Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

नरसोजी खरा आहे मग इनिसानी हरदोजणास हरकी गुन्हेगारी बाधोन तुरक कैद केला नरसोजीबावास हुकूम केला की पाछायास अर्ज करून तुज निरोप देतो त्याजवर नरसोजीबावास सागितले की चोवीस व्होन हरकी तुजवर करार केली नरसोजीबावानी अर्ज केला की चोवीस व्हन आपणासी फिटत नाही मेहरबानी करून सोड दिल्ह्याने पैका फिटेल इनिसा बोलला जे पाछाचे हुकुमाने करार जाहले ते दरम्यान आपल्याच्याने सोडवत नाहीं तुझा पैका फिटेना तर आपण हावाला घेतो तुजला फिटतील तैसे फेडणे आणि आपले वादे मारून काढणे त्याजवरोन नरसोजीबावा याणीं अर्ज केला की साहेबाचा हुबर कसबे मजकूर आहे त्यास हुकूम दिल्हा पाहिजे त्यावरून हुबर यास कागद दिल्हा की नरसोजी आपला मुदाई दावा करून मारून काढील त्यास मुजाहीम तुह्मी न होणे ह्मणऊन कागद दिल्हा नरसोजीबावानी कागद घेऊन व इनिसाचा निरोप घेऊन कसबे मसूरचे रानात आले गावात पैवसती हेयना माग किवळास गेले नावजी पाटील किवळकर यासी भेटून वर्तमान सागितले की आपली तक्षीम निमी देतो चोविस व्होन द्यावे आणि तुरक मारून काडावे आणि आपली पाठ राखावी त्यास नावजी पाटील बोलले की आपणा आठोप होत नाही मग रिसवडास गेले तेथील ही पाटलास वर्तमान हे च सागितले त्याणीं उत्तर दिल्हे की आपलेयाचेनही आटपत नाही तेथून नेवरीस भालेराव याचे येथे गेले त्यास हे वर्तमान सागितले त्याणीं ही उत्तर दिल्हे जे आपलेचेन आटपत नाही मग त्याचा निरोप घेऊन कुमठेस गेले तेथे हाणगोजी पा। जगदळे याची भेट घेतली त्यास सागितले जे आपले वतन तुह्मास देतो चोवीस व्होन द्यावे आपली पाठी राखावी आपले मुदाई मारून काडावे येतकी बोली शफतपूर्वक जाहली हणगोजी पाटिलानी कबूल केले त्यास भानजीपत कुलकर्णी कुमठेकर यासी हाणगोजी पाटीलानी वर्तमान सागितले त्याणीं उत्तर दिल्हे जे रजावदीने दिल्हे आहे याचे प्रमाण काय तुह्मास घेणे असल तर यास घेऊन मसूरास जाणे तेथे याचे भाऊबद व बयतेबलुते असतील त्याचे विदमान हा जे वतन देईल ते घेणे इतकीयाउपरी नरसोजीबावा व हाणगोजी पा। उभयता निगडीचा डोगरास आले तेथे राहून रावजी खोत हणमतवाडीकर यास बोलाऊ पा। तोही वाडीहून निघोन डोगरास गेला उभयताची भेट घेतली नरसोजी बावानी रावजी मजकुरास सागितले जे गावात जाऊन बयतेबलूते आमचे कोणीहि असेल तर त्यास वर्तमान सागा जे भेटीस येणे याउपरी रावजी ब्रह्मपुरीस येऊन नाहावियास वर्तमान सागितले आपण माघारा वाडीस गेला नाहावी गावात येवून सुतार यास वर्तमान सागितले सुताराने ठाकूर वगैरे यास वर्तमान सागितले चवघानी चित्ती गोष्ट धरून कोणास नकळता वाडीचे रानात गेले तेथे रावजी खोताने उभयता पाटिलाच्या व चवघाच्या भेटी केल्या हणगोजी पाअलानी चवघा बयतेसी विचारल की नरसोजी पाटील आपणासी वतन देतो तुमचे विदमान देईल तर आपण घेईन चवघाजणानी उतर दिल्हे जे आपणास विचारिता तर आह्मी नरसोजीबावास विचारतो की तुह्मी यास वतन किती देता नरसोजीबावा बोलले जे निमे वतन आपण देतो

