लेखांक ९९
१५८४ आषाढ वद्य ६
(शिक्का)
आज दिवाण ठाणा ता। तारगाऊ ताहा हुदेदारानी व मोकदमानी मौजे निगडी किले सतारा सुहूर सन सलास सितैन अलफ दरीविले खुर्दवत बतेरीख १९ जिलकाद दरवझबदल इनाम बो। कलमनयन गोसावी मानभाव सो। समय निंब पा। वाई यास बदल धर्मादाऊ जमीन बिघे १५ दर सवाद मौजे मजकूर पैकी देखील मळा बिघे
२ नजीक समाधी अजरामहर्हामत करून दिल्हे असे देखील महसूल व नख्तयाती व बाजे उजूहाती कुलबाब व कुलकानूनात दिल्हे असे दुमाला कीजे हद महदूद घालून देणे दरसाला ताजा खुर्दखताचे उजूर न करणे या इनामास हिदू अगर मुसलमान इस्कील करील त्यास महजब बा। सौगद असे तालिक लिहून घेऊन असल खु॥ इनामदारमजकुरास परतोन देणे ह्मणौन मौजे मा। खु॥ रवा असे बा। खुर्दखतप्रमाणे गोसावी यास देखील मळा बिघे दोनी व इनाम जमीन बिघे
१३ + + + + बिघे
१५ दिल्हे असे हद महदूद घालून दुमाला कीजे तालिक लिहून घेऊन असल खुर्दखत मिसेली परतोन देणे दरसाला ताजा मिसलीचे उजूर न करणे मोर्तब (शिक्का)
तेरीख ९ माहे जिल्हेज