लेखांक ९२
१५७६ चैत्र वद्य १२
(शिक्का)
अज रखतखाने राजश्री संभाजी राजे दामदौलतहू बजानेबु कारकुनानि
हाल व इस्तकबाल का। बालाघाट किले पनाला बिदानंद सु॥ अर्बा खमसैन अलफ बो। मधुकरगिरी गोसावी हुजूर येऊन मालूम केले जे आपला मठ मौजे आंबोडे का। मजकूर तेथे आहे यास इनाम जमीन बिघे साडेच्यारी आहे यासि माहाली कारकून इनामपटी मागताती ह्मणोनु मालूम केले तरी गोसावियास इनामपटी माफ केली असे यासि एकजरा हली व पेस्तर तसवीस लागो ने देणे फिर्यादी येऊ ने देवणे तालीक लेहोनु घेऊन असेली खुर्दखत फिराऊन देणे दर हर साला ताजा खुर्दखताचा उजूर न करणे पा। हुजूर रा। गोविंद माहादेऊ मजकूदार मोर्तबु ता। सन इसने चालत असेली त्याणेप्रमाणे चालवणे (शिक्का)
तेरीख २५ रुजु सुरुनिवीस
जमादिळोवल सुरु सूद