लागले मातोश्रीस नरसोजीबावानी विचारिले आपणास मसूरकर म्हणून पाचारताती हे वर्तमान आपणास सागणे आपले ठिकाणा वतन सागणे मातोश्रीने मसूर वतन सागितले आणि पाहिले पासून जाहलेले वर्तमान तेही सागितले ते चित्तामध्ये धरून तेच रात्री मातोश्री स्नानास उठली गळृयातील ताईत काढून घरामध्ये ठेविला त्यात पधरा व्होन होते नरसोजी बावानी ताइतातील पधरा व्होन घेऊन न पुसता विजापुरास गेले तेथे जाऊन मसूरचा मोकासा मलिकइनीस पाछाचा सुरतचा जावई त्यास भेटले त्याणी नरसोजी बावास हालीचालीत शाहाणा पाडून देवडीस ठेविला काही एक दिवसा राहून मलिकइनियाचे बायकोस अर्ज केला की आपण मसूरचे पाटलाचा लेक आपले वतन जबरदस्तीने बागवान कराडकर यानी घेतले आपले वर्तमान वडिलाची हकेकत सागितली त्यावर बायको बोलिली जे मलिकइनीस दिवाणातून आलेवर त्यास वर्तमान सागते दुसरे दिवसी मलिकइनीस यानी नरसोजी बावास बोलावून हकिकत विचारली त्यास त्यावरून नरसोजी बावानी आपले वडिलाचे वतनाचा करिना सागितला व बागवानाचे कर्ज पाढरीवर थोडकेच होते परतु मनसूबी न करीता बागवानानी नायबाचे पाठी करून वतन घेतले आपला बाप कैदेत घालून त्याचे मरण केले आणि आपण परागादा जाहालो त्यावर आपण मायबाप धणी आहेत माझी मनसुबी करून आपणास वतनावर बैसवावे एतकियावरून मलिकइनिसाने अभय दिल्हे की तुझी मनसुबी करून तुझे वतन तुझे दुमाला करून पोटाची वस्त्राची बेजमी करून दिली घरामध्ये ही बायकास सागितले की वतनदारचे मूल आहे त्याची खबर घेत जाणे इतकिया उपर काही दिवस असता तुरकानी कसबे मजकूरची रसद भरून रसदबा। कोळविलातीची भुते रवाना केली कसबे मजकूरचा माहार बाबनाक पलसिकर रसद घेऊन विजापुरास मलिकइनीस मोकासी याचे घरास घेऊन गेला तेथे नरसोजीबावा याची गाठी न पडता देवडीच्या लोकानी म्हारास खासपागेस ठाव दिल्हा म्हार जाऊन पागेस राहताच घोडा मेला व बायकोस तेच भूत लागले हे वर्तमान मलिकइनीस दरबारी आयकून घरास आले शाहारातून पचेक्षरी आणोन बायको सावध केली इतकियात ह्मार कसबेमजकूर याचे आगी भूत बोलू लागले की आपणास बागवानानी कोळविलातीतील आणोन रसद बरोबर पाठवून पाटलाचे मूल मारावे आपणास पानी देऊन माघारी लावून दिल्याने आपण माघारी जाऊ याउपरी मलिकइनीसानी पानीचा खर्च देऊन माघारी रवाना केली ते कसबेमजकूरास येऊन पोचली त्याजपैकी बागवान कसबेमजकूरी राहिले ते गावातून बाहिर गेले मग मलिकइनसानी बागवानास तलब करून हुजूर आपणापाशी नेहले हुजूर करीना मनास आणिता तुरक बागवान बोलला जे आपणासी स्थल देणे इनिसानी त्याजवरून स्थळ कराडचे उभयतास दिल्हे उभयता कराडास आले कराडी पचाईत होऊन बागवान खोटा केला कराडची सडी घेऊन नरसोजीबावा विजापुरास गेले समागमे तुरक ही गेला तेथे गेलेयावर तुरकानी अर्ज केला की जातिभाऊ आपली मनसोभी जाहली नाही याउपरी इनिसानी पैट्टणचे स्थळ उभयतास नेमून बरोबर आपला हुजूरचा म्हालदार देऊन हरदो वादेयास पैट्टणास रवाना केले तेथे बाबाजीराव पैठणकर याणी पचाइती करून तुरक खोटा केला तेथून सडी घेऊन विजापुरास इनिसापासी गेले याउपर कराडची व पैठणची सडी मनास आणिता म्हालदार याणी जबानी सागितले की तुरक जबरदस्तीने वतन खाताती वतन जगदळे याचे खरे

