Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक १४०
श्री १५९८ पौष वद्य १२
राजमान्य राजश्री आनदगिरी गोसावी यासि सेवक सीऊजी बिन तुकोजी पवार वस्ती डोणिजे सरणाई सु॥ सबा सबैन अलफ लेहोनु दिधले ऐसे जे तुमचे टके ३४ आपणाकडे होते त्यापैकी चाकरीमधे फिटले टके ११ बाकी राहिले टके २३
तेवीस येपैकी उगवणी करून देउनु छ २५ जिल्काद लिहिले सही
कोयाजी पाटील रखमाजी पाटील
मौजे बलवडे मौजे बलवडे
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक १३९
१५९८ भाद्रपद वद्य १
(शिक्का)
आज दिवाण किले सातारा ता। मोकदमानी मौजे निगडी ता। सातारा सु॥ सबा सबैन अलफ मौजेमा। आनदगरी गोसावी याचा इनाम आहे तो चालतच आहे त्यासी कोणी रजपूत येऊन तोसीस देत आहेती तरी त्यासी कोणेविशी तोसीस न लगे ते करणे छ १५ रबिलाखर मोर्तब सुद (शिक्का)
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक १३८
१५९८ अधिक श्रावण शुध्द १४
(शिक्का)
अज दिवाण ता। सातारा ता। मोकदम देहाय ता। मजकूर सु॥ सबा सबैन अलफ रा। सदानद गोसावी याचा इनाम गावगना बिाा
१५ मौजे निगडी
१० मौजे देगाऊ
५ मोजे वरये
-------
.।.
एकूण तीस बिघे आहे तो दुमाले करविला आहे बा। सनद सुभा छ २६ रबिलाखर पाद्यै छ १२ जमादिलावल रजे बा। दुमाले करून दरसाला सनदेचा उजूर न करणे तालिक घेऊन असल परतोन दीजे छ १२ माहे जमादिलावल मोर्तबु
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक १३७
१५९८ आषाढ वद्य ३०
श्रीसदानंतगोसावी
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य राजश्री
माहादजी आनंत सुबेदार व कारकून सुभा
ता। सातारा गोसावियासि
सेवक दताजी त्रिमल नमस्कार सूरसन सबा सबैन अलफ श्री गोसावियाचा इनाम ता। मजकूर तर्फेस सालाबाद जैसा चालिला आसळ तेणे च प्रमाणे चालवीत जाणे आपले तर्फेन आगर दुसर तर्फेन सर्वथा तसवीस लागो न देणे बहुत लिहिणे तरी सूज्ञ असा रा। छ २७ रबिलाखर
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक १३६
१५९७ माघ वद्य ६
अज दिवाण सुभा पा। वाई ता। मोकदमानी मौजे गोवे तान्हाजी (पा)टील सा। निंब सु॥ सीन सबैन अलफ मौजे मजकूरपैकी गोसावी यास एक बिघ दिधला आहे आणि तू कथळा करितोस तरी आता त्याचा बिघा त्यास देणे गावपैकीं दिधला आहे ऐसे असता कथला करितोस तरी आजीपासून गोसावी याचे वाटें नव जाणे छ १९ जिलकाद
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक १३५
१५९७ कार्तिक शुध्द ७
(शिक्का)
(फारसी मजकूर)
अज रखत मसुरल हजरती राजश्री जगदेराऊ नाईक साहेब खुलीदामदौलतहू बजानेब हुदेदारानि वा मोकदमानि मौजे पापरडे ता। मोरगीर मरली बिदानद सु॥ सीत सबैन अलफ अजरामर्हामती इनाम कमलनयनगिरी मानभान भाऊ मठाधिपती श्रीसदानद मुकाम मौजे नींब पा। वाई यास मौजे मा। इनाम जमीन चावर नीम .॥. दीधले असे नखतयाती महसूल व बाजे बाब कुलबाब कुलकानू कदीमपटी व पेस्तरपटी व वेठ बेगारी व फर्मासी व बाजे उजुहाती इनाम फकीराणा अनछत लगर इनाम दीधला असे दुमाले कीजे यासि उजूर न कीजे सदरहू मुसलमान व हिंदू भले सदरहू आपले महजदाची सौगद असे असल खुर्दखत इनामदार मजकुरापासी दीजे तालीक लेहोनु घेउनु इनाम फकीराणा देणे मोर्तब
