लेखांक ९५
१५७९ भाद्रपद शुध्द १
सदानंद
अज रखतखाने मा। अनाम राजश्री अबाजी राजे घाटे साहे दामदौलतहू ता। हुदेदारानि हाल व इस्तकबाल व मोकदमानि चिंचणेर किले ताथोटे बिदानद सु॥ समान खमसैन व अलफ दरवज बदल धर्मादाउ कमलनयनगिरी सन्यासी मठ मुकाम मौजे नीब पा। वाई यासि गहू कैली .।. पाच कुडो देविले असे आदा कीजे पेस्तर साल दर साल देत जाणे दर हर साला ताजा खुर्दखताचे उजूर न करणे तालीक लेहून घेउनु असल परतोन देणे मा। (शिक्का)
तेरीख २३ माहे जिल्हेज