                                                                                   लेखांक ६१

                                                                                                                                                                १६५३                                                            

                                                                                                   तालिक                                                                               १/१७

भगवंतराव बिन सुभानराव जगदाले पाटिल कसबे मसूर सुर सन इसन्ने सलासिन मया व अलफ कारणे लिहुन दिल्ही तक्रीम ऐसिजे आपले वडिलानी कुमाजीबावाचे वर्तमान सागितले कराडकर बागवानयाचे कर्ज पांढरीवर होते गैरहगामाचे दिवस बागवान येऊन दगा करू लागला त्यास कुमाजीबावा बोलल की गैरहगामाचे दिवस आहेत हगामावर येऊन मागण आता हाणामारी करू नये इतकियावर न ऐकता बागवान जगीस ऐऊन बेआदबी बोलला त्यावर कुमाजीबावानी पायाचा पायपोस काढून त्यावर टाकिला बागवानाने तैसाच पायपोस काढून त्यावर टाकिला बागवानाने तैसाच पायपोस घेऊन कराडास गेले तेथ नायबास आपली लेक देऊन फिर्याद त्यापासी केली की मसूरचे पाढरीवर कर्ज होते आपण मागावयासी गेलो त्यास कुमाजी पाटिल यानी आपणासी पायपोस मारिला ह्मणोन फिर्याद केली बागवानाचे आत्म्य धरून कुमाजी पाटिलास तलब करून कराडास नेहले मनोरियात कैदेत ठेविले त्याजवर जबरदस्ती करून पैका व्याजसुध्धा देणे अगर वतन लिहून देणे पैका द्यावयासी गाठ पडे ना जीवावरील गोष्टी येऊन पडली नाइलाजे मग वतनाचा कागद करून दिल्हा त्या उपरि हि कैदेतून बाहेर काढीनात तीन वर्षे मनोरियात ठेविले त्यावर म्हादजी पाटील चेरगावकर हे आपले दिवाणकामास नायबाचे भेटीस आले भेट घेऊन निरोप घेऊन माघारे आपले गावास मनोरियावरून जात होते तो कुमाजीबावा बदीखानेतून निघोन बाहेर बैसले होते तो याची व म्हादजी पाटील याची द्रिष्टी जाहाली कुमाजीबावानी रामराम केला त्यावर त्याणी विचारिले की तुमचे वर्तमान काय आहे त्यास त्याणी आपले सकल वर्तमान सागितले वतन हि घेऊन आपलेसी सोडीत नाही तुह्मी सिवधडे पाटील आह्मी तीन वर्षे बदखाना सोसिला आता आपण काही वाचत नाही तुमचे हातून काही इलाज जाहला तर करून पाहणे एतके ऐकून माघारा फिरोन नायबास अर्ज केला की त्याचे वतन घेऊन त्यास का सोडाना त्यावर नायब बोलला जे त्याजपासून आपण जबरदस्तीने वतनाचा कागद घेतला आहे जर तो आपले रजावदीने देईल तर त्यास सोडू त्यावर म्हादजी पाटिलानी अर्ज केला की त्यास बाहीर काढून ते आपण बोलून विचार करून आपणास अर्ज करू त्यावर कुमाजीबावास कैदेतून काढून म्हादजी पा। याचे हाती दिल्हा म्हादजी पाटिलानी कुमाजीबावास विचारले की रजावदीने वतन दिल्ह्यास तुह्मास सोडतील त्याजवरून कुमाजीबावा बोलला की आपण काही वाचत नाही निमे वतन देतो हे वर्तमान नायबास म्हादजी पाटील यानी सागितले त्यावरून त्याणी मान्य केले निमे वतना कागद करून घेतला आणि हजीर जामिन मागितला त्यावरून कुमाजीबावानी म्हादजी पाटिलास दिले भारी करून दिवाणात जामिन दिले त्यावर नायबाने बागवानास बोलावून आणोन त्यास सागितले की कुमाजी पाटिलास नाहून धू घालून त्यास वस्त्रे देणे असे नायबाने सागितले त्यावर त्याणे त्यास वस्त्रे देऊन म्हादजी पाटलास सागितले की कुमाजी पाटलास मसुरास घेऊन जाणे असे निर्वाह करून म्हादजी पाटलास सागितले पाठीमागे आह्मी मसूरास येतो त्यावरून कुमाजीबावा व म्हादजी पाटिल मिळून शाहापूरचे डोगरापावेतो आले तेथ उभे राहून कुमाजीबावा याणी म्हादजी पाटलास सागितल जे आपण गावास येत नाही तुरका बराबर आपण पाटिलकी करीत नाही निरोप द्याल तर आपण जाईन म्हादजी पाटील बोलिले जे आपणास जामीन दिले आणि तुह्मी जाऊ म्हणतां याचा विचार काय कुमाजी बावा बोलिले जे तुह्मास जामिनकीचा तगादा लागला तर अवघेच वतन त्याचे हावाल करणे आपण निश्चयरूप राहात नाही मग म्हादजी पाटिलानी निरोप देऊन चरेगावास गेले मग कुमाजीबावानी आपली बायको गावात होती व लेक नरसोजी पाच वर्षाचा होता हे उभयता गावातून काढून समागम घेऊन घाटावर मौजे आबेकीत जावून राहिले तेथे असता कुमाजीबावा मृत्यु पावले त्याउपर त्याचे बायकोन आपला लेक नरसोजी समागमे घेऊन निदुतास माहेरास गेली तेथे नरसोजीबावा विसा वर्षाचा जाहला लोक मसूरकराचे मूल ह्मणून पाचारू