तेरीख ५ माहे शाबान
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक १३४
१५९७ वैशाख वद्य ९
तालिक बा। असल
राजश्री कुकाजी बयाजी हवालदार व कारकून
ता। सातारा गोसावी यासि
अखंडितलक्ष्मीराजमान्य स्नेहाकित कृष्णाजी भास्कर सुभेदार व कारकून सुभा महालहाय पा। वाई व सातारा आशिर्वाद व नमस्कार सु॥ खमस सबैन अलफ रो। जोगेद्रगीर मानभाऊ जाबती कमळनैन सेकीन समत निंब यास इनामती जमीन बिघे
१५ पधरा आहे ती त्यास सालाबाद याचे भोगवटा चालत आला आहे त्यास सालगुदस्त जमीन पडत पडली होती साल मजकूर इनाम मजकूर कीर्दीस लावितील तर लाऊ देणे पेस्तर तुह्मास सनद सादर होईल तेणेप्रमाणे अमल करणे तालिक घेऊन असल परतोन देणे रवाना छ ७ सफर मोर्तब (शिक्का) मौजे वरये कीर्द होऊ देणे उजूर न करणे मोर्तब असे (शिक्का)
(शिक्का)
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक १३३
१५९६ ज्येष्ठ शुध्द ३
(शिक्का)
आज दिवाण ठाणा ता। सातारे ता। मोकदमानी मोजे वरये ता। मजकूर सु॥ खमस सबैन अलफ छ ७ सफर पैवस्ता छ १ रबिलवल सुभाहून रजा सादर जाली तेथे रजा जे जोगीद्रगीर मानभाऊ जाबती कमलानयन सेकीन सा। निंब यास इनामती जमीन बिघे १५ मौजे मजकुरी सालाबाद भोगवटा चालिला आहे ऐसीयास सालगुदस्ता सदरहू जमीन पडी पडिली होती सालमजकूर इनाम कीर्दीस लावितील तरी लाऊ देणे कीर्दी जालियावरी पेस्तर सनद सादर होईल त्याप्रमाणे आदा करणे तालिक लिहून घेऊन असल परतोन देणे ह्मणऊन रजा सनदेबा। इनाम लावणीस दुमाले केले असे लावणी जालियावरी पेस्तर सनद सादर होईल त्याप्रमाणे अमल करणे तालीक घेऊन असल मिसेल परतोन दीजे मोर्तबु सुद रा।
तेरीख १ माहे रबिलावल
माहे रबिलावल
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक १३२
१५९४ मार्गशीर्ष वद्य १
माा अनाम राजश्री कारकुनास का। हुमगाऊ यासि विठल दतो सुभेदार व कारकून सुभा जाउली सु॥ सलास सबैन अलफ रेवागीर गोसावी जटाधारी याचे इनामात झाडे आहेत ऐसीयास गोसावियाचे जैसे सालाबाद चालिले असेल तैसा हाली चालवणे उजूर न करणे छ १४ साबान (शिक्का)
गोसावियास गावातून घरोघरीहून भाकरी देवीत जाणे
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक १३१
१५९४ वैशाख शुध्द ११
(शिक्का)
अज रखतखाने खुदायवद खा। वालाकदर बुलद मकान फतेसिताबखान व मीराखान सरनाईक किले सातारा व जमीये किलेहाय ता। हुदेदार हाल व इस्तकबाल व मोकदमानि व रयानि मौजे वरिये किले राजा सु॥सन इसने सबैन अलफ इनाम दर सवाद मौजे मजकूर मठ सर्पुर्दीन पीर मो। नीब पा। वाई जमीन
५ बमोजीव साल गुदस्ता रु॥ साही चालत आहे सालमजकुरी हि ते च दुबाले केले असे तालीक लेहून घेऊन असल मिसाल आनदगीर गोसावी यानजीक परतोन दीजे (शिक्का)
तेरीख ९ मोहरम