके जैसे हिसेबी असेल तैसे कीजे बाजे तोसीस लागो न देणे दरीबाब फिरयाद येऊ न दीजे मो। बाजे पटी अगर हर एक पटी आपले गावताफ पाहून घेणे मठाचे इनामास एकजरा तसवीश ने दीजे व फिर्याद येऊ न दीजे (शिक्का)
तेरीख १ जमादिलाखर