                                                                                   लेखांक ६०

                                                                                                                                                १६३३ कार्तिक वद्य १४                                                            

                                                                                             (फारसी मजकूर)

जुबादतुल एकरान माहादजी जगदळे देशमुख पा। मसूर सु॥ सन ११२० बिदानद की पा। मजकूरची देशमुखी तुमचे वतन तुमचे दुमाला केले असे तर तुह्मी मौजेमजकुरास जाऊन पा।मजकुरच्या मोकदमास व कसबेमजकुरच्या सेटे व महाजनास कौल देऊन आबादी व इस्तमालतीस कोसीस करून किफायत सरकार व रफायत राया अमलात आणोन व हरएक असामीस तुह्मी आपला कौल देऊन आणाल त्याप्रमाणे चालविले जाईल कोण्हे बाबे वसवान न धरिया सरकारचे काम बवजे अहसन सरजाम करीत जाणे मोर्तब शुद

रुजू दफ्तर दिवानी
रुजू दफ्तर मुस्तोफी

तेरीख २७ सौवल

सदर्हूप्रमाणे गोत मिळोन साक्षपत्र लेहून दिल्हे ऐसे जे माहादजी देसमुख पा। मसूर याचे पुत्र यशवंतराऊ जगदळे हे रा। हिदूराऊ घोरपडे याबराबरी राजश्री छत्रपति स्वामीस भेटीस गेले ह्मणौऊन राजश्री जाधवराऊ सेनापती यानी राग केला की आपला दावेदार घोरपडा याची पाठी करून माहादजी जगदळे देसमुख याचा लेक आला तेव्हा कैसी देसमुखी खाऊ पाहातो ह्मणौऊन राजश्री जाधवराऊ सेनापती यानीं निकस करून जोरावारीने माहादजी देसमुखाची देसमुखी देह ५७ सत्तावन पुरातन चालत असता हाली राजश्री छत्रपतिसाहेबास सकट घालून अतिशय करून पाटगावीचे मोकामी रुसवा करून सनद करून घेतली तेव्हा देसमुखाचे पुत्र यशवंतराऊ देसमुख यानी पाटगावीचे मोकामी थोरथोर सरदार मर्‍हाटे व देसमुख वतनदार यापासी उभे राहिले की तुह्मी गोत मायबाप आहा आपण न्यास व जेथे खलास पाठवाल तेथे जावयास राजी आहे अगर एथे तुह्मी गोत मनसुफी कराल त्यास राजी असे ऐसे ऐकोन राजश्री सेनापती सत्तेच्या बळे जोरावारीने सनद करून घेतली हा आदि अत गोतसभेस ठाउके आहे ह्मणौन हुजूर पाटगावीचे मोकामी सर्व गोतास विनंति केली त्यावरून समस्तानी पुरातन माहादजी जगदळे देसमुख याची देसमुखी पा। मसूर येथील खरी आहे ऐसे मनास आणून जैस करीना हुजूर जाहाला तो लेहून साक्षपत्र करून दिल्हे त्यावरी आपले साक्षीसी निशाने करून दिल्ही ते पत्र घेऊन यशवंतराऊ देसमुख मसुरास आले तेथे माहादजी जगदळे देसमुख व परगणाचे मोकदम व समस्त गोतापासी उभे राहिले कीं रा। जाधवराऊ सेनापती यानी यादवाची पाठी राखोन त्यापासून कर्‍हाडीची देसमुखीची तकसीम घेऊन आपलियावरी जोरावारी केली आपण न्यास व खलास व गोतास राजी असता बळे च सनद करून घेतली तरी हा करीना आह्मा समस्त गोतास हि विदित आहे माहादजी जगदळे देसमुख याची मसूरपरगणाची देसमुखी देह ५७ सत्तावन एथील खरी असे राजश्री जाधवराऊ सेनापती यानी न्याय न करिता जोरावारीने सत्तेच्या बळे राजश्री छत्रपति स्वामीसी हट्ट निग्रह करून रुसवा करुन कर्‍हाडीची सनद करून घेतली त्यामधे मसूरपरगणाचे गाव भिडवून दिल्हे ऐसे आह्मा गोतास विदित जाले तरी मसूरपरगणाची देसमुखी जगदळेची खरी असे रा। जाधवराऊ सेनापति व यादव यास मसूरपरगणाचे देसमुखीस समध नाही जगदळेचे देसमुखी पूर्वापार खरी आहे आपण साक्षपत्र करून दिल्हे असे सन १११७ सु॥ समान मया अलफ छ १ माहे सफर वैशाखसुद त्रितीया वळी सुमार ५३ त्रिपन 

