लेखांक १०९
१५८६ कार्तिक वद्य २
(शिक्का)
अज दिवाण पा। वाई ता। कुभारानी मौजे निंब पा। मजकूर सुहुजूर सु॥ सन खमस सितैन अलफ हुजूर मालूम जाहले की तुह्मी मालूम जाहले की तुह्मी मठ सदानद त्यानजीक माती खाणौन तसवीस देता तरी नवी जिकीर करून मठानजीक माती खाणावया तुमचे काय अबाजा आहे सालाबाद जे जागा माती खाणत होतेस तेथे माती खाणे मठानजीक मातीसाठी खाटिलिया ताकीद होइल उजूर असेल तरी हुजूर एणे मोर्तब
तेरीख १५ माहे रबिलाखर
रबिलाखर