लेखांक १०८
१५८६ कार्तिक वद्य २
(शिक्का)
आज दिवाण पा। वाई ता। मोकदमानी मौजे निंब पा। मजकूर सु॥ सन खमस सितैन अलफ मौजे मजकूरी सदानंद गोसावी याचे मठ आहे त्यानजीक कुभार नवी जिकीर करून माती खाणताती आणि तुह्मी त्यास ताकीद करीत नाहीस यावरून मालुम होते की तुह्मी कुंभारास सागोन ऐसे अमल करविता तरी ऐसे न करणे आता सालाबाद कुभार जे जागा माती खाण(त) होते ते जागा माती खाणवणे नवी जिकीर होऊ न देणे नवी जिकीर जाहाली तुह्मी जाणा मोर्तब (शिक्का)
तेरीख १५ माहे रबिलाखर