→साक्ष देह पा। मसूर वाचण्यासाठी इथे क्लिक करा

 

*

त्यासि सांगितले की बाळाजी विश्वनाथ मुतालिक पंत अमात्य व पंताजीपंत मुतालीक पंत सचिव यासि जाऊन सांगणे की जाधवरायाच्या देशमुखीच्या सनदा लिहिल्या आहेत त्या आपणास विचारल्याविरहित न देणे ह्मणौन सांगितले व यादव गोपाळ हस्तक गदाधर भट्ट गोसावी याचे त्यासी सांगितले की तुह्मी जाऊन भट्टगोसावी यासी सांगणे की तुह्मी सनदा सिक्के करावयासि आणाल तरी आपण सिक्के न करी सिक्के तैसे च ठेवणे ह्मणौन सांगू पाठविले परंतु त्यांनी गै केली इतके जाहालियावरी हे वर्तमान जाधवरायासि कळले मग जाधवराऊ खुद्द कचेरीस आले कचेरीहून रा। गदाधरभट्ट व नारसेणवी व राघो काकाजी राजश्रीकडे खलबतखानियात पाठविले की आजी प्रतिपदेचा मुहूर्त आहे सनदेवरी सिक्के करून देणे त्यासि राजश्री बोलिले की तुह्मी यादवाच्या नावे सनदा लिहिल्या आहेत तरी आपण सिक्के करीत नाही यादव पुरातन जाहाले तेव्हा आह्मी त्याचे मुतालीक की काय कर्‍हाडची देशमुखी आपली आहे मसूरची देशमुखी तर जगदळियाची आहे आणि तुह्मी अतिशय करिता तरी तुह्मी खुद्द आपल्या नावे सनदा करून घेणे त्यावरी सिक्के करून देतो या सनदेवरी सिक्के करून देत नाही तुह्मी च आपले मनी समजणे जे देणे ते न्यायेकरून द्यावे लागते आपली भाकरी आहे तुह्मी जैसी मागता तैसी जगदळियासि देवणे तरी तुह्मी जाऊन जाधवरायासि समजाऊन सांगणे आणि त्याची भीड आहे ऐसे न होय की रागावरी नव जात ऐसे तजविजीने सांगणे ह्मणौन सांंगितले मग नारसेणवी व राघो काकाजी यांनी जाऊन जाधवरायासि वर्तमान सांगितले त्यावरून जाधवराऊ रागे आण घेऊन बोलिले की आपले एवढे काम होत नाही तेव्हा आपण चाकरी करीत नाही ह्मणौन उठोन आपल्या डेर्‍यासि गेले त्याउपरि रुसून घरी बैसले कारभार अवघा तटला मग जाधवरायाच्या डेरियासि राजश्री गेले जाधवरायाची समजावीस केली घोडा १ दिल्हा मग जेवावयासि सांगून आले ते दिवसी काही मजकूर जाहाला नाही मग दुसरे दिवसी मागती सिक्के करावयासि सनदा आणिल्या त्यासी राजश्री बोलिले की इतका अतिशय काय आहे आणि कितेक सरदारांनी हि जाधवरायासी सांगितले ते हि ऐकिले नाही अड घातला की जरी सनदा करून द्याल तरी आपण चाकरी करीन ह्मणौन अड घातला त्यासि राजश्री बोलिले की आपणास सकट प्राप्‍त जाहाले आजी सनदा करून देत नाही तेव्हा हा मूरख जैसा गेला तैसे च हे निघोन जातील ह्मणजे अवघे काम दरकम होईल ऐसे जाणोन वेळावरी नजर देऊन जाधवरायाच्या भिडेने सनद करून जाधवरायासी दिल्ही हे काम अडून जाहाले काही पचायत अगर इनासाफ जाहाला नाही हे अवघे मतलबी आहे जैशा मोकाशाच्या सनदा करून उग्याच देताती तैसी च हे सनद करून दिल्ही पाचाईतमुळे इनसाफ होऊन खरेखोटे करून सनद दिल्ही नाही हे आपणास दखल आहे यादव काही फडी प्रसंगी कोठे आपणास आढळले नाहीत माहादजी जगदळे देसमुख पा। मसूर याची सत्तावन गावीची देशमुखी खरी आहे पूर्वी जगदळियासि व यादवास वाद जाहाला वादामुळे यादव खोटे जाहाले आहेत जगदळे देशमुख खरे आहेत हे आपणास ठावके आहे आणि माहादजी देशमुख याचा पुत्र यशवंतराऊ येऊन उभा राहिला आणि हा करीना सांगितला आणि ह्मणो लागला की एणेप्रमाणे करीना जाहाला आहे हा खरा असिला तरी तुह्मी समस्त मिळोन एक साक्षपत्र करून त्यावरी मोहरा करून देणे ह्मणौन करीना जाहीर केला त्यासि आह्मी समस्तानी मनास आणिता हा करीना खरा आहे मग समस्तानी आह्मीं साक्षपत्र करून त्यावरी मोहरा करून दिल्ह्या हे साक्षपत्र सही वळी सुमार २१२ दोनी से बारा मोर्तब सूद

