लेखांक ९३
१५७९ चैत्र वद्य १
रा। वेंकाजी नरसीह हुदेदार व मोकदमानि मौजे निंब पा। वाई सु॥ सबा खमसैन अलफ दरीविले जोगीद्र गोसावी सदानदाचे मठपतीयाचे फर्जद गोविदगीरी मालूम केले जे मौजे मा। लग्ना मुहूर्त होते तेथे जगम आह्मासी कुसूर करिताती पान- मान लग्न मोहूर्त यास आपणास टाकून जगम जातो ह्मणौऊन मालूम केले तरी सालाबाद चालिले अमलास नवी जिकीर करावया जंगमाचे काय अबजा आहे आता ताकीद पाहाताच जगमास ताकीद करून हाल खुद ठेऊन सालाबादप्रमाणे त्याचे पानमान औलाद अफलाद जैसे चालिले असेल त्याप्रमाणे चालवणे तालीक घेऊन असल परतून दीजे मोर्तब सूद (शिक्का)
तेरीख १४ माहे जमादिलाखर
जमादिलाखर