लेखांक ९८
१५८३ माघ शुध्द ३
(शिक्का)
अज रखतखाने खुदायवंद खा। शर्जाखान साहेब खुलीदयामदौलतहू बजानेब कारकुनानि व हाल व इस्तकबाल देशमुखानि पा। वाई बिदानद सु॥ इसने सितैन अलफ दरीविला कमलनयन गोसावी मोकाम मठ सदानंद मोजे नीब पा। मा। हुजूर येऊन मालूम केले जे आपणास इनाम जमीन बिघे .।. तीस दर सवाद मौजे इडमिडे ता। कारवे पा। कर्हाड जहाती भंडारा बा। खु॥ धारोजी राजे मोहिते व मुकासाइयानि माजी भोगवटा तसरुफात सालाबाद ता। सालगु॥ चालिले आहे हाली मौजे मा। किले खा। सरंबजखान पणीयासि साहेब मुकासा दीधला आहे व साहेबास मुकासा नवा अर्जानी जाला आहे माहाली कारकून ताजा खु॥ उजूर करून दुमाले करीत नाहीत फकीराचा इनाम आहे नजर इनायती फर्माऊन दुमाले खु॥ मर्हामत केले पाहिजे बराय मालुमाती गोसावीमजकूर खातिरेसी आणऊन सरदहू इनाम दे॥ माहासूल नखतयाती व बाजेपटीया व वेठी बेगारी व फर्मायती कुलबाब कुलकानू बा। खु॥ मोकासाइयानि माजी भोगवटा व तसरुफाती ता। सालगु॥ चालिले असेल तेणेप्रमाणे दुमाले केले असे दुमाले करून चालवीजे दर हर साला ताजा खु॥ उजूर न कीजे तालीक घेऊन असल खु॥ परतून दीजे हिंदू अगर मुसलमान होऊन इस्कील करील त्यास आपले महजदाची सौगंद असे पा। हुजूर
तेरीख १ माहे जमादिलाखर (शिक्का)
जमादिलाखर रुजु शुरुनिवीस
पौ छ १ रजब