(शिक्का फारसी)

मग हिंदूरायानी यशवंतराऊ जगदळे देशमुख व नारो रुद्र देशपांडिये पा। मसूर याची हि भेटी केली ते समयी राजेयानी विचारिले की हे कोण आहेत हिंदूरायानी सांगितले की माहादजी जगदळे देशमुख पा। मसूर याचा पुत्र आहे व ते दुसरे देशपांडे आहेत ह्मणौन सांगितले त्यावरून बरे ह्मणौन निरोप दिल्हा इतके जाहालियावरी लस्कर कुच होऊन सातारियाखाले एऊन मोकाम जाहाले तेथे जाधवरायानी अर्ज केला की कर्‍हाडची देशमुखी यादवाची आहे यादवाच्या नावे सनद करून देणे जाधवरायाची भीड फार यासाठी राजश्री नी मान्य केले मग जाधवरायानी मसुदा करून आणिला त्यात मसूरपरगणियाचे बगाव सत्तावन कर्‍हाडाखाले भिडवले मग हे वर्तमान यशवंतराऊ यासि कळले त्याने कचेरीस येऊन दोही दिल्ही आणि राजश्री छत्रपती स्वामीस अर्ज केला की आपणापासी पूर्वील पत्रे इभराईम इदलशा व सुलतान महमूदशाहा व हुसैन अरखान याची आहेत व अलीकडे माहाराज राजश्री कैलासवासी राजाराम याची हि पत्रे आहेत व गोताची पत्रे आहेत मसूरपरगणियाची देशमुखी आपली अलाहिदी आहे इतके असता सेनापती गैरन्याये करून जोरावारीने कर्‍हाडाखाले गाव आपले बळे च लिहिताती ह्मणौन अर्ज केला त्यासि राजश्री बोलिले की जे खरे असेल ते च करून एकाचे वतन एकास आपल्याच्याने देवत नाही तू आपली खातीरजमा असो देणे जाधवरायानी सनदा लिहिल्या होत्या त्या तैशा च राहिल्या इतका मजकूर जाहालियावरी यशवंतराऊ देशमुख यानी छत्रपतीस विनति केली की लस्करच्या धामधुकीकरिता आपला परगणा खराब जाहाला आहे कौल सादर केलिया परगणा आबाद होईल मग राजश्री नी आज्ञा केली की आपलिया परगणियाची नजरपट्टी चुकवणे ह्मणौन आज्ञा केली आज्ञेवरून यशवंतराऊ जगदळे देशमुख व नारो रुद्र देशपांडिये पा। मजकूर यानी परगणियाची नजरपट्टी खडून सिरपाव व कौल नावनिसीवार घेतला त्यावरी जाधवरायानी मागती मजकूर करावा तरी सातारा हस्तगत जाहाला रागणियासी जायाची त्वरा जाहाली लस्कर कुच दर कुच करून कसबे पाटेगावावरी आले तेथे जाधवरायानी रा। गदाधरभट्ट यासि मजकूर केला की माहादजी देशमुखाच्या लेकाने आपल्या सनदास दोही दिल्ही हे कोण गोष्टी आहे भटगोसावी यानी मान्य केले की सवत्सरप्रतिपदेच्या दिवसी सनदेवरी शिक्के करून देऊ ह्मणौन मान्य केले मग प्रतिपदेचे दिवसी सनदेवरी शिक्के करावयासी आले ते वेळेस माहादजी जगदळे देशमुख पा। मजकूर याचा पुत्र यशवंतराऊ याने दोही दिल्ही व राजश्रीस अर्ज केला की आपला इनसाफ होत नाही आणि आपणापासी सनदा आहेत त्या हि कोण्ही मनास आणीत नाहीत आपले वतन मसूरपरगणषायाचे पूर्वापार चालत आले आहे आणि आता जाधवराऊ गैरन्याये जोरावारीने यादव पाठीसी घालून सनदा करून घेताती आपणास कोणाचा आसिरा नाही आपले वडील तो भोसल्याचे नवाजीस आणि भोसल्याचे घरी वडिलावडिलाच्या खस्ता जाहाल्या आहेत इतके असता जोरावरी आपलियावरी होती आपली बदी कोण्ही देत नाही त्यासि बोलिले की कर्‍हाडची देशमुखी आपली आहे यादवास देत नाही मसूरीची तर तुझी आहे हे हि आपल्याच्याने देवत नाही तू काही चिता न करणे ह्मणौन सांगितले आणि भागीरथ चोपदार बोलाविला

                                                                                   लेखांक ५९

                                                                                        श्री                                            चैत्र शुध्द ७ गुरुवार शक १६३०                                                           

                                                                                                                                                                                                   छ ६ मोहरम सन १११७ फसली ११२० हिजरी
                                                                                            राजश्री शाहूराजे                                              सुहुरसन समान मया अलफ ११०८
                                                                                                                                                               १८ मार्च १७०८

साक्षपत्र मुकाम कसबा पाटगाऊ शके १९३० सर्वधारी सवछरे चैत्रशुध सप्‍तमी सुहुरसन समान मया अलफ छ ६ मोहरम हाजीर मजालसी

