लेखांक ११०
१५८६ मार्गशीर्ष वद्य ४
(शिक्का)
अज दिवाण ठाणे ता। तारगाउ ता। हुदेदारानि व मोकदमानि मौजे निगडी किले सतारा सु॥ खमस सितैन अलफ मोजे मजकुरी कलमनयन गोसावी मो। नीब याचे इनाम बिघे १५ पंधरा आहे त्यास हरएकविसी तसवीस ने दणे गोसावियाचे इनाम आहे जर तसवीस ने दणे उजूर न करणे मो। कुलास लाविले आहे त्यास तोसीस ने दणे मो। (शिक्का)
तेरीख १७ माहे जमादिलोवल