लेखांक ९७
१५८२ आश्विन वद्य १४
सदानंद
अजरख्तखान मशरुल अनाम राजश्री अंबाजी राजे घोरपडे साहेब दामदौलतहू ता। हुदेदारानी हाल व इस्तकबाल व मोकदमानी मौजे चिचणारे किले ताथोडे बिदानंद सु॥ इहिदे सितैन अलफ कमलनयनगिरी सन्यासी मठ मा। मौजे निंब हुजूर येऊन मालूम केले जे आपणास धर्मादाऊ गला गहू कैली कुडो .।. पाच मौजे मा। प्रा। नख्त खरीदपैकी साल दरसाल देविले होते ते पावत गेले सालमजकुराकारणे महाली कारकून ताजे खुर्दखताचे उजूर करितात ह्मणौन मालूम केले तरी सन्यासी मजकुरास धर्मादाऊ देविले असे त्यास साल दरसाल ताजा खुर्दखताचे उजूर करणे काय माना आता बा। खु॥ धर्मादाऊ गहू कुडो पाच दो साला प्रा। ना। खरीद कि॥पैकी देत जाणे दरसाल ताजा खुर्दखताचे उजूर न कीजे तालिक लेहून घेऊन असल परतोन दीजे (शिक्का)
तेरीख २७ माहे सफर