→साक्षपत्र वाचण्यासाठी इथे क्लिक करा

या विद्यमानें जाहाले साक्षपत्र ऐसे जे प्रा। मसूर देह सत्तावन गावीची देशमुखी माहादजी बिन सुलतानजी जगदळे देसमुख पा। मजकूर याची देशमुखी पुरातन पिडी तर पिडी पूर्वापार चालत आली आहे ऐसियासि माहाराज राजश्री छत्रपती स्वामी याचे आगमन या प्राते जाहाले त्यासि राजश्री स्वामी आळदेच्या तळावरी आले इकडून राजश्री जाधवराऊ सेनापती हे भेटीस गेले बराबरी यादव हि घेऊन गेले त्याउपरि जाधवराऊ राजश्री स भेटले ते समयी यादवानी जाधवरायासी मसलत दिल्ही की कर्‍हाडची देशमुखी आपली आहे आपण तुह्मास चौथी तकसीम देऊ तुह्मी राजश्री पासी सनद करून घेणे समय हा च आहे त्याउपरि जाधवरायानी रदबदली केली की कर्‍हाडची देसमुखी यादवास देणे यादवाची आहे मग राजश्री बोलिले की कर्‍हाडची देशमुखी आमची आहे यादव कोण होताती तेव्हा रदबदली तैसी च राहिली मागती दुसरे दिवसी यादवास भेटावयासि घेऊन गेले राजरी ची यादवाची भेट केली त्यासि राजश्री छत्रपतीनी पुसिले की हे कोण आहेत जाधवरायानी सागितले की कर्‍हाडचे देशमुख यादव आहेत त्यासि राजश्री बोलिले की कर्‍हाडची देशमुखी आपली आहे हे आपणास ठाऊके नाहीत व आपण ऐकिले हि नाहीत तरी यासि देशमुख न ह्मणने कोण्ही ह्मणी ह्मणतील त्यासि साहेब इतराज होतील इतके जाहालियावरी तो मजकूर तैसा च राहिला मग दुसर्‍या तळावरी जाधवरायानी रदबदली केली की कर्‍हाडची देशमुखीची सनद करून दिल्ही पाहिजे राजरी नी हि मान्य केले की आह्मी तुह्मास खुद्द सनद करून देऊ परतु यादवास देणार नाही मग जाधवरायानी उत्तर दिल्हे की आपण आहे तोवरी आपणास भोगवटा होईल मग आपणास कोण खाऊ देईल ह्मणोन उत्तर दिल्हे त्याउपरि रदबदली तैसी च राहिली मग तस्कर कुच होऊन एऊन शिरवळावरी राहिले तो हिदूराऊ घोरपडे हे चिकोडीकडून भेटीस जावयासि कसबे मसुरास आले त्याबराबरी माहादजी जगदळे देशमुख याचा पुत्र यशवतराऊ आला मग हिंदूरायानी राज्याचे दर्शन घेतले
                                  

                                                                                   लेखांक ५८

                                                                                        श्री                                                           १६२९ माघ वद्य ७                                                            

