लेखांक १०५
१५८५ वैशाख वद्य ३
सदानंद (शिक्का)
अज दिवाण किले सतारे साहेब सदर ता। हुदेदारानी हाल व इस्तकबाल व मोकदमानी व रयानी मौजे वरीया किले मजकूर बिदानद के हर्ची सुहुर सन सलास सितैन अलफ दरीविला अजरामर्हामत इनाम जोगीद्रगोसावी मोकाम मौजे निंब परगणे वाई दर नजीक यास इनाम बदल खैराती बिघे 6 ५ पाच देखील महसूल व नख्तयाती व जमे लवाजिमात व अखदुलबदिवानी व पटी सिके हुमायून व कारइमारती व बाजेपटे मुबारका व मुतखरका माखनलअमान हरीअलसुरूर व कानू व कानूनात इस्मी व रसमी व कलमी व कदमी व नकदी व जिनस खा। गला व रोगन व लवाजिमा वर्तना हकदार ठाणा देह मजकूर व पटी सादिलवार व फर्मायती वेठबेगार मोकुलबाब कुल खुर्दखत दुबाले केले असे दुबाला कीजे यास अगर कोण्ही इस्कील करील त्यास महजबप्रो। सौगद असे तालीक लेहून घेऊन असल मिसेली परतून दीजे इनामास हदमहदूद घालून दीजे मिसेलीचे उजूर हर साला न कीजे (शिक्का)
तेरीख १६ माहे रमजान