लेखांक १०४
१५८५ चैत्र वद्य १
सदानंद
खान अजम सिताबखान नाइकवाडी किले सतारा ता। हुदेदारानी हाल व इस्तकबाल व मोकदमानी मौजे वरीये किलेमजकूर सु॥ सलास सितैन अलफ वा सन अर्बा सितैन अलफ जोगिंद्रगिरी गोसावी मुकाम मौजे निंब प्रा। वाई नजीक यास इनाम बिगे 6 ५ बदल खैराती देखील माहसूल व नख्तयाती व बाजे उजूहात व वेठबेगार कुलबाब कुलकानू दुंबाले केले असे दुंबाला कीजे यास अगर कोण्ही इस्कील करील त्यास सौगद महजबप्रमाणे असे तालीक लेहून घेऊन असल मिसली परतून दीजे इनामास हदमहदूद घालून दीजे मो। (शिक्का)
तेरीख १५ रमजान