स्वस्तिश्रीराज्याभिषेक शके ३४ सर्वजित नामसंवत्सरे माघ बधी सप्‍तमी रविवासरे क्षेत्रियकुलावतस श्रीराजा शाहू छत्रपति स्वामी याणी माहादजी जगदळे (देशमुख) च रुद्राजी चंदो देशपांडे ता। मसूर सुभा प्रात सातारा यासि आज्ञा केली ऐसी जे तर्फमजकूरची नजरपट्टीची खंडणी क रु॥ १५००58 1 पंधरासे पैकी बद्दलदेणे रा। परसोजीराजे भोसले रु॥ ७००58 1 बाकी रसद हुजूर रु॥ ८००58 1 आठसे पैकी रवासूदगी सेटी खाटक हुजूर बाजार लस्कर रु॥ १०० बाकी रु॥ ७०० सातसे पैकी हुजूर रसद घेतली रु॥ २००58 1 दोनसे बाकी रुपये ५००58 1 हुजूर रसद पाठवणे या कामास लोक दि॥ हाय रुपये

हरवाजी अंबीकर बारगीर रु॥ ६
लखमाजी बिरामण जाधव रु॥ ५

एकूण रु॥ ११ अकरा रास देविले असे आदा करणे जाणिजे


58 2

                                             

                                                                                   लेखांक ५६

                                                                                        श्री                                                           १६२५                                                            

कौलनामा देसमुखानि पा। मसूर सु॥ १११३ तुह्मास लिहिला गेला ऐसा जे माहाराज धिराज राजश्रीस जागीर सरजामी आलियावर तुह्मास रयायत पाच हजाराची परगणाचे पैकी करार होईल सही

 

 

 

                                                                                 लेखांक ५७

                                                                                                                                                    १६२६ ज्येष्ठ शुध्द ७                                                            

                                                                                                                                                                                (शिक्का फारसी)

ता। मोकदमानी प्रा। मसूर इदा ५७ सरकार रायबाग सुबे दारुलजफर बिज्यापुर सु॥ सन १११३ मालूम दानद की माहादजी वलद सुलतानजी जगदळे देसमुख प्रा। मा।र हे मोख्तसर जमीदार व कामाचे व पातशाही सनदी जमीदार आहेत याकरिता याजवर मेहरबान होऊन यासि पालखी हजरूनी मरहमत करून यासि सरकारातून पालखीचा ऐवज देविला आहे ते आमील देतील परगन्यात सादिलवारपैकी रु॥ ७०० सातसे देविले असेती तरी दरसाल रुपये सातसे देस मुखमशारनिलेस पाववीस जाने दरसालास उजूर न करने परवानियाची नकल लेहून घेऊन असल फिराऊन देने दरी बाब ताकीद तमाम दानद मोर्तब सूद

ता। छ ५ सफर सन ४७ जुलूसवाला